Jobs Opportunities after Qualifying Maha TET 2024 | MAHA TET 2024 पात्र झाल्यावर पुढे काय?

maha tet logo

Jobs Opportunities after Qualifying Maha TET 2024 | MAHA TET 2024 पात्र झाल्यावर पुढे काय?

आपणास माहिती आहे की 2013 पासून महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षक व्हायचे असेल म्हणजेच वर्ग पहिली ते आठवी करिता शिक्षक पाहिजे असेल तर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. 2013 पासून शिक्षक पात्रता परीक्षा ही दरवर्षी राबविल्या जाते आणि ती महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे घेतल्या जाते. आज पर्यंत ही परीक्षा ऑफलाईन स्वरूपात एकाच दिवशी घेण्यात यायची आणि त्यामुळे काही प्रमाणात गैरप्रकार तसेच निकाल लावण्यास एक वर्षाचा कालावधी सुद्धा जायचा. परंतु आता तशा प्रकारचा गैरप्रकार किंवा निकालासाठी विलंब होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2024 मध्ये होणारे शिक्षक पात्रता परीक्षा ही ऑनलाईन आणि आयबीपीएस या कंपनीमार्फत आयोजन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही आणि निकाल सुद्धा लवकरात लवकर लागेल. 2020 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली त्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्यांदा शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्याची ठरविले आहे ही एक अत्यंत आनंदाची बाब ठरली आहे. जर आपण पहिली ते आठवी या वर्गासाठी शिक्षक होण्यास इच्छुक असाल किंवा आपले डीएड किंवा बीएड झाले असेल आणि आपल्याला शिक्षक व्हायचे असेल तर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे त्यामुळेही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असेल. यापूर्वी आपण आपल्या महा सरकारच्या बऱ्याच पेजवर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पॅटर्न, उत्तीर्ण करण्याचे निकष, अभ्यासक्रम या सर्वांविषयी माहिती बघितली आहे. आज इथे आपण शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कोणकोणत्या करिअरच्या संधी किंवा जॉबच्या संधी आपल्याला उपलब्ध होतात हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. फक्त डीएड किंवा बीएड करून उपयोग नाही तर सोबत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे सुद्धा आवश्यक आहे आणि जर आपण ती परीक्षा उत्तीर्ण असाल तर आपण जॉबलेस राहणार नाही याची खात्री आम्ही देतो. सध्याच्या काळात महाराष्ट्रातील सर्व अल्पसंख्यांक शाळा, आदिवासी शाळा, समाज कल्याण शाळा, जिल्हा परिषद शाळा, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, सैनिक शाळा, आश्रम शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद यांच्या शाळा, खाजगी संस्थेच्या शाळा या सर्व ठिकाणी पहिली ते आठवी या वर्ग करिता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे तरच तुम्ही या शाळांमध्ये पहिली ते पाचवी या वर्गाकरिता शिक्षक बनू शकता. म्हणजेच जर तुम्हाला महाराष्ट्र मध्ये कुठेही परमनंट किंवा तात्पुरत्या स्वरूपाची वर्ग पहिली ते आठवी या वर्गासाठी शिक्षक म्हणून नोकरी करायची असेल तर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली म्हणजे आपण शिक्षक झालो असे नाही काही वेळेस महाराष्ट्रातील बऱ्याच विभागामार्फत शिक्षक भरती करिता परीक्षा घेतल्या जातात आणि त्या परीक्षांमध्ये केवळ असेच विद्यार्थी पात्र ठरतात जे डीएड किंवा बीएड उत्तीर्ण आहेत आणि सोबत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. त्यामुळे शिक्षक होण्याआधी आपण त्यासाठी पात्र होणे आवश्यक आहे म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिक्षक पात्रता परीक्षा पूर्ण केल्यानंतर समोर जाऊन येणाऱ्या संधी कोणत्या किंवा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून नोकरी कशी मिळवावी, तर यासाठीच आम्ही इथे आपणास महत्वपूर्ण माहिती देणार आहोत. ही माहिती वाचण्याआधी तुम्ही आमचे पेज फॉलो करा, लाईक करा आणि आमचे महासरकार टेलिग्राम चैनल फॉलो करा.

MAHA TET उत्तीर्ण केल्यानंतर पुढे काय?

आपणास माहिती आहे की महा टी इ टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा ही एक शिक्षक होण्यासाठीची किंवा शिक्षक म्हणून पात्र ठरवण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा आहे. वर्ग पहिली ते आठवी करिता शिक्षक व्हायचे असेल तर आपण शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. जर आपण ही परीक्षा उत्तीर्ण झालो त्यानंतर आपल्याला चालू येणाऱ्या नोकरीच्या कोणकोणत्या संधी आहे त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती इथे जाणून घेणार आहोत ती खालील प्रमाणे.

महाराष्ट्र मधील सर्व अल्पसंख्यांक शाळा, आश्रम शाळा, सैनिकी शाळा, समाज कल्याण शाळा, आदिवासी शाळा यामध्ये किंवा त्यांच्या विभागानुसार विभागीय परीक्षा घेऊन शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जाते. आणि या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेसाठी परीक्षेचे आयोजन करून त्यासाठी केवळ डीएड – बीएड उत्तीर्ण विद्यार्थी आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी यांनाच प्राधान्य दिले जाते. म्हणजे पुढे चालून तुम्हाला समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्यांक विभाग, आश्रम शाळा, सैनिकी शाळा यामध्ये शिक्षक म्हणून रुजवायचे असेल किंवा या विभागांमध्ये होणाऱ्या शिक्षक भरतीच्या परीक्षेकरिता पात्र ठरायचे असेल तर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे अत्यंत आवश्यक आहे.

तसेच 2017 पासून स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषद, खाजगी आस्थापनांच्या संस्था यांच्यामध्ये वर्ग पहिली ते बारावी करिता शिक्षक नेमण्यासाठी पवित्र पोर्टलची स्थापना करण्यात आली. आणि तेव्हापासूनच पवित्र पोर्टल मधून या ठिकाणी पहिली ते बारावी या वर्गांची शिक्षकांची भरती केल्या जाते. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षक मिळत असून शिक्षक भरती करत असताना होणारा आर्थिक घोटाळा सुद्धा टाळल्या जातो. त्यासाठी शासन वेळोवेळी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षा TAIT घेऊन त्यातून गुणवत्तेनुसार शिक्षकांची भरती पवित्र पोर्टल मार्फत केल्या जाते. म्हणजेच एकंदरीत जर तुम्हाला जिल्हा परिषद शिक्षक, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद या शाळांमध्ये शिक्षक व्हायचे असेल किंवा खाजगी संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते बारावी या वर्गासाठी शिक्षक व्हायचे असेल तर तुम्हाला पवित्र पोर्टल मधून जाणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT – Teaching Aptitude and Intelligence Test) देणे गरजेचे आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीला बसण्यासाठी तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा (TET – Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पण असे म्हणू शकतो की शिक्षक म्हणून पात्र व्हायचे असेल तर आपण डायरेक्टली शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तसेच आजच्या काळात केवळ डीएड मिळतील विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून खाजगी संस्थांमध्ये तात्पुरत्या मानधनावर घेतल्या जात नसून सोबतच ते शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण आहेत की नाही बघितला जाते. उदाहरणार्थ, CBSE या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक हे तात्पुरत्या स्वरूपात नेमलेले असून ते डीएड किंवा बीएड उत्तीर्ण असतातच. सोबत शिक्षक पात्रता परीक्षा TET सुद्धा उत्तीर्ण झालेले असतात. म्हणजेच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही शिक्षक व्हायचे असेल ते पर्मनंट असो की तात्पुरता स्वरूपाचे परंतु त्यासाठी तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण असाल तरच तुम्हाला त्यात प्राधान्य दिले जाते. म्हणून फक्त डीएड किंवा बीएड करून उपयोगाची नाही तर शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

त्यानंतरच तुम्ही शिक्षक म्हणून पात्र ठरता, परंतु कोणत्याही विभागात आणि त्या विभागातील शाळांमध्ये शिक्षक व्हायचे असेल तर, शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET उत्तीर्ण केल्यानंतर त्या विभागाने घेतलेली परीक्षा यामध्ये सुद्धा चांगले गुण मिळवून गुणवत्ता यादीत आल्यास आपली नक्कीच शिक्षक म्हणून निवड होऊ शकते.

जर आपण महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण-घेवाण न करता शिक्षक होऊ इच्छित असाल, तर आपण शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET उत्तीर्ण करून पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी TAIT चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

तसेच विविध विभागामार्फत येणाऱ्या जाहिराती जसे की, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग, एम पी एस सी तर्फे सुद्धा शिक्षक होण्यासाठीच्या जाहिराती दिल्या जातात आणि त्यामध्ये कोणताही प्रकारची आर्थिक देवाण-घेवान न होता फक्त गुणवत्तेच्या आधारावर शिक्षकांची निवड केल्या जाते. जर या परीक्षानकरिता किंवा या विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या सरळ सेवा परीक्षे करिता तुम्हाला पात्र ठरायचे असेल तर त्यासाठी तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा TET आधी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

एकंदरीत शिक्षक व्हायचे असेल तर डीएड बीएड करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही शिक्षक होण्यासाठी केवळ पात्र ठरणार. प्रत्यक्षात शिक्षक होण्यासाठी तुम्हाला विविध विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा यामध्ये गुणवत्ता सिद्ध करावी लागेल.

अशाप्रकारे तुम्ही बारावी उत्तीर्ण करून डीएड केले असेल किंवा बारावी उत्तीर्ण केल्यावर कोणताही पदवी पूर्ण करून नंतर बीएड केले असेल किंवा पदवी करून पदव्युत्तर पदवी घेतली असेल आणि बीएड केले असेल तरीही तुम्ही वर्ग एक ते बारा करिता शिक्षक म्हणून पात्र ठरता. परंतु केवळ इतकेच शिक्षण घेऊन उपयोग नाही तर त्यानंतर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा TET आणि विभागामार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीच्या परीक्षा यामध्ये गुणवत्ता सिद्ध करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही डीएड किंवा बीएड पूर्ण केले असेल आणि शिक्षक पात्रता परीक्षेची MAHA TET तयारी करत असाल तर नक्कीच आमच्या महा सरकार या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा, आमचे महा सरकार हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि वेळोवेळी मिळणारा जलद आणि अधिकृत माहिती करिता नक्कीच आमचे पेज फॉलो करा.

Also See: Maha TET 2024 Syllabus and Exam Pattern


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT