Solve these “Statement – Courses of Action” problems to ace Reasoning part | या “विधान – कार्यवाही” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

Solve these “Statement – Courses of Action” problems to ace Reasoning part | या “विधान – कार्यवाहीसमस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

This is the 30 no. topic article on “Statement – Courses of Action” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “Statement – Courses of Action [ विधान – कार्यवाही] Topic.

या प्रकारच्या टॉपिक मधे आपणास एखादी योजना किंवा धोरणाची अंमलबजावणी करायची असेल तर कोणते उपाय योजना, नियोजन करावे लागेल याविषयी कार्यवाही दिली जाते. त्यावरून कोणती कार्यवाही योग्य असेल ते धोरण किंवा योजना आमलात आणण्यासाठी हे पाहणे आपले कर्तव्य असते. असे प्रश्न सोडवत असताना आपली सर्वतोपरी विचार करण्याची क्षमता असणे गरजेचे असते. समाजातील फक्त एक घटकाचा विचार न करता सर्व बाबींचा विचार करून योग्य नियोजन आणि उपाय करणे हे आपल्याला त्या कार्यवाहीत करायचे असते. एकाला लाभ आणि दुसऱ्याला नुकसान होईल अशी कार्यवाही कधीच योग्य ठरत नाही. म्हणून दिलेले विधान चहू बाजूंनी विचार करून नंतरच त्यावर कार्यवाही करायची असते. अशा प्रकरचे तर्क संगत प्रश्न सोडविण्यासाठी आपले वाचन कौशल्य, निर्णय क्षमता, योग्य त्या वेळी योग्य ते बदल करण्याची क्षमता महत्वाची ठरते. म्हणून संपूर्ण समस्या पाहूनच त्यावर कार्यवाही करणे हे इथे उद्दिष्ट असते. त्यासाठी आपण खाली दिलेली काही उदाहरणे अभ्यासू.

उदाहरणे:

१.)

विधान:

जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी बाकी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेत मागे पडतात असे वातावरण पालक मंडळी मधे झाले आहे.

कार्यवाही:

१) जिल्हा परिषद प्रशासन ने लगेच या समस्येचा विचार करून त्यावर उपाय योजना केल्या पाहिजे.
२) जिल्हा परिषद विभागाने जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षक यांच्या जागा भरून काढायला हव्यात.
३) जिल्हा परिषद विभागाने काही शाळा बंद कराव्या जेणेकरून बाकी शाळांवर योग्य लक्ष देता येईल.

a) फक्त १ योग्य
b) फक्त २ आणि ३ योग्य
c) फक्त १ आणि ३ योग्य
d) फक्त १ आणि २ योग्य
e) सर्व योग्य

उत्तर: a) फक्त १ योग्य

स्पष्टीकरण:

दिलेल्या समस्येवर योग्य उपाय म्हणजे ती समस्या का उद्भवली हे शोधणे आणि त्या त्रुटी दूर करणे. म्हणून फक्त कार्यवाही १ योग्य असेल.
म्हणून आपले योग्य उत्तर a) असेल.

२.)

विधान:

आज ही दुर्गम भागात राहणारे आदिवासी लोक शिक्षण आणि सुविधा यांच्या पासून दूर आहेत.

कार्यवाही:

१) त्या दुर्गम भागातील लोकांना शिक्षण मिळावे म्हणून सरकारने समाज सेवी संस्थांना योग्य ती मदत करायला पाहिजे.
२) त्या दुर्गम भागात जनजागृती केली पाहिजे.
३) समाज सेवकांनी त्या दुर्गम भागातील लोकांना शिक्षित करण्याचे कार्य हाती घ्यायला हवे.

a) फक्त १ योग्य
b) फक्त २ आणि ३ योग्य
c) फक्त १ आणि ३ योग्य
d) फक्त १ आणि २ योग्य
e) सर्व योग्य

उत्तर: d) फक्त १ आणि २ योग्य

स्पष्टीकरण:

दिलेल्या विधान वरून, दुर्गम भागातील लोकांना शिक्षण मिळावे म्हणून जन जागृती करणे तसेच समाज सेवी संस्थांना ते काम सोपवून सरकारने मदत करणे आवश्यक असेल. म्हणून कार्यवाही १ आणि २ योग्य असेल. पूर्णत: समाज सेवक यांवर हे सोडून देणे योग्य ठरणार नाही. म्हणून आपले योग्य उत्तर d) असेल.

३.)

विधान:

नुकत्याच पावसाळा मधे झालेय अती पावसामुळे शहरांमधील रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे.

कार्यवाही:

१) शहरी प्रशासनाने सहाय्यक वाहतूक टीम बनवून वाहतूक सुरळीत करावी.
२) शहरी नागरी प्रशासनाने लगेच रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण करावे.
३) जिथे रस्ते खराब झाले आहेत तिथे सूचना फलक लावाव जेणेकरून वाहन चालकांना त्रास होणार नाही.

a) फक्त १ योग्य
b) फक्त २ आणि ३ योग्य
c) फक्त १ आणि ३ योग्य
d) फक्त १ आणि २ योग्य
e) सर्व योग्य

उत्तर: e) सर्व योग्य

स्पष्टीकरण:

दिलेल्या विधान वरून असे दिसून येते की सर्व कार्यवाही या रस्ते दुरुस्ती आणि वाहन चालकांना त्रास होऊ नये या दृष्टीने योग्य आहेत. आणि दिलेल्या समस्येवर योग्य कार्यवाही आहेत. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय e) असेल.

४.)

विधान:

बऱ्याच शाळांमधील दहावीत शिकनारे विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत.

कार्यवाही:

१) ज्या शाळांनी दहावीचा निकाल चांगला दिला नाही त्या शाळा बंद कराव्यात.
२) या शाळांमधील शिक्षकांना लगेच नोकरीवरून काढून टाकावे.
३) नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून द्यावे.

a) फक्त १ योग्य
b) फक्त २ आणि ३ योग्य
c) फक्त १ आणि ३ योग्य
d) फक्त १ आणि २ योग्य
e) सर्व अयोग्य

उत्तर: e) सर्व अयोग्य

स्पष्टीकरण:

दिलेल्या विधान वरून असे दिसून येते की, परीक्षा विभागाने परीक्षेत झालेल्या त्रुटी, परीक्षा व्यवस्था या सर्व बाबी लक्षात घेऊन मग च कार्यवाही करायला हवी. इथे दिलेली कोणतीच कार्यवाही दिलेल्या समस्येचे निराकरण करू शकत नाही. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय e) असेल.

५.)

विधान:

हवामान अंदाज विभागाने यावर्षी कमी पाऊस पडणार असे वर्तवले आहे.

कार्यवाही:

१) सरकारने उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याकडे लक्ष द्यावे.
२) पाणी पुरवठा विभागाने भविष्यात येणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन पाणी पुरवठा कमी प्रमाणात करायला हवा.
३) भविष्यात शेतकऱ्यांनी कमी पाण्यात वाढणारी पिके घ्यावीत असे आश्वासन द्यावे.

a) फक्त १ योग्य
b) फक्त २ आणि ३ योग्य
c) फक्त १ आणि ३ योग्य
d) फक्त १ आणि २ योग्य
e) सर्व योग्य

उत्तर: e) सर्व योग्य

स्पष्टीकरण:

दिलेल्या विधान वरून असे दिसून येते की, पावसा अभावी पाण्याची कमतरता ही आपणास आधीच कळून चुकली असल्याने दिलेल्या तिन्ही कार्यवाही योग्य ठरवतील जेणेकरून भविष्यात कोणतेही संकट उद्भवणार नाही. म्हणून सर्व कार्यवाही उचित आहेत. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय e) असेल.

६.)

विधान:

रेल्वे रुळावरून बस जात असताना अचानक रेल्वे येऊन अपघात झाला आणि १०० लोकांनी जीव गमावला होता.

कार्यवाही:

१) रेल्वे चालकाला शिक्षा झाली पाहिजे.
२) बस चालकाच्या निष्काळजी मुळे हा अपघात झालं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
३) रेल्वे रूळ क्रॉसिंग आहे तिथे एक मार्गदर्शक व्यक्ती ची नियुक्ती करावी.

a) फक्त ३ योग्य
b) फक्त २ आणि ३ योग्य
c) फक्त १ आणि ३ योग्य
d) फक्त १ आणि २ योग्य
e) सर्व योग्य

उत्तर: a) फक्त ३ योग्य

स्पष्टीकरण:

विधान वरून असे दिसून येते की ही घटना भूतकाळात घडून आली आहे. आणि यात बस चालक किंवा रेल्वे चालकाची पूर्ण चूक नसल्याने कार्यवाही ३ योग्य असेल. जेणेकरून कोणीही निष्काळजी मुळे नियम मोडणार नाहीत. म्हणून एक व्यक्ती रेल्वे क्रॉसिंग वर नियुक्त करून फाटक लावण योग्य ठरेल. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय a) असेल.

More Reasoning Parts:-


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT