Pavitra Portal Shikshak Bharti 2024 : विविध जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित!

Pavitra Portal Shikshak Recruitment 2024

Pavitra Portal Shikshak Bharti 2024: Birhanmumbai Mahanagarpalika, Mumbai announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Shikshak (Teacher). Eligible candidates are directed to submit their application offline through mahateacherrecruitment.org.in this Website. Total 216 Vacant Posts have been announced by Birhanmumbai Mahanagarpalika (BMC), Mumbai in the advertisement February 2024.


Pavitra Portal Shikshak Bharti 2024: Maharashtra State Education Commissioner will announce new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Shikshak (Teacher) through Pavitra Portal. Eligible candidates are directed to submit their application online through https://edustaff.maharashtra.gov.in/ this Website. Total 2381 Vacant Posts have been announced by Pavitra Portal Shikshak Recruitment Board, Maharashtra in the advertisement July 2023. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Between 15th August 2023 to 31st August 2023, advertisements will publish on the Pavitra portal.

Willing Candidates are advised to follow our Website Mahasarkar.Co.In to get latest updates of Pavitra Portal Shikshak Bharti 2024 / Pavitra Portal Shikshak Recruitment 2024 / Pavitra Portal Shikshak Vacancy 2024. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test and all other necessary information regarding Pavitra Portal Teachers Recruitments Forms are updated here https://mahasarkar.co.in/pavitra-portal-shikshak-bharti/

Organization Name

Maharashtra State Education Commissioner

Advertisement No. (जाहिरात क्र.)

Name Posts (पदाचे नाव)

Shikshak (Teacher)

Number of Posts (एकूण पदे)

2381 Vacancies

Age Limit (वय मर्यादा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)

https://edustaff.maharashtra.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online by email

Job Location (नोकरी ठिकाण)

Maharashtra

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

August 2023

Date of Interview (थेट मुलाखत)

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

Update Soon

Experience (अनुभव)

Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Selection Process is: Exam

Application Fee (अर्ज शुल्क)

Update Soon

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)

Importants Dates

Starting Date For Online Application

August 2023

Starting Date For Offline Application

Last Date For Online Application

August 2023

Last Date For Offline Application

Walk- in Interview Date

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Application Form (अर्जाचा नमुना)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Download Our MAHASARKAR App

येथे क्लिक करा


पवित्र पोर्टल : महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती

या लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्यामधील शिक्षक भरती करिता नव्याने सुरू केलेल्या पवित्र पोर्टल (Pavitra -Portal for Visible to All Teachers Recruitment) याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. तसेच पवित्र पोर्टल वर नोंदणी करण्यापासून ते शिक्षक म्हणून रुजू होई पर्यंत काय करावे लागते, कोणते नियम आहेत याची सर्व माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

आपणास माहिती आहे की आज संपूर्ण भारत देशातून लाखो विद्यार्थी एक शिक्षक होण्याचे स्वप्न पाहतात , येणाऱ्या पुढील पिढीना पंख देऊ पाहतात, इतकेच नव्हे तर त्या पंखांना बळ देऊन त्यांना उंच गगनात भरारी घेण्यास प्रेरणा देऊ पाहतात. आपणास माहिती आहे की शिक्षण हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि या हक्कापासून आपल्याला कोणीही वंचित ठेऊ शकत नाही. त्यामुळेच भारत सरकारने शिक्षणाचा मूलभूत हक्क 2009 अंतर्गत आठवी पर्यंत चे शिक्षण मोफत व सक्तीचे केलेले आहे. असे म्हणतात ना, जर देश घडवायचा असेल तर देशाच्या तरुणांना घडवायला हवं. आज चे बालकच उद्याचे भावी पंतप्रधान, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, आधुनिक शेतकरी, व्यावसायिक, उद्योगपती, संशोधक अशा अनेक क्षेत्रात योग्य ती कामगिरी करून आपल्या देशाचा विकास नक्कीच करतील. परंतु त्यासाठी मूळ पाया मजबूत असणे महत्वाचे आहे आणि तो पाया शालेय शिक्षणातूनच बांधला जातो. त्यासाठी शाळांना गुणवत्ता पूर्ण तसेच विविध कौशल्य पूर्ण शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पवित्र पोर्टल विकसित केले आहे. ज्यातून लाखो विद्यार्थ्यांचे भावी शिक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊन देशासाठी एक सुजाण नागरिक तयार करण्याची उमेद सुद्धा पूर्ण होणार आहे. आपण पवित्र पोर्टल या विषयी आता खोलवर माहिती जाणून घेऊ.

Also See: शिक्षक पदांसाठी ZP सोलापूर भारती 2023 मध्ये 700 पदांसाठी लवकरच उपलब्ध होईल: येथे तपासा

पवित्र पोर्टल काय आहे?

महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामधील शिक्षकांची भरती प्रक्रिया ही CET मधील गुणांच्या आधारे करण्यात आलेली होती. खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांची भरती प्रक्रिया ही त्या व्यवस्थापनामधील पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मुलाखती द्वारे होत होती. ही प्रक्रिया सदोष असल्यामुळे व त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरवाव्याहार होत असल्यामुळे
महाराष्ट्र सरकारने 2017 मध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (School Education And Sports Department) यांच्या वतीने पवित्र पोर्टल ची स्थापना केली. पवित्र पोर्टल मधून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, खाजगी अनुदानित संस्था, अंशता: अनुदानित संस्था तसेच विना अनुदानित संस्था या मधे शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी पवित्र पोर्टल लागू केले आहे. दुसरीकडे, अल्पसंख्यांक संस्था, आदिवासी शाळा, आश्रम शाळा, समाजकल्याण विभाामार्फत चालणाऱ्या शाळा यामधे शिक्षक नेमणूक करण्याकरिता त्या संस्थांना किंवा विभागाला स्वतंत्र अधिकार दिले आहेत. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र मधील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षक मिळू लागले आहेत. पवित्र पोर्टल वर नोंदणी करण्याआधी त्या व्यक्तीने काही शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेल्या असणे अत्यंत आवश्यक आहे. ते खालील प्रमाणे.

पवित्र पोर्टल वर नोंदणी करण्याकरिता (शिक्षक या पदावर रुजू होण्यासाठी) आवश्यक असणारी पात्रता:

• तो व्यक्ती महाराष्ट्राचा नागरिक असावा.
• त्या व्यक्तीने किमान BEd, DEd, Dted, MEd यापैकी एक तरी कोर्स पूर्ण केलेला असावा.
• त्या व्यक्तीने 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य असेल (Graduation किंवा Post Graduation असेल तरी चालेल).
• त्या व्यक्तीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET यापैकी एक परीक्षा उत्तीर्ण असावे किंवा नसेल तरीही नोंदणी करता येते.
• त्या व्यक्तीने शिक्षक होण्यासाठी आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी TAIT (Teacher Aptitude And Intelligence Test) परीक्षा दिलेली असणे अनिवार्य आहे.

पवित्र पोर्टल असण्याचे फायदे:

• पवित्र पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रात कुठेही शिक्षक म्हणून रुजू होता येते.
• पवित्र पोर्टल ही एक ऑनलाईन प्रणाली असल्याने संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि वेळेत पूर्ण केल्या जाते.
• पवित्र पोर्टल वर एका पेक्षा जास्त पदांसाठी apply करायचे असेल तरी एकच वेळी नोंदणी करून आपले प्रोफाईल बनवावे लागते.
• एकदा आपले प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर पुढील संपूर्ण प्रोसेस ही त्या प्रोफाईल वर जाऊन आपण वेळोवेळी पूर्ण करू शकतो.
• तसेच नोंदणी करताना काही त्रुटी आढळून आल्यास पुन्हा एकदा दुरुस्ती करण्यासाठी सुविधा दिली जाते.
• नोंदणी झाल्यावर पवित्र पोर्टल वर जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात व त्यावर आपण आपल्या हेतूने कोणता जिल्हा निवडायचा याची संपूर्ण मुभा दिली जाते.
• तसेच पवित्र पोर्टल मधून होणारी शिक्षक भरती ही विभागीय पद्धतीने न होता केंद्रीय पद्धतीने होऊन गुणवत्ता यादी नुसार च होते त्यामुळे कोणत्याही प्रवर्ग वर अन्याय होत नाही.
• सर्व प्रवर्ग च्या जागा त्यांच्या आरक्षण नुसार उपलब्ध करून दिल्या जातात.

पवित्र पोर्टल वर नोंदणीकृत आवश्यक पायऱ्या:

पवित्र पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी वरील पात्रता असणे आवश्यक आहे. आणि खालील स्टेप्स नुसार आपण योग्य पद्धतीने नोंदणी करू शकता.
Step 1:
• सर्वात अगोदर आपणास School Education And Sports Department यांच्या अधिकृत संकेतस्थळ याला भेट द्यावी लागेल. त्यासाठी आपणास https://mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या लिंक वर क्लिक करावे लागेल त्यानंतर आपल्या समोर एक होम पेज ओपन होईल.
• होम पेज वर पोहोचल्या नंतर आपणास मेनू बार मधे जाऊन पवित्र पोर्टल असे सिलेक्ट करून त्यावर क्लिक करावे लागेल.
• जसे आपण पवित्र पोर्टल वर क्लिक कराल आपणासमोर एक नवीन पेज ओपन होईल आणि त्या पेजवर जाऊन आपणास application यावर क्लिक करावे लागेल.
• जसे आपण application वर क्लिक करणार लगेच आपणासमोर नोंदणी करीता एक नवीन पेज ओपन होईल.

Step 2:
• आता नोंदणी पेज वर आल्यावर तुम्हाला selection टॅब वर क्लिक करून करून रोल नंबर टाकून स्वतः ची नोंदणी करायची आहे.
• आता इथे तुम्हाला नोंदणी करताना स्वतः चे एक प्रोफाईल क्रिएट करायचे आहे त्यासाठी तुम्हाला एक एकमेव user ID आणि pasword क्रिएट करून तुमचे प्रोफाईल बनवायचे आहे.
• त्यानंतर खाली दिलेल्या टॅब मधे मोबाईल नंबर टाकून captcha code टाकून रजिस्टर या बटन वर क्लिक करून तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे.

Step 3:
• आता तुम्ही तुमचे प्रोफाईल बनवले आहे. तुम्ही एंटर केलेला user ID आणि password तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला तो वापरून च तुमचे प्रोफाईल लॉग इन करता येईल.
• आता तुम्हाला लॉग इन करून applicant details वर क्लिक करून personal details वर क्लिक करायचे आहे.
• जेव्हा तुम्ही personal details या ऑप्शन वर क्लिक कराल तेव्हा तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
• त्या पेज वर जी माहिती विचारली आहे ती अचूक रित्या भरून तुम्हाला ते पूर्ण करायचे आहे.
• त्यानंतर address for correspondence यावर क्लिक करून योग्य तो पत्ता तुम्हाला टाकायचं आहे.

Step 4:
• आता तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स भरल्या नंतर शैक्षणिक माहिती भरावयाची आहे. आता इथे संपूर्ण माहिती भरल्या नंतर तुम्हाला TET details यावर क्लिक करून ती माहिती भरायची आहे.
• त्यात तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक MAHA TET आणि दुसरा CTET, तुम्ही जी पात्रता पूर्ण केली आहे तिथे क्लिक करून ती माहिती भरायची आहे.
• आता तुम्हाला qualification details वर क्लिक करायचे आहे ज्यात दोन पर्याय असतील एक academic qualification आणि दुसरा professional qualification.
• Academic qualification वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची संपूर्ण माहिती एसएससी, एचएससी, पदवी, पोस्ट Graduation असेल तर ते अशी संपूर्ण माहिती अचूक भरावयाची आहे.
• त्यानंतर तुम्हाला प्रोफेशनल qualification वर क्लिक करून तुम्ही कोणता professional course केला आहे त्याविषयी अचूक माहिती टाकायची आहे.
• आता academic आणि professional qualification मधे संपूर्ण माहिती भरल्या नंतर तुम्हाला सेल्फ certification वर क्लिक करून योग्य ती माहिती भरायची आहे.
• सगळी माहिती अचूक भरून झालाय नंतर तुम्हाला certify करून त्याची एक प्रत स्वतः जवळ जपून ठेवायची आहे.
• अशा प्रकारे तुम्ही पवित्र पोर्टल वर स्वतः घरी बसल्या अचूक रित्या स्वतः नोंदणी करू शकता.

वर्गानुसार शिक्षक पदे:

1.) इयत्ता १ ली ते ५ वी करीता (प्राथमिक शिक्षक):
• 1 ते 5 या वर्गा करीता जे शिक्षक म्हणून रुजू होतील ते प्राथमिक शिक्षक या गटात मोडतात.
• त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता HSC, DEd + TET 1/CTET 1
• राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) नुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibility Test-TET) उत्तीर्ण असणे अनिवार्य.

2.) इयत्ता ६ वी ते ८ वी करीता (उच्च प्राथमिक शिक्षक):
वर्ग 6-8 करीता जे शिक्षक म्हणून रुजू होतात ते उच्च प्राथमिक शिक्षक या गटात मोडतात.
त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता
1) HSC, DEd, Graduation + TET2/CTET2
किंवा
2) BEd + TET2/CTET2
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) नुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibility Test-TET) उत्तीर्ण असणे अनिवार्य.

 

3.) इयत्ता ९ वी ते १० वी करीता (माध्यमिक शिक्षक):
वर्ग 9 ते 10 करीता जे शिक्षक म्हणून रुजू होतील ते माध्यमिक शिक्षक गटात मोडतात. त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता BEd+Graduation

4.) इयत्ता ११ वी ते १२ वी करीता (उच्च माध्यमिक शिक्षक):
वर्ग 11 ते 12 करीता जे शिक्षक म्हणून रुजू होतील ते उच्च माध्यमिक शिक्षक या गटात मोडतात. त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता BEd + Post Graduation

प्रशिक्षण:

ज्या उमेदवाराने ५०% घेऊन कला, विज्ञान, वाणिज्य शाखेची पदवी आणि DEd किंवा ४५% घेऊन कला , वाणिज्य, विज्ञान शाखेची पदवी आणि BEd असेल अशा उमेदवाराची नियुक्ती इयत्ता १ली ते ५ वी करीता प्राथमिक शिक्षक झाली असेल तर त्या उमेदवाराने नियुक्ती नंतर राष्ट्रीय शिक्षण शिक्षक परिषदे द्वारे मान्यता प्राप्त ६ महिन्याचा विशेष प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असेल.

पवित्र पोर्टल मधून शिक्षण सेवक किंवा शिक्षक या पदावर रुजू होणाऱ्या उमेदवार यांकरिता महत्वपूर्ण सूचना:

• जेव्हा पोर्टल वर जाहिराती दिल्या जातात तेव्हा त्या जाहिरातींना प्राधान्य क्रम कसे द्यायचे हे मात्र त्या उमेदवार कडे असते. त्यावरून च त्याचे selection ठरलेले असते. म्हणून प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया स्वतः उमेदवाराने करणे अत्यंत आवश्यक आहे.
• त्या उमेदवाराने सर्व शैक्षिणक व व्यावसायिक शिक्षण मधील सर्व सत्रांच्या परीक्षा दिलेल्या deadline आधी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर काही कारणास्तव त्या शैक्षणिक वर्षाचा निकाल राखीव असेल तर ती पात्रता ग्राह्य धरण्यात येणार नाही.
• नोंदणी करताना उमेदवाराने वय, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, जात, प्रवर्ग, उन्नत गटात मोडत नसल्याबाबत, दिव्यांग व्यक्ती, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, अनाथ, खेळाडू, प्रकल्प ग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादी गोष्टींचा पाठपुरावा अचूक रित्या करणे आवश्यक असेल.
• OBC NCL व OPEN EWS मधील उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे दिलेल्या तारखेच्या आत काढलेली असतील तरच ती ग्राह्य धरण्यात येईल.
• EWS मधे मोडणाऱ्या उमेदवारांना NCL ची आवश्यकता नसते तर त्यांना EWS प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे.
• वेळोवेळी निघालेले शासन निर्णय, शासन परिपत्रक आणि आदेश यांचा विचार करूनच दिलेल्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल.
• ऑनलाईन कागदपत्रे पडताळून त्या उमेदवारास तात्पुरते पात्र करून मुळ कागदपत्रे पडताळून बघितल्याशिवाय उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल अन्यथा कोणत्याही प्रकारचे गैर कागदपत्रे आढलून आल्यास त्या उमेदवाराची नियुक्ती रद्द करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
• उमेदवाराने शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
• पवित्र पोर्टल वर हेतुपुरस्सर खोटी, अपूर्ण आणि चुकीची माहिती भरून बनावट कागदपत्रे सादर करून पात्रता अटी पूर्ण असल्याचा खोटा दावा केल्यास असे उमेदवार कठोर शिक्षेस पात्र राहील.
• कुणीही कुणी दिलेल्या आश्वासनाला बळी पडून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्यास याला उमेदवार स्वतः जबाबदार असणार.
• उमेदवाराने पवित्र पोर्टल वर जाहिराती ना प्राधान्यक्रम देण्याआधी योग्य ते निगडित असलेले शासन निर्णय काळजीपूर्वक वाचूनच प्राधान्यक्रम लॉक करावेत.

वयोमर्यादा:

•उमेदवाराचे दिनांक परीक्षा जाहिरात आली तेव्हाचे वय ग्राह्य धरण्यात येईल.
• शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय नुसार शिक्षण सेवक या पदाकरीता खुल्या प्रवर्गतील किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे असेल तर मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे राहील.
• शासन निर्णय नुसार पात्र खेळाडू यांची पात्रता आणि गुणवत्ता विचारात घेऊन कमाल वयोमर्यादा मधे ५ वर्षाची शिथिलता देण्यात येईल.
• दीव्यांग पात्र उमेदवारासाठी, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ४५ असेल.

निवडीची कार्यपद्धती:

• उमेदवाराने पवित्र पोर्टल वर नोंदणी करताना दिलेल्या वयक्तिक माहिती वरुन ज्या संस्थेस तो पात्र ठरत असेल त्या संस्थांची यादी त्या उमेदवाराच्या लॉग इन वर preference generate करून डाऊनलोड करून पाहावी. त्यातून उमेदवाराने स्वेच्छेने योग्य ते प्राधान्यक्रम निवडून विचारपूर्वक देणे गरजेचे आहे. आणि हे प्राधान्य क्रम एकदा लॉक केल्यावर नंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
• उमेदवाराने स्वतः ची माहिती भरून ती सप्रमानित केली असल्याने त्यानुसार च त्यास प्राधान्यक्रम generate होतील.
• प्राधान्यक्रम कसे द्यावेत याविषयी संकेत स्थळावर योग्य ते व्हिडिओज आणि माहिती वेळोवेळी दिली जाईल ती पाहणे उमेदवाराची जबाबदारी असेल.
• यानंतर ही उमेदवारास काही अडचण येत असेल तर विभाग स्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालक किंवा जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक इथे असलेल्या पवित्र केंद्र मदत येथून मार्गदर्शन घेता येईल.
• प्राधान्यक्रम दिल्यानंतर उमेदवारास त्याच्या TAIT मधील गुण, जात प्रवर्ग, समांतर आरक्षण, विषय, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यानुसार उपलब्ध असलेल्या जागेतून preference generate होतील. याव्यतिरिक्त जे चुकीचे प्राधान्यक्रम दिलेत ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. म्हणून प्राधान्यक्रम देण्याची योग्य ती जबाबदारी स्वतः उमेदवाराची असेल.
• प्राधान्यक्रम दोन भागांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत पहिल्या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद मनपा नगरपरिषद यातील पदे व खाजगी संस्थातील मुलाखत शिवाय येणारी बुद्धिमत्ता व अभियोग्यता यात मिळालेल्या गुणांनुसार थेट नियुक्ती देण्यात येईल.
• दुसऱ्या टप्प्यामध्ये खाजगी संस्था मधील जी रिक्त पदे मुलाखतीत भरली जाते अशी पदे प्राधान्यक्रम देण्यासाठी उपलब्ध होतील.
• ज्या उमेदवाराची निवड विना मुलाखत मध्ये झाली असेल त्याची मुलाखतीसहित करावयाच्या नियुक्तीमध्ये विचार केला जाणार नाही त्यामुळे उमेदवाराने स्वतः योग्य ते प्राधान्यक्रम विचारपूर्वक द्यावेत.
• स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी निवडलेल्या उमेदवारास विना मुलाखत नियुक्ती केल्या जाईल तसेच यामध्ये एकास एक या प्रमाणात उमेदवार पाठवले जातात.
• विना मुलाखत पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारांनी विहित कालावधीत संबंधित पदावर कोणत्याही कारणामुळे रुजून झाल्यास किंवा कागदपत्र पडताळणी मध्ये अपात्र ठरल्यास त्या उमेदवाराची नियुक्ती केल्या जाणार नाही व ते पण तसेच रिक्त ठेवण्यात येईल त्याचा विचार केला जाणार नाही.
• दुसरीकडे मुलाखतीसहित नियुक्ती करताना एकास दहा या प्रमाणात उमेदवार खाजगी संस्थांमध्ये पाठवण्यात येतील.
• खाजगी संस्थांच्या मुलाखतीसह पदक भरती करिता निवड झालेल्या उमेदवारांना जास्तीत जास्त दहा पदांकरिता मुलाखत देण्याची मुभा असेल यामध्ये अध्यापन कौशल्य चाचणी आणि मुलाखत यांचा कालावधी स्वतंत्रपणे देण्यात येतो.
• मुलाखतीचा पद भरती मध्ये बोलावलेल्या दहा उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराची अंतिम निवड ही मुलाखत व अध्यापन कौशल्य यांच्या गुना द्वारे करण्यात येईल येथे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यातील गुण विचारात घेतले जाणार नाही.
• सदर संस्थेची मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची गुनानूक्रमे यादी संस्थेच्या संकेतस्थळावर विहित मुदतीत प्रसिद्ध करण्यात येईल.
• जर निवडलेल्या उमेदवारापैकी कोणताही कारणामुळे रुजू न झाल्यास कागदपत्र पडताळणी मध्ये अपात्र ठरल्यास रिक्त राहिलेल्या पदावर गुणानुक्रमे येणाऱ्या पुढील उमेदवाराची नियुक्ती संस्थेमार्फत करण्यात येते.
• उमेदवाराची अंतिम निवड झाल्यानंतर कार्यालयीन सात दिवसांमध्ये उमेदवारास जर व्हावे लागेल.
• पद भरती करताना उमेदवाराकडून कोणतीही शुल्क किंवा फी घेण्यात येणार नाही.
• मुलाखती शिवाय पद भरती मध्ये अंतिम निवड झालेल्या उमेदवारास मुलाखतीसह पदभरती मध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाही त्यासाठी उमेदवारांनी योग्य ते प्राधान्यक्रम देणे आवश्यक असते.
• उमेदवारांनी प्राधान्यक्रम देताना ज्या रिक्त पदांना प्राधान्यक्रम दिलेत त्याच पदांसाठी त्यांचा विचार करण्यात येईल अन्यथा पात्र असूनही प्राधान्यक्रम न दिल्यास त्या रिक्त पदांसाठी उमेदवाराचा विचार करण्यात येणार नाही.
• शासन निर्णयानुसार समांतर आरक्षण गृहीत धरून उपलब्ध उमेदवारांपैकी योग्य त्या उमेदवाराची निवड करण्यात येईल.

मानधन/वेतनश्रेणी:

स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांच्या अनुदानित शाळांमधील नियुक्ती ही शिक्षण सेवक म्हणून एकत्रच मानधनावर राहिला तर अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक पदावरील नियुक्ती विहित वेतनश्रेणी मध्ये असेल.

प्रमाणपत्र पडताणीसाठी सादर करावयाची कागदपत्रे:

•  प्रमाणपत्र पडताळणी च्या वेळी उमेदवाराने खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक असेल.
• वयाचा पुरावा यासाठी माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
• माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच एस एस सी परीक्षेचे किंवा त्या परीक्षेचे बाबतीत संबंधित मंडळाचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र.
• उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे एच एस सी किंवा संबंधित परीक्षेची गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र.
• पदवी किंवा पदविका परीक्षांमध्ये प्रत्येक परीक्षेचे मंडळ किंवा विद्यापीठ किंवा सक्षम प्राधिकार्याने साक्षांकित गुणपत्रक व प्रमाणपत्र.
• पदव्युतर पदवी परीक्षेचे विद्यापीठ गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
• राज्य व केंद्र शासनाने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची पात्र असल्या विषयीचे प्रमाणपत्र (TET किंवा CTET).
• अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे गुणपत्रक.
• महाराष्ट्र राज्यात आधिवास असल्याचे प्रमाणपत्र (डोमिसाईल सर्टिफिकेट)
• कागदपत्र पडताळणी करताना स्वतःच्या ओळखीच्या पुराव्या करिता स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाची ओळखपत्र, पासपोर्ट, pan card, किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स, महाविद्यालयात शिकत असलेले ओळखपत्र इत्यादी पैकी कोणतेही एक व त्याची एक छaयांकीत प्रत सोबत असणे अनिवार्य असेल.
• मागासवर्गीय उमेदवार असल्यास त्याबाबतचा पुरावा.
• अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, विमुक्त जाती आ, भटक्या जमाती ब , भटक्या जमाती क ,भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग(SEBC )असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत.
• विमुक्त जाती आ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग तसेच सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गातील व खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेले उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे Non Creamy Layer Certificate सादर करणे आवश्यक असेल.
• SC, ST, ST PESA या प्रवर्गातील उमेदवारांना non creamy layer ची आवश्यकता नसेल.
• दिव्यांग असल्यास त्यासाठीचा पुरावा
• माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा
• अमागास महिला आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
• खेळाडूच्या आरक्षणाकरिता पात्र असल्यास त्यासाठीचा दावा.
• विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्यास त्याचा पुरावा.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).
माझी नौकरी – Majhi Naukri – महाराष्ट्रातील वर्तमान भरती सूचना

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT