Process after Locking Preferences on Pavitra Portal | प्राधान्यक्रम दिल्यानंतर पुढची प्रोसेस कधी आणि काय असेल?

maha govt

Process after Locking Preferences on Pavitra Portal | प्राधान्यक्रम दिल्यानंतर पुढची प्रोसेस कधी आणि काय असेल?

पवित्र पोर्टल मार्फत होणारी शिक्षक भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र मधील सर्वात मोठी म्हणजेच तब्बल 21000 शिक्षकांची रिक्त पदे या मार्फत भरल्या जाणार आहेत. त्यासाठी सुरुवातीला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2023 TAIT घेण्यात आली आणि या परीक्षेच्या गुणांवर शिक्षकांची निवड होणार आहे. त्यासाठी दिनांक 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा देण्यात आली होती. आता प्राधान्यक्रम ब्लॉक करण्याची प्रक्रिया पूर्णतः बंद करण्यात आलेली असून आता सर्व उमेदवारांना निवड यादी लागण्याची उत्सुकता आहे. सर्वांना हा प्रश्न पडला असेल की निवड यादी कधी लागेल आणि त्यानंतरची पुढची प्रक्रिया काय असणार आहे. याविषयी आज आपण या पेजवर संपूर्ण अधिकृत माहिती घेणार आहोत ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. उमेदवाराने दिलेले प्राधान्यक्रम आणि सोबतच त्यांची गुणवत्ता यावरच त्यांची निवड केल्या जाणार आहे. तरीही मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निवड यादी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवड यादी लागल्यानंतर सर्वांना आपल्याला मिळालेला जिल्हा किंवा शाळा किंवा संस्था याविषयीची संपूर्ण माहिती मिळणार आहे. आपणास माहित आहे की शिक्षक भरती प्रक्रिया आहे दोन टप्प्यात विभागलेली आहे. एक म्हणजे विना मुलाखत (Without Interview) शिक्षक पदभरती आणि दुसरी म्हणजे मुलाखतीसहित (With Interview) शिक्षक पद भरती. त्यामुळे उमेदवारांना दोन टॅब उपलब्ध करून देण्यात आले होते आणि या दोन्ही टॅब वर उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. आता लॉक केल्यानंतर काही दिवसातच निवड यादी प्रसिद्ध केल्या जाईल आणि त्यानंतरची प्रक्रिया काय असेल हे आपण खालील प्रमाणे पाहूया.

निवड यादी आणि नियुक्तीचे नियम:

📌आपणास माहिती आहे की दोन प्रकारच्या निवड याद्या लागणार आहेत. पहिली निवड यादी ही विना मुलाखत शिक्षक पदभरती करिता असेल. आणि या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या म्हणजेच मुलाखतीसह शिक्षक पदभरती मध्ये वरच्या वर्गासाठी निवडल्या जाईल.

📌 एकंदरीत विना मुलाखत राऊंड मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांची निवड झालेल्या वर्गापेक्षा वरचे वर्ग मुलाखतीसह निवड यादीमध्ये पाहायला मिळतील.

📌विना मुलाखत निवड यादी मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना एकच जिल्हा उपलब्ध झाल्याने ते तिथे कागदपत्र पडताळणी करून त्यांना नियुक्तीपत्र दिले जातील. नियुक्तीपत्र दिल्यानंतर ठरलेल्या कालावधीत त्यांना त्या शाळेत किंवा त्या संस्थेत दिलेल्या कालावधीच्या आत रुजू होण्यास सांगितले जाईल.

📌सुरुवातीला विना मुलाखत यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित जिल्ह्याच्या किंवा संस्थेच्या किंवा महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या ठिकाणी आपणास विशिष्ट वेळापत्रकानुसार कागदपत्र पडताळणी करिता बोलविले जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी मध्ये आपण पात्र झाल्यानंतर आपले समुपदेशन केले जाईल. म्हणजेच तुमची निवड झालेल्या जिल्ह्यातील विविध शाळांची नावे तुमच्यासमोर ठेवल्या जातील आणि त्यातून निवड करण्याची संधी तुम्हाला दिल्या जाईल.

शाळा निवड करण्याची संधी ही सुद्धा त्या जिल्ह्यात निवड झालेल्या उमेदवारांच्या गुणांच्या आधारे म्हणजेच मेरिटने होईल.

📌यात सुरुवातीला येणाऱ्या दिव्यांग उमेदवार यांना शाळा निवडीची संधी अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर मेरिटने येणाऱ्या महिला उमेदवारांना शाळा निवडीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि शेवटी राहिलेल्या पुरुषांना मेरिटानुसार शाळा निवडीची संधी देण्यात येईल. अशाप्रकारे विना मुलाखत यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि समुपदेशन केले जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या शाळेत कमीत कमी सात दिवसांच्या आत रुजू होण्यासाठी सांगितले जाईल आणि नियुक्तीपत्र दिले जाईल.

📌तसेच विना मुलाखत निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच किंवा काही कालावधीनंतर आपणास मुलाखतीसहित शिक्षक पदभरतीची निवड यादी पाहायला मिळेल. या निवड यादी मध्ये प्रत्येक उमेदवारास त्याच्या गुणांच्या आणि त्या व्यक्तीने दिलेल्या प्राधान्यक्रम यांच्या आधारे किमान दहा संस्था उपलब्ध करून दिला जातील. म्हणजेच प्रत्येक उमेदवाराला किमान दहा संस्थेमध्ये मुलाखतीला जाण्यासाठीची संधी असेल.

📌दुसऱ्या बाजूस प्रत्येक संस्थेवर एका जागेसाठी तीन उमेदवारांनाच मुलाखतीकरिता बोलावले जाईल हा नियम शिक्षण विभागाने या वर्षीपासूनच लागू केला आहे. जर तुमची निवड विना मुलाखत यादीमध्ये वर्ग सहा ते आठ करिता झाली असेल, तरीसुद्धा त्या उमेदवारास नऊ ते बारा वर्गाचे प्राधान्यक्रम मुलाखतीसह निवड यादी मध्ये दिसू शकतात, जर तो त्यासाठी पात्र असेल तरच. म्हणजेच तुम्ही विना मुलाखत निवड यादी मधून एखाद्या शाळेवर रुजू झालात तरीही तुम्हाला मुलाखतीसह राऊंडमध्ये वरच्या वर्गासाठी मुलाखतीला जाता येईल. मुलाखतीसह शिक्षक पद भरती करिता थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. एकदा मुलाखतीसह संस्थांची यादी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आल्यावर त्या त्या संस्थेच्या वेळापत्रकानुसार त्यांना तिथे मुलाखतीला जावे लागेल.

📌प्रत्येक संस्थेत एका जागेसाठी तीन उमेदवारांना बोलविण्यात येईल आणि त्यातील उमेदवारांची मुलाखत व डेमो घेतल्यानंतरच त्यापैकी एका उमेदवाराची निवड करणे त्या संस्था चालकाला अनिवार्य असेल. मुलाखतीसाठी प्रत्येक उमेदवाराला तीस मार्क असतील. त्यापैकी पंधरा गुण हे डेमो साठी असतील तर पंधरा गुण हे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे यासाठी असतील.

📌एका जागेसाठी आलेल्या तीन उमेदवारांपैकी जो उमेदवार मुलाखतीमध्ये सर्वात जास्त गुण मिळवेल, त्या उमेदवाराची निवड सदर संस्था करेल किंवा कोणत्या उमेदवाराची निवड करायची हे सर्व अधिकार त्या संस्थेला दिलेले असतील.

📌अशाप्रकारे प्रत्येक उमेदवाराला दहा ठिकाणी मुलाखतीस जाता येईल आणि प्रत्येक संस्थेमध्ये एका जागेसाठी तीन उमेदवार बोलून त्यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. अशाप्रकारे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या त्या संस्थेमार्फत त्यांच्या संस्थेतील रिक्त पदांच्या जागी निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी लावल्या जाईल. एकदा उमेदवारास संस्था उपलब्ध झाल्यानंतर त्या संस्थेची कॉन्टॅक्ट करून पुढची प्रक्रिया करणे हे संपूर्ण जबाबदारी त्या उमेदवाराची असेल.

त्यामुळे सतत त्या संस्थांच्या संपर्काशी राहणे हे उमेदवाराचे काम आहे आणि दिलेल्या वेळापत्रकात मुलाखतीसाठी जाणे ही संपूर्ण जबाबदारी त्या उमेदवाराची असेल.

📌एकंदरीत सर्व संस्थांच्या मुलाखती झाल्यानंतर प्रत्येक संस्थेमध्ये त्या संस्थेची निवड यादी प्रसिद्ध केल्या जाईल आणि त्या नंतरच संस्थेमार्फतच कागदपत्र पडताळणी करून समुपदेशन केल्या जाईल.

📌अशाप्रकारे मुलाखतीसह शिक्षक पदभरती करिता किमान एक महिन्याचा कालावधी लागू शकतो आणि त्यानंतर निवड यादी प्रसिद्ध करून सदर उमेदवारांना त्या संस्थेमध्ये नियुक्त्या मिळू शकतात.

📌लोकसभा निवडणूक आणि आचार संहिता पाहता दहा मार्चपूर्वी विना मुलाखत निवड यादी आणि नियुक्तीचे आदेश देण्याचे काम शिक्षण विभागामार्फत युद्ध पातळीवर चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.

तरीही निवड यादी 10 मार्चपूर्वी लागल्यानंतर जूनमध्ये नियुक्त्या मिळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. मुलाखती साहित निवड यादी ही संस्थांमार्फत मुलाखत घेऊन त्या त्या संस्थेमध्ये प्रसिद्ध केला जाईल.

📌आता फक्त प्रत्येक उमेदवाराला मुलाखतीसाठी उपलब्ध झालेल्या संस्था त्यांच्या लॉगिन वर दिसतील.

📌अशाप्रकारे प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया वरील प्रमाणे असेल. तसेच कागदपत्र पडताळणी मध्ये कोणत्याही प्रकारचे खोटे कागदपत्र किंवा गैरप्रकार आढळून आल्यास त्या उमेदवारास त्याच ठिकाणी या पदभरती मधून अपात्र केला जाईल. म्हणून उमेदवारांनी ओरिजनल कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

📌उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्व प्रमाणित करताना जी कागदपत्रे अपलोड केली आहेत ती सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असेल.

📌पवित्र पोर्टल मार्फत होणारे शिक्षक भरती ही दोन टप्प्यांमध्ये होणार असल्याचे माननीय शिक्षण मंत्री आणि माननीय शिक्षण आयुक्त यांनी आधीच सांगितले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तब्बल एकवीस हजार पदांची शिक्षक भरती होणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पदांची शिक्षक भरती होणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे आणि हा दुसरा टप्पा मे महिन्याच्या नंतर सुरू होईल असे सुद्धा सूत्रांनी कळविले आहे.

📌त्यामुळेच ज्या ज्या उमेदवारांना पहिला टप्प्यांमध्ये संधी मिळाली नाही किंवा काहीही चुकांमुळे त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध झाले नसतील अशा उमेदवारांसाठी दुसरा टप्प्यामध्ये सुवर्णसंधी चालून येणार आहे असे आपण म्हणू शकतो.

📌 सोबतच पहिल्या टप्प्यांमध्ये ज्या उमेदवारांची विना मुलाखत किंवा मुलाखतीसह पदभरती मध्ये निवड झाली असेल असे उमेदवार दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा, ज्या वर्गाला निवड झाली असेल त्या वर्गाच्या वरच्या वर्गासाठी पात्र ठरू शकतात. पुन्हा ते उमेदवार दुसऱ्या टप्प्यात सुद्धा पात्र ठरणार आहेत.

📌अशाप्रकारे महाराष्ट्र शासनाकडून शिक्षक भरती प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे आणि त्यामुळेच ग्रामीण भागातील शाळांना गुणवत्ताधारक शिक्षक तर मिळणार आहेत. सोबतच बेरोजगार डीएड बीएड धारकांना नोकऱ्या सुद्धा मिळणार आहेत.

📌जर आपण पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी झाला असाल तर कागदपत्र पडताळणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे याची संपूर्ण अधिकृत यादी आम्ही खाली दिलेली आहे. ती नक्कीच तपासा आणि ते कागदपत्र गोळा करून सादर करण्यास तत्पर राहा.

📌कागदपत्र पडताळणीच्या वेळेस खाली दिलेल्या यादी मधील सर्व कागदपत्रे यांची एक ओरिजनल कॉपी यांचा संच, तर अजून झेरॉक्स कॉपीचे (self attested) तीन संच बनवून ठेवणे आवश्यक आहे.

कागदपत्र पडताळणी करीता आवश्यक असणारी कागदपत्रे:

१.) रजिस्टर मोबाईल नंबर

२.) रजिस्टर ईमेल आयडी

३.) तुमची सही, पत्ता, जन्म तारीख

४.) ओळख पत्र (आधार कार्ड/पॅनकार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स)

५.) निवड यादी मधील अनुक्रमांक

६.) उमेदवाराने स्व प्रमाणित केलेल्या अर्जाची प्रत

७.) जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला

८.) दहावीचे SSC गुणपत्रक व प्रमाणपत्र

९.) बारावीचे HSC चे गुणपत्रक व प्रमाणपत्र

१०.) पदवी चे गुणपत्रक व प्रमाणपत्र

११.) पदव्यूतर पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र

१२.) DEd/D.TEd गुणपत्रक व प्रमाणपत्र

१३.) BEd गुण पत्रक व प्रमाणपत्र

१४.) TET/CTET गुण पत्रक व प्रमाणपत्र

१५.) TAIT परीक्षेचे स्कोअर कार्ड

१६.) जात प्रमाणपत्र Caste Certificate

१७.) जात वैधता प्रमाणपत्र Caste Validity

१८.) अधिवास प्रमाणपत्र Domicile Certificate

१९.) लहान कुटुंब प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र (Small Family Declaration)

२०.) MS-CIT प्रमाणपत्र

२१.) नावात बदल असल्यास (affidavit/gazette/marriage certificate)

२२.) महिला आरक्षण पत्र लागू असेल तर

२३.) नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र

२४.) पेसा क्षेत्र मधून असल्यास (ST उमेदवार) मूळ अधिवास प्रमाणपत्र

२५.) समांतर आरक्षण असल्यास तसे पत्र – खेळाडू/अनाथ/डीव्यांग/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/माजी सैनिक/अंशकालीन लागू असेल तर

२६.) निवड यादी मधे नाव असलेल्या पेज ची प्रत

अशाप्रकारे वरील सर्व ओरिजनल कागदपत्रे आणि त्यांच्या प्रत्येकाचे तीन संच बनवून आपण कागदपत्र पडताळणी करीता तयार राहू शकता.

जर आपण पवित्र पोर्टल मार्फत होणारा शिक्षक पदभरती मध्ये सहभागी झालेले असाल तर वेळोवेळी मिळणाऱ्या अधिकृत सूचना नोटिफिकेशन्स व अपडेट्स होतात काळरीत्या उपलब्ध करून घेण्यासाठी आमचे चॅनल Mahasarkar नक्कीच फोन करा आमची लिंक फॉलो करा.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT