शिक्षक भरती पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम

Best way to give preferences on Pavitra Portal | पवित्र पोर्टल वर प्राधान्य क्रम देण्याची योग्य पद्धत | पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम

आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र मधील विविध शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त असणारी पदे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये शिक्षक भरती करण्याकरिता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी TAIT फेब्रुवारी महिन्यात घेतली होती. ही परीक्षा एका महिन्यात पूर्ण करून मार्च महिन्यात या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला होता. सदर परीक्षा आयबीपीएस या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. परंतु ही परीक्षा घेण्याआधी रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. परीक्षेचा निकाल घोषित केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागामार्फत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची संच मान्यता ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संच म्हणते वरून शिक्षकांची कार्यरत पदे आणि रिक्त पदे यांचा अहवाल सादर करण्यात आला होता. यावरून प्रत्येक शाळेत असणाऱ्या शिक्षकांची रिक्त पदे म्हणजेच बिंदू नामावली पूर्ण करण्यात आली. आणि या सर्व प्रक्रियेनंतर संपूर्ण महाराष्ट्र मधील जिल्हा परिषद शाळा, नगरपालिकेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, नगरपरिषदेच्या शाळा, खाजगी संस्थांमधील शाळा अशा प्रत्येक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे यांचा एकूण आकडा जाहीर करण्यात आला. ही एकूण रिक्त पदे 67 हजार असून त्यापैकी 80 टक्के पद भरतीला अर्थ विभागाकडून परवानगी देण्यात आली होती.

कोणत्याही परीक्षेमध्ये परीक्षा घेण्याआधी सदर परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली जाते परंतु शिक्षक भरती मध्ये याउलट झाल्याचे दिसून येते. म्हणूनच शिक्षक भरती मध्ये होणारा गोंधळ आणि त्यास होणारा विलंब यास कारणीभूत असल्याचे आपणास सर्वांना दिसून येते.

वेगवेगळ्या गटांमध्ये होणारे परस्परविरोधी वाद, माध्यमांमध्ये वाद, पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता यामध्ये वेळोवेळी परीक्षा घेतल्यानंतर बदल करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. परंतु हे सर्व वाद आता मिटले असून शिक्षक भरती ही शेवटच्या टप्प्यात आली आहे असे आपण म्हणू शकतो. कारण मार्च महिन्यामध्ये लागणाऱ्या निवडणुकीच्या आचारसंहिता पाहता शिक्षण विभागामार्फत शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून प्राधान्यक्रम देण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध करून प्राधान्यक्रम देण्याची सुविधा अभियोग्यता धारकांना उपलब्ध होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कळले आहे. आपण सर्वांनी एक वर्षापासून या क्षणाची वाट बघत आहोत आणि तो क्षण काही दिवसात येणारच आहे. परंतु त्याआधी आपण आपले डोके शांत ठेवून प्राधान्यक्रम आपल्या सोयीनुसार योग्य पद्धतीने आणि वेळेत देणे सुद्धा तितकीच महत्त्वाचे आहे. कारण आपल्याला चांगले मार्क्स असतील तरीही प्राधान्यक्रम देताना थोडी सुद्धा चूक झाल्यास आपण आपल्या आवडीच्या ठिकाणावरून किंवा पदावरून दूर जाऊ शकतो. म्हणूनच प्राधान्यक्रम कसे द्यावे याविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे आणि ती माहिती आम्ही इथे खाली उपलब्ध करून दिली आहे. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून आणि आपल्या कुटुंबाशी चर्चा करून तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम नोंदवू शकता.

 • सर्वांनाच माहिती आहे की पवित्र पोर्टलवर जेव्हा आपण स्व प्रमाणेच केले आणि ते करताना जी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तसेच आपली संपूर्ण माहिती आपण त्यात समाविष्ट केली होती. त्या माहितीनुसारच आपल्याला आपल्या लॉगिनवर प्राधान्यक्रम उपलब्ध होणार आहेत.

एकंदरीत आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार आपणास प्राधान्यक्रम जनरेट होणार आहेत हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे.

 • तुमच्या लॉगिन वर जनरेट होणारे परिणाम हे तुमच्या स्वतःच्या विषयाशी निगडित, तुमच्या प्रवर्गाशी निगडित आणि खुल्या प्रवर्गाचे सर्व प्राधान्यक्रम तुम्हाला दिसतील. कारण तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रवर्गासाठी पात्र तर असतात त्यासोबत खुल्या प्रवर्गात गुणवत्तेवर सुद्धा तुम्ही पात्र ठरू शकता.
 • प्राधान्यक्रम हे तुम्ही निवडलेले समांतर आरक्षण, तुमचा प्रवर्ग, तुमचा विषय, तुमची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता या सर्वांच्या नुसारच तुमच्या लॉगिनवर जनरेट होणार आहेत.
 • आतापर्यंत मिळत आलेल्या अधिकृत माहितीनुसार आपणा सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टल मार्फत अंदाजे 21 ते 22 हजारांची शिक्षक भरती करण्याचा मानस महाराष्ट्र शासन म्हणजेच शिक्षण विभागाचा आहे असे आपणास कळले आहे.

आणि हा संपूर्ण जागा दोन भागात विभागल्या जाणार आहेत ते म्हणजे विना मुलाखत Without Interview आणि मुलाखत With Interview या पद्धतीमध्ये.

 • या संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रियेत एकूण रिक्त असणारी पदे ही 21 ते 22 हजार असून त्यात वर्ग पहिली ते बारावी करिता शिक्षक भरती केल्या जाणार आहे.
 • या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र मधील समाविष्ट असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, नगर परिषदेच्या शाळा आणि खाजगी संस्था यांच्या शाळा या सर्व शाळांमधील वर्ग पहिली ते बारावी करिता रिक्त असणाऱ्या पदांची जाहिरात आपल्याला आपल्या लॉगिन वर दिसणार आहे.
 • पोर्टलवर आपणास या सर्व जाहिराती सर्वांसाठी अगोदर प्रसिद्ध केल्या जातील. आणि त्या सर्व जाहिरातींचा सुरुवातीला आपणास सखोल अभ्यास करायचा आहे. जाहिराती प्रसिद्ध केल्यावर त्या पाहण्यासाठी किंवा त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपणास पाच ते सहा दिवसांचा कालावधी दिला जाऊ शकतो. या कालावधीनंतर प्रत्येक उमेदवाराला त्याच्या लॉगिन वर त्याच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार आणि त्यांच्या प्रवर्गानुसार जाहिराती दिसायला सुरुवात होतील.
 • एकदा आपल्या लॉगिन वर आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार जाहिरातीत दिसायला सुरुवात झाल्यावर प्रत्येक उमेदवाराला त्याच्या सोयीनुसार किंवा त्याच्या आवडीनुसार उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम पैकी हव्या असलेल्या प्राधान्यक्रमांची योग्य प्रकारे मांडणी करावयाची आहे.
 • प्राधान्यक्रम देत असताना उमेदवारांनी स्वतः प्राधान्यक्रम द्यावेत. जेणेकरून कोणत्याही प्रकारची चूक होऊन आपली पुढे चालून गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी.

📌 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 यादरम्यान घेण्यात आली होती या परीक्षेकरिता एकूण दोन लाख 39 हजार 730 उमेदवारांनी आपली नोंदणी केली होती तर त्यापैकी केवळ दोन लाख 16 हजार 443 उमेदवार यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दिली.

📌 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 या परीक्षेद्वारे संपूर्ण महाराष्ट्र मधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्था यांच्या शाळा मधील वर्ग पहिली ते वर्ग बारावीची रिक्त असणारी शिक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही या शिक्षक अभियोग्यता चाचणी मधून करण्यात येणार आहे आणि त्यातून 80 टक्के पदे भरण्याची परवानगी अर्थ विभागाकडून दिलेली आहे.

📌 परंतु काही प्रवर्ग यांच्यामध्ये झालेला बिंदू नामावली घोटाळा किंवा उपस्थित करण्यात आलेले प्रश्न यावरून कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होऊ नये यासाठी एकूण पदांच्या 80 टक्के जागा न भरता त्यापैकी 70 टक्के जागा भरण्याची परवानगी शिक्षण विभागाला मिळाली आहे. तसेच दहा टक्के कपात झालेल्या जागा ह्या आरक्षण विषयक बिंदू नामावली तपासणी केल्यानंतरच ज्या प्रवर्गाचे बिंदू कमी आढळल्यास त्यांना ह्या दहा टक्के कपात मधील जागा देण्यात येतील. त्यासाठी या दहा टक्के जागा दाखवून ठेवण्यात आल्या आहेत.

📌 दिनांक 25 जानेवारी आणि 28 जानेवारी 2024 ला आयुक्त ऑफिस मार्फत जी परिपत्रके काढली त्यानुसार ज्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करायचे आहेत त्यांनी तसे सेमी इंग्रजीसाठीचे बिंदू द्यावेत किंवा जागा द्याव्यात अशी सुद्धा तरतूद करण्यात आली आहे.

📌 तसेच भविष्यकाळात प्रत्येक केंद्रशाळा स्तरावर साधन व्यक्ती पदाची निवड करण्यासाठी त्यांच्या जागा सुद्धा फ्रिज केल्या आहेत.

📌 शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 या मार्फत शिक्षक भरती करण्यात येणार असून ती ऑनलाईन पद्धतीने पवित्र पोर्टल मार्फत प्रक्रिया करण्यात येणार आहे. पवित्र पोर्टल वर संपूर्ण महाराष्ट्र मधील एकूण 34 जिल्हा परिषद यांच्या वर्ग पहिली ते बारावी वर्गाच्या रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. तसेच महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपरिषद व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती सुद्धा नोंदवण्यात आलेली आहे. ही संपूर्ण आकडेवारी खालील प्रमाणे आहे.

 • 34 जिल्हा परिषद – 12,522 जागा
 • 18 महानगरपालिका -2951 जागा
 • 82 नगरपालिका/नगरपरिषद – 477
 • 1123 खाजगी संस्था – 5728 जागा
 • एकूण जागा – 21678

अशाप्रकारे संपूर्ण महाराष्ट्र मधील सर्व आस्थापनांच्या एकूण 21 हजार 678 रिक्त पदांची भरती ही पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येणार आहे.

 

📌 पवित्र पोर्टल वर नोंदणी झालेली आरक्षणा नुसार रिक्त पदांची संख्या खालील प्रमाणे आहे.

 • अनुसूचित जाती – 3147
 • अनुसूचित जमाती – 3542
 • विमुक्त जाती अ – 862
 • भटक्या जमाती ब – 404
 • भटक्या जमाती क – 582
 • भटक्या जमाती ड – 493
 • विशेष मागास प्रवर्ग – 290
 • इतर मागास प्रवर्ग – 4024
 • आर्थिदृष्ट्या दुर्बल घटक – 2324
 • खुला प्रवर्ग – 6170

अशाप्रकारे प्रत्येक प्रवर्गाल त्यांच्या आरक्षणा नुसार रिक्त पदे देण्यात आली आहेत. काही प्रवर्ग यांना त्यांच्या आरक्षणा नुसार रिक्त पदे उपलब्ध झाले नसतील तर याचा अर्थ ती पदे या आधीच्या भरतीमध्ये भरल्या गेली असे समजावे.

📌 शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 या मार्फत संपूर्ण महाराष्ट्र मधील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्था यांच्या शाळांमधील वर्ग पहिली ते बारावी वर्गातील शिक्षकांची पदे भरण्याची तरतूद पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. त्यामुळेच पवित्र पोर्टल वर एकूण वर्गानुसार किती पदे रिक्त आहेत याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

 • वर्ग १ ली ते ५ वी – 10240
 • वर्ग ६ वी ते ८ वी – 8127
 • वर्ग ९ वी ते १० वी – 2176
 • वर्ग ११ वी ते १२ वी – 1135

अशाप्रकारे वर्ग पहिली ते बारावीची पवित्र पोर्टल वर दिली जाणारी रिक्त पदे वरील प्रमाणे आहेत.

📌 तसेच पवित्र पोर्टलवर होणाऱ्या शिक्षक भरती मध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, बंगाली आणि तेलगू या माध्यमाची पदे सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे या सर्व माध्यमांची रिक्त पदे खालील प्रमाणे आहेत.

 • मराठी – 18373
 • इंग्रजी – 931
 • उर्दू – 1850
 • हिंदी – 410
 • गुजराती – 12
 • कन्नड – 88
 • तमिळ – 8
 • बंगाली – 4
 • तेलुगू – 2

वरील प्रमाणे शिक्षकांची रिक्त पदे प्रत्येक माध्यमात पवित्र पोर्टल वर किती आहेत हे सांगितले आहे.

📌 आपणास माहित आहे की पवित्र पोर्टल मार्फत दोन प्रकारचे राऊंड होतात एक म्हणजे विना मुलाखत (Without Interview) आणि दुसरा मुलाखत (With Interview) यांचा राऊंड. यावेळेस होणाऱ्या पवित्र पोर्टल मार्फत च्या शिक्षक भरती करिता विना मुलाखतीसाठी आणि मुलाखतीसाठी किती पदांची जाहिरात देण्यात आली आहे ते खालील प्रमाणे आहे.

 • विना मुलाखत (Without Interview) – 16799 जागा
 • मुलाखत (With Interview) – 4879 जागा

📌 जर आपणास प्राधान्यक्रम देताना काही अडचण आल्यास तुम्ही पवित्र पोर्टल पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दिलेले युजर मॅन्युअल User Manual बघून त्याद्वारे सुद्धा प्राधान्यक्रम नोंद करण्याची प्रक्रिया करू शकता.

📌 उमेदवारांना शिक्षक भरती करिता पवित्र पोर्टल वर जाऊन प्राधान्य क्रम यांची नोंदणी करण्यासाठी तसेच वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक, नियमांची यादी व युजर मॅन्युअल बघण्याकरिता खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भेट देऊ शकता.

📌 उमेदवारांना पवित्र पोर्टल वर शिक्षक भरती करिता प्राधान्यक्रम यांची नोंद करण्यासाठी ची सुविधा दिनांक 5 फेब्रुवारी पासून तर दिनांक 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत ची दिलेली आहे. या कालावधीतच उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंदविणे अनिवार्य आहे. यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही.

 

📌 दिनांक 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्राधान्यक्रम नोंदवून झाल्यावर नऊ तारखेपर्यंत म्हणजेच 8 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2024 या दरम्यानचा कालावधी  हा नोंद केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिला जाईल. त्यामुळे उमेदवारी यांनी त्या विहित मुदतीत आपले प्राधान्यक्रम योग्यरित्या नोंदवून लॉक करणे आवश्यक आहे.

📌 पवित्र पोर्टल वर प्राधान्यक्रम नोंदविण्याची आणि लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर काही दिवसातच संकेतस्थळावर विना मुलाखत ची गुणवत्ता यादी म्हणजेच निवड यादी तसेच मुलाखतीसाठी ची निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि याचे संभाव्य वेळापत्रक सुद्धा त्याआधी दिले जाईल.

📌 पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरती करिता सुरू करण्यात आलेली प्राधान्यक्रम नोंद करण्याची प्रक्रिया याविषयी उमेदवारांना कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी खाली दिलेल्या ई-मेलवर पत्रव्यवहार करावा.

Email: [email protected]

📌 पवित्र पोर्टल वर सुरू झालेली प्राधान्यक्रम नोंदणीची प्रक्रिया ही त्याच उमेदवारांसाठी असेल ज्यांनी याआधी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली असेल आणि त्यानुसार पोर्टलवर स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेले असेल.

📌 प्रत्येक उमेदवाराने वर दिलेल्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन होम पेजवर जाऊन डाउनलोड या मेनूमध्ये त्यांना मुलाखती शिवाय व मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारच्या जाहिराती वेगवेगळ्या पाहायला मिळतील आणि त्या डाउनलोड सुद्धा करता येतील.

📌 तसेच उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार आणि त्यांच्या प्रवर्गानुसार त्यांच्या लॉगिन वर प्राधान्यक्रम जनरेट होतात. हे प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी त्या उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर लॉगिन करून Generate Preferences याचा वापर करून मुलाखती शिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या शिक्षक भरती साठी प्राधान्यक्रमांची नोंदणी स्वतंत्र प्रमाणे करावी.

📌 प्रत्येक उमेदवाराच्या लॉगिन वर मुलाखतीसह आणि मुलाखती शिवाय या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करण्याची आणि लॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

📌 उमेदवारांना काही अडचण आल्यास ते युजर मॅन्युअल चा वापर करून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू शकतात फक्त प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी जोपर्यंत ही सुविधा देण्यात येणार नाही तोपर्यंत उमेदवारांनी ते लॉक करू नये. अधिकृत सूचना आल्याशिवाय उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करू नयेत. फक्त ते प्राधान्यक्रम त्यांच्या योग्य सोयीनुसार नोंदवून ठेवावेत.

📌 दिलेल्या मुदत मधेच उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदविणे आणि लॉक करणे हे आवश्यक आहे.

📌 ज्या उमेदवारांना मुलाखती शिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकारे शिक्षक व्हायचे असेल त्यांनी दोन्ही प्रकारची प्राधान्यक्रम नोंदवून ते लॉक करू शकतात.

📌 जर उमेदवाराने स्व प्रमाणेच केले असून त्यांनी प्राधान्यक्रम नोंदविले नाहीत आणि लोक केले नसतील तर त्यांना कोणत्याही प्रकारे निवडीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. आणि याची संपूर्ण जबाबदारी त्या उमेदवाराची असेल.

 

📌 प्राधान्यक्रम जनरेट केल्यावर उमेदवाराने त्याला आलेले प्राधान्यक्रम त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार आणि प्रवर्गानुसार आहेत की नाही हे एक वेळा अभ्यासून पाहावे आणि त्यानंतरच असे प्राधान्यक्रम लॉक करावेत. जर चुकून एखादा वेगळा म्हणजेच उमेदवाराच्या शैक्षणिक व व्यावसायिक आणि प्रवर्गानुसार प्राधान्यक्रम आला असेल तर तो प्राधान्यक्रम सदर उमेदवाराने लॉक करू नये. जर चुकून असे प्राधान्यक्रम उमेदवाराकडून लॉक झाले आणि त्याची निवड त्या जागेसाठी झाली तर कागदपत्र पडताळणी वेळेस त्या उमेदवाराला तिथून बाद केले जाईल. त्यामुळे ती जागा त्या उमेदवाराला तर मिळणारच नाही परंतु सदर जागा तशीच रिक्त ठेवण्यात येईल. यामुळे प्राधान्यक्रम देताना प्रत्येक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचा आणि प्रवर्गाचा विचार करूनच प्राधान्यक्रम लॉक करावेत.

📌 पवित्र पोर्टल वर नोंदणी करताना म्हणजेच स्वप्रमानित करताना ज्या उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक आणि इतर अर्हता किंवा कोणतीही अर्हता दिनांक 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीची असावी. 12 फेब्रुवारी 2023 यानंतर उत्तीर्ण झालेली कोणतीही अर्हता गृहीत धरण्यात येणार नाही आणि त्याचा विचार नियुक्तीसाठी सुद्धा होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

📌 पवित्र पोर्टलवर उमेदवारांनी स्व प्रमाणित करताना जी माहिती म्हणजेच शैक्षणिक पात्रता, व्यवसायिक पात्रता आणि प्रवर्ग याविषयीची माहिती भरली असेल, त्यानुसारच त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. स्व प्रमाणित करताना चुकीची माहिती भरली असेल, तर त्यानुसारच प्राधान्यक्रम जनरेट होतील. अशा उमेदवारांनी प्राधान्यक्रम लोक करू नयेत ज्यामुळे ती जागा त्यांच्यामुळे रिक्त राहणार नाही.

📌 उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करताना लक्षपूर्वक ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर काही कारणास्तव उमेदवारांना लॉक केलेले प्राधान्यक्रम पुन्हा बदल करायचे असतील, तर त्यांनी दिलेले प्रेफरन्सेस डिलीट करून दिलेल्या मुदत मधेच पुन्हा नव्याने त्यांना प्राधान्यक्रम नोंद करून लॉक करता येतील. अशी डिलीट करण्याची सुविधा प्रत्येक उमेदवाराला केवळ तीन वेळाच दिल्या जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

📌 उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम हे त्यांच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मधील गुणांवर आधारित नसून तर त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता नुसार व त्यांच्या प्रवर्गानुसार त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. उदाहरणार्थ 1 गुण असणाऱ्या उमेदवाराला सुद्धा त्याच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेनुसार व प्रवर्गानुसार प्राधान्यक्रम जनरेट होऊ शकतात.

📌 उमेदवाराने लॉक केलेल्या प्राधान्यक्रम यामध्ये ज्या प्राधान्यक्रमावर त्या उमेदवाराची निवड होईल, त्यानंतरची त्याच्या खालची उर्वरित प्राधान्यक्रम यांचा विचार त्या उमेदवार करीता केला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.

📌 उमेदवारांना त्यांच्या लॉगिन वर जनरेट झालेले प्राधान्यक्रम हे शैक्षणिक, व्यावसायिक पात्रतेनुसार व प्रवर्गानुसार असल्याने ते जेवढे प्राधान्यक्रम जनरेट झालेत त्यापैकी सर्वच प्राधान्यक्रम सुद्धा लॉक करू शकतात.

📌 पवित्र पोर्टल वर स्व प्रमाणित करताना जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्याच मोबाईल नंबर वर प्राधान्यक्रम जनरेट करताना ओटीपी येणार. जर तुम्हाला तो मोबाईल नंबर बदल करायचा असेल तर तुम्ही जवळच्या जिल्हा परिषद ला जाऊन प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांना विनंती अर्ज करून व स्वतःची ओळख पुराव्यासह दाखवून त्यात बदल करू शकता.

 

📌 ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये गैर प्रकारात त्यांचे नाव असतील त्यांची नियुक्ती चरित्र पडताळणी केल्यानंतरच करण्यात येईल.

📌 उमेदवारांनी पवित्र पोर्टल वर आपले प्राधान्यक्रम नोंदवून लॉक केल्यानंतर मुलाखती शिवाय आणि मुलाखतीसह प्राधान्यक्रम लॉक केलेल्यांची प्रिंट घ्यावी.

📌 जर एखाद्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त विषयांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केली असेल तर त्यानुसार त्या उमेदवाराला प्राधान्यक्रम जनरेट होतील आणि ते प्राधान्यक्रम तो व्यक्ती त्याच्या सोयीनुसार लॉक करू शकतो.

📌 एखाद्या उमेदवाराची निवड खुला प्रवर्गासाठी होत असेल तर त्या उमेदवाराने त्या प्रवर्गासाठीची आवश्यक असणारी वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता यांचा विचार करूनच त्या उमेदवारास खुल्या प्रवर्गाची प्राधान्यक्रम आपोआप जनरेट होतील.

📌 वेळोवेळी प्रसिद्ध झालेले शासन निर्णय यांच्यानुसार एखाद्या उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवड झाल्यास त्या उमेदवारास विचार खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये त्याच गटातील पदासाठी केला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.

📌 तसेच शासन निर्णयानुसार शिक्षक भरती प्रक्रिया ही विविध टप्प्यांमध्ये होत असल्याने उमेदवाराची एका टप्प्यात निवड झाल्यानंतर तो उमेदवार पुन्हा नव्याने होणाऱ्या टप्प्यामध्ये जाहिरातीनुसार अर्ज करू शकतो. परंतु त्याची निवड ही त्याच्या गुणवत्तेवर पूर्वी निवड झालेल्या वर्गापेक्षा वरच्या वर्गासाठी करण्यात येईल. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.

अशाप्रकारे उमेदवारांनी वरील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून व अभ्यास करूनच आपले प्राधान्यक्रम लोक करावेत आणि काही अडचणी आल्यास अधिकृत ई-मेल आयडी वर पत्र व्यवहार करावा.

 

 

📌 एकदा प्राधान्यक्रम जनरेट झाल्यावर त्या प्राधान्यक्रमाची पीडीएफ याची प्रिंट काढून घेऊन आधी त्या सर्व जाहिरातींचा सखोल अभ्यास करावा आणि त्यानंतरच कच्च्या पद्धतीने त्यावर पेन्सिलने आपले प्राधान्यक्रम यांना नंबरिंग देऊन ठेवावी.

जेणेकरून जेव्हा आपण पवित्र पोर्टलवर लॉगिन करून आपले प्राधान्यक्रम क्रमानुसार नोंदवू तेव्हा आपल्याला वेळ लागणार नाही आणि कोणत्याही प्रकारचे कन्फ्युजन होणार नाही.

📌 ही शिक्षक भरती दोन टप्प्यात विभागलेली आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या लॉगिन वर दोन टॅब उपलब्ध होणार आहेत. एक टॅब विना मुलाखत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींना प्राधान्यक्रम देण्यासाठीचा असेल तर दुसरा टॅब मुलाखत घेऊन शिक्षकांची पदे भरण्याकरिता साठीचा दिलेला असेल.

📌 या शिक्षक भरती मध्ये विना मुलाखत मध्ये येणाऱ्या शाळा या जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा नगरपालिकेच्या शाळा नगर परिषदेच्या शाळा आणि काही विशिष्ट खाजगी संस्था याच समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

📌 तसेच मुलाखत घेऊन शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी विविध खाजगी संस्था यांनी सुद्धा जाहिरात दिली आहे. त्यामध्ये मुलाखत घेऊन शिक्षकांची पदे भरल्या जातील आणि त्यासाठी मुलाखतीचा दुसरा टॅब उपलब्ध करून दिला आहे.

📌 जर तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता म्हणजेच पदवी किंवा पदविका तीर्ण केली असेल तरच तुमची ती पदवी किंवा पदविका ग्राह्य धरण्यात येईल अन्यथा तुम्ही त्यातून बाहेर पडाल.

📌 सुरुवातीला तुम्हाला विना मुलाखतीसाठी जे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत आणि त्यानंतर मुलाखतीचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत.

📌 विना मुलाखतीचे प्राधान्यक्रम देत असताना तुम्हाला तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अरहतेनुसार जे प्राधान्यक्रम उपलब्ध झाले आहेत त्यांची तुम्ही तुमच्या सोयीनुसार योग्य क्रमाने मांडणी करू शकता.

📌 म्हणजेच सुरुवातीला तुम्हाला कोणत्या वर्गासाठी शिक्षक म्हणून रुजू व्हायचे असेल त्या वर्गाचा विचार करून त्यानुसार उपलब्ध झालेले प्राधान्यक्रम जसे की जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि त्यानंतर संस्था याप्रमाणे क्रम लावू शकता.

📌 जर तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी करायची असेल तर तुम्ही सुरुवातीला स्वतःच्या जिल्हा निवडू शकता किंवा तुम्हाला दूरवर जाऊन नोकरी करायची असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचे प्राधान्य क्रम यांची मांडणी करू शकता.

📌 जर तुम्हाला शहरांमध्ये राहण्याची आवड असेल तर तुम्ही शहराच्या ठिकाणी असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळांची सुद्धा निवड करू शकता.

📌 एकंदरीत ही शिक्षक भरती प्रक्रिया दोन भागात होणार असून म्हणजेच विना मुलाखत आणि मुलाखत. आणि या दोन्ही भागांमध्ये होणारे शिक्षण भरती ही मेरिटने होत असल्याने गुणवत्तेला प्राधान्य देऊन त्यानुसारच उमेदवारांची निवड केल्या जाईल.

 

📌 प्रवर्गनिहाय जागा, समांतर आरक्षण, पात्र असणारे विषय, वर्ग आणि तुमचे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी मधले गुण या सर्वांचा विचार करूनच तुमची तुम्ही दिलेल्या प्राधान्यक्रमाच्या मांडणीनुसार तुमची निवड केल्या जाणार आहे.

📌 तुम्ही सुरुवातीला जो प्राधान्यक्रम दिला त्याचा गुणवत्तेनुसार आधी विचार केला जाईल आणि उतरत्या क्रमाने नंतर उरलेल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाईल.

📌 म्हणून सुरुवातीला तुम्ही तुमच्या आवडीचे प्राधान्यक्रम देऊ शकता आणि ती उतरत्या क्रमाने मांडू शकता. ज्या ठिकाणी तुमचा विषय, प्रवर्ग, तुमचे समांतर आरक्षण आणि शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता व तुमची मिळालेले गुण यांची सांगड बसेल तिथेच तुमची निवड केली जाईल.

📌 जर तुमची एखाद्या प्राधान्य कामासाठी निवड झालेली असेल तर त्यानंतर उरलेले खालचे जे प्राधान्यक्रम आहे त्यासाठी तुमचा विचार केल्या जाणार नाही.

📌 तुम्हाला जेवढे प्राधान्यक्रम जनरेट झालेले असतील तेवढे संपूर्ण प्राधान्यक्रम सुद्धा तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्यांची मांडणी करू शकता किंवा लॉक करू शकता.

📌 परंतु काही उमेदवारांना त्या ठिकाणी किंवा त्या वर्गासाठी जायचे नसेल तर अशा उमेदवारांनी त्या प्राधान्यक्रमांना लॉक करू नये ते तसेच सोडावेत.  तसेच काही महिला उमेदवारांना दूरवर जाण्यास नको असते त्यामुळे अशा महिलांनी संपूर्ण विचार करूनच आपल्या प्राधान्य प्रमाणे लॉक करण्याची प्रक्रिया करावी.

📌 कारण हे शिक्षण भरती प्रक्रिया गुणवत्तेवर होणार असल्याने जर एखादा ठीक ठिकाणी तुम्हाला जायचे नसेल आणि तरीही तुम्ही तिथे प्राधान्यक्रम दिला आणि तुमची निवड तिथे झाली परंतु तुम्ही त्यासाठी पुढे गेला नाहीत तर ती जागा तशीच रिक्त राहण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रत्येक उमेदवारांनी विचार करूनच प्राधान्यक्रम ची निवड करायची आहे.जेणेकरून ती जागा रिक्त न राहता गरजू उमेदवारांना नक्कीच मिळेल.

📌 वर्ग पहिली ते आठवी करिताचे जिल्हा परिषद शाळा यांचे रोस्टर हे कॉमन असल्याने तिथे गुणवत्तेला प्राधान्य देऊनच निवड करण्यात येईल.

📌 जर तुमचे शिक्षण उच्च असेल म्हणजेच तुम्ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केली असेल तर तुम्ही वरच्या वर्गापासून प्राधान्यक्रम (12 ते खाली) देत खाली येऊ शकता.

📌 कारण वरच्या वर्गाचा Pay Scale हा खालच्या वर्गांच्या Pay Scale पेक्षा जास्तच असतो.

उदा.

1.) वर्ग 11-12 वी करीता: S 16

2.) वर्ग 9-10 वी करीता : S 14

3.) वर्ग 6-8 वी करीता: S14 काही ठिकाणी तर काही ठिकाणी S10

4.) वर्ग 1-5 वी करीता: S10

 

 

📌 शिक्षण सेवक कालावधी ३ वर्षाचा असून त्यासाठी चे मानधन खालील प्रमाणे.

1.) वर्ग 11-12 वी करीता:20000

2.) वर्ग 9-10 वी करीता :18000

3.) वर्ग 6-8 वी करीता: 18000

4.) वर्ग 1-5 वी करीता: 16000

📌 प्राधान्यक्रम देत असताना तुम्ही सर्व बाबींचा म्हणजेच त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, तिथले वातावरण, तुम्ही निवडलेला विषय, तुम्ही निवडलेला जिल्हा आणि त्यासाठी दिला जाणारा Pay Scale या सर्वांचा विचार करूनच प्राधान्यक्रमांची योग्य ती क्रमाने मांडणी करावी.

📌 अशाच प्रकारे तुम्हाला मुलाखतीच्या टॅब मध्ये जाऊन तिथे सुद्धा प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. तिथे सुद्धा तुम्हाला जिथे जायची इच्छा आहे अशाच प्राधान्यक्रमांना तुमच्या आवडीनुसार लॉक करायचे आहेत.

📌 मुलाखतीच्या टॅब मध्ये आपणास सर्व खाजगी संस्था यांच्या वर्ग पहिली ते बारावी करिता च्या जाहिरात दिसू शकतात. आणि यासाठी सुरुवातीला प्रत्येक जागेसाठी त्या संस्थेत तीन उमेदवारांची निवड केल्या जाईल. आणि त्यातील उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतरच ती संस्था स्वतः त्यातील उमेदवारापैकी योग्य अशा एका उमेदवाराची निवड करेल.

मुलाखतीच्या राऊंडमध्ये उमेदवाराची निवड करण्याची सर्व अधिकार खाजगी संस्था यांना दिले आहेत.

📌 अशा प्रकारे प्रत्येक संस्था एका जागेसाठी तीन उमेदवारांना बोलावे आणि त्यातून एका उमेदवाराची निवड करून त्यांचे कागदपत्र पडताळणी करूनच त्यांना नियुक्ती देईल.

📌 दुसरीकडे विना मुलाखतीच्या राऊंडमध्ये सरळ सरळ गुणवत्तेनुसार उमेदवारांची डायरेक्ट निवड केल्या जाईल आणि निवड यादी जाहीर केला जाईल. निवड यादी जाहीर झाल्यानंतर दिलेल्या वेळापत्रकानुसार निवड झालेल्या उमेदवाराला त्याच्या निवडीच्या जिल्ह्यामध्ये जाऊन सुरुवातीला कागदपत्र पडताळणी करावी लागेल. आणि ती कागदपत्र पडताळणी योग्य पद्धतीने झाली तरच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येतील.

📌 कागदपत्र पडताळणी करत असताना तुम्ही ज्या गोष्टी किंवा जी माहिती Self Certify करताना पवित्र पोर्टल वर नोंदविली आहे आणि जे कागदपत्र अपलोड केले आहेत त्यांची मूळ प्रत तुम्हाला तिथे सादर करावी लागेल. आणि त्यांची जुळवाजुळव झाली तरच तुम्ही कागदपत्र पडताळणी मध्ये पात्र व्हाल. अन्यथा एखादे जरी कागदपत्र खोटे असेल किंवा कोणतेही माहिती खोटी निघाली तर तुम्ही कोणत्याही क्षणी या संपूर्ण प्रक्रियेमधून बाद होऊ शकतात याची काळजी घ्यावी.

 

 

📌 एकंदरीत विना मुलाखती साठी निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी लवकर जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर दिलेल्या वेळापत्रकानुसार त्यांची कागदपत्र पडताळणी करण्यात येईल. आणि कागदपत्र पडताळणी नंतरच त्यांना नियुक्ती पत्र दिले जातील.

📌 तर मुलाखतीच्या राऊंडसाठी थोडा कालावधी लागणार आहे असे दिसून येते. कारण त्यामध्ये मुलाखतीसाठी वेळ दिल्या जाईल आणि नंतर निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी लावून त्यांचे कागदपत्र पडताळणी करण्यात येईल आणि शेवटी त्यांना नियुक्त्या दिल्या जातील.

📌 सदर प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुरुवात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले आहे. म्हणजेच प्राधान्यक्रम देण्यासाठी सुरुवातीला दहा दिवसांची मुदत दिल्या जाईल आणि त्यानंतर एक वेळा मुदतवाढ देऊन फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत सगळ्यांचे प्राधान्यक्रम लॉक होतील अशी आपण अपेक्षा करू.

📌 प्राधान्यक्रम लोक केल्यानंतर संपूर्ण टेस्टिंग करण्यासाठी आणि सॉफ्टवेअर मार्फत ही प्रक्रिया पूर्ण पार पाडण्यासाठी किमान 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतरच विना मुलाखतीची निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि ज्यांचे निवड मुलाखतीसाठी झाली आहे त्यांना त्यांच्यावर आलेल्या संस्था दिसतील.

📌 एकंदरीत उमेदवारांनी दिलेला प्रतिसाद आणि टेक्निकल प्रॉब्लेम या सर्वांचा विचार करून जर वेळेत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली तर लोकसभा आचारसंहिते पूर्वी निवड यादी लागण्याची दाट शक्यता आहे.

अन्यथा उमेदवारांना अडचणी उद्भवल्यास किंवा सॉफ्टवेअर मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास या प्रक्रियेला विलंब होऊ शकतो आणि निवड यादी आचारसहिता संपल्यावरच लागू शकते असे आपण म्हणू शकतो.

📌 शिक्षक भरती प्रक्रिया आचारसंहितेमध्ये अडकू नये असे वाटत असेल तर प्रत्येक उमेदवाराने जबाबदारीने प्राधान्यक्रम लॉक करताना दिलेल्या मुदतीतच लॉक करावे जेणेकरून पुढची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केल्या जाईल आणि निवड यादी प्रसिद्ध केल्या जाईल.

📌 प्राधान्यक्रम दिल्यानंतर कागदपत्र पडताळणी वेळेस उमेदवाराने नोंदवलेली संपूर्ण माहिती म्हणजेच उमेदवाराचे वय, शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता, जातीचा प्रवर्ग, नॉन क्रिमीलेअर गटात मोडत असल्यास त्याबाबतचे व्हॅलिड प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती असल्या बाबतचा पुरावा, महिला माजी सैनिक, अंशकालीन, अनाथ, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादी संदर्भात पुरावे सादर करणे आवश्यक आहे.

📌 प्राधान्यक्रम लोक केल्यानंतर विना मुलाखतीसाठी प्रसिद्ध केली जाणारी निवड यादी ही तात्पुरत्या स्वरूपाची म्हणजेच निवडलेले उमेदवार तात्पुरते पात्र समजण्यात येईल. आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळेस अर्जामध्ये नोंदवलेली संपूर्ण माहिती मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे यांच्या आधारे तपासून घेतल्यावरच आणि ती खरी ठरल्यावरच त्या उमेदवारास त्या पदासाठी पात्र करण्यात येईल आणि त्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल. परंतु कागदपत्र पडताळणी मध्ये कोणत्याही प्रकारचा गैर प्रकार किंवा खोटी माहिती आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर तो उमेदवार त्या पदावरून काढून टाकल्या जाईल.

 

📌 कागदपत्र पडताळणी वेळेस नियुक्ती देण्यासाठी सदर उमेदवाराला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पात्र असल्यासाठीचा सक्षम प्राधिकरण कडून प्रमाणित केलेला पुरावा देणे आवश्यक असेल याची नोंद घ्यावी.

📌 एखाद्या उमेदवाराने पवित्र पोर्टल मध्ये स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली, तसेच खरी माहिती लपवून ठेवली किंवा त्यात बदल केला किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कुठलाही प्रकारची खाडाखोड मिळाली किंवा ते प्रमाणपत्र बनावटी असल्याचे माहिती झाले तर अशा उमेदवाराला गैरवर्तणूक केल्याबद्दल कोणत्याही क्षणी अपात्र करून योग्य ती शिक्षा करण्यात येईल.

📌 वर्ग पहिली ते पाचवी करिता उमेदवाराने माध्यमिक शाळांत परीक्षा, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा आणि डीएड ची पदवी का ज्या माध्यमातून पूर्ण केलेली असेल त्या माध्यमांनुसार त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध होतील.

📌 वर्ग सहावी ते आठवी या पदवीधर शिक्षकांसाठी उमेदवाराने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा, पदवी परीक्षा सोबतच डीएड किंवा बीएड ज्या माध्यमातून पूर्ण केले असेल त्या माध्यमानुसार त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध होतील.

📌 वर्ग नववी ते दहावी च्या शिक्षकांसाठी सदर उमेदवाराने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा, पदवी परीक्षा व बी एड ज्या माध्यमातून पूर्ण केले असेल त्या सर्व प्रकारचे माध्यमाचे प्राधान्यक्रम त्यास उपलब्ध होतील.

📌 वर्ग अकरावी ते बारावी या गटासाठी सदर उमेदवाराने पदवी, पदव्युत्तर पदवी परीक्षा आणि सोबतच बी एड ही व्यवसायिक अर्हता पूर्ण केलेली असावी आणि हे शिक्षण ज्या माध्यमातून झाले असेल त्यानुसारच त्यांना माध्यम आणि माध्यम नीहाय व विषयनिहाय प्राधान्यक्रम त्यांच्या लॉगिन वर उपलब्ध होतील.

📌 उमेदवार ज्या भाषा विषयासाठी पात्र असेल अशा उमेदवारांना त्याच भाषासाठीचे प्राधान्यक्रम पाहायला मिळतील.

📌 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील शाळांमधील रिक्त जागांसाठी अशा उमेदवारांची निवड केल्या जाईल ज्यांचे संपूर्ण शिक्षण म्हणजेच शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ इंग्रजी माध्यमातून झालेली आहे अशाच उमेदवारांची निवड तिथे केल्या जाईल.

📌 सेमी इंग्रजीच्या शाळांवर एक इंग्रजी माध्यमाचा शिक्षक असावा अशी या भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून मागणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार डी एड किंवा बी एड ही व्यवसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

📌 प्रत्येक उमेदवाराला त्याच्या लॉगिन वर एकापेक्षा जास्त माध्यमाचे प्राधान्यक्रम कदाचित दिसू शकतात परंतु सदर उमेदवार ज्या माध्यमातून अध्यापन करण्यास सक्षम आहेत त्याच माध्यमाचे प्राधान्यक्रम दिले तर सोयीस्कर होईल.

📌 बंगाली माध्यमांसाठी सदर उमेदवारांनी बारावी मध्ये बंगाली भाषा घेऊन बारावी उत्तीर्ण केलेली असेल तरच त्यांनी त्या माध्यमासाठी आवश्यक ती माहिती भरून सेव केल्यानंतरच त्यांना त्यांच्या माध्यमातून प्राधान्यक्रम जनरेट होतील.

📌 प्रत्येक उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करण्याआधी स्वतः अर्ज करताना नोंदविलेली संपूर्ण माहिती तपासून आणि वेळोवेळी शासनाने प्रसिद्ध केलेले GR काळजीपूर्वक वाचूनच आपले प्राधान्यक्रम जनरेट करावेत आणि लॉक करावेत.

 

 

📌 वयोमर्यादेची अट ही शासनाने कोरोना काळात दिलेल्या शिथीलतेच्या नियमावर अवलंबून असेल.

📌 उमेदवाराने पवित्र पोर्टल वर स्व प्रमाणित करताना जी माहिती भरली आहे त्याच माहितीनुसार सदर उमेदवारास प्राधान्यक्रम उपलब्ध होणार आहेत आणि सदर प्राधान्यक्रमासाठी तो उमेदवार पात्र आहे की नाही याची एक वेळ त्यांनी खात्री करून घ्यावी.

📌 प्राधान्यक्रम देण्यासंबंधी शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर मार्गदर्शक व्हिडिओ तसेच मार्गदर्शक पत्रिका सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाईल. त्याचा योग्य व पुरेपूर वापर प्रत्येक उमेदवाराने करून घ्यायला हवा आणि अफवांना बळी न पडता अधिकृत माहिती च्या आधारे प्राधान्य क्रम द्यावेत.

📌 जर एखाद्या जागेसाठी समान गुण असलेले उमेदवार गुणवत्ता यादीत येत असतील तर त्यांची निवड खालील निकषांच्या आधारे करण्यात येईल.

सुरुवातीला जो उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

वरील आठ पूर्ण न झाल्यास जो उमेदवार वयाने ज्येष्ठ असेल त्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

दोन्ही अटी पूर्ण झाल्यास अर्ज सादर करण्याच्या दिनांक पूर्वी जो उमेदवार शैक्षणिक अहर्ता पूर्ण करत असेल त्याचीच निवड करण्यात येईल.

वरील तीनही अटी पूर्ण होत नसतील तर सदर उमेदवाराने व्यावसायिक अर्हता मध्ये उच्च गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची निवड करण्यात येईल.

📌 स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि खाजगी संस्थांच्या अनुदानित शाळा असतील त्यामध्ये नियुक्त केलेल्या उमेदवारांना नियुक्ती ही शिक्षण सेवक म्हणून एकत्रित मानधनावर दिल्या जाईल.

तर दुसरीकडे अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती ही विहित वेतनश्रेणीमध्ये राहील आणि वेळोवेळी शासन ठरवेल त्याप्रमाणे त्यांना मानधन किंवा वेतनश्रेणी देण्यात येईल.

📌 अशाप्रकारे वरील सर्व नियमांचा विचार करूनच प्रत्येक उमेदवाराने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावेत ही संपूर्ण जबाबदारी स्वतः उमेदवाराची असेल.

📌 निवड यादी प्रसिद्ध केल्यानंतर कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर करावयाची कागदपत्रे यांची यादी खाली दिली आहे.

१.) पवित्र पोर्टल वर माहिती भरताना सादर केलेल्या स्व प्रमाणित अर्जाची प्रत.

२.) वयाचा पुरावा साध्या करण्यासाठी माध्यमिक शाळांत परीक्षेचे प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

३.) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता यांच्या पुराव्यासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र व गुणपत्रक, उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र व गुणपत्रक, पदवी किंवा पदविका परीक्षांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, पदवीत्तर पदवी परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र.

४.) शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे गुणपत्रक.

५.) महाराष्ट्र राज्यात अधिवास असल्याचे प्रमाणपत्र.

६.) स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स/ महाविद्यालयात शिकत असलेले ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आणि त्याची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल.

७.) मागासवर्गीय उमेदवार असल्यास त्याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक असेल.

८.) नॉन क्रिमीलेअर गटात मोडत असल्यास त्यासाठीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

९.) ई डब्ल्यू एस प्रवर्गात मोडत असल्यास त्यासंबंधी प्रवासादर करणे आवश्यक.

१०.) दिव्यांग असल्यास त्याबाबतीत पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

११.) माजी सैनिक असल्यास त्या संबंधित पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

१२.) महिला आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा सादर करण्यासाठी नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.

१३.) खेळाडू आरक्षणासाठी सदर पुरावा सादर करणे आवश्यक असेल.

१४.) विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्यास किंवा काही कारणास्तव उमेदवाराने नावात बदल केल्यास सदर नावात बदल असल्याचे राजपत्र सादर करावे लागेल.

अशाप्रकारे पवित्र पोर्टलमार्फत प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असून त्यासाठीची संपूर्ण अधिकृत आणि सखोल माहिती आम्ही इथे उपलब्ध करून दिलेली आहे. या सर्व बाबींचा विचार करून आणि शासनाने वेळोवेळी उपलब्ध करून दिलेले परिपत्रक यांचा विचार करूनच उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करावेत.

पवित्र पोर्टल मार्फत वेळोवेळी प्रसिद्ध केला जाणाऱ्या सूचना आणि त्यांची अंमलबजावणी करताना आवश्यक असलेल्या नियमांची माहिती करून घेण्यासाठी नक्कीच आमचे टेलिग्राम चैनल Mahasarkar फॉलो करा आणि आमचे पेज नक्की लाईक करा जेणेकरून पवित्र पोर्टल संदर्भातील प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत जलद आणि तात्काळ गतीने पोहोच तील.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT