GK MCQs and Answers About Thane History | General Knowledge | Current Affairs | Maharashtra History
वनरक्षक भरती, तलाठी भरती,जिल्हा परिषद भरती व इतर सर्व सरळ सेवा भरती साठी परीक्षाभिमुख माहिती सहज लक्षात राहण्यासाठी MCQ स्वरूपात उपयुक्त असे सामान्य ज्ञान, येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियामध्ये आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे त्यामुळे आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS यांच्या परीक्षापद्धतीलाअनुसरून (जिल्हा सामान्य ज्ञान) PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS सामान्य ज्ञान चे 20 सराव प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS सामान्य ज्ञान सराव, विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त जिल्हा सामान्य ज्ञान –
Also See:
(Q1) रायगड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?
(A) पुणे
(B) अमरावती
(C) नागपूर
(D) वरील पैकी नाही
Ans- (D) वरील पैकी नाही
(Q2) रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
(A) कर्जत
(B) मुरुड
(C) महाड
(D) अलिबाग
Ans- (D) अलिबाग
(Q3) रायगड जिल्ह्यात तालुक्याची संख्या किती आहेत?
(A) 11
(B) 12
(C) 14
(D) 15
Ans- (D) 15
(Q4) खालीलपैकी कोणती नदी रायगड जिल्ह्यातून वाहत नाही?
(A) उल्हास
(B) सावित्री
(C) कुंडलिका
(D) सीना
Ans- (D) सीना
(Q5) रायगड जिल्हाला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते?
(A) तांदळाचे कोठार
(B) ज्वारीचे कोठार
(C) कापसाचे कोठार
(D) वरीलपैकी सर्व
Ans- (A) तांदळाचे कोठार
(Q6) महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत केंद्र असलेले खोपोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
(A) रत्नागिरी
(B) पालघर
(C) ठाणे
(D) रायगड
Ans- (D) रायगड
(Q7) रायगड या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव खालीलपैकी कोणते होते
(A) कुलाबा
(B) धाराशिव
(C) वत्सगुल्म
(D) प्रभावती
Ans- (A) कुलाबा
(Q8) खालीलपैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यात नाही?
(A) मुरुड जंजिरा
(B) द्रोनागिरी
(C) कर्नाळा
(D) नर्नाळा
Ans- (D) नर्नाळा
(Q9) अष्टविनायकापैकी कोणते गणेशस्थान रायगड जिल्ह्यात नाही?
(A) बल्लाळेश्वर
(B) वरदविनायक
(C) लेण्याद्री गणपती
(D) वरीलपैकी सर्व
Ans- (C) लेण्याद्री गणपती
(Q10) खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे?
(A) कर्नाळा
(B) नर्नाळा
(C) ज्ञानगंगा
(D) अर्नाळा
Ans- (A) कर्नाळा
(Q11) रायगड जिल्ह्यातील कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे?
(A) कान्हेरे
(B) श्रीवर्धन
(C) माथेरान
(D) वरीलपैकी सर्व
Ans- (C) माथेरान
(Q12) रायगड हा जिल्हा 1869 मध्ये खालील पैकी कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे?
(A) पालघर
(B) ठाणे
(C) रत्नागिरी
(D) पुणे
Ans- (B) ठाणे
(Q13) रायगड जिल्ह्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे?
(A) 160
(B) 120
(C) 140
(D) 100
Ans- (B) 120
(Q14) रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स हा खत कारखाना कोणत्या ठिकाणी आहे?
(A) थळ वायशेत
(B) लोणेरे
(C) उरण
(D) अलिबाग
Ans- (A) थळ वायशेत
(Q15) रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे?
(A) थळ वायशेत
(B) लोणेरे
(C) उरण
(D) अलिबाग
Ans- (B) लोणेरे
(Q16) रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू बंदर हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
(A) थळ वायशेत
(B) न्हावाशेवा
(C) उरण
(D) अलिबाग
Ans- (B) न्हावाशेवा
(Q17) रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागू आहे?
(A) पालघर
(B) ठाणे
(C) रत्नागिरी
(D) वरीलपैकी नाही
Ans- (C) रत्नागिरी
(Q18) रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध मुरुड जंजिरा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे
(A) भुईकोट किल्ला
(B) सागरी किल्ला
(C) गिरीदुर्ग किल्ला
(D) वरीलपैकी नाही
Ans- (B) सागरी किल्ला
(Q19) रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ लिहिला?
(A) शिवथरघळ
(B) मुरुड जंजिरा
(C) माथेरान
(D) वरीलपैकी नाही
Ans- (A) शिवथरघळ
(Q20) आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव ‘शिरढोण’ हे रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
(A) कर्जत
(B) अलिबाग
(C) पनवेल
(D) महाड
Ans- (C) पनवेल
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
🔎जिल्हा नुसार जाहिराती📲 |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
🎓शिक्षणानुसार जाहिराती💼 |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |