Arogya Sevak Practice Paper 02 : आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०२

Maharashtra Arogya Sevak/Arogya Sevika Practice Paper 02

कतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत १८,८३९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार आरोग्यसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण आरोग्यसेवक पदांसाठी महत्वाचे “आरोग्यविषयक व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०२

1.आर्थोटोल्युडिन टेस्ट (OT) कशासाठी करतात?
A. पाण्यातील जीवाणू तपासणीसाठी
B. पाण्यातील विरघळलेले मिनरल तपासण्यासाठी
C. पाण्यातील मुक्त क्लोरिनचे प्रमाण तपासण्यासाठी
D. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी
ANSWER: C. पाण्यातील मुक्त क्लोरिनचे प्रमाण तपासण्यासाठी

2.खालीलपैकी कोणती समिती आरोग्य सेवा सुधारणा समिती नाही?
A. केळकर समिती
B. मुदलियार समिती
C. कर्तारसिंह समिती
D. मुखर्जी समिती
ANSWER: A. केळकर समिती

More:

3. भारत सरकारने “राष्ट्रीय आरोग्य धोरण” कधी जाहीर केले होते?’
A. 2000
B. 2002
C. 2005
D. 2010
ANSWER: B. 2002

4. राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश होत नाही?
A. हिवताप
B. क्षयरोग
C. हत्तीरोग
D. जपानी मेंदूदाह
ANSWER: B. क्षयरोग

5. मलेरिया / हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अति संवेदनशील भाग ———– गटातील किटकनाशकाद्वारे फवारणी करतात.
A. DDT (डी. डी. टी.)
B. क्लोरीक्युनीन
C. अँटीरिट्रोव्हियल
D. सिंथेटीक पायरेथ्राईड
ANSWER: D. सिंथेटीक पायरेथ्राईड

6. हत्तीरोग कोणत्या किटकाच्या माध्यमातून होतो?
A. मच्छर
B. ढेकूण
C. सँडप्लाय
D. माशी
ANSWER: A. मच्छर

7. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती उष्मांक ऊर्जा मिळते?
A. 4
B. 7
C. 9
D. 12
ANSWER: C. 9

8. खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व तेलात विरघळणारी नाही?
A. अ
B. इ
C. ड
D.ब
ANSWER: D.ब

9.सुजवटी (Kwashiorkor) हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो?
A.प्रथिने
B. उष्मांक
C. जीवनसत्त्व
D. स्निग्ध पदार्थ
ANSWER: A.प्रथिने

10. स्कर्व्ही हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?
A. अ
B. ब
C. क
D. ड
ANSWER: C. क

11.मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?
A. अ
B. ब
C. क
D. ड
ANSWER: D. ड

12. कुपोषण निमुर्लन करिता ग्रामबाल विकास केंद्र (VCDC) कुठे भरते?
A. उपकेंद्र
B. आरोग्यवर्धीनी केंद्र
C. प्राथमिक आरोग्य केंद्र
D. अंगणवाडी
ANSWER: D. अंगणवाडी

13. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून मायक्रो ट्युबरक्युलासीस या ——— मुळे होतो?
A. जीवाणू
B. विषाणू
C. जंतू
D. कृमी
ANSWER: A. जीवाणू

14. DOT’S औषध प्रणाली कोणत्या आजारामध्ये वापरली जाते?
A. हिवताप
B. टी.बी.
C. मधुमेह
D. कॅन्सर
ANSWER: B. टी.बी.

15. खालील कोणत्या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगाची संस्था 10,000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त आहे?
A. गडचिरोली
B. वर्धा
C. बीड
D. नागपूर
ANSWER: A. गडचिरोली

16. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे एड्स होत नाही?
A. असुरक्षित यौन संबंध
B. दूषित रक्त पुरवठा
C. दूषित इंजेक्शनचा पुन्हा वापर
D. हस्तांदोलन केल्यामुळे
ANSWER: D. हस्तांदोलन केल्यामुळे

17. एड्स उपचाराकरिता कोणत्या गटातील औषधे वापरतात.
A. ACT
B.ART
C. CTC
D. RTI
ANSWER: B.ART

18. खालीलपैकी कोणती आरोग्य सेवा केंद्र जिल्हा आरोग्य PS अधिकारी (जि.प.) यांच्या नियंत्रणाखाली नाही.
A. ग्रामीण रुग्णालय
B. उपकेंद्र
C. प्राथमिक आरोग्य केंद्र
D. फिरते आरोग्य केंद्र
ANSWER: A. ग्रामीण रुग्णालय

19. खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते?
A.BCG
B. TT
C. DPT
D. Vitamin-A
ANSWER: A.BCG

20.गोवरची लस लहान मुलाला कधी देतात?
A. जन्मत:
B. 6 महिने
C.9 ते 12 महिने
D. दिडवर्ष झाल्यावर
ANSWER: C.9 ते 12 महिने

21. दवाखान्यामध्ये संसर्गजन्य टाकावू वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकतात?
A. पिवळे
B. लाल
C. काळ्या
D. निळा
ANSWER: B. लाल

22. खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी / अन्नाद्वारे होत नाही.
A. पटकी
B. कावीळ
C. अॅमीब्रीयासीस
D. गोवर
ANSWER: D. गोवर

23. डेंग्युचा आजार डासाच्या कोणत्या प्रजातीमुळे होतो?
A. एडिस इजिप्ती
B. क्युलेक्स
C. अॅनॉफिलीस
D. सँड फ्लाय
ANSWER: A. एडिस इजिप्ती

24. खालीलपैकी BMI काढण्याचे सूत्र आहे?
A. (वजन) kg / (उंची) m
B. (वजन) kg / (उंची)2 m
C. C. (वजन) kg / (उंची) cm
D. (वजन) kg (उंची)2 cm
ANSWER: B. (वजन) kg / (उंची)2 m

25. आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचा काय निकष आहे?
A. 3000 आदिवासी, 5000 बिगर आदिवासी भागात.
B. 5000 आदिवासी, 7500 बिगर आदिवासी भागात
C. 7500 आदिवासी, 9000 बिगर आदिवासी भागात
D. 10000 आदिवासी, 15000 बिगर आदिवासी भागात
ANSWER: A. 3000 आदिवासी, 5000 बिगर आदिवासी भागात

26 वायुद्वारे निर्जंतूणीकरणाकरिता काय वापरतात?
A. फॉरमाल्डेहाईड
B. हायड्रोक्लोरिक ऑसड
C. प्रायमाथ्रीन
D. क्लोरीन गॅस
ANSWER: A. फॉरमाल्डेहाईड

27. स्वाईन फ्लू कोणत्या विषाणुमुळे होतो?
A. H2N2
B. H1N1
C. H2N5
D.H1N2
ANSWER: B. H1N1

28. नवजात बालकांचे शरीराचे कमी होणारे तापमान (Hypothermia) करिता, कोणत्या उपचारात्मक पद्धतीचा वापर केला जातो?
A. औषधोपचार
B. गरम पाण्याने आंघोळ घालणे
C. कांगारू मदर केअर
D. लिथोटोमी थेरेपी
ANSWER: C. कांगारू मदर केअर

29 हिवतापाचा उद्रेक झाल्याबाबत खालीलपैकी कोणता निकष नाही.
A. अबाधित क्षेत्रात मागच्या 3 महिन्यात किमान 1 दूषित रक्त नमूना
B. हिवतापामुळे एक मृत्यू होणे
C. तापाच्या रुग्णात वाढ होणे
D. फॅल्सिफेरमचा किमान एक स्थानिक रुग्ण असणे.
ANSWER: B. हिवतापामुळे एक मृत्यू होणे

30. दक्षता प्रशिक्षण कशा करिता दिले जाते?
A. हिवताप निर्मूलन
B. प्रसुती दरम्यान घेण्याची काळजी
C. नवजात बालकाची काळजी.
D. आजारी बालकाची काळजी
ANSWER: B. प्रसुती दरम्यान घेण्याची काळजी

31. खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणा दरम्यान रक्त नमुने रात्रीच्या वेळीच घेणे योग्य असेल?
A. डेंगू
B. पटकी
C. जपानी मेंदूदाह
D. हत्तीरोग
ANSWER: D. हत्तीरोग

32. खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था माता व बाल आरोग्य सुधारणा बाबत कार्य करते?
A. UN
B. WHO
C. UNICEF
D. UNDP
ANSWER: C. UNICEF

33.’जननी सुरक्षा योजना’ बाबत खालीलपैकी कोणते चूकीचे आहे?
A. मातेला फूकट संदर्भ सेवा दिली जाते.
B यीजनेचा उद्देश संस्थात्मक प्रसुती वाढविणे आहे
C. बालक मृत्यूदर कमी करणे
D. सदर योजनाला 100% केंद्रातून मिळतो.
ANSWER: B यीजनेचा उद्देश संस्थात्मक प्रसुती वाढविणे आहे

34. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची कधी सुरुवात झाली?
A. June 2011
B. June 2014
C. July 2015
D. July 2016
ANSWER: A. June 2011

35. गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी NRC आहे?
A. वडसा
B. कोरची
C. अहेरी
D. भामरागड
ANSWER: C. अहेरी

36. WIFS कार्यक्रमांतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त गोळ्या किती वेळा दिल्या जातात?
A. दररोज
B आठवड्यातून एकदा
C. आठवड्यातून दोनदा
D. महिन्यातून एकदा
ANSWER: B आठवड्यातून एकदा

37. ‘Deworming Programme’ मध्ये जंतूनाशकाच्या गोळ्या किती वेळा दिल्या जातात.
A. वर्षातून दोन वेळा
B. वर्षातून एकदा
C. दर महिना
D. वर्षातून 4 वेळा
ANSWER: A. वर्षातून दोन वेळा

38. किशोरावस्थेतील मुले-मुली कोणत्या वयोगटाची आहेत?
A. 8-10 वर्षे
B. 8-15 वर्षे
C. 10 – 19 वर्षे
D. 19-35 वर्षे
ANSWER: C. 10 – 19 वर्षे

39. MTP कायदा 1971 नुसार किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येवू शकतो?
A. 28 आठवडे
B. 20 आठवडे
C. 24 आठवडे
D. 30 आठवडे
ANSWER: B. 20 आठवडे

40. गरोदर मातेला कमीत कमी किती वैद्यकिय तपासणी झाली पाहिजे?
A. 2
B.4
C. 6
D. 8
ANSWER: B.4


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT