Maharashtra TET 2024 : Maharashtra Teacher Eligibility Test 2024

MAHA TET (MH TET) 2024

Maha Tet 2024: The notification of Maharashtra Teacher Eligibility Test Mahatet 2024 under Maharashtra State Education Department will announce TET notification, Online application, Form fill up online, Syllabus, Exam Date & Schedule all in one advertisement No- महाटीईटी-2024. Eligible candidates can apply hare and get updated everyday with our study materials free of cost by group of TET Experts.

MAHA TET 2024 All Details/ शिक्षक पात्रता परीक्षा 2024 संपूर्ण विश्लेषण:

महाराष्ट्र सरकारने 2013 पासून जिल्हा परिषद , नगर परिषद, नगर पालिका, महा नगर पालिका, स्वायत्त संस्था, अल्पसंख्यांक संस्था, आदिवासी आणि समाजकल्याण विभाग मधील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षक यांच्या करीता TET म्हणजेच Teacher Eligibility Test – शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे.  म्हणजेच शिक्षक होण्यासाठी DEd BEd नंतर ची पायरी म्हणजे TET उत्तीर्ण होणे असे आपण म्हणू शकतो. 2013 पासून खूप कमी वेळा ही शिक्षक पात्रता परीक्षा घेतल्या गेली. तसेच 2021 नंतर 2024 मधे ही परीक्षा होत आहे म्हणून यासाठी असणारी स्पर्धा नक्कीच वाढलेली असेल. अध्यापन शास्त्रात पदविका आणि पदवी अभ्यासक्रम (DEd आणि BEd) पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे असे आपण म्हणू शकतो. आज पर्यंत महाराष्ट्र सरकारने TET ही परीक्षा ऑफलाईन आणि एकाच दिवशी संपूर्ण राज्यात घेतली. परंतु TET परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याने 2024 मधे ही परीक्षा ऑनलाईन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळेस ही परीक्षा IBPS द्वारे ऑनलाईन विविध केंद्रांवर घेण्यात येणार असून प्रथम ही परीक्षा ऑनलाईन घेतल्या जाणार आहे. जर तुम्ही DEd किंवा BEd केले असेल आणि महाराष्ट्र राज्यात शिक्षक होऊ इच्छित असाल तर तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. या परीक्षेचा cut off लागत नसून त्याचा passing criterion category नुसार ठरलेला असतो. या पेजवर तुम्हाला TET Exam 2024 संपूर्ण माहिती, संपूर्ण अभ्यासक्रम, आवश्यक शैक्षणिक अर्हता, आवश्यक संदर्भ पुस्तके, उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण, TET उत्तीर्ण झाल्यावर शिक्षक होण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या संधी आणि आम्ही तुमच्यासाठी खास करून IBPS पॅटर्न नुसार TET साठी Video Series  सुरू करणार आहोत याविषयी अधिकृत माहिती आपणास खाली मिळेल.

MAHA TET 2024 Information

 • Exam’s Name: Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET).
 • Conducted By: Maharashtra State Council of Examination (MSCE).
 • Exam Level: State Level.
 • Frequency of Exam: Once in a year.
 • Exam Levels: Paper 1 (Class 1 – Class 5) Paper 2 (Class 6 – Class 8).
 • Mode of Examination: Offline.
 • Exam Duration: 02 hours 30 minutes.
 • Language: English, Hindi, Marathi, Urdu, Bengali, Gujarati, Telugu, Sindhi, Kannada.
 • Post Name: Teachers (Shikshak).
 • Exam Helpdesk No.: 8956438464/65/66/67/68/69/70/71/72/73
 • Email: [email protected]
 • Official Website: https://mahatet.in/

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) महाराष्ट्रातील शाळांसाठी शिक्षक बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी MAHA TET म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करते. हे दोन स्तरांवर आयोजित केले जाते- पेपर 1 (प्राथमिक कक्षा 1-5 कक्षासाठी) आणि पेपर 2 (उच्च प्राथमिक कक्षा 6-8 कक्षासाठी).

शिक्षक होऊ इच्छिणारे उमेदवार दोन्ही पेपरसाठी अर्ज करू शकतात. भर्ती संस्था योग्य वेळेत MAHA TET 2024 साठी उमेदवारांना आमंत्रित करणारी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करेल. दुसरीकडे, महा टीईटी 2022 31 ऑक्टोबर 2022 रोजी 2 शिफ्टमध्ये नियोजित करण्यात आली आहे. महा टीईटी शिफ्ट 1 जी इयत्ता 1 – 5 कक्षा साठी आहे, सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 पर्यंत सुरू होईल तर इयत्ता 6 ते 8 कक्षाच्या अर्जदारांसाठी शिफ्ट 2 ची परीक्षा दुपारी 2.00 ते 04.30 पर्यंत आहे.

TET Exam 2024 Details (TET परीक्षा संपूर्ण माहिती):

जर आपणास वर्ग 1 ली ते 8 वी या वर्ग करीता शिक्षक होण्याची इच्छा असेल तर तुम्ही MAHA TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षक होण्या आधी ही पात्रता पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. यात सुद्धा दोन पेपर असतात TET Paper 1 आणि TET Paper 2.

प्राथमिक शिक्षक (वर्ग १ ली ते ५ वी) यांना TET Paper 1 उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे तर उच्च प्राथमिक शिक्षक (वर्ग ६ वी ते ८ वी) यांना TET Paper 2 अनिवार्य केला आहे.

तसेच TET Paper 2 हा विषय शिक्षक करीता असल्याने तो विषय नुसार वेगळा असतो.

 • गणित – विज्ञान विषय शिक्षकांना TET Paper 2 गणित – विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
 • सामाजिक शास्त्रे विषय शिक्षकांना TET Paper 2 सामाजिक शास्त्रे विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
 • तर भाषा विषय शिक्षकांना वरील पैकी कोणताही एक विषय घेऊन TET Paper 2 उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

TET Paper 1 आणि TET Paper 2 हे दोन्ही पेपर प्रतेकी 150 गुणांचे असून एकूण 150 प्रश्न विचारले जातात. आणि यात कोणत्याही प्रकारची negative marking नसते. आणि एकूण वेळ 150 मिनिटे म्हणजेच अडीच तास असतो. याचा अर्थ आपणास 150 प्रश्न 150 मिनिट मधे सोडवायचे असतात.

एकंदरीत,

 • परीक्षेचा कालावधी – 150 मिनिटे (अडीच तास)
 • एकूण प्रश्न – 150
 • एकूण गुण – 150

TET Exam Educational Qualification/ TET परीक्षा आवश्यक शैक्षणिक पात्रता

TET म्हणजेच Teacher Eligibility Test ही एक eligibility म्हणजेच शिक्षक होण्यासाठी पात्रता परीक्षा असून ही परीक्षा उत्तीर्ण झालो म्हणजे आपण शिक्षक झालो असे नाही तर आपण शिक्षक होण्यास पात्र झालोत असे होतो.

आपणास माहिती आहे, शिक्षक होण्याकरिता DEd किंवा BEd ही अध्यापन शास्त्र मधील पदविका किंवा पदवी पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार वर्ग १ली ते ५वी (प्राथमिक शिक्षक ) करीता फक्त DEd धारक आणि TET Paper 1 उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतील.

तसेच ६वी ते ८वी (उच्च प्राथमिक शिक्षक) वर्ग करीता विषय शिक्षकांनी (DEd + Graduation + TET Paper 2) किंवा (BED + Graduation + TET Paper 2) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

एकंदरीत,

 • प्राथमिक शिक्षक (१ली ते ५वी) – HSC + DEd + TET Paper 1
 • उच्च प्राथमिक शिक्षक (६वी ते ८वी) – Graduation + DEd + TET Paper 2 (त्या विशिष्ट विषय मधे) किंवा Graduation + BEd + Paper 2 (त्या विशिष्ट विषय मधे)

म्हणजेच

TET Paper 1 फक्त DEd धारक विद्यार्थी देऊ शकतात तर TET Paper 2 DEd आणि BEd धारक दोन्ही विद्यार्थी देऊ शकतात.

म्हणून TET Exam करीता आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे:

 • TET Paper 1: (HSC + DEd) धारक विद्यार्थी
 • TET Paper 2 (गणित – विज्ञान विषय घेऊन) : (Graduation मधे गणित विज्ञान विषय असणारे + BEd/DEd) धारक विद्यार्थी
 • TET Paper 2 (सामाजिक शास्त्रे विषय घेऊन): (graduation मधे सामाजिक शास्त्रे विषय असणारे + BEd/DEd) धारक विद्यार्थी

•  TET Paper 2 (सामाजिक शास्त्रे किंवा गणित – विज्ञान विषय घेऊन): (Graduation मधे भाषा विषय असणारे + BEd/DEd धारक) विद्यार्थि

TET 2024 Exam Syllabus/ TET 2024 परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम:

TET Paper 1 किंवा 2 यासाठी एकंदरीत १ली ते १०वी ची शालेय स्तरावरील महाराष्ट्र राज्य शासनाची सर्व पुस्तके जर अभ्यासली तर नक्कीच आपण अगदी उत्तम गुणांनी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो.

ही परीक्षा १५० गुणांची असून एकूण १५० प्रश्न विचारले जातात आणि वेळ १५० मिनिटे असतो. म्हणजे प्रतेक प्रश्नाला आपणास एक मिनिट मिळतो.

तसेच 2024 पासून ही परीक्षा IBPS company द्वारे ऑनलाईन होत असून यात कोणत्याच प्रकारची negative marking नसणार आहे.

फक्त मागील परीक्षेच्या आणि 2024 मधे होणाऱ्या परीक्षेच्या अभ्यासक्रम मधे थोडाफार बदल होऊ शकतो. तरीही इथे आपण TET 2024 च अधिकृत अभ्यासक्रम दिला आहे तो खालील प्रमाणे.

1.) TET Paper 1: १ली ते ५वी करीता (प्राथमिक शिक्षक)

 • वेळ – १५० मिनिटे
 • प्रश्न – १५०
 • गुण – १५०
 • विषय:

१.) भाषा १ (इंग्लिश/मराठी)- गुण ३०, प्रश्न ३०

२.) भाषा २ (इंग्लिश/मराठी परंतु भाषा १ मधील वगळून) – गुण ३०, प्रश्न ३०

३.) बाल मानस शास्त्र व अध्यापन शास्त्र – प्रश्न ३०, गुण ३०

४.) गणित – प्रश्न ३०, गुण ३०

५.) परिसर अभ्यास – प्रश्न ३०, गुण ३०

वर दिलेले ५ विषय हे TET Paper 1 साठी अनिवार्य असून त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि विश्लेषण खाली दिले आहे.

 • भाषा १/२ (मराठी/इंग्लिश): यात वर्ग १ली ते ८वी करीता राज्य शासनाची प्रचलित शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके आणि व्याकरण यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
 • बाल मानस शास्त्र आणि अध्यापन शास्त्र: यात ६ ते ११ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन पद्धती वरील प्रश्न असतील. तसेच विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्न विचारले जातील.

तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर प्रश्न विचारले जातील.

एकंदरीत DEd ला असलेला संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासणे गरजेचे आहे.

 • गणित: वर्ग १ली ते ५वी पर्यंतच्या गणित विषयातील सर्व मूलभूत संकल्पना यावरील प्रश्न असतील.

तसेच तर्क, समस्या निराकरण व गणित विषय मधील अध्यापन शास्त्र चे ज्ञान यावरील आधारित प्रश्न विचारले जातात.

 • परिसर अभ्यास: यात १ली ते ५वी वर्गाची इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयावरील मूलभूत संकल्पना यावर आधारित प्रश्न विचारले जातील. तसेच या विषयातील अध्यापन शास्त्र चे ज्ञान यावर सुद्धा प्रश्न असू शकतात.

काठिण्य पातळी:

एकंदरीत TET Paper 1 साठी ची काठिण्य पातळी ही १ली ते ८वी ला असणाऱ्या शालेय अभ्यासक्रम आणि माध्यमिक शालांत परीक्षेस असलेली काठिण्य पातळी असू शकते.

2.) TET Paper 2: 6वी ते 8वी करीता ( उच्च प्राथमिक शिक्षक)

 • वेळ – १५० मिनिटे
 • प्रश्न – १५०
 • गुण – १५०
 • विषय:

१.) भाषा १ (इंग्लिश/मराठी)- गुण ३०, प्रश्न ३०

२.) भाषा २ (इंग्लिश/मराठी परंतु भाषा १ मधील वगळून) – गुण ३०, प्रश्न ३०

३.) बाल मानस शास्त्र व अध्यापन शास्त्र – प्रश्न ३०, गुण ३०

४.) गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे – प्रश्न ६०, गुण ६०

वर दिलेले ४ विषय हे TET Paper २ साठी अनिवार्य असून त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि विश्लेषण खाली दिले आहे.

 • भाषा १/२ (मराठी/इंग्लिश): यात वर्ग ६वी ते ८वी करीता राज्य शासनाची प्रचलित शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके आणि व्याकरण यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
 • बाल मानस शास्त्र आणि अध्यापन शास्त्र: यात ६ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन पद्धती वरील प्रश्न असतील. तसेच विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्न विचारले जातील.

तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर प्रश्न विचारले जातील.

एकंदरीत BEd ला असलेला संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासणे गरजेचे आहे.

 • गणित व विज्ञान: वर्ग ६वी ते ८वी पर्यंतच्या गणित व विज्ञान विषयातील सर्व मूलभूत संकल्पना यावरील प्रश्न असतील.

तसेच तर्क, समस्या निराकरण आणि गणित व विज्ञान विषय मधील अध्यापन शास्त्र चे ज्ञान यावरील आधारित प्रश्न विचारले जातात.

 • सामाजिक शास्त्रे: यात ६वी ते ८वी वर्गाची इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयावरील मूलभूत संकल्पना यावर आधारित प्रश्न विचारले जातील. तसेच या विषयातील अध्यापन शास्त्र चे ज्ञान यावर सुद्धा प्रश्न असू शकतात.

काठिण्य पातळी:

एकंदरीत TET Paper २ साठी ची काठिण्य पातळी ही ६वी ते १२वी ला असणाऱ्या शालेय अभ्यासक्रम वर आधारित असू शकते.

TET Exam 2024 Reference book/ TET परीक्षा 2024 करीता उपयुक्त संदर्भ पुस्तके:

TET paper १ किंवा २ हे दोन्ही पेपर शालेय शिक्षण वर आधारित अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र मधे पूर्ण केलेली पदविका किंवा पदवी यावर आधारित असतो. त्याची काठिण्य पातळी ही कमी जास्त होऊ शकते. परंतु यासाठी आपण महाराष्ट्र सरकारने नेमून दिलेली १ ली ते १०वी ची पुस्तके आणि तो अभ्यासक्रम जर अभ्यासला तर नक्कीच आपल्याला कोणतेच संदर्भ पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही.

तरीही भूक नसो पण शिदोरी असो या म्हणी प्रमाणे आपण खालील संदर्भ पुस्तके वापरू शकता.

TET Paper करीता:

 • प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम (DEd अभ्यासक्रम) वर आधारित पुस्तके
 • राज्यशासन ची १ली ते १०वी ची पाठ्यपुस्तके
 • नवनीत प्रकाशन चे TET Paper 1 चे पुस्तक
 • विद्याभरती प्रकाशन चे TET Paper 1 चे पुस्तक
 • जुने TET Paper 1 चे पेपर यातील प्रश्नांचा सराव
 • संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासून झाल्यास टेस्ट सिरीज सोडवणे.

TET Paper 2 करीता:

 • प्रचलित अध्यापक शिक्षण पदवि अभ्यासक्रम व पाठ्यक्रम (BEd अभ्यासक्रम) वर आधारित पुस्तके
 • राज्यशासन ची १ली ते १२वी ची पाठ्यपुस्तके
 • नवनीत प्रकाशन चे TET Paper 2 चे पुस्तक
 • विद्याभरती प्रकाशन चे TET Paper 2 चे पुस्तक
 • जुने TET Paper 2 चे पेपर यातील प्रश्नांचा सराव
 • संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासून झाल्यास टेस्ट सिरीज सोडवणे.

MAHA TET Exam

It is mandatory for the candidate to qualify both TET and Central Pre-Recruitment Test for recruitment of teaching staff on compassionate basis. Now only TET passed candidates will be appointed to the post of teaching staff on compassionate basis. Read More details are given below.

For the recruitment of teaching staff on compassionate basis it is mandatory for the candidate to clear both TET and Central Pre-Recruitment Test. Now only TET passed applicants will be appointed to the post of teacher on compassionate basis. Read more details given below.

It is mandatory to pass Teacher Eligibility Test (TET) to become a primary teacher. Also, it is necessary to pass TET for the post of Educational Servant on Compassionate basis, and while appointing the post of Educational Servant on Compassionate basis, it has been instructed to ensure that the concerned candidate has passed TET. The instructions in this regard were given to the Chief Executive Officers of all Zilla Parishads by the Village Development Department.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 बाबतच्या सूचना

Maha TET Interim Answer Key:

TET Exam Answer Key : The interim Answer Key For the Maharashtra Teacher Eligibility Test (Maha TET) has been Released. Click on the link below to download the answer key.

Maha TET परीक्षेची अंतरिम उत्तरतालिका जाहीर: Click Here to Download

Maha TET Result:

Maha Tet 2021 Question Paper Download (Exam Date 21st November 2021)

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET) 2021 will be held on 21 November 2021 in two shifts as follow. Maharashtra TET Admit Card is now uploaded on 25th October 2021. Applicants who are applied for the exam can download Maharashtra TET Admit Card till 21st  November 2021.

Maha Tet Exam New Dates 2024: 

 • Maharashtra TET Paper 1: Available soon.
 • Maharashtra TET Paper 2: Available soon.

MAHA TET 2024 Eligibility:

MAHA TET 2024 Syllabus & Marks Distribution:

MAHA TET Paper I Exam Syllabus Based New Exam Pattern:

MAHA TET Paper II Exam Syllabus Based New Exam Pattern

MAHA TET 2024 Application Fee:

 • OBC/SBC/Open/VJNT: Rs. 500/- (Only Paper I or Only Paper II) & Rs. 800/- (Paper I & Paper II Both)
 • SC/ST/ Differently abled person: Rs. 250/- (Only Paper I or Only Paper II) & Rs. 400/- (Paper I & Paper II Both).

Cutoff Date for MAHATET Application:

 • Online Applications Start From: 
 • Closing Date for Online Applications: 
 • प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे: 

MAHA TET Exam Date:

Maharashtra TET 2021 exam date has been changed. The exam will now be held on October 31st, 2021 in two shifts.

 • पेपर I: 10th October 2021 31st October 2021 21st November 2021  (10:30 AM ते 01:00 PM) 
 • पेपर II: 10th October 2021 31st October 2021 21st November 2021 (02:00 PM ते 04:30 PM)
 • शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ परीक्षेचे आयोजन १०.१०.२०२१ रोजी करण्यात आलेले आहे. तथापि त्यामध्ये covid -१९ प्रादुर्भाव व अन्य (MPSC / UPSC ) परीक्षा आयोजन या कारणामुळे बदल होण्याची शक्यता आहे.

Maharasahtra TET Study Materials:

Study meterials with perfect guideline and suggestive question-answer set will be hare only at MAHASARKAR. Suggestive question-answer book 2021 by TET papers and group of experts will be sent to the appliers by cash on delivery system. No previously published book. Current 2021 new made book in original hand writing will be delivered with in 07 days of application.

Maharasahtra TET Exam Info Contact Details:

 • पत्ता: आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे – ४११ ००१ (Commissioner, Maharashtra State Examination Council, 17, Dr. Ambedkar Marg, Pune – 411 001).
 • हेल्पलाईन नंबर: 8956470891/92/93/94/95/96
 • ई-मेल: [email protected]

MAHA TET Previous Year Question papers:

 1. Maharashtra Teacher Eligibility Test OLD Year Question – Paper 1
 2. Maharashtra Teacher Eligibility Test OLD Year Question – Paper 2
 3. Maharashtra Teacher Eligibility Test Last Years Question – Paper 1
 4. Maharashtra Teacher Eligibility Test Last Years Question – Paper 2
 5. Maharashtra Teacher Eligibility Test 2016 Paper 1- Marathi Medium
 6. Maharashtra Teacher Eligibility Test 2013 Paper 1- English
 7. Maharashtra Teacher Eligibility Test 2013 Paper 1- Urdu
 8. Maharashtra Teacher Eligibility Test 2013 Paper II – English
 9. E-MAHA TET Question Paper SET 1
 10. E-MAHA TET Question Paper Set 2
 11. E-MAHA TET Question Paper Set 3
 12. E-MAHA TET Question Paper Set 4
 13. E-MAHA TET Question Paper Set 5
 14. E-MAHA TET Question Paper Set 6
 15. E-MAHA TET Question Paper Set 7
 16. E-MAHA TET Question Paper Set 8
 17. E-MAHA TET Question Paper Set 9
 18. E-MAHA TET Question Paper Set 10
 19. E-MAHA TET Question Paper Set 11
 20. E-MAHA TET Question Paper Set 12
 21. E-MAHA TET Question Paper Set 13
 22. E-MAHA TET Question Paper Set 14

TET Exam Qualifying Criterion/ TET परीक्षा उत्तीर्ण होण्यास आवश्यक गुण:

महारष्ट्र सरकारने ३० हजार शिक्षकांची भरती करण्यासाठी मार्च २०२३ मधे TAIT (Teaching Aptitude and Intelligence Test – अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी) घेतली. आणि मार्च २०२४ मधे TET Exam घेउन पुन्हा २० हजार शिक्षकांची भरती करण्यास सरकार TAIT २०२४ घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही शिक्षक भरती पवित्र पोर्टल द्वारे घेण्यात येते ज्यात without interview आणि with interview असे दोन राऊंड होतात. म्हणजे उच्च गुण असणाऱ्यांसाठी जिल्हा परिषद वर अगदी मोफत शिक्षक होण्याची संधी च आहे ही असे आपण म्हणू शकतो. परंतु त्यासाठी तुम्ही TET Exam उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आणि TET Exam उत्तीर्ण होण्याचा criterion category wise वेगळा असतो जो खाली दिलेला आहे.

 • TET Paper १/२:
 • एकूण गुण = १५०
 • एकूण प्रश्न = १५०
 • एकूण वेळ = १५० मिनिटे
 • General Category करीता TET Paper 1/2 उत्तीर्ण होण्यास आवश्यक गुण = 60% (90 गुण)
 • Other category साठी TET Paper 1/2 उत्तीर्ण होण्यास आवश्यक गुण = 55% (83 गुण)

हा  qualifying criterion प्रतेक वर्षी तोच असल्याने आपल्याला या नुसार गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणून जर तुम्ही नुकतेच DEd किंवा BEd पूर्ण केले असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे असे आपण म्हणू शकतो. तर मग कोणताही विलंब न करता जोमात तयारीला लागा आपले शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी.

Job opportunities after qualifying TET/ शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या संधी:

महाराष्ट्र सरकारने २०१३ पासून जिल्हा परिषद , नगर परिषद, नगर पालिका, महा नगर पालिका, खाजगी अनुदानित/विना अनुदानित/ अंशत अनुदानित संस्था, अल्पसंख्यांक संस्था, आदिवासी विभाग शिक्षण संस्था, समाजकल्याण विभाग शिक्षक संस्था यातील प्राथमिक शिक्षक भरती करीता TET अनिवार्य केलेली असून ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे आपण प्राथमिक शिक्षक होण्यास पात्र होणे असे होते.

म्हणजे ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आपणास शिक्षक होण्याची दारे खुली होतात. तसेच या परीक्षेची validity आता लाईफ टाइम करण्यात आली आहे ही एक चांगली गोष्ट आहे असे आपण म्हणू शकतो.

अल्पसंख्यांक, समाज कल्याण आणि आदिवासी विभाग यांची प्राथमिक शिक्षक भरती ही ऑफलाईन आणि वेगळी होत असून तिथे सुद्धा आपण TET उत्तीर्ण झाल्यावर शिक्षक या पदासाठी अर्ज करू शकतो.

तसेच जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पालिका, महा नगर पालिका, खाजगी संस्था यांची शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन होते त्यासाठी आपणास TET नंतर TAIT ही परीक्षा द्यावी लागते.

अशा प्रकारे MAHA TET उत्तीर्ण करून आपण महाराष्ट्र राज्य मधे प्राथमिक शिक्षक या पदासाठी पात्र ठरतो.

New Series for TET 2024/ IBPS पॅटर्न नुसार TET 2024 करीता व्हिडिओ ची मालिका:

जर तुम्ही DEd किंवा BEd पूर्ण केले असेल आणि महाराष्ट्र राज्यात शिक्षक व्हायचे असेल तर २०२४ हे वर्ष नक्कीच तुमचे स्वप्न पूर्तीचे वर्ष असेल. तर मग कोणताही विलंब न करता लगेच तयारीला लागा. आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेल्या व्हिडिओ मालिका यांचा नक्कीच फायदा करून घ्या.

 • नुकतेच महाराष्ट्र सरकारने TET Exam February किंवा मार्च २०२४ मधे घेण्याचे आवाहन केले आहे. म्हणजे आपल्याकडे कमीत कमी २ ते अडीच महिने आहेत. आणि यावेळेस पहिल्यांदा TET परीक्षा IBPS पॅटर्न नुसार ऑनलाईन होत असल्याने थोडाफार बदल होऊ शकतो. आणि हा होणारा बदल समजून घेण्यासाठी आम्ही आपणास IBPS पॅटर्न नुसार अत्यंत उपयुक्त सर्व विषयांची व्हिडिओ ची मालिका मोफत देणार आहोत. जेणेकरून वेळोवेळी शासनाने केलेले बदल आपणास लगेच समजतील.
 • तसेच यात आम्ही आता पर्यंतचे TET चे झालेले संपूर्ण पेपर यांचे संपूर्ण विश्लेषण देणार आहोत.
 • विषय नुसार व्हिडिओ ची मालिका, जुन्या प्रश्न पत्रिका यांचा सराव, IBPS पॅटर्न नुसार झालेलं बदल यांचा अभ्यास करून घेतला जाईल.
 • यात आपणास नियमित विषय नुसार अभ्यासक्रम मिळेल आणि परीक्षा होई पर्यंत संपूर्ण सराव करून घेतला जाईल.
 • जलद गतीने माहिती मिळिण्याकरिता आणि कमी वेळेत जास्त ज्ञान घेण्यासाठी आमचे telegram channel Ani you tube channel नक्कीच follow करा.

Telegram channel link: https://telegram.me/mahasarkar

WhatsApp Group link: https://mahasarkar.co.in/telegram-channel-mahasarkar/

You Tube channel link: https://www.youtube.com/channel/UCsfopybexwfEQhENyqrzlog

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).