पवित्र पोर्टल शिक्षक भरती निवड यादी जाहीर

maha govt

Pavitra Portal Selection List | पवित्र पोर्टल शिक्षक भरती निवड यादी लवकरच होणार जाहीर

Published On : 26-Feb-2024: Click Here

पवित्र पोर्टल मार्फत होणारी सर्वात मोठी शिक्षक भरती प्रक्रिया ही तब्बल 21000 पदांची असून त्यासाठी उमेदवारांकडून प्राधान्य क्रम लॉक करण्याची प्रक्रिया नुकतीच म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली आहे. तसेच त्यानंतर पासून संपूर्ण निवड यादी बनवण्याची प्रक्रिया ही संगणकीय प्रणाली मार्फत असून त्यात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नसणार आहे. त्यामुळे ही सर्वात मोठी आणि अत्यंत पारदर्शक भरती प्रक्रिया असणार आहे. शिक्षण विभाग मार्फत मिळणाऱ्या अधिकृत माहिती वरून असे दिसून येते की निवड यादी बनवण्याची प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक आणि वेगाने होत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की लगेच विना मुलाखत आणि मुलाखत सहित निवड याद्या पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध केल्या जातील. तसेच निवड याद्या पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध होण्या अगोदर उमेदवाराची निवड कुठे झाली आहे हे प्रतेक उमेदवार स्वतच्या लॉग इन वर जाऊन पाहू शकता. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा काही वेळेत संपूर्ण प्राधान्य क्रम लॉक केलेल्या उमेदवारांची निवड यादी सर्वांना दिसेल. एकंदरीत ही संपूर्ण प्रक्रिया फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत नक्कीच पूर्ण होणार असून त्यानंतर किमान एक आठवडा कागदपत्र पडताळणी करीता दिला जाईल. पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या सूचना आणि अन्य उपयुक्त माहिती करिता तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता. याच लिंक वर तुम्हाला भविष्यात निवड याद्या पाहण्यास मिळणार आहेत.

उमेदवारांची निवड ज्या ज्या आस्थापना मधे झाली आहे त्यांच्याकडून एक विशिष्ट वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्या विहित मुदतीत च सदर उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्या जाईल. सोबतच कागदपत्र पडताळणी करण्यात दिली जाणारी शिथिलता ही त्या त्या आस्थापना वर अवलंबून असेल. त्यामुळे आता उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची काळजी न करता आणि कोणत्याही अफवांना बळी न पडता आपले सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे लावून तयारीत राहायचे आहे.

लोकसभा निवडणूक आचार संहिता तोंडावर असल्या कारणाने ही संपूर्ण प्रक्रिया अगदी युद्ध पातळीवर सुरू असल्याचे समजते आहे. परंतु तरीही निवड यादी प्रसिद्ध झाल्यावर लगेच नियुक्त्या मिळतील की नाही याची अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. तरीही उमेदवारांनी तयारीत असणे आवश्यक आहे जेणेकरून ऐनवेळी धावपळ होणार नाही. आपण दिलेले प्राधान्य क्रम नुसार त्या ठिकाणी जाण्याची आणि राहण्याची तयारी प्रतेक उमेदवाराने करणे गरजेचे आहे. भविष्यात संभवणाऱ्या अडचणी म्हणजे जिल्हा अंतर्गत बदली, आंतर जिल्हा बदली होणारी ऑनलाईन प्रक्रिया, यामुळे कदाचित थोडाफार परिणाम नियुक्त्या देण्यावर होऊ शकतो. बदल्या पूर्ण केल्यावरच त्या शिक्षकांना कार्यमुक्त करून त्या ठिकाणी नवीन शिक्षकांची नियुक्ती दिल्या जाते त्यामुळे ही संपूर्ण बदली प्रक्रिया सुद्धा वेळेत पूर्ण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून उमेदवारांनी आता कोणतीही काळजी न करता फक्त निवड याद्या जाहीर होण्याची वाट बघणे उरले आहे. प्रसार माध्यमे, सोशल मीडिया मधून किंवा वयक्तिक स्तरावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि भुल थापा यांना बळी न पडता फक्त पवित्र पोर्टल वर दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचन यावरच विश्वास ठेवून त्या अवलंबणे फायद्याचे होईल.  एकंदरीत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवड यादी जाहीर होऊन पुढील सात दिवसात कागदपत्र पडताळणी पूर्ण करून आणि त्यानंतर समुपदेशन करून लगेच नियुक्त्या सुद्धा मिळू शकतात. परंतु काही अपवादात्मक परिस्थितीत निवड यादी जाहीर करून नियुक्त्या देण्याचे काम आचार संहिता नंतर सुद्धा केले जाऊ शकते. म्हणून कोणत्याही प्रकारचा अविश्वास न दाखवता ही संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. जर तुम्ही विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल किंवा महारष्ट्र मधे सरकारी नोकरी किंवा अन्य नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही एका योग्य प्लॅटफॉर्म वर आला आहात. इथे आपणास अधिकृत आणि सखोल माहिती तात्काळ आणि जलद गतीने दिल्या जाईल. ज्यामुळे आपण जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनांना घरबसल्या एका क्लिक मधे मिळवू शकता.

पवित्र पोर्टल मार्फत होणारी शिक्षक भरती प्रक्रिया आणि पुधी संपूर्ण प्रक्रिया सोबतच वेळोवेळी प्रसिद्ध होणारे परिपत्रक यांची माहिती तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आमचे telegram channel Mahasarkar नक्कीच फॉलो करा.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT