Solve these “Linear Seating Arrangement” problems to ace Reasoning part | या “सरळ बैठक व्यवस्था” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

Solve these “Linear Seating Arrangement” problems to ace Reasoning part | या “सरळ बैठक व्यवस्थासमस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

This is the 31 no. topic article on “Linear Seating Arrangement” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “Linear Seating Arrangement [सरळ बैठक व्यवस्था] Topic.

अशा प्रकारच्या घटका मधे आपणास काही गोष्टी क्रमाने न देता थोड्या किचकट पद्धतीने दिल्या जातात आपणास त्यावरून एक योग्य क्रम बद्ध मांडणी करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. काही वेळेस सरळ रेषेत असलेली बैठक व्यवस्था देऊन त्यावर प्रश्न विचारले जातात. जर एक व्यक्ती ची बैठक चुकली तर संपूर्ण बैठक व्यवस्था चुकू शकते. म्हनून योग्य वाचन करून, मांडणी समजून घेऊन च आपण एक कच्ची मांडणी कागदावर करून त्यानंतर च त्यावरील प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. मुख्यत: अशा प्रकारच्या घटका मधे ७-८ व्यक्तीची सरळ रेषिय बैठक व्यवस्था दिली जाते आणि त्यावर किमान ४-५ प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपण एक बैठक व्यवस्था जरी योग्य केली तर त्यावरील प्रश्नांची उत्तरे देऊन आपण ८-१० मार्क्स सहज मिळवू शकतो. म्हणून असे प्रश्न जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे. IBPS पॅटर्न मधे बैठक व्यवस्था यावर जास्त भर दिला जातो आणि प्रतेक प्रश्न मधे ५-६ उपप्रश्र्न विचारले जातात म्हणजे आपण हा घटक परफेक्ट केला तर आपले १५-२० मार्क्स पक्के म्हणायला हरकत नाही.
परंतु असे प्रश्न जास्तीत जास्त कागदावर मांडणी करून सोडविल्या शिवाय त्याचा सराव होणार नाही आणि आपल्याला अचूकता येणार नाही. म्हणून जास्तीत जास्त सराव करावा लागेल.
त्यासाठी आपण खाली दिलेली काही उदाहरणे अभ्यासू.

उदाहरणे:

प्रश्न १.) सहा माणसे A, B, C, D, E आणि F हे एका रांगेत सरळ रेषेत उभे आहेत. C आणि D हे शेजारी असून E च लगत आहेत. B हा फक्त A ला लागून उभा आहे. A हा F पासुन चौथा क्रमांक वर आहे. तर यावरून सगळ्यात शेवटी किंवा टोकाला कोण उभा असेल?
a) A आणि F
b) B आणि D
c) B आणि F
d) यापैकी नाही

उत्तर: c) B आणि F

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व अटी वरून आपण खालील आकृती मधे दाखविल्या प्रमाणे सरळ रेषेत बैठक व्यवस्था मांडणी करू शकतो. आणि त्यावरून आपणास असे दिसून येते की दोन्ही टोकाला असणारे व्यक्ती B आणि F आहेत.

म्हणून आपले योग्य उत्तर c) असेल.

प्रश्न २.) रवी, सूरज, तेजस, सागर आणि अक्षय परीक्षा शुल्क भरण्यासाठी खिडकी जवळ रांगेत उभे आहेत. सूरज मध्यभागी उभा आहे. तेजस सागरच्या समोर नाही आणि रवी अक्षयच्या मागे उभा नाही. जर रवी तेजस च मागे असेल तर दोन्ही टोकांना कोण उभे असतील?
a) सागर, अक्षय
b) सागर, रवी
c) तेजस, रवी
d) रवी, अक्षय

उत्तर: a) सागर, अक्षय

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व अटी वरून आपण खाली दिलेल्या आकृती मधे दाखविल्या प्रमाणे सरळ रेषेत बैठक व्यवस्था मांडणी करू शकतो. आणि त्यावरून आपणास असे दिसून येते की दोन्ही टोकांना सागर आणि अक्षय आहेत.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय a) असेल.

प्रश्न ३.) एका गट मधील ५ सदस्य एका रांगेत बसले आहेत. A हा B याच्या डावीकडे परंतु C याच्या उजवीकडे आणि D हा E याच्या डावीकडे परंतु B याच्या उजवीकडे आहे, तर रांगेच्या मध्यभागी कोण बसले आहे?

a) D
b) B
c) A
d) E

उत्तर: b) B

स्पष्टीकरण:

उदाहरणात दिलेल्या अटी वरून आपण खाली दिल्या प्रमाणे आकृती किंवा मांडणी करू शकतो आणि त्यावरून उत्तर देऊ शकतो.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

प्रश्न ४.) राधा गितापेक्षा मोठी परंतु सितापेक्षा लहान आहे. गीता रीनापेक्षा मोठी परंतु सितपेक्षा लहान आहे. तर या सगळ्यांमध्ये सर्वात मोठी कोण असेल?
a) राधा
b) गीता
c) सीता
d) रीना

उत्तर: c) सीता

स्पष्टीकरण :

उदाहरणात दिलेल्या माहिती वरून आपण खालील खालील प्रमाणे मांडणी करू शकतो.
राधा > गीता
सीता > राधा
सीता > गीता > रीना
तसेच,
सीता > राधा
सीता > गीता > रीना
यावरून आपण असे सांगू शकतो की सीता ही राधा, गीता आणि रीना पेक्षा मोठी आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

प्रश्न ५.) फोटो काढण्या करीता चार मुले बाकावर बसले आहेत. सचिनच्या डाव्या बाजूला सुरेश बसला आहे; सचिनच्या उजव्या बाजूला सागर आहे. सचिन आणि सागर यांच्या मधे सोमेश बसला आहे; तर फोटो मधे डावीकडून दुसरा कोण असेल?
a) सचिन
b) सुरेश
c) सागर
d) सोमेश

उत्तर: d) सोमेश

स्पष्टीकरण:

उदाहरणात दिलेल्या माहिती वरून आपण खालील प्रमाणे चार मुलांची बैठक व्यवस्था करू शकतो आणि त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो.

यावरून आपणास असा क्रम मिळेल सागर, सोमेश, सचिन, सुरेश.
म्हणून फोटो मधे सोमेश डावीकडून दुसरा असेल.

More Reasoning Parts:-


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT