Arogya Sevak Practice Paper 05 : आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०५

Maharashtra Arogya Sevak/Arogya Sevika Practice Paper 05

कतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत १८,८३९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार आरोग्यसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण आरोग्यसेवक पदांसाठी महत्वाचे “आरोग्यविषयक व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

More:

आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०५

1. खालीलपैकी ———- पर्याय असलेला लक्षण समूह गंभीर न्युमोनिया हा आजार दर्शवितो?
A. तीव्र खोकला
B. श्वासाचा वेग वाढणे व बरगड्या आत खेचल्या जाणे
C. बेडक्यातून रक्त पडणे
D. रक्तांची उलटी होणे.
Answer: B. श्वासाचा वेग वाढणे व बरगड्या आत खेचल्या जाणे

2. कुष्ठरोगाचा कारक जंतू कोणता आहे?
A. एम. लेप्री
B. एन. इनफलुएंजा
C. एम. ट्यूबरक्युलॉसिस
D. एम. लेप्रोमॅटस
Answer: A. एम. लेप्री

3. कातडीवर कमी अधिक बधीर झालेले आणि न खाजवणारे चट्टे कोणत्या आजाराचे संशयित रुग्ण दर्शवितात? A. फंगल इनफेक्शन
B. अ जीवनसत्व कमतरता
C. बी – 12 जीवनसत्व कमतरता
D. लेप्रसी
Answer: D. लेप्रसी

4. बालकामध्ये एक वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूंना —— मृत्यू असे म्हणतात.
A. नवजात अर्भक
B.अर्भक
C. बाल
D. यापैकी नाही
Answer: B.अर्भक

5. आरोग्य विभागातील कोणता कार्यक्रम जीवनचक्राशी संबंधित सर्व सेवा देणारा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो?
A. बाल जीवित्व व सुरक्षित मातृत्व
B. प्रजनन व बाल आरोग्य
C. राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण
D. कुटुंब कल्याण कार्यक्रम
Answer: B. प्रजनन व बाल आरोग्य

6. ‘डेंगी’ हा आजार पसरविण्यास कारणीभूत ठरणारा डासाचा प्रकार कोणता?
A. अॅनाफिलीस
B. एडिस इजिप्ती
C. एडिस क्युलिफीकन्स
D. क्युलेक्स
Answer: B. एडिस इजिप्ती

7. लसीच्या कुपीवरील व्ही. व्ही. एम. ( VVM) म्हणजे काय ?
A. वॅक्सिन व्हायल मॉनिटर’
B. वॅक्सिन व्हायटल मॉनिटर
C. वॅक्सिन व्हेईकल मॉनिटर
D. वॅक्सिन व्हरायटी मॉनिटर
Answer: A. वॅक्सिन व्हायल मॉनिटर’

8. गरोदर मातेस सध्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात कोणती लस देतात?
A. टी.टी.
B. टी. डी.
C. डी. पी. टी.
D. यापैकी सर्व
Answer: A. टी.टी.

9. बालकामध्ये बी.सी.जी. लस खालीलपैकी कोणत्या प्रकारे देतात ?
A. इंट्राडर्मल
B. इंट्रामस्कुलर
C. सबक्युटॅनियस
D. इंट्राव्हेनस
Answer: A. इंट्राडर्मल

10. त्वचेवर लालसर पुरळ व ताप हे ————- आजारांचे लक्षण असू शकते.
A. डेंगी व गोवर
B. डेंगी व मलेरिया
C. डेंगी व मेंदू आवरण दाह
D. यापैकी नाही
Answer: A. डेंगी व गोवर

11. 9 महिने पूर्ण झालेल्या बालकास अ जीवनसत्वाची मात्रा खालीलपैकी कोणत्या पर्यायानुसार देणे योग्य आहे?
A. 2 लाख IU
B. 1.5 लाख IU
C. 1 लाख IU
D. 03 लाख IU
Answer: C. 1 लाख IU

12. आजार व त्यावरील लसीच्या अचूक जोड्या लावा.
अ गट ब गट
अ) गोवर रुबेला अ) HBV
ब) पोलिओ ब) RVV
क) हिपॅटायटीस ब (कावीळ) क) MR
ड) रोटा विषाणू अतिसार ड) OPV व IPV
A.अक, बड, कअ, डब
B. अअ, बब कक, डड
C. अब, बक, कड, डअ
D. अड, बअ, कब, डक
Answer: A.अक, बड, कअ, डब

13. वजनवाढ व लठ्ठपणा यामुळे खालील आजारांचा धोका संभावतो?
A. संधिवात, गलगंड
B. न्युमोनिया, सांध्याची झीज
C.मधुमेह व हृदयविकार
D. यापैकी नाही
Answer: C.मधुमेह व हृदयविकार

14. बॉडीमास इंडेक्स (BMI) मध्ये शरीरातील कोणत्या घटकांचे अंदाजित प्रमाण दर्शविले जाते?
A. प्रथिने
B. चरबी
C. रक्तशर्करा
D. थायरॉईड हार्मोन
Answer: B. चरबी

15. भारतामध्ये सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा (COTPA) कधी लागू झाला?
A.2003
B. 2009
C. 2008
D. यापैकी नाही
Answer: A.2003

16. क्षयरोगामध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराची देखील तपासणी करणे आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचे आहे?
A. सी. टी. स्कॅन
B. एच. आय. व्ही. टेस्ट
C. एम. आर. आय तपासणी
D. यापैकी नाही
Answer: B. एच. आय. व्ही. टेस्ट

17. लहान बालकांमधील कोणती चाचणी क्षयरोगाच्या निदानासाठी उपयुक्त ठरते?
A. हिमोग्लोबिन
B. ट्युबरक्युलोमा
C. ट्युबरक्युलीन स्किन टेस्ट
D. थायरॉईड हार्मोन तपासणी
Answer: C. ट्युबरक्युलीन स्किन टेस्ट

18. क्षयरोगाच्या निदानासाठी बेडका नमुनांबाबत कोणती पद्धत अचूक आहे?
A. दोन बेडका नमुने, स्पॉट व सकाळचा
B. एक बेडका नमुना, सकाळचा
C. तीन बेडका नमुना
D. यापैकी नाही
Answer: A. दोन बेडका नमुने, स्पॉट व सकाळचा

19. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना कोणता आर्थिक लाभ दिला जातो?
A. रु.5000/- ऐवढी रक्कम रोख स्वरूपात.
B. रु.5000/- ऐवढी रक्कम चेक स्वरूपात.
C. रु. 5000/- ऐवढी रक्कम तीन हप्त्यात आधार संलग्न बँक/पोस्ट खात्यात.
D. रु.5000/- ऐवढी रक्कम दोन हप्त्यात आधार संलग्न बँक / पोस्ट खात्यात.
Answer: C. रु. 5000/- ऐवढी रक्कम तीन हप्त्यात आधार संलग्न बँक/पोस्ट खात्यात.

20. एच. आय. व्ही. (HIV) म्हणजे काय?
A.ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस
B. ह्यूमन इम्युनो डिसीज व्हायरस
C. हेरिडेटरी इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस
D. यापैकी नाही
Answer: A.ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस

21. एच. आय. व्ही. (HIV) बाबत पुढीलपैकी कोणती चाचणी निर्णायक स्वरूपाची मानली जाते?
A. एलम्बझा
B. हार्मोनल टेस्ट
C. वेस्टर्न ब्लॉट
D. इम्युनोॲसे टेस्ट
Answer: C. वेस्टर्न ब्लॉट

22. भारतात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत?
A.12
B.10
C. 8
D. 6
Answer: A.12

23. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत ओरल पोलिओची लस बालकांना—– वर्षापर्यंत देता येते.
A. दोन
B. पाच
C. एक
D. यापैकी नाही
Answer: B. पाच

24. खालीलपैकी ———- या परिस्थितीमध्ये बालकांना लस देवू नये.
A. कमी वजनाचे बाळ
B. सिझेरियन प्रसूतीद्वारे जन्माला आलेले बाळ
C. हलका ताप, सर्दी व खोकला
D. लसीचा एखादा डोस दिल्यानंतर अॅलर्जी दिसून आल्यास.
Answer: D. लसीचा एखादा डोस दिल्यानंतर अॅलर्जी दिसून आल्यास.

25. सामान्यतः प्रौढ व्यक्तीचे नाडीचे ठोके प्रति मिनटास ——–असतात.
A.60 ते 90
B. 40 ते 50
C. 100 ते 130
D. 100 ते 110
Answer: A.60 ते 90

26. गरोदर मातेच्या वजनात एका महिन्यामध्ये 3 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त वाढ होत असल्यास या आजाराचे लक्षण मानले जाते?
A. मधुमेह, हृदयविकार, तीव्र रक्तक्षय
B. प्रीएक्लॅपसिया, जुळीगर्भधारणा, मधुमेह
C. मधुमेह, उच्च रक्तदाब
D. यापैकी नाही
Answer: B. प्रीएक्लॅपसिया, जुळीगर्भधारणा, मधुमेह

27. कीटकजन्य आजारामध्ये ————– या आजाराचा समावेश होत नाही?
A. हिवताप
B. रिकेटाशिअल ताप (स्क्रबटायफस)
C. चिकनगुनिया
D. स्वाईन फ्लू
Answer: D. स्वाईन फ्लू

28. गर्भवती मातेला रक्तक्षय प्रतिबंधक गोळ्यांचा उपचार सामान्यतः ———आठवड्यापासून सुरू करावा?
A. 09 ते 10
B. 10 ते 11
C. 14 ते 16
D. यापैकी नाही
Answer: C. 14 ते 16

29. मेंदूचे प्रामुख्याने हे तीन भाग आहेत?
A. अग्रप्रमस्तिष्क, मध्यमेंदू, मस्तिष्कपुच्छ
B. मज्जारज्जू, मध्यवर्ती चेतासंस्था, चेतातंतू
C. चेतापेशी, मस्तिष्कपुच्छ, अग्रप्रमस्तिष्क
D. यापैकी नाही.
Answer: A. अग्रप्रमस्तिष्क, मध्यमेंदू, मस्तिष्कपुच्छ

30. निकटदृष्टिता या दृष्टिदोषात ————- भिंगाचा चष्मा वापरावा लागतो?
A. बहिर्वक्र
B. अंतर्वक्र
C. काचगोलक
D. यापैकी नाही
Answer: B. अंतर्वक्र

31. दूषित पाणी पिल्याने होणाऱ्या रोगांचा अचूक पर्याय निवडा?’
A.विषमज्वर, आमांश
B. कॉलरा, हिपॅटायटिस-ब प्रकारची कावीळ
C. विषमज्वर व घटसर्प
D. विषमज्वर व डांग्या खोकला
Answer: A.विषमज्वर, आमांश

32. पुढीलपैकी ———- जीवनसत्व हाडांच्या बळकटीसाठी महत्त्वाचे आहे.
A. के
B. इ
C. क
D.ड
Answer: D.ड

33. स्निग्ध पदार्थाचा प्रमुख स्रोत ———- आहे.
A. तांदूळ, गहू, मका
B. शेंगदाणे, वनस्पती तूप,
C. अक्रोड, दूध, दुग्धजन्य पदार्थ
D. यापैकी नाही.
Answer: B. शेंगदाणे, वनस्पती तूप,

34. ———-या खनिजाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो.
A. पोटॅशियम
B. कॅल्शियम
C. लोह
D. सोडियम
Answer: C. लोह

35. मलेरिया आजारावर ———- हे प्रभावी औषध आहे.
A. क्लोरोक्विन
B. टेट्रासायक्लिन
C. नायट्रोग्लिसरीन
D. यापैकी नाही
Answer: A. क्लोरोक्विन

36. आशा कार्यकर्तीची नेमणूक बिगर आदिवासी ग्रामीण भागामध्ये सामान्यतः ———– लोकसंख्येसाठी असते.
A. 500
B. 1000
C. 5000
D. 1500
Answer: D. 1500

37. लहान बालकांमध्ये होणाऱ्या श्वसनदाह या आजारावर ——— हे स्वस्त व परिणामकारक औषध आहे.
A. अम्पीसीलीन
B. सेप्ट्रान
C. सेफिक्झाईम
D. टेट्रासायक्लिन
Answer: A. अम्पीसीलीन

38. अतिसारामधील मध्यम प्रकारची जलशुष्कता बरी करण्यासाठी ———- हा परिणामकारक उपाय आहे?
A. घरगुती पातळ पदार्थ व ओ. आर. एस.
B. शिरेवाटे सलाईन
c. ओ. आर. एस.
D. यापैकी नाही.
Answer: c. ओ. आर. एस.

39. ‘कांगारू मदर केअर’ ही उपचार पद्धती ———– बालकांसाठी परिणामकारक आहे.
A. तीव्र अतिसार ग्रस्त
B. कमी वजनाची बालके
C. मतिमंद
D. जन्मजात व्यंग
Answer: B. कमी वजनाची बालके

40. गृहभेटीमध्ये लहान बालकामध्ये खालीलपैकी ———- लक्षण आढळल्यास तात्काळ संदर्भ सेवा सुचवावी लागते.
A. अचानक आलेला स्नायुंचा लुळेपणा
B. गुंगीतील किंवा बेशुद्धावस्था
C. सात दिवसापेक्षा जास्त ताप
D. यापैकी सर्व
Answer: D. यापैकी सर्व


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT