Solve these “Odd One Out” problems to ace Reasoning part

Solve these ” Odd One Out” problems to ace Reasoning part | या “Odd One Out” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

This is the 17 no. topic article on Odd One Out Problems for the Talathi exam as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the Odd One Out topic.

या टॉपिक मधे आपणास काही पर्याय दिले जातील आणि त्यांच्यामध्ये विशिष्ट रचना किंवा संबंध दिला जाईल तो ओळखून त्यात असणारा भिन्न पर्याय आपणास ओळखायचं आहे. त्यासाठी आपणास इंग्लिश अल्फाबेट आणि त्यांची numbering लक्षात असणे आवश्यक आहे. तरच आपण असे प्रश्न कमी वेळेत सोडवू शकतो.

खाली दिलेली काही उदाहरणे अभ्यासून आपण जास्तीत जास्त सराव करू शकतो.

उदाहरणे:

1.) खाली दिलेल्या 5 पर्याय पैकी 4 पर्याय हे सारखी रचना दाखवत असून एक पर्याय भिन्न आहे तो शोधा.

a) HLJ

b) PUS

c) BFD

d) UYW

e) CGE

उत्तर: a) PUS

स्पष्टीकरण:

इथे a)PUS हा पर्याय सोडला तर बाकी पर्याय मधे पहिल्या आणि तिसऱ्या इंग्लिश अल्फाबेट मधे एक अल्फाबेट सोडला आहे.

पण PUS मधे असे नाही, म्हणून हा पर्याय भिन्न पर्याय असेल.

म्हणून आपले उत्तर a)PUS असेल.

2.) खाली दिलेल्या 5 पर्याय पैकी 4 पर्याय हे एकमेकांशी निगडित आहेत तर एक पर्याय भिन्न आहे तो भिन्न पर्याय शोधा.

a) BTAS

b) SPRN

c) QNPM

d) PMOL

e) BYAX

उत्तर: b) SPRN

स्पष्टीकरण:

इथे b) SPRN हा पर्याय सोडला तर बाकी पर्याय मधे चौथा आणि दुसरा इंग्लिश अल्फाबेट हे क्रमाने आलेले आहेत. तर पर्याय b) SPRN मधे असे दिसून येत नाही म्हणून आपले योग्य उत्तर b) SPRN असेल.

3.) खाली दिलेल्या 5 पर्याय पैकी 4 पर्याय हे सारखे संबंध दाखवतात तर एक पर्याय हा भिन्न आहे तो भिन्न पर्याय शोधा.

a) GT

b) KP

c) DW

d) JQ

e) FR

उत्तर: e) FR

स्पष्टीकरण:

इथे e)FR हा पर्याय सोडला तर बाकी पर्याय मधे पाहिले आणि दुसरे अक्षर हे अल्फाबेट series मधे समोरून आणि शेवटून अनुक्रमे समान अंतरावर आहेत. परंतु e)FR या पर्याय मधे हे दिसून येत नाही म्हणून हा वेगळा पर्याय आहे.

4.) खाली दिलेल्या 5 पर्याय पैकी 4 पर्याय हे एकमेकांशी संबंध दाखवणारी आहेत तर एक पर्याय हा भिन्न आहे तर तो भिन्न पर्याय कोणता असेल?

a) H20L

b) J27Q

c) E29Y

d) C9F

e) B28Z

उत्तर: c) E29Y

स्पष्टीकरण:

इथे c)E29Y हा पर्याय सोडला तर बाकी पर्याय मधे पहिल्या आणि दुसऱ्या इंग्लिश अल्फाबेट मधील अक्षर यांच्या number ची बेरीज मधे दिली आहे.

जसे पर्याय H20L मधे H=8 आणि L=12, म्हणूनच 12+8=20

याप्रमाणे सर्व पर्याय दिले आहेत परंतु c)E29Y हे त्यानुसार नसल्याने हा पर्याय वेगळा असून हे आपले योग्य उत्तर असेल.

5.) खाली दिलेल्या 5 पर्यायी पैकी 4 पर्याय हे विशिष्ट मांडणी नुसार बनवली आहेत तर त्यापैकी एक पर्याय हा भिन्न आहे तर तो भिन्न पर्याय शोधा.

a) T4E

b) R2I

c) B12X

d) D4P

e) M1Z

उत्तर: e)M1Z

स्पष्टीकरण:

इथे, e) M1Z हा पर्याय सोडला तर बाकी पर्याय मधे खालील रचना वापरली आहे.

T4E मधे,T=20 आणि E=5

म्हणून 20/5=4

 

R2I मधे, R=18 आणि I=9 म्हणून 18/9=2

 

याप्रमाणे आपण B12X आणि D4P मधे सुद्धा सारखा संबंध दाखवू शकतो.

म्हणून आपले उत्तर e)M1Z असेल.

6.) खाली दिलेल्या 5 पर्याय पैकी 4 पर्याय हे एकमेकांशी संबंध दाखवणारी आहेत तर त्यापैकी एक हा भिन्न पर्याय आहे तर तो भिन्न पर्याय कोणता आहे.

a) IM

b) AE

c) GJ

d) TX

e) NR

उत्तर: c)GJ

स्पष्टीकरण:

इथे c)GJ हा पर्याय सोडला तर बाकी सर्व पर्याय यामधे अनुक्रमे 3 इंग्लिश अल्फाबेट अक्षर यांचा गॅप येतो परंतु GJ मधे फक्त 2 अक्षर यांचा गॅप येतो.

म्हणून पर्याय c)GJ भिन्न असून ते आपले योग्य उत्तर असेल.

7.) खाली दिलेल्या 5 पर्याय पैकी 4 पर्याय हे विशिष्ट रचना करून बनवले आहेत तर त्यापैकी एक पर्याय हा भिन्न आहे तर तो भिन्न पर्याय कोणता असेल?

a) ZS12

b) PM4

c) RJ16

d) FD2

e) EP20

उत्तर: c) RJ16

स्पष्टीकरण:

इथे c) RJ16 हा पर्याय सोडला तर बाकी पर्याय मधे शेवटी दिलेला नंबर हा आधी दिलेल्या दोन अक्षर यामधे येणाऱ्या अक्षराचया संख्येच्या दुप्पट दिले आहे.

उदा. ZS12

Z आणि S मधे एकूण 6 अक्षर येतात म्हणून 6 ची दुप्पट 12, म्हणूनच ZS12.

 

P आणि M या अक्षर मधे एकूण 2 अक्षर येतात आणि 2 ची दुप्पट 4 म्हणूनच PM4.

 

अशाप्रकारे RJ16 हा पर्याय सोडला तर बाकी पर्याय ही रचना दाखवतात.

म्हणून आपले उत्तर c)RJ16 असेल.

8.) खाली दिलेल्या 5 पर्याय पैकी 4 पर्याय हे एकमेकांशी विशिष्ट रचनेने निगडित आहेत आणि त्यापैकी एक पर्याय हा वेगळा आहे तर तो वेगळा पर्याय कोणता असेल?

a) 1M3

b) 1P6

c) 2Y4

d) 2Y5

e) 2T0

उत्तर: c) 2Y4

स्पष्टीकरण:

इथे c)2Y4 हा पर्याय सोडला तर बाकी पर्याय मधे मधल्या अक्षरचा अल्फाबेट मधे असलेला number हा त्यांच्या साईड ला लिहिला आहे.

उदा. 1M3, कारण M=13

2Y5, कारण Y=25

1P6, कारण P=16

2T0, कारण T=20

परंतू, 2Y4 हे यात बसत नाही म्हणून आपले योग्य उत्तर c)2Y4 असेल.

9.) खाली दिलेल्या 5 पर्याय पैकी 4 पर्याय हे एकमेकांशी विशिष्ट रचनेने निगडित आहेत आणि त्यापैकी एक पर्याय भिन्न आहे तर तो भिन्न पर्याय कोणता असेल?

a) QPO

b) LKM

c) RQP

d) EDC

e) IHG

उत्तर: b)LKM

स्पष्टीकरण:

इथे b)MKL हा पर्याय सोडला तर बाकी पर्याय मधे जर आपण उजवीकडून डावीकडे गेलो कीवा मागून पुढे गेलो तर दिलेले अक्षर क्रमाने आले आहेत.

उदा. QPO मधे, म्हणजेच O, P, Q

RQP मधे, P, Q, R

EDC मधे, C, D, E

IHG मधे, G, H, I

परंतू b)LKM मधे असे दिले नाही म्हणून हे आपले उत्तर असेल.

10.) खाली दिलेल्या 5 पर्याय पैकी 4 पर्याय हे एकमेकांशी विशिष्ट रचनेने निगडित आहेत आणि त्यापैकी एक पर्याय भिन्न आहे तर तो वेगळा पर्याय कोणता असेल?

a) U3G

b) P4D

c) B12X

d) R3F

e) Y5I

उत्तर: e)Y5I

स्पष्टीकरण:

इथे, e)Y5I हा पर्याय सोडला तर बाकी खालील प्रमाणे सारखी रचना दाखवतात.

उदा.

U3G मधे, U=21 आणि G=7 म्हणूनच 21/7=3

P4D मधे, P=16 आणि D=4 म्हणूनच 16/4=4

R3F मधे, R=18 आणि F=6 म्हणूनच 18/6=3

परंतु e)Y5I मधे असे दिसून येते नाही म्हणून आपले हे उत्तर असेल.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT