Maha TET 2024 Paper 2 संपूर्ण अभ्यासक्रम (IBPS पॅटर्न नुसार)

maha tet logo

Maha TET 2024 Paper 2 संपूर्ण अभ्यासक्रम (IBPS पॅटर्न नुसार):

जर आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन साठी अभ्यास करत असाल, तर आपण योग्य ठिकाणी विजिट दिलेली आहे. या ठिकाणी आपणास शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन देण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता आणि त्या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम, सोबतच ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणारा कट ऑफ क्रायटेरिया या सर्वांची अधिकृत माहिती आम्ही इथे आपणास उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शासन निर्णयानुसार शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन देण्यासाठी सदर उमेदवाराने कोणत्याही विषयातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी तसेच डीएड किंवा बीएड उत्तीर्ण केलेले असावे.

 • (Graduation + DEd/BEd) उत्तीर्ण उमेदवारच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन देऊ शकतात.
 • आपणास माहिती आहे की शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन हा वर्ग सहावी ते आठवी करिता विषय शिक्षक होण्यासाठी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळेच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन देताना आपल्या पदवीच्या वर्षाच्या शेवटी असणारे विषय आणि बीएडला असणाऱ्या अध्यापनाच्या पद्धती चे विषय घेऊनच आपण शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन देऊ शकतो. हे खाली सखोल मध्ये जाऊन दिले आहे.
 • Graduation (Science/Maths) + BEd/DEd असणाऱ्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन देताना Maths and Science हे विषय निवडणे अनिवार्य आहे.
 • Graduation (Social Sciences) + BEd/DEd असणाऱ्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन देताना Social Sciences हा विषय निवडणे अनिवार्य आहे.
 • Graduation (Any language) + BEd/DEd असणाऱ्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन देताना Maths and Science किंवा Social Sciences यापैकी कोणताही एक विषय निवडू शकतात.

अशा प्रकारे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन विषय शिक्षकांसाठी म्हणजेच वर्ग सहावी ते आठवी करिता अनिवार्य असल्याने, आपल्या पदवीच्या वर्षी असलेल्या विषयातूनच आणि तुम्ही पात्र ठरणाऱ्या विषयास अनुसरूनच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन मधील विषय निवडणे अनिवार्य केले आहे.

परीक्षेचा आराखडा आणि प्रश्नांचे स्वरूप:

एकूण गुण = 150

एकूण कालावधी = 150 मिनिटे

एकूण प्रश्न = 150

विषय:

Graduation ल Maths and Science असणाऱ्यांसाठी खालील प्रमाणे विषय आणि त्यांचे गुण असतील.

१.) बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र: गुण ३०, प्रश्न ३०, बहुपर्यायी प्रश्न

२.) भाषा १: गुण ३०, प्रश्न ३०, बहुपर्यायी प्रश्न

३.) भाषा २: गुण ३०, प्रश्न ३०, बहुपर्यायी प्रश्न

४.) गणित आणि विज्ञान: गुण ६०, प्रश्न ६०, बहुपर्यायी प्रश्न

Graduation ल Social Science असणाऱ्यांसाठी खालील प्रमाणे विषय आणि त्यांचे गुण असतील.

१.) बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र: गुण ३०, प्रश्न ३०, बहुपर्यायी प्रश्न

२.) भाषा १: गुण ३०, प्रश्न ३०, बहुपर्यायी प्रश्न

३.) भाषा २: गुण ३०, प्रश्न ३०, बहुपर्यायी प्रश्न

४.) सामाजिक शास्त्रे: गुण ६०, प्रश्न ६०, बहुपर्यायी प्रश्न

Graduation ल भाषा विषय असणाऱ्यांनी वरील पैकी कोणताही एक विषय घेऊन शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन देऊ शकतात.

अशाप्रकारे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन मध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विषयानुसार त्या उमेदवाराला शिक्षक पात्रता परीक्षा दोन मध्ये विषय निवडायचे असतात आणि ते विषय कोणते निवडायचे हे वर दिल्याप्रमाणे आहे. 2024 मध्ये होणारी शिक्षक पात्रता परीक्षा ही ऑनलाईन आयबीपीएस पॅटर्ननुसार होणार असल्याने त्यासाठीचा आवश्यक अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे.

 १.) बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्र:

 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन हा वर्ग सहावी ते आठवी या वर्गासाठी विशेष शिक्षक होण्यासाठी असल्याने, यात बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयासाठी विचारली जाणारी प्रश्न हे वय 11 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर त्यांच्या शैक्षणिक समस्या, शालेय समस्या यांच्यावर आधारित असतात.
 • तसेच 11 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात उद्भवणारी समस्या, त्यांच्या आंतरक्रिया, त्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम आणि त्यांच्या अध्ययन विषयी असणाऱ्या अडचणी, त्यांचे उपाय या सर्वांवर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन मधे प्रश्न विचारले जातात.
 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन साठी पात्र असणारे उमेदवार हे बीएड उत्तीर्ण उमेदवार असल्याने त्यांच्या बीएड पदवीमध्ये जो बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम होता तो सुद्धा अभ्यासणे आवश्यक आहे.
 • आयबीपीएस पॅटर्न मध्ये विचारले जाणारे प्रश्न हे तुमच्या ज्ञानावर आधारित नसून ते तुमच्या अध्यापन कौशल्यावर आणि तुम्ही वर्गात कशाप्रकारे शिकविणार, विद्यार्थ्यांच्या समस्या कशा सोडविणार या सर्वांवर अवलंबून असतात. एकंदरीत या प्रश्नांद्वारे तुमचा प्रेझेंनस ऑफ माईंड चेक केल्या जातो.

२.) भाषा आणि भाषा २:

 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन मध्ये प्रत्येक उमेदवाराला अनिवार्य केलेला विषय म्हणजे भाषा विषय आहे. भाषा विषयांमध्ये दोन भाषा विषयांचा समावेश होतो आणि ती भाषा कोणती निवडायची हा संपूर्ण अधिकार हा उमेदवाराला असतो.
 • इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी भाषांवर विचारले जाणारे प्रश्न हे सखोल व्याकरणावर विचारले जात असून आयबीपीएस पॅटर्नमध्ये तुमच्या भाषा कौशल्या वर आणि भाषेच्या आकलनावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.
 • आयबीपीएस पॅटर्न हा संपूर्णतः इतर स्पर्धा परीक्षा पेक्षा वेगळा असल्याने तुम्ही आयबीपीएस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षा मधील मराठी भाषा इंग्रजी भाषा व अन्य भाषा यांचा सराव करू शकता किंवा त्यानुसार त्याचा अभ्यासक्रम ठरवू शकता. आणि जुने प्रश्नपत्रिका सुद्धा पाहू शकता.
 • एकंदरीत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक साठी जो अभ्यासक्रम भाषा विषयांसाठी दिला आहे तोच अभ्यासक्रम शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन साठी लागू होतो.
 • माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच वर्ग सहावी ते आठवीला मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असणारा व्याकरनिक दृष्ट्या अभ्यासक्रम हा संपूर्ण अभ्यासक्रम शिक्षक पात्रता परीक्षा मधील भाषा विषयांसाठी असतो.

४.) गणित आणि विज्ञान:

 • इतर स्पर्धा परीक्षा यामधील गणित विषयात विचारणारे प्रश्न आणि आयबीपीएस पॅटर्न मध्ये विचारले जाणारे प्रश्न यामध्ये फार मोठी तफावत असल्याचे आपण म्हणू शकतो. कारण इतर परीक्षांमध्ये गणित या विषयावर जास्त भर दिला जातो तर आयबीपीएस पॅटर्नमध्ये बुद्धिमत्ता या भागावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात.
 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 हा ऑनलाइन पद्धतीने सर होणार असल्याने उमेदवारांनी बुद्धिमत्ता यावर जास्त भर देणे आवश्यक आहे. सरावासाठी IBPS पॅटर्नची पुस्तके किंवा टेस्ट सिरीज यांचा वापर करणे आवश्यक आहे.
 • आयबीपीएस पॅटर्ननुसार होणाऱ्या कोणत्याही परीक्षेत तुमच्यातील बुद्धिमत्ता कौशल्य, कमी वेळेत निर्णय घेण्याची क्षमता, संवाद कौशल्य, आकलन कौशल्य, तुमची तार्किकता या सर्वांचा विचार करूनच प्रश्न विचारले जातात आणि ते ज्ञानावर आधारित नसतात.
 • त्यामुळे यावेळेस होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन आयबीपीएस पॅटर्ननुसार होत असल्याने विद्यार्थ्यांनी फक्त पाठांतरावर भर न देता बुद्धिमत्ता कौशल्य आणि लॉजिकल रिझनिंग यावर जास्त भर देणे आवश्यक आहे.
 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक मध्ये जो गणित विषयाचा अभ्यासक्रम दिला आहे तोच अभ्यासक्रम पेपर दोन साठी सुद्धा लागू होतो. परंतु त्यामध्ये काही मुद्दे अजून समाविष्ट केले आहेत ते खालील प्रमाणे.
 • तर्कशास्त्र (Logic), गृहीतके (Assumptions), युक्तिवाद (Arguments), विधान – निष्कर्ष (Statement – Conclusion), विधान – कार्यवाही (Statement – Courses of Action) वर्गीकरण (Classification), बैठक व्यवस्था (Seating Arrangemnet), तुलना (Comparison), घटनाक्रम (Sequential Order of Things), निवड प्रक्रिया (Selection Process), नातेसंबंध वरील विश्लेषण (Family – Based Analysis),  घड्याळावरील प्रश्न (Problems on Clock),  क्रम व मोजणी (Number , ranking and counting), दिनदर्शिका (Calendar), वेन आकृत्या (Venn Diagrmas), नातेसंबंध (Blood Relations), आकृत्यांमधील रिकाम्या जागा भरणे (Missing Characters), दिशाबोध (Direction Sense Test), सांकेतिक भाषा (Code Language), विसंगत घटक, समान संबंध (Analogy), मालिका पूर्ती (Series Completion) इत्यादी मुद्द्यांचा समावेश होतो.

 

 • विज्ञान या विषयांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहे विज्ञानाच्या अध्यापन पद्धती विज्ञान मधील मूलभूत संकल्पना नियम त्यावर आधारित असतात.
 • तसेच गणित आणि विज्ञान या विषयाकरिता असणारा अभ्यासक्रम यामध्ये वर्ग सहावी ते आठवीची पाठ्यक्रमाची पुस्तके यांमधील अभ्यासक्रम सुद्धा लागू होतो.
 • गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय मिळून एकूण 60 प्रश्न विचारले जातात जे 60 गुनांसाठी असतात.

अशाप्रकारे गणित आणि विज्ञान या विषयावर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन मध्ये जास्त भर दिला असल्याने एकंदरीत माध्यमिक शाळांत परीक्षेचा अभ्यासक्रम यावरील सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात.

५.) सामाजिक शास्त्रे:

 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन मध्ये ज्या उमेदवारांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला सामाजिक शास्त्री हा विषय आहे त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन देताना सामाजिक शास्त्र हा विषय घेऊनच ती परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.

त्यामुळे या विषयाचा अभ्यासक्रम हा खाली दिल्याप्रमाणे आहे.

 • सामाजिक शास्त्रीय या एकाच विषयाला 60 गुण दिले असून 60 प्रश्न विचारले जातात.

यात सामाजिक शास्त्र मधील संकल्पना, आशय व अध्यापन शास्त्रीय पद्धती या सर्वांचा समावेश होतो.

 • तसेच वर्ग सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमामध्ये सामाजिक शास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे तो इथे लागू होतो.

 

 • अशाप्रकारे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन च अभ्यासक्रम वर दिल्याप्रमाणे असून यामधील प्रश्नांची काठिण्य पातळी बदलू शकते. म्हणून वर्ग सहावी ते आठवी तसेच वर्ग पहिली ते बारावीचे सदर विषयाची पाठ्यपुस्तके आणि त्यांचा अभ्यासक्रम अभ्यासणे आवश्यक आहे.
 • सोबतच बी एड या पदवीला असणारा बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र याविषयीचा संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासणे सुद्धा आवश्यक आहे.

 MAHA TET Qualifying Criterion/ Cut Off Marks (TET उत्तीर्ण होण्याचे निकष):

महाराष्ट्र राज्य शिक्षक स्पर्धा परीक्षा पेपर एक आणि दोन दोन्ही उत्तीर्ण होण्याचा क्रायटेरिया किंवा निकष सारखाच आहे. या परीक्षेचा कट ऑफ लागत नसून तो एक ठरलेला क्रायटेरिया आहे. हा क्रायटेरिया प्रत्येक प्रवर्गासाठी वेगळा वेगळा आहे आणि तो खालील प्रमाणे आहे.

General Category – 60% गुण मिळवणे आवश्यक (म्हणजेच 150 पैकी 90 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणे आवश्यक).

General Category सोडून उर्वरित category करीता – 55% गुण मिळवणे आवश्यक (म्हणजेच 150 पैकी 82 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणे आवश्यक).

अशाप्रकारे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता, परीक्षा पेपर पॅटर्न, परीक्षेत विचारले जाणारे विषय, त्यांचा सखोल अभ्यासक्रम, आणि परीक्षा उत्तीर्ण होण्याचा क्रायटेरिया या सर्वांशी आपण सखोल माहिती इथे घेतली आहे.

जर आपण येणाऱ्या म्हणजेच मार्च किंवा एप्रिल मध्ये होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा 2024 चा अभ्यास करत असाल तर वेळोवेळी निघत असलेल्या सूचना किंवा शासनाचे परिपत्रक यांची जलद आणि तात्काळ माहिती मिळविण्यासाठी तुम्ही आमचे टेलिग्राम चैनल किंवा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि स्वतःला प्रत्येक क्षणाला स्पर्धेशी जुळवून ठेवू शकता.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT