Arogya Sevak Practice Paper 04 : आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०४

Maharashtra Arogya Sevak/Arogya Sevika Practice Paper 04

कतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत १८,८३९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार आरोग्यसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण आरोग्यसेवक पदांसाठी महत्वाचे “आरोग्यविषयक व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०४

 

1. खालीलपैकी एकात्मिक बालविकास योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
A. गरोदर माता
B. 6 वर्षापर्यंतची बालके
C.A व B
D. 30 वर्षावरील सर्व महिला
ANSWER: C.A व B

2. ‘आयुष’ शब्दात खालीलपैकी कोणत्या वैद्यकशास्त्रांचा समावेश आहे.
A. आयुर्वेद
B. युनानी
C. सिद्ध
D. वरीलपैकी सर्व
ANSWER: D. वरीलपैकी सर्व

3. एक हजार ————- मागे ———- च्या संख्येला लिंग प्रमाण (sex ratio) असे म्हणतात.
A.पुरुष, स्त्रिया
B. स्त्री, पुरुष
C. स्त्री, मुली
D. यापैकी नाही
ANSWER: A.पुरुष, स्त्रिया

More:

4. नगरपरिषदेच्या क्षेत्रात जन्ममृत्यू नोंदविण्याची जबाबदारी …… यांची असते.
A. जिल्हा शल्य चिकित्सक
B. जिल्हा आरोग्य अधिकारी
C. मुख्याधिकारी नगरपरिषद
D. जिल्हाधिकारी
ANSWER: C. मुख्याधिकारी नगरपरिषद

5. जन्मानंतर बाळाला पहिले ———- महिने निव्वळ मातेने स्तनपान द्यावे.
A. 12 महिने
B. 18 महिने
C. 6 महिने
D. यापैकी नाही
ANSWER: C. 6 महिने

6. अतिसारामध्ये होणारे मृत्यू ———-मुळे होतात.
A. जलशुष्कता
B. जलसंवर्धन
C. जलावरण
D. यापैकी नाही.
ANSWER: A. जलशुष्कता

7. अल्पवयीन विवाहाचे तोटे लक्षात घेऊन भारत सरकारने 1978 च्या बालविवाह नियंत्रण कायद्यानुसार ————- वयापेक्षा कमी मुलगा व ———— वयापेक्षा कमी मुलगी यांचे विवाहास बंदी घातली आहे.
A. 21 वर्षे, 18 वर्षे
B. 18 वर्षे, 21 वर्षे
C. 21 वर्षे, 25 वर्षे
D. यापैकी नाही
ANSWER: A. 21 वर्षे, 18 वर्षे

8. गर्भधारणेनंतर 28 आठवड्यापुर्वी गरोदर अवस्था नष्ट होणे किंवा गर्भाशयातील वाढत असलेला गर्भ काढण्याच्या पद्धतीला ——- म्हणतात.
A. गर्भपात
B. गरोदरपात
C. गर्भक्रिया
D. गर्भमृत्यु
ANSWER: A. गर्भपात

9. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाअंतर्गत शौचालय बांधकामासाठी ———-एवढे अनुदान दिले जाते.
A. 12,000 रुपये
B. 1, 50,000 रुपये
C. 15,000 रुपये
D. 10,000 रुपये
ANSWER: A. 12,000 रुपये

10. एड्स (AIDS) हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो?
A. ह्युमन इम्युनो डेफिसिएन्सी व्हायरस (HIV)
B. ह्युमन इमेज डेफिमिन व्हायरस (HIV)
C. ह्युमन इमेज डिविजन व्हायरस (HIV)
D. यापैकी नाही
ANSWER: A. ह्युमन इम्युनो डेफिसिएन्सी व्हायरस (HIV)

11. रुग्णवाहिका सेवा मिळविण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे.
A. 102
B. 103
C. 107
D.108
ANSWER: D.108

12. पाण्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे?
A. H2O
B. H2O2
C. HCL
D. HO2
ANSWER: A. H2O

13. आपल्या शरीरातील ——- हे आम्ल असते, जे आपले आनुवंशिक गुण ठरवते.
A. DNA
B. NDA
C. DNS
D. DND
ANSWER: A. DNA
14. ———- या रक्तगटाचे लोक त्यांचे रक्त सर्व रक्त गटाच्या व्यक्तींना देऊ शकतात म्हणून त्यांना ‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.
A. O
B. AB
C. A
D. B
ANSWER: A. O

15. ———- हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे.
A. सूर्य
B. चंद्र
C. दगडी कोळसा
D. अण्विक ऊर्जा
ANSWER: A. सूर्य

16. वस्तूचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरली जाते व वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी हे उपकरण वापरले जाते.
A. कॅलरीमापी
B. तापमापी
C. पारामापी
D. उष्मामापी
ANSWER: A. कॅलरीमापी

17. पृथ्वीवर ———- भाग पाण्याने व्यापला असून फक्त ——— भागावर जमीन आहे.
A. 71%, 29%
B. 29%, 71%
C. 50%, 50%
D. यापैकी नाही
ANSWER: A. 71%, 29%

18. सुर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या ——— पासून ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो.
A. अतिसार किरणे
B. अतिनील किरणे
C. अतितीव्र किरणे
D. जीवनसत्वहीन किरणे
ANSWER: B. अतिनील किरणे

19. गाईच्या दूधामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण, म्हशीच्या दूधापेक्षा ——— असते.
A. कमी
B. जास्त
C. समान
D. यापैकी नाहीं
ANSWER: A. कमी

20. या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केली जाते व त्यांची किंमत ब्रॅन्डेड औषधांच्या किंमतीपेक्षा तुलनेने खूप कमी असते.
A. जनरल औषधे
B. जैनेरिक औषधे
C. जनरल ब्रॅन्ड औषध
D. सरकारी कंपनी निर्मित सर्व औषधे
ANSWER: B. जैनेरिक औषधे

21. बेडूक हा प्राणी ——- आहे.
A. जलचर
B. उभयचर
C. सरीसृप
D. समचर
ANSWER: B. उभयचर

22. ही लस जन्मानंतर लगेच किंवा सहा आठवड्याचे आत टोचली जाते व या लसीमुळे क्षयरोगविरुद्ध मिळणारी प्रतिकार शक्ती साधारणपणे 80% इतकी असून ती 15 वर्षे टिकते.
A.बी.सी.जी.
B. ओरल पोलिओ
C. मीसल्स रुबेला
D. यापैकी नाही
ANSWER: A.बी.सी.जी.

23. ———- या रोगात इन्सुलीनचे प्रमाण कमी होऊन रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
A. रक्तक्षय
B. मधुमेह
C. जठरप्रण
D. कर्करोग
ANSWER: B. मधुमेह

24. आहारातील या खनिज द्रव्याच्या कमतरतेने गलगंड तसेच शारीरिक व मानसिक अपंगत्वाचे विकार होतात.
A. केरोटीन
B. लोह
C आयोडीन
D. मॅनगीज
ANSWER: C आयोडीन

25. साधारणपणे आपल्या आहारातील 65 ते 80% उष्मांक हा ———– पासून मिळतात.
A. स्निग्ध पदार्थ
B. कर्बोदके
C. पिष्ठमय पदार्थ
D. तंतुमय पदार्थ
ANSWER: B. कर्बोदके

26. विहीरीतील पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी 1000 लीटर पाण्यासाठी ———- ग्रॅम याप्रमाणे विरंजक चूर्ण घ्यायला हवे.
A. 2 ग्रॅम
B. 5 ग्रॅम
C. 10 ग्रॅम
D. 15 ग्रॅम
ANSWER: B. 5 ग्रॅम

27. ———- हे मासे डासांच्या अळ्यांना खातात असे आढळले आहे.
A. गप्पी मासे
B. रोइ मासे
C. कटला मासे
D. कासव मासे
ANSWER: A. गप्पी मासे

28. वर्णकहीनता हा एक जनुकीय आजार आहे. या विकारामध्ये शरीर ———– हे वर्णक (रंगद्रव्य) तयार करू शकत नाही.
A. डी. एन. ए.
B. आर. एन. ए.
C. मैलॅलीन
D. सिकलसेल
ANSWER: C. मैलॅलीन

29. सीमा ही 21 वर्षांची आहे. तिची शेवटची पाळीची तारीख 2 जानेवारी आहे. तरी प्रसूतिची अपेक्षित तारीख कोणती?
A. 9 सप्टेंबर
B. 9 ऑक्टोबर
C. 9 नोव्हेंबर
D. 9 डिसेंबर
ANSWER: B. 9 ऑक्टोबर

30. जन्मापासून 28 दिवसाच्या आत अर्भकाचा मृत्यू झाल्यास त्यास ———– असे म्हणतात.
A. नवजात अर्भक मृत्यू
B. लहान बाल मृत्यू
C. उपजत मृत्यू
D. यापैकी नाही
ANSWER: A. नवजात अर्भक मृत्यू

31. सूर्यकिरणांचा त्वचेशी संपर्क झाल्यावर त्वचेखाली ———– तयार होते.
A. जीवनसत्व अ
B. जीवनसत्व ब
C. जीवनसत्व क
D जीवनसत्व ड
ANSWER: D जीवनसत्व ड

32. हृदयरोगामध्ये रक्तातील ———- चे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त वाढते.
A. अमोनिया
B ऑक्सिजन
C. कोलेस्ट्रॉल
D. प्रथिने
ANSWER: C. कोलेस्ट्रॉल

33. खालीलपैकी कुपोषणाची कारणे ओळखा.
1. गरीबी
2. लोकसंख्या वाढ
3. आहाराविषयी अज्ञान
4. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव
A. केवळ 1, 2 व 3
B. केवळ 1, 2 व 4
C. सर्व पर्याय बरोबर
D. सर्व पर्याय अयोग्य
ANSWER: A. केवळ 1, 2 व 3

34. रेबीज हा ———– रोग आहे.
A. विषाणूजन्य
B. संसर्गजन्य
C. हवाजन्य
D. पाणीजन्य
ANSWER: A. विषाणूजन्य

35. स्वाईन फ्लूचा संसर्ग———- या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो.
A. डुक्कर
B. माकड
C. कुत्रा
D. घोडा
ANSWER: A. डुक्कर

36. ———- प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो.
A. एडिस इजिप्ती
B. एडिस पाकिस्तानी
C. अॅनाफिलीस
D. क्युलेक्स
ANSWER: A. एडिस इजिप्ती

37. खालील पर्यायातून वेगळा शब्द ओळखा.
A. हिवताप
B. कावीळ
C. हत्तीरोग
D. डेंग्यू
ANSWER: B. कावीळ

38. खालील पर्यायातून वेगळा शब्द ओळखा.
A. प्लेग
B. एड्स
C. कॉलरा
D. क्षय
ANSWER: B. एड्स

39. ———- हा वायू ज्वलनाला मदत करतो.
A. ऑक्सिजन
B. कार्बन डायऑक्साईड
C. दोन्ही पर्याय बरोबर
D. दोन्ही पर्याय चूक
ANSWER: A. ऑक्सिजन

40. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनीटात ———- ठोके पडतात.
A.72
B. 82
C. 100
D. 60
ANSWER: A.72


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT