MAHA TET Eligibility Criteria 2024 | MAHA TET 2024 पात्रता निकष

maha tet logo

MAHA TET 2024 Eligibility Criteria | MAHA TET 2024 पात्रता निकष

Maha TET Eligibility Criteria 2024: महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शिक्षक होण्या करीता म्हणजेच वर्ग पहिली ते आठवी या वर्गासाठी शिक्षक होण्याकरिता महा टीईटी MAHA TET (Teacher Eligibility Test) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2013 पासून अनिवार्य केली आहे. 2013 नंतर शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी घेण्यात येत होती. परंतु त्यानंतर दोन ते तीन वर्षाच्या कालावधीने ही परीक्षा होत गेली. 2020 मध्ये शेवटची शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती आणि त्याचा निकाल तब्बल एक वर्षाने म्हणजेच 2021 मध्ये लावण्यात आला होता. ही परीक्षा ऑफलाइन घेतल्या कारणाने यामध्ये बऱ्याच वेळा गैरप्रकार झाल्याचे दिसून आले आणि त्यामुळेच या परीक्षेचा निकाल लावण्यात बराच अवधी गेला. तब्बल तीन वर्षानंतर ही परीक्षा आता 2024 मध्ये म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. तसेच ही परीक्षा यावेळेस पहिल्यांदा ऑनलाईन होत असून ही परीक्षा आयबीपीएस या आयटी कंपनी मार्फत घेण्यात येण्याचे शासनाने नियोजन केले आहे. जेणेकरून कोणताही प्रकारचा गैरप्रकार परीक्षेदरम्यान आढळून येणार नाही आणि निकाल सुद्धा लवकरात लवकर जाहीर करू देता येईल. आपणा सर्वांना माहिती आहे की शिक्षक होण्याकरिता सर्वात महत्त्वाची म्हणजे तो उमेदवार डीएड DEd किंवा बीएड BEd पूर्ण केलेला असावा. महा टीईटी ही परीक्षा दोन विभागात विभागल्या गेलेली आहे. म्हणजेच महाटीई परीक्षा पेपर एक आणि पेपर दोन अशा प्रकारे घेतली जाते. पेपर एक हा पहिली ते पाचवी करिता पात्र असणाऱ्या शिक्षकांकरिता असते तर पेपर दोन ही परीक्षा सहावी ते आठवी या वर्गासाठी पात्र ठरणाऱ्या शिक्षकांसाठी असते. ही परीक्षा फक्त पात्रता परीक्षा असल्याकारणाने ही परीक्षा उत्तीर्ण झाले म्हणजे आपण शिक्षक झालो असे नाही तर आपण शिक्षक होण्यास पात्र आहोत असे निदर्शनास येते. जर आपण महाटीईटी 2024 यासाठी योग्य मार्गदर्शन हवे असेल तर नक्कीच आमचे चॅनल फॉलो करा. आज या वेब पेजवर तुम्हाला टीईटी बद्दलची संपूर्ण पात्रता तसेच शैक्षणिक पात्रता या सर्वांची माहिती उपलब्ध करून दिला जाणार आहे. आज पर्यंत महाटीईटी ही परीक्षा महाराष्ट्र शिक्षण परिषद मार्फत घेण्यात येत होती परंतु या वेळेस ही परीक्षा आयबीपीएस या कंपनीमार्फत घेण्यात येणार असल्याचे दिसून येते. ही परीक्षा देण्यासाठी वेगवेगळे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निकष असतात तेच निकष आज आपण येथे जाणून घेणार आहोत.

MAHA TET 2024 Paper 1 Eligibility Criteria | MAHA TET 2024 Paper 1 पात्रता निकष:

आपणास माहिती आहे की महाराष्ट्र मध्ये पहिली ते आठवी या वर्गाकरिता शिक्षक व्हायचे असेल तर महा टीईटी ही परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे म्हणजेच ही पात्रता सिद्ध करणे आवश्यक आहे. मराठी ही परीक्षा दोन विभागात विभागल्या गेली आहे म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन. पेपर एक देण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता खालील प्रमाणे दिल्या गेली आहे.

  • ज्या उमेदवाराचे डीएड DEd झाले आहे असेच उमेदवार पहिले ते पाचवी (१ ते ५) या वर्गाकरिता प्राथमिक शिक्षक म्हणून पात्र ठरतात.
  • म्हणजेच पहिली ते पाचवी (१ ते ५) या वर्गाकरिता शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या डीएड पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना महा टीईटी पेपर एक MAHA TET Paper 1 देता येतो.

MAHA TET Paper 1 पॅटर्न:

परीक्षेचा कालावधी – १५० मिनिटे

एकूण प्रश्न – १५०

एकूण गुण – १५०

अशाप्रकारे पहिली ते पाचवी या वर्गाकरिता प्राथमिक शिक्षक व्हायचे असेल तर महा टीईटी पेपर वन उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे महा टीईटी या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग आढळून येत नाही. म्हणून ही परीक्षा उत्तीर्ण करणे सोपे आहे.

प्राथमिक शिक्षक पात्रता निकष:

  • HSC उत्तीर्ण असणे, DEd उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • MAHA TET Paper 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • असे शिक्षक वर्ग १ली ते ५वी करीता पात्र ठरत असून त्यांना प्राथमिक शिक्षक असे संबोधले जाते.

MAHA TET 2024 Paper 2 Eligibility Criteria | MAHA TET 2024 Paper 2 पात्रता निकष:

आपणा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र मध्ये सहावी ते आठवी या वर्गाकरिता शिक्षक व्हायचे असेल तर महाटीईटी पेपर दोन उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. आणि सहावी ते आठवी या वर्गाकरिता जे शिक्षक असतात त्यांना विषय शिक्षक किंवा उच्च प्राथमिक शिक्षक असे सुद्धा म्हटले जाते. म्हणून उच्च प्राथमिक शिक्षक किंवा विषय शिक्षक होण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे आहे.

महा टीईटी पेपर दोन जरी सहावी ते आठवी करिता असेल तरीही हे असे शिक्षक हे विषय शिक्षक असल्याने ते ज्या विषयासाठी पात्र आहेत त्याच विषयातून त्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराने पदवी सायन्स मधून पूर्ण केलेली असेल तर तो विद्यार्थी विज्ञान या विषयासाठी पात्र ठरेल. म्हणून त्याने विज्ञान या विषयातून MAHA TET Paper 2 उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तसेच जर एखादा उमेदवार पदवी कला शाखेतून पूर्ण केली असेल आणि त्याच्या पदवीच्या वर्षाला जे विषय असतील उदाहरणार्थ समाजशास्त्र तर त्याने सहावी ते आठवी या वर्गाकरिता समाजशास्त्र या विषयास पात्र ठरेल आणि त्यासाठी त्याने महा टीईटी पेपर 2 समाजशास्त्र या विषयातूनच उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

वर्ग ६वी ते ८वी विज्ञान/गणित शिक्षक (उच्च प्राथमिक शिक्षक):

  • पदवी ला विज्ञान आणि गणित विषय असणे आवश्यक किंवा पदवी विज्ञान आणि गणित विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक.
  • BEd किंवा DEd असणे आवश्यक.
  • MAHA TET Paper 2 गणित आणि विज्ञान विषय मधून उत्तीर्ण होणे अनिवार्य

MAHA TET Paper 2 (विज्ञान – गणित विषय शिक्षक करीता) पॅटर्न:

वेळ – १५० मिनिटे

एकूण गुण – १५०

एकूण प्रश्न – १५०

विषय –

१.) इंग्लिश (३० प्रश्न -३० गुण)

२.) मराठी (३० प्रश्न -३० गुण)

३.) बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र (३० प्रश्न -३० गुण)

४.) गणित (३० प्रश्न – ३० गुण)

५.) विज्ञान (३० प्रश्न – ३० गुण)

वर्ग ६वी ते ८वी करीता सामाजिक शास्त्रे विषय शिक्षक होण्यासाठी आवश्यक पात्रता:

  • पदवी ला सामाजिक शास्त्रे विषय असणे आवश्यक किंवा पदवी सामाजिक शास्त्रे विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक.
  • BEd किंवा DEd असणे आवश्यक.
  • MAHA TET Paper 2 सामाजिक शास्त्रे विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक.

MAHA TET Paper 2 (सामाजिक शास्त्रे विषय शिक्षक करीता) पॅटर्न:

वेळ – १५० मिनिटे

एकूण गुण – १५०

एकूण प्रश्न – १५०

विषय –

१.) इंग्लिश (३० प्रश्न -३० गुण)

२.) मराठी (३० प्रश्न -३० गुण)

३.) बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र (३० प्रश्न -३० गुण)

४.) सामाजिक शास्त्रे (६० प्रश्न – ६० गुण)

वर्ग ६वी ते ८वी करीता भाषा विषय शिक्षक होण्यास आवश्यक पात्रता:

  • पदवी ला भाषा विषय असणे आवश्यक किंवा पदवी त्या भाषा विषय मधून उत्तीर्ण होणे आवश्यक.
  • BEd किंवा DEd असणे गरजेचे.
  • MAHA TET Paper 2 सामाजिक शास्त्रे किंवा गणित विज्ञान हे विषय घेऊन उत्तीर्ण होणे अनिवार्य.

MAHA TET Paper 2 (भाषा विषय शिक्षक करीता) पॅटर्न:

वेळ – १५० मिनिटे

एकूण गुण – १५०

एकूण प्रश्न – १५०

विषय –

१.) इंग्लिश (३० प्रश्न -३० गुण)

२.) मराठी (३० प्रश्न -३० गुण)

३.) बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र (३० प्रश्न -३० गुण)

४.) गणित विज्ञान(६० प्रश्न – ६० गुण) किंवा सामाजिक शास्त्रे (६० प्रश्न – ६० गुण)

अशाप्रकारे विषय शिक्षक म्हणजेच गणित विज्ञान शिक्षक, भाषा विषय शिक्षक, सामाजिक शास्त्रीय विषय शिक्षक होने साठी B.Ed किवा DEd उत्तीर्ण असणारे परंतु त्या विषयातून पदवी पूर्ण केलेले उमेदवार पात्र ठरतात.

अशाप्रकारे महाटीईटी पेपर एक आणि पेपर दोन यासाठी आवश्यक असणारी पात्रता वरील प्रमाणे आहे. जर आपल्याला शिक्षक व्हायचे असेल तर महाटीईटी MAHA TET 2024 ची परीक्षा आपणासाठी एक सुवर्णसंधीच आहे. कारण ही परीक्षा झाल्यावर लगेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी TAIT (Teacher Aptitude and Intelligence Test) होणार आहे आणि घरातून डायरेक्ट शिक्षकांची निवड करण्यात येईल आणि त्यांना नियुक्ती देण्यात येतील. शिक्षक होण्याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये पवित्र पोर्टल या पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे आणि 2017 पासून महाराष्ट्र मध्ये शिक्षकांची नियुक्ती ही पवित्र पोर्टल मार्फत केल्या जाते. जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, तसेच खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित संस्था यामध्ये पहिली ते बारावी करिता शिक्षक व्हायचे असेल तर पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणारी परीक्षा म्हणजेच TAIT परीक्षा देणे अनिवार्य केले आहे. महा टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली म्हणजे आपण महाराष्ट्र मध्ये शिक्षक होण्यास पात्र ठरणार आहोत वर्ग पहिली ते आठवी करिता. परंतु वर्ग नववी ते बारावी करिता कोणत्याही प्रकारची पात्रता परीक्षा सध्या तरी शासनाने निर्गमित केली नाही. जर आपले डीएड किंवा बीएड झालेले असेल आणि आपण MAHA TET 2024 या परीक्षेची तयारी करत असाल तर नक्कीच आमचे टेलिग्राम चैनल फॉलो करा, आमचे पेज लाईक करा आणि फॉलो करा जेणेकरून वेळोवेळी उपलब्ध होणारी माहिती अगदी तात्काळ आणि जलद गतीने आपणापर्यंत पोहोचेल.

See More: MAHA TET 2024 करीता ऑनलाईन अर्ज कसा करावा?

अल्पसंख्यांक शाळा, आश्रम शाळा, आदिवासी शाळा, समाज कल्याण विभाग शाळा यामधील शिक्षकांची निवड पवित्र पोर्टल मार्फत केल्या जात नाही ती विभागीय परीक्षा घेऊन किंवा त्यांच्या स्तरावर शिक्षकांना नेमणुका दिला जातात. अशाप्रकारे जर आपणास 2024 मध्ये शिक्षक व्हायचे असेल तर हे आपले स्वप्न नक्कीच या वर्षी पूर्ण होणार आहे कारण शिक्षक पात्रता परीक्षा झाल्यावर लगेच शिक्षक भरती करिता आवश्यक असणारी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा सरकार घेणार आहे त्यामुळे ही एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे आणि त्या संधीचे सोने करणे हे आपल्या हातातच आहे. शिक्षक पात्रता परीक्षा करिता आवश्यक असणारी योग्य ती पात्रता आणि त्याचे निकष, शैक्षणिक पात्रता, व्यवसायिक पात्रता अशा सर्व गोष्टींची खोलात जाऊन माहिती आम्ही दिलेली आहे त्या माहितीचा अभ्यास करून तुम्ही कोणत्या विषय शिक्षक साठी पात्र आहात त्यानुसारच तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा फॉर्म भरत असताना त्या विषयांना नमूद करा जेणेकरून तुम्ही परीक्षा दिल्यावर उत्तीर्ण केल्यानंतर ते प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT