Solve these “Logic and Conclusion” problems to ace Reasoning part | या “तर्क आणि निष्कर्ष” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

Solve these “Logic and Conclusion” problems to ace Reasoning part | या “तर्क आणि निष्कर्षसमस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

This is the 33 no. topic article on “Logic and Conclusion” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “Logic and Conclusion [तर्क आणि निष्कर्ष] Topic.

अशा प्रकारच्या घटका मधे आपणास दिलेल्या प्रश्ना तील माहिती वरून तर्क लावून निष्कर्ष काढायचा असतो. हा तर्क लावत असताना कधी आपणास आकृती काढावी लागते व त्यावरून वेगवेगळे निष्कर्ष काढून शेवटी योग्य ते उत्तर शोधावे लागते. अशी प्रश्न खूप सोपी व सोबतच कन्फ्युज करणारी असतात. त्यामुळे वाचन कौशल्य अचूक असणे गरजेचे असते.
दिलेल्या विधान वरून आपणास तर्क आकृती काढता येणे सर्वात महत्वाचे आहे. तरच आपण अचूक निष्कर्ष काढू शकतो.
त्यासाठी आपण खालील विधान व त्यावरून काढलेली तर्क आकृती बघू.

१.) सर्व A हे B आहेत.
वरील विधान दिले असता आपण खाली दिल्या प्रमाणे दोन तर्क आकृती काढू शकतो.

२.) एकही A हा B नाही.
वरील विधान दिले असता आपण खाली दिल्या प्रमाणे तर्क आकृती काढू शकतो. ज्या एकमेकींना कुठेच छेदत नाहीत.

३.) काही A हे B आहेत.
वरील विधान दिले असता आपण खाली दिल्या प्रमाणे तर्क आकृती काढू शकतो आणि त्या दोन अकृतींचा कॉमन भाग हा दिलेले विधान दर्शवतो.
४.) काही A हे B नाहीत.
वरील विधान दिले असता आपण खाली दिल्या प्रमाणे तर्क आकृती काढू शकतो. ज्यात त्या दोन अकृतीचा कॉमन भाग आहे तो दिलेले विधान दर्शवतो.
याप्रमाणे जर आपण दिलेल्या विधान वरून तर्क आकृत्या काढल्या आणि त्यावरून निष्कर्ष काढून योग्य उत्तर शोधू शकतो. त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रश्न सराव करणे आवश्यक आहे. खाली दिलेली काही उदाहरणे आपण अभ्यासू.

Note:
•अशा प्रकारच्या तर्क शास्त्रीय प्रश्न मधे दिलेली माहिती वास्तव घटनांसोबत कितीही विसंगत असेल तरीही ती पुर्णत: सत्य समजून निष्कर्ष काढायचा असतो.
•तसेच दिलेले निष्कर्ष दोन्ही तर्क आकृती मधे सत्य ठरत असेल तरच ते सत्य असते अथवा नाही.
•तसेच जर दिलेले दोन निष्कर्ष एकमेकांस विसंगत असतील आणि त्यापैकी एक निष्कर्ष एक आकृती मधे तर दुसरे निष्कर्ष दुसऱ्या आकृती मधे सत्य ठरत अस तर तेथे आपले उत्तर निष्कर्ष १ किंवा २ सत्य असे असेल.

 

उदाहरणे:

1.) विधान: सर्व वह्या पुस्तके आहेत. सर्व पेन्सिल पुस्तके आहेत. सर्व रबर पेन्सिल आहेत.

निष्कर्ष:
१) सर्व रबर पुस्तक आहेत.
२) काही रबर वह्या आहेत.
३) काही पुस्तके रबर आहेत.

a) फक्त १ आणि २ बरोबर
b) फक्त २ आणि ३ बरोबर
c) फक्त १ आणि ३ बरोबर
d) सर्व बरोबर
e) एकही बरोबर नाही

उत्तर: c)

स्पष्टीकरण:
वर दिलेल्या विधान वरून आपण खालील प्रमाणे दोन तर्क आकृती काढू शकतो. त्यावरून असे दिसून येते की, निष्कर्ष १ आणि निष्कर्ष ३ दोन्ही आकृती मधे सत्य ठरत आहे. परंतु निष्कर्ष २ आकृती १ मधे असत्य तर आकृती २ मधे सत्य ठरत आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

2.) विधान: सर्व उंदीर मांजर आहेत. सर्व कुत्रे मांजर आहेत. सर्व मांजर ससे आहेत.

निष्कर्ष:
१) सर्व उंदिर ससे आहेत.
२) सर्व कुत्रे ससे आहेत.
३) काही ससे मांजर आहेत.

a) फक्त १ आणि २ बरोबर
b) फक्त २ आणि ३ बरोबर
c) फक्त १ आणि ३ बरोबर
d) सर्व बरोबर
e) एकही बरोबर नाही

उत्तर: d)

स्पष्टीकरण:
वर दिलेल्या विधान वरून आपण खालील प्रमाणे दोन तर्क आकृती काढू शकतो. त्यावरून असे दिसून येते की, निष्कर्ष १, २ आणि निष्कर्ष ३ दोन्ही आकृती मधे सत्य ठरत आहेत. म्हणून दिलेले तिन्ही निष्कर्ष सत्य आहेत.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय d) असेल.

3.) विधान: सर्व चिकू पेरू आहेत. काही पेरू आंबे आहेत. सर्व आंबे केळी आहेत.

निष्कर्ष:
१) काही केळी चिकू आहेत.
२) काही आंबे चिकू आहेत.
३) काही केळी पेरू आहेत.

a) फक्त २ बरोबर
b) फक्त ३ बरोबर
c) फक्त १ आणि ३ बरोबर
d) फक्त १ बरोबर
e) एकही बरोबर नाही

उत्तर: b)

स्पष्टीकरण:
वर दिलेल्या विधान वरून आपण खालील प्रमाणे दोन तर्क आकृती काढू शकतो. त्यावरून असे दिसून येते की, निष्कर्ष १, २ आकृती १ मधे असत्य ठरत आहेत, तर आकृती २ मधे सत्य ठरत आहेत. परंतु निष्कर्ष ३ दोन्ही आकृती मधे सत्य ठरत आहे.म्हणून फक्त निष्कर्ष ३ सत्य आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

4.) विधान: काही फुले फळे आहेत. काही फळे भाज्या आहेत. सर्व भाज्या झाडे आहेत.

निष्कर्ष:
१) काही झाडे फळे आहेत.
२) काही झाडे फुले आहेत.
३) काही भाज्या फुले आहेत.

a) फक्त २ बरोबर
b) फक्त ३ बरोबर
c) फक्त १ आणि ३ बरोबर
d) फक्त १ बरोबर
e) एकही बरोबर नाही

उत्तर: d)

स्पष्टीकरण:
वर दिलेल्या विधान वरून आपण खालील प्रमाणे दोन तर्क आकृती काढू शकतो. त्यावरून असे दिसून येते की, निष्कर्ष २, ३ हे आकृती १ मधे असत्य ठरत आहेत, तर आकृती २ मधे सत्य ठरत आहेत. तसेच फक्त निष्कर्ष १ दोन्ही आकृती मधे सत्य ठरत आहे. म्हणून फक्त निष्कर्ष १ सत्य आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय d) असेल.

5.) विधान: काही तांदूळ गहू आहेत. काही गहू ज्वारी आहेत. काही ज्वारी बाजरी आहेत.

निष्कर्ष:
१) काही बाजरी गहू आहेत.
२) काही ज्वारी तांदूळ आहेत.
३) काही बाजरी तांदूळ आहेत.

a) फक्त २ बरोबर
b) फक्त ३ बरोबर
c) फक्त १ आणि ३ बरोबर
d) फक्त १ बरोबर
e) एकही बरोबर नाही

उत्तर: e)

स्पष्टीकरण:
वर दिलेल्या विधान वरून आपण खालील प्रमाणे तर्क आकृती काढू शकतो. त्यावरून असे दिसून येते की, निष्कर्ष १, २ आणि ३ हे आकृती मधे असत्य ठरत आहेत, म्हणून दिलेला एकही निष्कर्ष बरोबर नाही.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय e) असेल.

6.) विधान: काही वाघ मांजर आहेत. कोणताही मांजर ससा नाही. सर्व ससे कुत्रे आहेत.

निष्कर्ष:
१) काही कुत्रे मांजर आहेत.
२) कोणताही कुत्रा मांजर नाही.
३) काही वाघ ससे आहेत.

a) फक्त २ बरोबर
b) फक्त ३ बरोबर
c) फक्त १ किंवा ३ बरोबर
d) फक्त १ किंवा २ बरोबर
e) एकही बरोबर नाही

उत्तर: d)

स्पष्टीकरण:
वर दिलेल्या विधान वरून आपण खालील प्रमाणे दोन तर्क आकृती काढू शकतो. त्यावरून असे दिसून येते की, निष्कर्ष १ आणि २ हे विसंगत असून त्यापैकी निष्कर्ष १ आकृती १ मधे सत्य तर निष्कर्ष २ आकृती २ मधे सत्य ठरत आहेत, म्हणून हे दोन निष्कर्ष विसंगत असल्याने त्यापैकी एक निष्कर्ष नक्कीच सत्य असेल. दुसरीकडे निष्कर्ष ३ दोन्ही आकृती मधे सत्य नाही. म्हणून निष्कर्ष १ किवा २ पैकी कोणताही एक सत्य असायलाच हवा.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय d) असेल.


More Reasoning Parts:-


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT