MAHA TET 2024 Paper 1 संपूर्ण अभ्यासक्रम (IBPS पॅटर्न नुसार)

maha tet logo

Maha TET 2024 Paper 1 Syllabus in Marathi (IBPS पॅटर्न नुसार)

Maha TET 2024 Paper 1 Syllabus: या पेजवर आपणास शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक याविषयीचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि हा पेपर देण्यासाठी ची आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तसेच पेपर एक उत्तीर्ण होण्यासाठीचा क्रायटेरिया या सर्वांची अधिकृत आणि सखोल माहिती आम्ही देणार आहोत.

पात्रता (Eligibility):

 • आपण मुख्य पेजवर बघितले आहे की शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर पहिला देण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता म्हणजे त्या उमेदवाराने बारावी उत्तीर्ण केलेली असावी आणि सोबत डीएड ही पदविका उत्तीर्ण केलेली असावी. तरच तो उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर एक देण्यास पात्र ठरतो.
 • (HSC + DEd) उत्तीर्ण उमेदवारच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक देऊ शकतात.

परीक्षेचा आराखडा आणि प्रश्नांचे स्वरूप:

 • एकूण गुण = 150
 • एकूण कालावधी = 150 मिनिटे
 • एकूण प्रश्न = 150

विषय:

१.) बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र: गुण ३०, प्रश्न ३०, बहुपर्यायी प्रश्न

२.) भाषा १: गुण ३०, प्रश्न ३०, बहुपर्यायी प्रश्न

३.) भाषा २: गुण ३०, प्रश्न ३०, बहुपर्यायी प्रश्न

४.) गणित: गुण ३०, प्रश्न ३०, बहुपर्यायी प्रश्न

५.) परिसर अभ्यास: गुण ३०, प्रश्न ३०, बहुपर्यायी प्रश्न

अशाप्रकारे एकूण पाच विषयांचा शिक्षक पात्र परीक्षा पेपर एक मध्ये समावेश होतो आणि त्यामध्ये विचारल्या जाणारी प्रश्नांची संख्या आणि गुण वरील प्रमाणे दिलेले आहेत. आता आपण शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक मधील प्रत्येक विषयाचा सखोल आयबीपीएस पॅटर्ननुसार चा अभ्यासक्रम पाहूया.

१.) बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र:

 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक मध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयात विचारण्यात येणारे प्रश्न हे, मानसशास्त्राशी संबंधित असून ते सहा ते अकरा या वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियांशी निगडित असतात.
 • यासोबतच बालकांची वाढ त्यांच्या गरजा विशेष बालकांच्या घरच्या त्यांची गुणवैशिष्ट्ये त्यांच्या शालेय जीवनात होणाऱ्या आंतरक्रिया व बदल उत्तम शिक्षक होण्यासाठी ची आवश्यक गुणवैशिष्ट्ये या सर्व मुद्द्यांवर आधारित प्रश्नांचा समावेश बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र यामध्ये होतो.
 • इतकेच नव्हे तर विविध विषयांमध्ये जसे की भाषा विषय गणित विषय परिसर अभ्यास विषय या विषयांमध्ये आवश्यक असणाऱ्या अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन पद्धती यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक करिता डीएड उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरत असल्याने, डीएड पदवीकेला जो बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयाचा अभ्यास आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासणे आवश्यक आहे.
 • अशाप्रकारे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक करिता बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम हा वर दिल्याप्रमाणे आहे.
 • आज पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही केवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा विभाग मार्फत घेण्यात येत होती. त्यामुळे बाजारात त्याच पॅटर्न ची पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. परंतु ती पुस्तके न वापरता तुम्ही आयबीपीएस पॅटर्ननुसार सदर परीक्षेचा अभ्यास करू शकता.
 • कारण आयबीपीएस पॅटर्नमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र यामधील ज्ञान तपासले जात नाही, तर तुम्ही वेगवेगळ्या शालेय अडचणींमध्ये किंवा शिकवत असताना वर्गात घडणाऱ्या समस्यांवर किंवा विद्यार्थ्यांच्या शालेय समस्या सोडविण्यासाठी कोणते उपाय कराल, कोणते नियोजन कराल किंवा कशा प्रकारे त्या समस्या सोडवाल यावरच सहज आणि सोपे परंतु बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न विचारले जातात.

२.) भाषा १ आणि भाषा २:

 • शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये भाषा या विषयात एकूण तीन भाषांचा समावेश होतो. त्यापैकी कोणत्याही दोन भाषा निवडणे हे आपले कर्तव्य आहे.
 • उपलब्ध असणाऱ्या तीन भाषांमधून तुम्ही भाषा एक म्हणून कोणतेही भाषा निवडू शकता आणि भाषा दोन म्हणून पहिली भाषा सोडून अन्य कोणतेही भाषा निवडू शकता.
 • वर्ग एक ते पाच करिता असणाऱ्या शिक्षकांना All Subjects शिकवायचे असल्याने त्यांचा कोणत्याच विषयाशी संबंध येत नाही.
 • त्यामुळेच ते कोणत्याही भाषेला प्राधान्य देऊ शकतात. पहिली भाषा निवडल्यानंतर दुसरी भाषा कोणती निवडायची याविषयीची माहिती खाली दिलेली आहे.

१.) भाषा १ मराठी निवडल्यास, भाषा २ इंग्रजी निवडू शकता.

२.) भाषा १ इंग्रजी निवडल्यास, भाषा २ मराठी निवडू शकता.

३.) भाषा १ उर्दू निवडल्यास, भाषा २ मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक निवडू शकता.

 • अशाप्रकारे भाषा १ आणि भाषा २ दोन तुम्ही निवडू शकता.

भाषा विषयाचा जर आपण अभ्यासक्रम बघितला तर आपण असे सांगू शकतो की मराठी व्याकरण आणि लेखन, इंग्लिश ग्रामर आणि writing skill, आणि उर्दू मधे सुद्धा याप्रमाणे अभ्यासक्रम दिल्या जातो.

 • एकंदरीत बाकी सरळ सेवा परीक्षांमध्ये जे काही मराठी आणि इंग्लिश याविषयी चे टॉपिक विचारले जातात तेच टोपी शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात.
 • परंतु भाषा विषयांमध्ये असणारी काठीन्य पातळी ही वर्ग पहिली ते पाचवी या वर्गासाठी असलेल्या अभ्यासक्रमानुसार असेल.
 • आयबीपीएस पॅटर्न मध्ये भाषा या विषयावर विचारले जाणारे प्रश्न आहे ज्ञानावर आधारित नसून ते तुमच्या भाषा कौशल्यावर संवाद कौशल्यावर लेखन कौशल्यावर आधारित असल्याचे दिसून येते.
 • त्यामुळे IBPS पॅटर्ननुसार भाषा विषयाचे प्रश्न हे सोपे जरी असले तरीही लक्षपूर्वक वाचूनच ते सोडवावे लागतील.
 • थोडक्यात मराठी भाषेमध्ये लिंग, विशेषण, शुद्ध अशुद्ध शब्द, शुद्ध अशुद्ध वाक्य, जोडशब्द व अलंकारिक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांची तार्किक मांडणी, वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ, म्हणी व त्यांचे अर्थ, वाक्य आणि त्यांचे प्रकार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वचन, विरामचिन्हे, काळ आणि त्याचे प्रकार यावर आधारित प्रश्न असू शकतात.
 • आय बी पी एस पॅटर्न मध्ये वर दिलेल्या मुद्द्यांवर जास्तीत जास्त आकलन होईल असे प्रश्न विचारले जातात.
 • इंग्रजी भाषेच्या संदर्भात सांगायची झाल्यास synonyms, antonyms, most appropriate words, phrases, idioms, proverb, spelling correction, articles, one word substitution, opposite and similar meaning words, sentence formation, model auxiliaries, tenses या सर्व मुद्द्यांवर जास्त भर दिला जातो.

• उर्दू भाषेच्या संदर्भात सांगायचे झाल्यास वर्ग पहिली ते पाचवी करिता जो अभ्यासक्रम त्या भाषेसाठी दिला आहे त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता.

४.) गणित:

 • सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे गणित कारण गणित या विषयाचा अभ्यासक्रम खूप विस्तारलेला आहे असे आपण म्हणू शकतो.
 • आयबीपीएस पॅटर्न मध्ये गणित विषयापेक्षा बुद्धिमत्ता या विषयावर जास्त भर दिला जातो हे आपण पाहिलेच आहे.
 • त्यामुळे गणित विषयाचा अभ्यास करताना त्यातील मूलभूत संबोध, तार्किकता आणि समस्या निराकरण, बुद्धिमत्ता शी निगडित सर्व प्रकारचे प्रश्न आणि गणित विषयाच्या अध्यापन पद्धती यांचेवर जास्त भर दिला जातो.
 • IBPS पॅटर्न मध्ये गणित या विषयात आकलन क्षमता यावर आधारित जास्त प्रश्न विचारले जातात.
 • IBPS पॅटर्न नुसार गणित या विषयात संख्याज्ञान, गुणाकार, भागाकार, वर्गमूळ- घन -, सरळ रूप द्या, लसावी- मसावी, अपूर्णांक, चिन्हांची अदलाबदली, वर्गसमीकरणे, किंमत काढणे, गुणोत्तर- प्रमाण, काम- काळ -वेग -मजूर -, टक्केवारी, सरासरी, नफा – तोटा, वयवारी, घड्याळ, भूमिती वरील प्रश्न, क्षेत्रफळ, संख्या आणि त्यांचे प्रकार, घातांक आणि त्यांचे नियम, परिमिती, स्तंभालेख आणि त्यांचे प्रकार, शेकडेवारी, बहुपदी, मालिका पूर्ण करणे, अक्षर मालिका, अंक मालिका, क्रम निश्चिती, समान संबंध, वेगळे पद ओळखणे, सांकेतिक भाषा, नातेसंबंध, अंकांचे कोडे, आरशातील प्रतिमा, पेपर कटिंग, आकृतीची मालिका, वेन आकृती, लपलेल्या आकृती, आकृतीचा समान संबंध, गटात न बसणारी आकृती, बैठक व्यवस्था, विधान व गृहीतके, विधान व निष्कर्ष, विधान व कृती संच इत्यादी प्रकारच्या सोप्या आणि अवघड प्रश्नांवर जास्त भर दिला जातो.
 • त्यामुळेच गणित विषयाचा अभ्यास करताना वरील सर्व टॉपिक यांचा सखोल अभ्यास करणे आणि सराव करणे आवश्यक आहे.

५.) परिसर अभ्यास:

 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक मध्ये परिसर अभ्यास या विषयात विचारले जाणारे प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संकल्पना आणि अध्यापन शास्त्रीय पद्धती यांवर विचारले जातात.
 • वर्ग पहिली ते पाचवी ची परिसर अभ्यास या विषयाची पुस्तके आणि अभ्यासक्रम जर अभ्यासला तर परिसर अभ्यास या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो.
 • तसेच वर्ग तिसरी ते पाचवीचा इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयाचे अभ्यासक्रम वर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात.
 • एकंदरीत परिसर अभ्यास या विषयामध्ये विचारले जाणारे प्रश्न आहे पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात असे पण म्हणू शकतो.

अशाप्रकारे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक साठी वरील पाच विषयांचा अभ्यासक्रम दिला आहे. या अभ्यासक्रमाची काठीन्य पातळी यामध्ये थोडी फार तफावत होऊ शकते. जर काठी न पातळीचा विचार केला तर माध्यमिक शालांत परीक्षेच्या पातळीचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. आयबीपीएस पॅटर्न मध्ये ज्ञानावर आधारित प्रश्नांवर भर न देता तुमचे कौशल्य, आकलन पद्धती, संवाद पद्धती, वर्गामध्ये उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल, शालेय समस्या यांवर आधारित जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात.

MAHA TET Qualifying Criterion/ Cut Off Marks (TET उत्तीर्ण होण्याचे निकष):

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ही केवळ शिक्षक होण्यासाठी ची पात्रता परीक्षा असल्याने या परीक्षेचा कट ऑफ लागत नसतो, तर या परीक्षेचा उत्तीर्ण होण्याचा क्रायटेरिया नेहमीसाठी एकच असून तो ठरलेलाच असतो. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक साठी लागू होणारा Qualifying क्रायटेरिया प्रवर्गानुसार वेगळा असून तो खालील प्रमाणे आहे.

General Category:

 • जनरल कॅटेगिरी मधील उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
 • आपणास माहिती आहे की शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक हा 150 गुणांचा असून त्याचे साठ टक्के म्हणजेच किमान 90 मार्क्स मिळणे अनिवार्य आहे.
 • जर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक मध्ये 150 गुणांपैकी 90 मार्क्स मिळत असतील तर General Category मधील उमेदवार ती परीक्षा पात्र होईल किंवा उत्तीर्ण होईल असे आपण म्हणू शकतो.

OBC/SC/ST:

 • OBC/SC/ST कॅटेगिरी मधील उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक उत्तीर्ण होण्यासाठी किमान 55 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
 • आपणास माहिती आहे की शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक 150 गुणांचा असतो त्यापैकी 55% म्हणजे 82 गुण मिळणे आवश्यक आहे.
 • थोडक्यात शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक उत्तीर्ण करायचा असेल तर जनरल सोडून दुसऱ्या कॅटेगिरी करिता 55 टक्के म्हणजेच 150 गुणांपैकी 82 गुण असतील तरच तो उमेदवार त्या कॅटेगिरीतून शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक उत्तीर्ण आहे असे आपण म्हणू शकतो.

Important Links:

Maha TET Question Paper Set wise

Set 1

Set 2

Set 3

Set 4

Set 5

Set 6

Set 7

Set 8

Set 9

Set 10

Set 11

Set 12

Set 13

Set 14♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT