MAHA TET 2024 Details & Syllabus (IBPS Pattern) | महा टीईटी 2024 संपूर्ण माहिती आणि अभ्यासक्रम (IBPS पॅटर्न)

MAHA TET 2024 Details & Syllabus (IBPS Pattern) | महा टीईटी 2024 संपूर्ण माहिती आणि अभ्यासक्रम (IBPS पॅटर्न):

Maha TET Syllabus 2024: दिनांक 23 ऑगस्ट 2013 शासन निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने टीईटी ही परीक्षा घेण्याची नियोजन केले. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका यांच्या शाळा तसेच खाजगी मान्यता प्राप्त अनुदानित किंवा विधाने किंवा कायम विना अनुदानित वर्ग पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (Maharashtra Teacher Eligibility Test) घेण्याचे योजिले होते. त्यानुसारच 2013 पासून महाराष्ट्र मध्ये दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ऑफलाइन परीक्षा घेतली जात असे. ही परीक्षा नुकतीच 2020 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. तब्बल तीन वर्षानंतर शिक्षक पात्रता परीक्षा ही पुन्हा फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्याची नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. आणि या परीक्षेकरिता लाखो उमेदवार तयारी करताना आपणास दिसून येतात. परंतु यावेळेस पहिल्यांदाच टीइटी परीक्षा आय बी पी एस पॅटर्ननुसार होणार असल्याने याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमचे टेलिग्राम शाळा नक्कीच फॉलो करा.

या परीक्षेसाठी डीएड किंवा बीएड केलेले उमेदवार हे पात्र ठरत असल्याने मोठा प्रमाणात आपणास स्पर्धा असल्याची दिसून येते. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन विभागात म्हणजेच पेपर १ आणि पेपर २ अशाप्रकारे दोन भिन्न पेपर घेऊन घेतली जाते.

पेपर १ हा वर्ग पहिली ते पाचवी या वर्गाकरिता शिक्षक होण्यासाठीची पात्रता ठरवतो, तर पेपर २ हा वर्ग सहावी ते आठवी या वर्गाकरिता शिक्षक होण्यासाठीची पात्रता ठरवतो. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ही केवळ वर्ग पहिली ते आठवी करिता शिक्षक होण्यासाठीची पात्रता आहे. ही परीक्षा पूर्ण केल्यानंतरच निवड किंवा बीएडउमेदवार वर्ग पहिली ते आठवी करिता शिक्षक होण्यास पात्र ठरतात.

2013 पूर्वी वर्ग पहिली ते आठवी करिता कोणत्याही प्रकारची शिक्षक पात्रता परीक्षा अस्तित्वात नव्हती. केवळ CET परीक्षा घेऊन डायरेक्ट गुणवत्ता यादीनुसार शिक्षकांची नियुक्ती दिली जायची. परंतु शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षक मिळावे यासाठी 2013 पासून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचे ठरवले. तेव्हापासून आजपर्यंत या पात्रता परीक्षा आणि अनिवार्य केल्या आहेत.
डीएड बीएड स्तरावरील उमेदवारांना वर्ग पहिली ते पाचवी करिता योग्य प्रकारे शिकवण्याचे कौशल्य तसेच विविध अध्यापन पद्धतीचा विकास व्हावा यासाठी टीईटी परीक्षेमध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र यांचा समावेश करण्यात आला. सोबतच भाषेचे ज्ञान आणि त्याचे महत्त्व टिकून ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने टीईटी परीक्षेमध्ये विविध भाषांना महत्व दिले आहे. तसेच थोड्याफार प्रमाणात गणित व बुद्धिमत्ता आणि परिसर अभ्यास यांची ओळख असावी यासाठी यांचा समावेश सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये करण्यात आला आहे. आज पर्यंत ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग मार्फत ऑफलाइन पद्धतीने टीईटी परीक्षा घेतली जायची त्यात आणि आयबीपीएस पॅटर्न मधे बरीच तफावत असणार आहे. कारण 2023 -2024 दरम्यान मोठ्या प्रमाणात सरळ सेवा भरतीच्या परीक्षा IBPS पॅटर्न नुसार घेण्यात आल्या आणि त्यांचा पॅटर्न सुद्धा वेगळाच दिसून आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळेच ही शिक्षक पात्रता परीक्षा पहिल्यांदाच आयबीपीएस पॅटर्ननुसार होणार असल्याने पूर्ण अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न याची सखोल ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही विविध आय बी पी एस पॅटर्ननुसार झालेल्या परीक्षा दिल्या असतील तर तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न विषयीची ओळख झालीच असेल. परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये आणि बाकी परीक्षांमध्ये विषयांची तफावत असल्याने ही परीक्षा एक वेगळीच परीक्षा ठरू शकते. कारण शिक्षक होण्यासाठी अध्यापनाचे कौशल्य, विविध विषयांमधील अध्यापनाविषयीच्या पद्धती यांची माहिती त्या शिक्षकास असणे आवश्यक आहे. आणि याच गुणांची तपासणी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे.

या पेजवर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा चे दोन्ही पेपर यांचा पॅटर्न आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार अभ्यासक्रम काय असतो याविषयी सखोल आणि अधिकृत माहिती आम्ही इथे देणार आहोत. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही ज्या पेपर साठी पात्र ठरता त्या पेपरचा संपूर्ण पॅटर्न आणि अभ्यासक्रम पाहू शकता. आपल्या माहितीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 हा वर्ग पहिली ते पाचवी करिता शिक्षक होण्यासाठी असून, हा पेपर केवळ डीएड उमेदवारच देऊ शकतात. तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर हा वर्ग सहावी ते आठवी करिता शिक्षक होण्यासाठीचा पेपर असून, हा पेपर डीएड परंतु पदवीधर उमेदवार आणि बीएड उमेदवार देऊ शकतात.
वरील बाबींचा विचार करून तुम्ही तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता यावरून ठरवू शकता की तुम्ही कोणत्या पेपर साठी पात्र आहात. 2024 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा साठी तुम्ही उत्सुक असाल तर वेळोवेळी प्रसिद्ध होणारी अधिकृत माहिती आणि सूचना यांच्यासाठी नक्कीच आमचे पेज फॉलो करा. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही वर्ग पहिली ते आठवी करिता शिक्षक व्हायचे असेल तर शिक्षक बाजूला परीक्षा अनिवार्य केली आहे त्यामुळे ही पात्रता परीक्षा तुम्ही उत्तीर्ण करणे अनिवार्य झाले आहे. जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल किंवा तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ इच्छित असाल तर तुम्ही नक्कीच या परीक्षेची तयारी करू शकता. विविध होणाऱ्या स्पर्धा परीक्षा आणि शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये फरक असल्याने आपण त्याच परीक्षांचा अभ्यासक्रम या परीक्षेला लागू करू शकत नाही. त्यामुळे योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार चा अभ्यासक्रम नक्कीच पाहू शकता. शिक्षक पात्रता परीक्षा चे दोन्ही पेपर हे एकूण 150 गुणांसाठी असून त्यासाठी दिला जाणारा कालावधी हा अडीच तासांचा असतो. तसेच प्रत्येक प्रवर्गानुसार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठीचा क्रायटेरिया हा ठरलेला आहे. त्याची संपूर्ण माहिती आपणास खाली दिलेल्या लिंक वर मिळेल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण अभ्यासक्रम आणि उत्तीर्ण होण्याचा क्रायटेरिया सुद्धा पाहू शकता. तसेच शिक्षक पात्रता परीक्षेचे दोन्ही पेपर हे बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपाचे असतात म्हणजेच मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स असून त्यांना चार पर्याय दिले जातात त्यापैकी अचूक एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो. या पेपरमध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसल्याने उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक उमेदवारास थोडे फार सोपे जाऊ शकते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला त्या जिल्हा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा

चे प्रमाणपत्र दिले जाते आणि तेच प्रमाणपत्र तुम्हाला संबंधित वर्गासाठी शिक्षक होण्यास पात्र असल्याचे सांगते.

आयबीपीएस पॅटर्न नुसार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी तुम्ही आमचे महा सरकार Mahasarkar टेलिग्राम चैनल नक्कीच जॉईन करू शकता.

  • प्राथमिक स्तर (पेपर 1): वर्ग १ ली ते ५ वी वर्ग करीता शिक्षक होण्यास आवश्यक
  • उच्च प्राथमिक स्तर (पेपर 2): वर्ग ६ वी ते ८ वी करीता शिक्षक होण्यास आवश्यक

वरील नियमांची अंमलबजावणी करूनच तुम्ही ज्या पेपर करिता पात्र ठरतात त्या पेपरचा सखोल अभ्यास करून योग्य मार्गदर्शनासाठी आमचे चॅनल फॉलो करू शकता.

MAHA TET Paper 1 Syllabus (IBPS Pattern) :

  • MAHA TET Paper 1 हा पेपर देण्याकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता म्हणजे तो व्यक्ती बारावी उत्तीर्ण असावा आणि त्याचे डी एड DEd झालेले असावे.
  • म्हणजेच (HSC + DEd) उत्तीर्ण उमेदवार च MAHA TET Paper 1 देण्यास पात्र ठरतात. म्हणजेच ते वर्ग पहिली ते पाचवी या वर्गाकरीता प्राथमिक शिक्षक होण्यास पात्र ठरतात.
  • MAHA TET Paper 1 या पेपर चा पॅटर्न खालील प्रमाणे आहे.

एकूण कालावधी – 150 मिनिटे

एकूण प्रश्न – 150

एकूण गुण – 150

विषय:

१.) मराठी व्याकरण (३० गुण)

२.) गणित आणि बुद्धिमत्ता (३० गुण)

३.) इंग्रजी व्याकरण (३० गुण)

४.) बाल मानसशास्त्र (३० गुण)

५.) परिसर अभ्यास (३० गुण)

वर दिलेले एकूण पाच विषय आहेत आणि या पाच विषयांवर प्रत्येकी 30 प्रश्न महा टीईटी पेपर एक MAHA TET Paper 1 मध्ये विचारले जातात. म्हणजेच प्रत्येक प्रश्न हा एक गुणाचा असून प्रत्येक विषयाला 30 गुण दिले जातात आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असते.  जर आपण जुन्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर्सचा अभ्यास केला तर आपणास दिसून येते की आयबीपीएस पॅटर्न आणि जुना पॅटर्न यामध्ये फार मोठी तफावत आहे. म्हणून इथे आम्ही आपणास आयबीपीएस पॅटर्ननुसार शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक चा संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे, तो खालील प्रमाणे.

१.) मराठी:

लिंग

विशेषण

शुद्ध शब्द

अशुध्द शब्द

शुद्ध वाक्य

अशुध्द वाक्य

जोडशब्द व अलंकारिक शब्द

समानार्थी शब्द

विरुद्धार्थी शब्द

शब्दांची तार्किक मांडणी

वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ

म्हणी आणि त्यांचे अर्थ

अर्थपूर्ण परिच्छेद

संधी आणि त्याचे प्रकार

समास आणि त्याचे प्रकार

शब्दांच्या जाती

अलंकार

अव्यय आणि त्याचे प्रकार

प्रयोग आणि त्याचे प्रकार

संधी आणि संधी विग्रह

वाक्य आणि त्यांचे प्रकार

उतारा

संवाद

शब्दसमुहाबद्दल एक शब्द

पारिभाषिक शब्द

वचन

विभक्ती, कारक अर्थ व शब्दाचे सामान्य रूप

विरामचिन्हे

काळ आणि त्याचे प्रकार

वृत्त आणि त्याचे प्रकार

 २.) इंग्रजी व्याकरण:

Synonyms

Anotonyms

Most appropriate words

Idioms

Phrase

Proverb

Choose Correct Spelling

Articles

Change the Voice

Direct and Indirect Speech

One Word Substitution

Opposite and similar meaning words

Homophones

Word formation

Crossword Puzzles

Sentence Formation

Types of sentences

Parts of speech

Modal Auxiliaries

Tenses

Active and Passive Voice

Degree

Prose or Passage for Reading skills

३.) गणित आणि बुद्धिमत्ता:

संख्याज्ञान

गुणाकार,भागाकार

वर्गमूळ,घन, घनमूळ

सरळ रूप द्या

लसावी, मसावी

अपूर्णांक

चिन्ह अदलाबदली

वर्ग समीकरणे

किंमत काढणे

गुणोत्तर – प्रमाण

नफा – तोटा

काम, काळ, वेग, मजूर , अंतर

सरासरी

टक्केवारी

वयवारी

श्रेणी

सरळव्याज व चक्रवाढ व्याज

घड्याळ

सांख्यिकी

संभाव्यता

दिनदर्शिका

स्थाननिश्चिती

भूमिती

क्षेत्रफळ

पृष्ठफळ

घनफळ

संख्या आणि त्यांचे प्रकार

दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक

घातांक आणि त्याचे नियम

दशमान परिमाणे

परिमिती

स्तंभालेख आणि त्यांचे प्रकार

शेकडेवारी

बहुपदी

मालिका पूर्ण करणे

अक्षर मालिका

अंक मालिका

क्रम निश्चिती

समान संबंध

वेगळे पद ओळखणे

सांकेतिक भाषा

नातेसंबंध

अंकांचे कोडे

आरशातील प्रतिमा

पेपर कटिंग

घणाकृती ठोकळा

आकृतीची मालिका

व्हेन आकृती

लपलेल्या आकृती

आकृतीचा समान संबंध

गटात न बसणारी आकृती

बैठक व्यवस्था

विधान व गृहीतके

विधान व निष्कर्ष

विधान व कृती संच

 ४.) बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र:

  • सहा ते अकरा वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रिया वरील प्रश्न
  • विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय अंतरक्रिया, उत्तम शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्न
  • विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यांच्यावर आधारित प्रश्न
  • एकंदरीत डीएडला DEd असलेला मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र याचा संपूर्ण अभ्यासक्रम

५.) परिसर अभ्यास:

  • इतिहास

नागरिकशास्त्र

भूगोल

सामान्य विज्ञान

पर्यावरण

या विषयातील मूलभूत संकल्पना आणि या विषयांवरील अध्यापन शास्त्रीय ज्ञान यावर आधारित प्रश्न

  • एकंदरीत पहिली ते पाचवी या वर्गाचा माध्यमिक शाळांत परीक्षे चा संपूर्ण अभ्यासक्रम

अशाप्रकारे पाच विषयांचा अभ्यासक्रम हा महा टीईटी पेपर एक करिता दिलेला असतो. जर आपण वरील अभ्यासक्रमानुसार अभ्यास केला आणि सराव केला तर नक्कीच आपण पहिल्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात आणि आपले शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

MAHA TET Paper 2 Syllabus (IBPS Pattern):

MAHA TET Paper 2 – Maths and Science (गणित विज्ञान)

MAHA TET Paper 2 (गणित- विज्ञान)हा पेपर देण्याकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता म्हणजे तो व्यक्ती डीएड आणि सोबतच गणित आणि विज्ञान या विषयातून पदवी उत्तीर्ण केलेला असावा. किंवा तो व्यक्ती बीएड आणि गणित व विज्ञान या विषयातून पदवी उत्तीर्ण केलेला असावा.

म्हणजेच (BSc + BEd) किंवा (BSc+ DEd) उत्तीर्ण विद्यार्थी MAHA TET Paper 2 (गणित विज्ञान) देऊ शकतात.

असे विद्यार्थी वर्ग सहावी ते आठवी करिता विज्ञान व गणित या विषयासाठी उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून किंवा विषय शिक्षक म्हणून पात्र ठरतात.

MAHA TET Paper 2 (गणित –विज्ञान) चा संपूर्ण अभ्यासक्रम आणि पॅटर्न खालील प्रमाणे आहे.

एकूण कालावधी – १५० मिनिटे

एकूण प्रश्न – १५०

एकूण गुण – १५०

विषय:

१.) मराठी व्याकरण (३० गुण)

२.) इंग्रजी व्याकरण (३० गुण)

३.) गणित आणि बुद्धिमत्ता (३० गुण)

४.) विज्ञान (३० गुण)

५.) बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र (३० गुण)

पर दिलेले पाच विषय हे महाटीईती पेपर दोन गणित विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण करण्यासाठी दिलेल्या असतात. म्हणजे प्रत्येक विषयाला 30 प्रश्न आणि 30 गुण असतात. यात कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह माहिती नसते. आता आपण खोलात जाऊन या सर्व विषयांचा अभ्यासक्रम पाहणार आहोत जो खालील प्रमाणे आहे.

१.) मराठी:

लिंग

विशेषण

शुद्ध शब्द

अशुध्द शब्द

शुद्ध वाक्य

अशुध्द वाक्य

जोडशब्द व अलंकारिक शब्द

समानार्थी शब्द

विरुद्धार्थी शब्द

शब्दांची तार्किक मांडणी

वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ

म्हणी आणि त्यांचे अर्थ

अर्थपूर्ण परिच्छेद

संधी आणि त्याचे प्रकार

समास आणि त्याचे प्रकार

शब्दांच्या जाती

अलंकार

अव्यय आणि त्याचे प्रकार

प्रयोग आणि त्याचे प्रकार

संधी आणि संधी विग्रह

वाक्य आणि त्यांचे प्रकार

उतारा

संवाद

शब्दसमुहाबद्दल एक शब्द

पारिभाषिक शब्द

वचन

विभक्ती, कारक अर्थ व शब्दाचे सामान्य रूप

विरामचिन्हे

काळ आणि त्याचे प्रकार

वृत्त आणि त्याचे प्रकार

२.) इंग्रजी व्याकरण:

Synonyms

Anotonyms

Most appropriate words

Idioms

Phrase

Proverb

Choose Correct Spelling

Articles

Change the Voice

Direct and Indirect Speech

One Word Substitution

Opposite and similar meaning words

Homophones

Word formation

Crossword Puzzles

Sentence Formation

Types of sentences

Parts of speech

Modal Auxiliaries

Tenses

Active and Passive Voice

Degree

Prose or Passage for Reading skills

३.) गणित आणि बुद्धिमत्ता:

संख्याज्ञान

गुणाकार,भागाकार

वर्गमूळ,घन, घनमूळ

सरळ रूप द्या

लसावी, मसावी

अपूर्णांक

चिन्ह अदलाबदली

वर्ग समीकरणे

किंमत काढणे

गुणोत्तर – प्रमाण

नफा – तोटा

काम, काळ, वेग, मजूर , अंतर

सरासरी

टक्केवारी

वयवारी

श्रेणी

सरळव्याज व चक्रवाढ व्याज

घड्याळ

सांख्यिकी

संभाव्यता

दिनदर्शिका

स्थाननिश्चिती

भूमिती

क्षेत्रफळ

पृष्ठफळ

घनफळ

संख्या आणि त्यांचे प्रकार

दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक

घातांक आणि त्याचे नियम

दशमान परिमाणे

परिमिती

स्तंभालेख आणि त्यांचे प्रकार

शेकडेवारी

बहुपदी

मालिका पूर्ण करणे

अक्षर मालिका

अंक मालिका

क्रम निश्चिती

समान संबंध

वेगळे पद ओळखणे

सांकेतिक भाषा

नातेसंबंध

अंकांचे कोडे

आरशातील प्रतिमा

पेपर कटिंग

घणाकृती ठोकळा

आकृतीची मालिका

व्हेन आकृती

लपलेल्या आकृती

आकृतीचा समान संबंध

गटात न बसणारी आकृती

बैठक व्यवस्था

विधान व गृहीतके

विधान व निष्कर्ष

विधान व कृती संच

 ४.) बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र:

  • सहा ते अकरा वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रिया वरील प्रश्न
  • विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय अंतरक्रिया, उत्तम शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्न
  • विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यांच्यावर आधारित प्रश्न
  • एकंदरीत डीएडला BEd असलेला मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र याचा संपूर्ण अभ्यासक्रम

५.) विज्ञान:

  • वर्ग १ ली ते १० वी पर्यंत च महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद च संपूर्ण विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम
  • विज्ञान विषयाशी निगडीत अध्यापन पद्धती
  • विज्ञान विषयाशी निगडीत BEd ला असलेला संपूर्ण अभ्यासक्रम

MAHA TET Paper 2 – Social Sciences (सामाजिक शास्त्रे):

MAHA TET Paper 2 (सामाजिक शास्त्रे)हा पेपर देण्याकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता म्हणजे तो व्यक्ती डीएड आणि सोबतच सामाजिक शास्त्रे या विषयातून पदवी उत्तीर्ण केलेला असावा. किंवा तो व्यक्ती बीएड आणि सामाजिक शास्त्रे या विषयातून पदवी उत्तीर्ण केलेला असावा.

म्हणजेच (BA + BEd) किंवा (BA+ DEd) उत्तीर्ण विद्यार्थी MAHA TET Paper 2 (सामाजिक शास्त्रे) देऊ शकतात.

असे विद्यार्थी वर्ग सहावी ते आठवी करिता सामाजिक शास्त्रे या विषयासाठी उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून किंवा विषय शिक्षक म्हणून पात्र ठरतात.

MAHA TET Paper 2 (सामाजिक शास्त्रे) चा संपूर्ण अभ्यासक्रम आणि पॅटर्न खालील प्रमाणे आहे.

एकूण कालावधी – १५० मिनिटे

एकूण प्रश्न – १५०

एकूण गुण – १५०

विषय:

१.) मराठी व्याकरण (३० गुण)

२.) इंग्रजी व्याकरण (३० गुण)

३.) सामाजिक शास्त्रे (६० गुण)

४.) बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र (३० गुण)

पर दिलेले चार विषय हे महाटीईती पेपर दोन सामाजिक शास्त्रे विषय घेऊन उत्तीर्ण करण्यासाठी दिलेल्या असतात. म्हणजे प्रत्येक विषयाला 30 प्रश्न आणि 30 गुण असतात. यात सामाजिक शास्त्रे krita ६० प्रश्न म्हणजेच ६० गुण असतात. यात कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते. आता आपण खोलात जाऊन या सर्व विषयांचा अभ्यासक्रम पाहणार आहोत जो खालील प्रमाणे आहे.

१.) मराठी:

लिंग

विशेषण

शुद्ध शब्द

अशुध्द शब्द

शुद्ध वाक्य

अशुध्द वाक्य

जोडशब्द व अलंकारिक शब्द

समानार्थी शब्द

विरुद्धार्थी शब्द

शब्दांची तार्किक मांडणी

वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ

म्हणी आणि त्यांचे अर्थ

अर्थपूर्ण परिच्छेद

संधी आणि त्याचे प्रकार

समास आणि त्याचे प्रकार

शब्दांच्या जाती

अलंकार

अव्यय आणि त्याचे प्रकार

प्रयोग आणि त्याचे प्रकार

संधी आणि संधी विग्रह

वाक्य आणि त्यांचे प्रकार

उतारा

संवाद

शब्दसमुहाबद्दल एक शब्द

पारिभाषिक शब्द

वचन

विभक्ती, कारक अर्थ व शब्दाचे सामान्य रूप

विरामचिन्हे

काळ आणि त्याचे प्रकार

वृत्त आणि त्याचे प्रकार

२.) इंग्रजी व्याकरण:

Synonyms

Anotonyms

Most appropriate words

Idioms

Phrase

Proverb

Choose Correct Spelling

Articles

Change the Voice

Direct and Indirect Speech

One Word Substitution

Opposite and similar meaning words

Homophones

Word formation

Crossword Puzzles

Sentence Formation

Types of sentences

Parts of speech

Modal Auxiliaries

Tenses

Active and Passive Voice

Degree

Prose or Passage for Reading skills

 ३.) बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र:

  • सहा ते अकरा वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रिया वरील प्रश्न
  • विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय अंतरक्रिया, उत्तम शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्न
  • विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यांच्यावर आधारित प्रश्न
  • एकंदरीत डीएडला BEd असलेला मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र याचा संपूर्ण अभ्यासक्रम

४.) सामाजिक शास्त्रे:

  • वर्ग पहिली ते दहावी संपूर्ण सामाजिक शास्त्रे विषय महाराष्ट्र राज्य ने नेमून दिलेला अभ्यासक्रम
  • सामाजिक शास्त्रे विषय निगडित अध्यापन पद्धती
  • एकंदरीत BEd ल असलेला सामाजिक शास्त्रे या विषयासाठी च संपूर्ण अभ्यासक्रम

 MAHA TET Paper 2 (भाषा विषय):

महा टीइटी पेपर 2 भाषा विषय करिता असणारी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता म्हणजे तो व्यक्ती डीएड किंवा बीएड झालेला असावा आणि त्याला पदवीला संबंधित भाषा विषय असणे आवश्यक आहे.

म्हणजेच (BEd+ BA) किंवा (DEd+ BA) भाषा विषय मधून उत्तीर्ण केलेला असावा.

सदर उमेदवार हा सहावी ते आठवी करिता भाषा विषय शिक्षक म्हणून पात्र ठरतो.

अशा उमेदवारांनी महा टीईटी पेपर दोन गणित विज्ञान विषय घेऊन किंवा सामाजिक शास्त्रे विषय घेऊन सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा देऊ शकतात. आणि त्यांचे हे प्रमाणपत्र भाषा विषय शिक्षकासाठी ग्राह्य धरले जातात.

MAHA TET Paper I and Paper II Exam Syllabus – Click Here

Maha TET 2024 Paper 1 Syllabus in Marathi

Maharashtra TET Paper 2 Syllabus

MAHA TET 2024 पात्रता निकष: Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT