Arogya Sevak Practice Paper 01: आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०१

Maharashtra Arogya Sevak/Arogya Sevika Practice Paper 01

कतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत १८,८३९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार आरोग्यसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण आरोग्यसेवक पदांसाठी महत्वाचे “आरोग्यविषयक व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०१

1. प्लेग हा आजार ———– ह्या जिवाणुमुळे होतो.
A. येरसिनियापेस्टीस
B. हिमोफिलस एन्फल्युएन्झा
C. स्ट्रप्टोकॉकफि फालिस
D. व्हिब्रीआ कॉलेरी
ANSWER: A. येरसिनियापेस्टीस

2. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत गर्भवती मातेला किती रुपये लाभ दिला जातो?
A. 4000 रुपये
B.5000 रुपये
C. 3000 रुपये
D. 1000 रुपये
ANSWER: B.5000 रुपये

More Practice Paper:

3. ‘Pentavalent’ ही रोग प्रतिबंधक लस खालीलपैकी एका रोगावर वापरत नाही?
A. रुबेला
B. डिप्थेरिया
C. हिप्याटाईटीस
D. टिटयानस
ANSWER: A. रुबेला

4. गरोदर मातेला दिली जाणारी लस?
A. DPT
B. BCG
C.TT
D. Polio
ANSWER: C.TT

5. DOTS ही उपचार पद्धती या ———- रुणांकरिता दिली जाते.
A. हिवताप
B. हत्तीरोग
C. कुष्ठरोग
D. क्षयरोग
ANSWER: D. क्षयरोग

6. डेंगू हा आजार खालील डासाचे दंशामुळे होतो.
A. अॅनाफिलीस
B.एडीस इजिप्ती
C. क्युलेक्स
D. यापैकी नाही
ANSWER: B.एडीस इजिप्ती

7. खालीलपैकी कोणत्या फळामध्ये सर्वात जास्त Vit. C असते.
A. आवळा
B. लिंबू
C. द्राक्षे
D.संत्रा
ANSWER: A. आवळा

8. राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम (NVBDCP) अंतर्गत खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश नाही.
A. काळा आजार
B. हत्तीरोग
C. जपानी मेंदूदाह
D. विषमज्वर
ANSWER: D. विषमज्वर

9. ‘Albendazole’ ही औषधी ——— साठी वापरली जाते.
A. कृमी
B. क्षयरोग
C. हिवताप
D. स्वाईन फल्यु
ANSWER: A. कृमी

10. एम. बी. कुष्ठरोगासाठी बहुविध औषधोपचार (MDT) किती कालावधी करीता देतात.
A. 2 महिने
B. 6 महिने
C. 9 महिने
D. 12 महिने
ANSWER: D. 12 महिने

11. 1 ग्रॅम स्निग्धापासून किती किलो कॅलरीज उष्मांक मिळतात?
A. 4
B.9
C. 12
D. 15
ANSWER: B.9

12. चीकदुध (Colostrum) पाजल्यामुळे होणारे फायदे-
A. प्रथिने व जीवनसत्वे मिळतात.
B. बाळाच्या आतड्याची वाढ होते.
C. वरीलपैकी एकही नाही
D. अ व ब
ANSWER: A. प्रथिने व जीवनसत्वे मिळतात.

13. मुलांमध्ये गंभीर कुपोषण आहे हे डाव्या हाताचा दंडघेर किती असल्यास दर्शविते?
A. 11.5 सें.मी. ते 12.5 सें.मी.
B. > 12.5 सें.मी.
C. <11.5 सें.मी.
D. 12.5 सें.मी. ते 13.5 सें.मी.
ANSWER: C. <11.5 सें.मी.

14. अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवकाची जबाबदारी खालीलपैकी नाही.
A. कार्यक्षेत्रातील जीवनसत्व अ ची कमतरता असलेली मुले शोधणे.
B. आहारात जीवनसत्व ‘अ’ चे महत्त्व सांगणे.
C. ‘अ’ जीवनसत्वाच्या औषधाच्या साठ्याचा नोंद करणे.
D. 6 ते 15 वयोगटातील लाभार्थ्यांना दर 6 महिन्यांनी जीवनसत्व ‘अ’ची मात्रा पाजणे.
ANSWER: D. 6 ते 15 वयोगटातील लाभार्थ्यांना दर 6 महिन्यांनी जीवनसत्व ‘अ’ची मात्रा पाजणे.

15. नवजात अर्भक मृत्यू म्हणजे वयाचे ——– दिवस पुर्ण होण्यापूर्वी झालेला मृत्यू
A. 7
B. 21
C. 28
D. 42
ANSWER: C. 28

16. ग्रामीण भागातील मृत्युची नोंद कोणत्या कार्यालयात करतात?
A. प्रा.आ.केंद्र
B. उपकेंद्र
C. ग्रामपंचायत
D. ग्रामीण रुग्ण
ANSWER: C. ग्रामपंचायत

17. भारतात होणाऱ्या माता मृत्युचे सर्वात प्रमुख कारण-
A. रक्तस्राव
B. रक्तक्षय
C. गर्भपात
D. जंतुदोष
ANSWER: A. रक्तस्राव

18. नवजात बालकाचे वजन ——- पेक्षा कमी असल्यास त्याला कमी वजनाचे बाळ म्हणतात.
A. 2500 ग्रॅम
B. 2700 ग्रॅम
C. 2900 ग्रॅम
D. 3000 ग्रॅम
ANSWER: A. 2500 ग्रॅम

19. खालीलपैकी कोणत्या D वर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामध्ये भर देण्यात आलेला नाही.
A.Dose Retention
B. Deficiencies
C. Development Disorder
D. Disabilities
ANSWER: A.Dose Retention

20. गरोदर मातांची नोंदणी सरकारी दवाखान्यात किती आठवड्यात करणे आवश्यक आहे.
A. 12 आठवडे
B. 24 आठवडे
C. 28 आठवडे
D. 30 आठवडे
ANSWER: A. 12 आठवडे

21. सामान्य रक्तदाब म्हणजे –
A. 120/80 mmHg
B. 100 / 80 mmHg
C. 130/80 mmHg
D. 140 / 80 mmHg
ANSWER: A. 120/80 mmHg

22. ———- हा रोग व्यावसायिक रोग (Occupational Disease) आहे.
A. सिलीकासीस
B. मलेरिया
C. विषमज्वर
D. मधुमेह
ANSWER: A. सिलीकासीस

23. मानसिक आरोग्याबाबतीतचा सर्वे करण्याकरिता गावपातळीवर कोणते आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतात.
A. आशा वर्कर
B. आरोग्य सेवक
C. आरोग्य सेविका
D. वरीलपैकी सर्व
ANSWER: D. वरीलपैकी सर्व

24. पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनचे द्रावण पाण्यात विरघळल्यानंतर जतुंचा संपुर्ण नायनाट होण्यासाठी ——— मिनीटांचा कालावधी लागतो.
A. 30
B. 60
C. 90
D. 120
ANSWER: B. 60

25. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी गरोदर मातेची प्रसुती आरोग्य संस्थेत झाल्यास किती रुपये लाभ दिला जातो?
A. 500
B. 600
C. 700
D.800
ANSWER: B. 600

26. ‘सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना’ बंद होऊन त्याऐवजी सध्या कोणती योजना सुरू आहे?
A. महात्मा ज्योतिबा फुले योजना
B. माझी कन्या भाग्यश्री योजना
C. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना
D. प्रधानमंत्री मातृवंदन योजना
ANSWER: B. माझी कन्या भाग्यश्री योजना

27. दवाखान्यात प्रसुती झाल्यास बाळाला किती तासाच्या आत Hepatitis B ची लस देण्यात येते. –
A. 24
B. 36
C. 72
D. 48
ANSWER: A. 24

28. हिस्टेरिया या आजारात रोगी –
A. बेशुद्धीचे ढोंग करतो
B. पुर्णपणे बेशुद्ध असतो.
C. अर्धवट बेशुद्ध असतो.
D. यापैकी नाही
ANSWER: A. बेशुद्धीचे ढोंग करतो

29. प्रथिने हे ——- अन्न आहे.
A. ऊर्जा उत्पादक
B. शरीर निर्माणक
C. शरीर संरक्षक
D. यापैकी नाही
ANSWER: B. शरीर निर्माणक

30. रक्तातील हिमोग्लोबीनमध्ये ———– धातु असतो.
A. झिंक
B. लोह
C. तांबे
D. यापैकी नाही.
ANSWER: B. लोह

31. कमी सोडियम युक्त आहार ——— आजारात हितकर असतो.
A. मधुमेह
B. कर्करोग
C. उच्च रक्तदाब
D. यापैकी नाही
ANSWER: C. उच्च रक्तदाब

32. ——– च्या कमतरतेमुळे गलगंड आजार होतो.
A. लोह
B. आयोडिन
C. कॅल्शिअम
D. झिंक
ANSWER: B. आयोडिन

33. सेंटक्रोमेन (छाया) गोळीचा वापर ———- करिता होतो.
A. उच्च रक्तदाब
B. थायराईड
C. गर्भनिरोधक
D. यापैकी नाही
ANSWER: C. गर्भनिरोधक

34. खालीलपैकी कोणत्या आजार हवेद्वारे पसरतो?
A. टायफॉईड
B. डोळे येणे
C. काजण्या
D. कॅन्सर
ANSWER: B. डोळे येणे

35. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य नाही?
A. कॅन्सर
B. रिकेट्स
C. मधुमेह
D. वरीलपैकी सर्व
ANSWER: D. वरीलपैकी सर्व

36. हिमोफिलिया हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आजार आहे?
A. संसर्गजन्य आजार
B. व्यवसायजन्य आजार
C. चयापचयजन्य आजार
D. अनुवंशिक आजार
ANSWER: D. अनुवंशिक आजार

37. गॉयटर (Goitre) हा विकार कशाच्या कमतरतेमुळे होतो?
A. आर्यन
B. झिंक
C. आयोडिन
D. प्रोटीन
ANSWER: C. आयोडिन

38. ‘जागतिक एड्स दिन’ कधी असतो?
A. 20 डिसेंबर
B. 1 डिसेंबर
C. 1 जून
D. 1 मे
ANSWER: B. 1 डिसेंबर

39. अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात.
A. पिवळा बलक
B. पांढरा बलक
C. कवच
D. यापैकी नाही
ANSWER: B. पांढरा बलक

40. विडाल (Widal) चाचणी कोणत्या आजारासाठी वापरले जाते.
A. टायफाईड
B. कावीळ
C. क्षयरोग
D. कुष्ठरोग
ANSWER: A. टायफाईड


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT