TCS/IBPS Pattern “Marathi Grammar” Practice Paper 3 : TCS/IBPS पॅटर्न “मराठी व्याकरण सराव पेपर 03

Talathi Bharti Practice paper

TCS/IBPS Pattern “Marathi Grammar Practice Paper 3

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे २५ सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS मराठी व्याकरण सराव प्रश्न…………………..

“TCS / IBPS पॅटर्न मराठी व्याकरण सराव पेपर – 3”

1. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक विशेष गुणधर्म असतो, त्यास ………. असे म्हणतात.
(1) काळ
(2) लिंग
(3) संधी
(4) वचन
उत्तर : वचन
स्पष्टीकरण:
नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक विशेष गुणधर्म असतो, त्यास वचन असे म्हणतात.
लिंग: नामाच्या रूपावरून एखादा घटक वास्तविक/काल्पनिक नर/ मादी जातीचा आहे किंवा नाही, हे ज्या वरून कळते त्याला लिंग असे म्हणतात.

2. ‘श्वशुर’ चा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
(1) दानशूर
(2) सासरा
(3) सासू
(4) शूर
उत्तर : सासरा
स्पष्टीकरण:
दिलेल्या ‘श्वशुर’ शब्दाचे समानार्थी शब्द ‘सासरा’ आहे.

3. ‘नास्तिक’ चा विरुद्धार्थी शब्द कोणता?
(1) आस्तिक
(2) निकोप
(3) तरुण
(4) नायक
उत्तर : आस्तिक
स्पष्टीकरण:
नास्तिक x आस्तिक

4. ‘कुत्रे झोपले आहे.’ या वाक्यातील नामाचे लिंग ओळखा.
(1) पुल्लिंग
(2) उभयलिंग
(3) स्त्रीलिंग
(4) नपुंसकलिंग
उत्तर : नपुंसकलिंग
स्पष्टीकरण
वाक्यातील ‘कुत्रे’ या नामाचे लिंग हे नपुंसकलिंग आहे.

5. खालीलपैकी कोणते वाक्य अर्थपूर्ण आहे?
(1) प्रामाणिकपणा हा कुत्रांचा गुण आहे.
(2) कुसुम ही माझ्या मित्राची मुलगी आहे.
(3) साखर गोडी असते.
(4) गोदावरी मोठा नदी आहे.
उत्तर : (2) कुसुम ही माझ्या मित्राची मुलगी आहे.
स्पष्टीकरण:
वाक्य रचनेनुसार वाक्य २ योग्य आहे.

6. वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास ——- म्हणतात.
(1) नपुंसकलिंग
(2) पुल्लिंग
(3) स्त्रीलिंग
(4) उभयलिंग
उत्तर : (2) पुल्लिंग
स्पष्टीकरण:
वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास पुल्लिंग म्हणतात.

7. मुलगा चेंडू खेळतो. या वाक्यातील कर्ता कोणता आहे ?
(1) मुलगा
(2) खेळणे
(3) चेंडू
(4) खेळतो
उत्तर : (1) मुलगा
स्पष्टीकरण:
इथे, खेळणारा कोण ? – मुलगा कर्ता आहे.

8. यथायोग्य, आमरण, प्रतिवर्ष, अपरोक्ष ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?
(1) तत्पुरुष
(2) द्विगू
(3) द्वंद्व
(4) अव्ययीभाव समास
उत्तर : (4) अव्ययीभाव समास
स्पष्टीकरण:
आ, यथा, प्रति, अप असे प्रत्यय (संस्कृत भाषेतील) लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासात मोडतात.

9. ‘मुले फुटबॉल खेळत आहेत. ‘ या वाक्यातील कर्ता ओळखा.
(1) खेळत
(2) आहेत
(3) मुले
(4) फुटबॉल
उत्तर : (3) मुले
स्पष्टीकरण:
खेळणारे कोण ? – मुले कर्ता आहे.

10. ‘मी एका मध्यमवर्गीय (शिक्षक) (घर) मुलगी आहे.’ अर्थपूर्ण वाक्य बनवा.
(1) मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाचा घरातील मुलगी आहे.
(2) मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरातून मुलगी आहे.
(3) मी एके मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरातील मुलगी आहे.
(4) मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरातील मुलगी आहे.
उत्तर : (4) मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरातील मुलगी आहे.
स्पष्टीकरण:
‘शिक्षक’, ‘घर’ या दोन शब्दांचा अर्थपूर्ण वाक्यात वापर “मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरातील मुलगी आहे.” असा होईल.

11. ‘कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो.’ हे कोणत्या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे?
(1) कर्तरी प्रयोग
(2) कर्मणी प्रयोग
(3) पुराण कर्मणी प्रयोग
(4) भावे प्रयोग
उत्तर : (1) कर्तरी प्रयोग
स्पष्टीकरण
कर्तरी प्रयोग : कर्ता नेहमी प्रथमान्त म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतो.

12. खाली विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे?
(1) गाव x ग्राम
(2) तत्काळ x धीमेपणे
(3) जुळवाजुळव x मोडतोड
(4) गारठा x उष्मा
उत्तर : (1) गाव x ग्राम
स्पष्टीकरण:
गाव = ग्राम हे समानार्थी शब्द आहेत.

13. मराठीची लिपी कोणती आहे?
(1) नस्तालीक
(2) ब्राह्मी
(3) देवनागरी
(4) सकळ
उत्तर : (3) देवनागरी
स्पष्टीकरण:
मराठीची लिपी देवनागरी आहे.

14. ‘अचेतन’ शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
(1) चैतन्यरहित
(2) विनाशी
(3) अजरामर
(4) सजीव
उत्तर : (1) चैतन्यरहित
स्पष्टीकरण:
‘अचेतन’ शब्दाचा समानार्थी शब्द चैतन्यरहित आहे.

15. ‘हिमालय पर्वत आहे.’ या वाक्यातील कर्म कोणते आहे?
(1) आहे
(2) हिम
(3) पर्वत
(4) हिमालय
योग्य उत्तर: (3) पर्वत
स्पष्टीकरण:
क्रियापदाला ‘काय’? ने प्रश्न विचारल्यास कर्म मिळते.
वाक्यातील कर्म ‘पर्वत’ हे आहे.

16. ‘तो येत असेल.’ या वाक्याचा काळ कोणता?
(1) अपूर्ण भविष्यकाळ
(2) पूर्ण वर्तमानकाळ
(3) पूर्ण भविष्यकाळ
(4) पूर्ण भूतकाळ
योग्य उत्तर : (1) अपूर्ण भविष्यकाळ
स्पष्टीकरण:
“येत असेल” या संयुक्त क्रियापदावरून समजते की हे अपूर्ण भविष्यकाळाचे उदाहरण आहे.

17. ‘त्याने हरिणास धरले.’ हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?
(1) भावे प्रयोग
(2) कर्तरी प्रयोग
(3) शक्य कर्मणी प्रयोग
(4) कर्मणी प्रयोग
उत्तर : (1) भावे प्रयोग
स्पष्टीकरण:
भावे प्रयोगात कर्त्याला आणि कर्माला दोन्हींना देखील प्रत्यय असतो.

18. ‘पाणि दुषित होणार नाही याची काळजी द्यावी.’ या अशुद्ध वाक्याचे शुद्ध रूप खालील पर्यायातून निवडा.
(1) पाणि दूषित होणार नाही याची काळजी यावी.
(2) पाणि दूषित होणार नाही याची काळजी दयावी.
(3) पाणी दुषित होणार नाही याची काळजी घ्यावी.
(4) पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी.
उत्तर : (4) पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी.
स्पष्टीकरण:
अशुद्ध वाक्याचे शुद्ध रूप पर्याय 4 आहे.

19. आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोचविला जातो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
(1) अकर्मक कर्तरी
(2) भावे
(3) कर्मणी प्रयोग
(4) सकर्मक कर्तरी
उत्तर : (3) कर्मणी प्रयोग
स्पष्टीकरण:
जेव्हा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत असते, येईल. तेव्हा त्या वाक्याची रचना कर्मणी प्रयोग असतो.

20. ‘मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास शाळेचा अभ्यास करतो.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
(1) प्रधानवाक्य
(2) केवलवाक्य
(3) संयुक्तवाक्य
(4) गौणवाक्य
उत्तर : (3) संयुक्तवाक्य
स्पष्टीकरण
जेव्हा दोन किंवा अधिक वाक्ये ‘आणि, व, परंतु, किंतु, ‘किंवा, वा, अथवा’ अशा शब्दांनी जोडले असतील तर ते वाक्य संयुक्त वाक्य असते.

21. ‘अपरिहार्य’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
(1) परिहार्य
(2) ऐच्छिक
(3) अनावश्यक
(4) आवश्यक
उत्तर : (1) परिहार्य
स्पष्टीकरण:
अपरिहार्य x परिहार्यं

22. ‘ताने त्याचा फाटलेला शरट शवून टाकला.’ या वाक्यातील चुकीचे शब्द शोधा.
(1) ताने, त्याचा, टाकला.
(2) ताने, शरट, शवून.
(3) त्याचा, शरत, शवून.
(4) ताने, फाटलेला, टाकला.
उत्तर : (2) ताने, शरट, शवून.
स्पष्टीकरण
वरील वाक्यातील चुकीचे शब्द – ताने, शरट, शवून हे आहेत.

23. ‘समशेर’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
(1) प्रख्यात
(2) तलवार
(3) कुल्हाड
(4) भाला
उत्तर : (2) तलवार
स्पष्टीकरण:
समशेर = तलवार, खड्ग, कृपाण हे समानार्थी शब्द आहे.

24. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. या वाक्याचा काळ ओळखा.
(1) अपूर्ण भूतकाळ
(2) पूर्ण भूतकाळ
(3) रीति भूतकाळ
(4) साधा भूतकाळ
उत्तर : (4) साधा भूतकाळ
स्पष्टीकरण:
दिलेल्या वाक्यातील ‘आला’ या क्रियापदावरून वाक्यातील काळ साधा भूतकाळ आहे.

25. ‘प्रतिबिंब’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
(1) फोटो
(2) व्यक्ती
(3) प्रतिमा
(4) आरसा
उत्तर : (3) प्रतिमा
स्पष्टीकरण:
प्रतिबिंब चा समानार्थी शब्द प्रतिमा आहे.



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT