SSC GD प्राथमिक गणित अभ्यासक्रम 2024

SSC

SSC GD Elementary Mathematics Syllabus and Strategy to Study

SSC GD ही परीक्षा कर्मचारी निवड आयोग यांच्यामार्फत केंद्रीय स्तरावर घेतली जाते जात भारतातील सर्व राज्यातील दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरले जातात. ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते आणि ती ऑनलाईन असते. या परीक्षेचे स्वरूप आणि काठीन्य पातळी शालेय अभ्यासक्रम यावर आधारित असते. या परीक्षेत एकूण 80 प्रश्न विचारले जातात त्यापैकी प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी विचारला जातो. म्हणजेच ही परीक्षा एकूण 160 गुणांची असते आणि त्यासाठी एक तास दिला जातो. परीक्षेत चुकीच्या उत्तरा करिता गुण कमी केले जातात. संपूर्ण भारत मधील कर्मचारी यांची निवड करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते, मोठ्या प्रमाणात पदे भरली जातात. म्हणून दहावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी जॉब मिळवण्याचा हा एक अतिशय योग्य मार्ग आहे असे आपण सांगू शकतो.

या परीक्षेमध्ये मुख्यतः चार विषयांवर प्रश्न विचारले जातात ते खालील प्रमाणे:

1.) Elementary Mathematics (प्राथमिक गणित) – 20 प्रश्न (गुण 40)

2.) General Intelligence and Reasoning (सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क)- 20 प्रश्न (गुण 40)

3.) General Knowledge and General Awareness (सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी) – 20 प्रश्न (गुण 40)

4.) Hindi or English (हिंदी/इंग्लिश) – 20 प्रश्न (गुण 40)

या ठिकाणी तुम्हाला Elementary Mathematics  म्हणजेच प्राथमिक गणित या विषयाचा संपूर्ण अधिकृत अभ्यासक्रम आपण बघणार आहोत. गणित हा विषय कोणत्याही परीक्षेमध्ये जास्त गुणांसाठी विचारला जातो तसेच या परीक्षेमध्ये गणित या विषयावर जास्त भर दिला जातो. आपले गणित पक्के असेल आणि आपण दिलेल्या अभ्यासक्रमानुसार सराव केला तर नक्कीच गणित या विषयाचे गुण कुठे जाणार नाहीत. भाषा विषय आणि गणित विषय असे हे दोन विषय आहेत जे प्रत्येक परीक्षेमध्ये जास्त गुणांसाठी विचारले जातात. खाली दिलेल्या गणित विषयाचा अभ्यासक्रम आपणास या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जर आपण SSC GD परीक्षेचा अभ्यास करत असाल तर गणित या विषयासाठी नक्कीच आपणास हे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

SSC GD प्राथमिक गणित अभ्यासक्रम 2024/ SSC GD Elementary Mathematics Syllabus 2024:

खाली दिल्याप्रमाणे गणित या विषयाकरिता संपूर्ण अभ्यासक्रम दिला आहे जो की अधिकृत संकेतस्थळ वरून घेतला आहे.

गणित या विषयाचा अभ्यासक्रम म्हणजेच अंकांची आकडेमोड, वजाबाकी, भागाकार, गुणाकार यांचा समावेश होतो. खालील प्रमाणे topic wise मुद्दे आणि त्यांचे विश्लेषण केले आहे.

  • Number system (संख्याज्ञान): – यात आपणास विविध संख्या, संख्यांचे प्रकार आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात.
  • Problems Related to Numbers (संख्या वर आधारित प्रश्न):- यात आपणास संख्या, त्यांची आकडेमोड, त्यांचे गुणधर्म आणि त्यांचा शाब्दिक उदाहरणांमध्ये होत असलेला वापर यावर आधारित प्रश्न विचारले जातात.
  • Computation of Whole Numbers (पूर्ण संख्या काढणे):- यात आपणास पूर्ण संख्या आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. काही वेळेस दिलेल्या संख्या पूर्ण संख्या आहेत की नाही हे ओळखण्यास सांगितले जाते.
  • Decimals and Fraction (दशांश आणि पूर्णांक):- यात आपणास दशांश संख्या आणि पूर्णांक संख्या यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यात त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशी आकडेमोड दिली जाते.
  • Relationship between Numbers (संख्या मधील नातेसंबंध):- यात आपणास विविध संख्या आणि त्यांचे एकमेकांशी असलेले रिलेशन्स यावर आधारित प्रश्न विचारले जातात.
  • Fundamental Arithmetic Operations (मूलभूत अंकगणितात आकडेमोड):- यात आपणास अंकगणित किंवा बीजगणित यामधील मूलभूत प्रक्रिया, गुणधर्म यावर आधारित प्रश्न विचारले जातात.
  • Percentage (शेकडेवारी): – यात आपणास शेकडेवारी काढणे किंवा शेकडा प्रमाण ओळखणे किंवा शेकडेवारी वर आधारित शाब्दिक उदाहरणे विचारली जातात.
  • Ratio and Proportion (गुणोत्तर आणि प्रमाण):- यात आपणास गुणोत्तर आणि प्रमाण यावर आधारित विविध प्रश्न विचारले जातात. तसेच गुणोत्तर आणि प्रमाण यावरील शाब्दिक उदाहरणे विचारले जातात.
  • Averages (सरासरी):- यात आपणास सरासरी यावर आधारित संख्यांवरील उदाहरणे आणि शाब्दिक उदाहरणे विचारली जातात.
  • Interest (व्याज):- यात आपणास सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यावरील शाब्दिक उदाहरणे विचारली जातात. ज्यांची काठिण्य पातळी मध्यम स्वरूपाची असते.
  • Profit and Loss (नफा आणि तोटा):- यात आपणास नफा आणि तोटा यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणे विचारले जातात जी सोप्या आणि मध्यम स्वरूपाची असतात.
  • Discount (सूट):- यात आपणास नफा आणि तोटा किंवा व्याज यावरील प्रश्न विचारले जाऊन त्यात सूट दिली असता असे प्रश्न कसे सोडवायचे यावर आधारित प्रश्न दिले जातात.
  • Mensuration (मोजमाप):- यात आपणास विविध भौमितीय आकृत्या किंवा घनाकृती आकृत्या जसे की घन ठोकळा, इष्टिकाचिती, शंकू, गोल, दंडगोल अशा विविध प्रकारच्या मुद्द्यांवर मोजमाप म्हणजेच त्यांची घनता, क्षेत्रफळ, पृष्ठफळ यावर आधारित प्रश्न विचारले जातात.
  • Time and Distance (वेळ आणि अंतर ):- यात आपणास वेळ, वेग, अंतर यावरील काही शाब्दिक उदाहरणे विचारली जातात ज्यात काही परिस्थिती दिली जाते.
  • Ratio and Time (गुणोत्तर आणि वेळ):- यात आपणास गुणोत्तर आणि वेळ यावरील सांख्यिकीय तसेच शाब्दिक उदाहरणे विचारली जातात.
  • Time and Work (वेळ आणि काम):- यात आपणास काम, काळ, वेग यावर आधारित शाब्दिक उदाहरणे विचारली जातात जी मध्यम आणि कठीण स्वरूपाचे असतात.

Tips for Best Preparation of SSC GD 2024/ महत्वाच्या टिप्स:

  • कोणत्याही परीक्षे करीता महत्वाचा आणि जास्त गुणासाठी असणारा अभ्यासक्रम म्हणजे maths and reasoning हा आहे. परंतु SSC GD करीता आपणास प्राथमिक शालेय स्तरावरील गणित च अभ्यासक्रम दिला आहे जो अगदी सोपा आहे.
  • SSC GD ही परीक्षा केंद्र स्तरावर होत असल्याने यासाठी कोणतेही reference book न वापरता तुम्ही elementary Mathematics साठी सरळ सरळ NCERT textbook ची पुस्तके वाचू शकता. ज्यातून सर्व basic concepts पूर्ण होऊन बाकी परीक्षा साठी सुद्धा मदत होईल.
  • NCERT Textbook सोबत च SSC GD अधिकृत संकेस्थळावर जाऊन तेथून जुने प्रश्नपत्रिका (Old Question Papers) यांचा सराव नक्की केला तर खूप फायदा होईल.
  • सोबतच SSC GD करीता तुम्ही काही test series join करून त्यांचा वेळेत सराव केला तर नक्कीच तुमच्या अचूकता आणि solving speed मधे फरक पडू शकतो.
  • अशा प्रकारे जर तुम्ही elementary Mathematics या विषयाचा अभ्यास केला तर नक्कीच तो बाकी परीक्षा साठी सुद्धा मोलाचं ठरेल.

Also See:

SSC GD Constable Salary 2024: BSF, ITBP, CISF, SSB, Assam rifles & More
SSC GD Constable Cut Off 2023, Previous Year Cut Off Marks : एसएससी जीडी कॉन्स्टेबल कट ऑफ 2023, मागील वर्षाचे कट ऑफ मार्क्स
SSC GD Constable Admit Card Download Link : एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
SSC GD Constable Syllabus & Exam Pattern PDF Download- Check New Exam Pattern 2023 Now
SSC GD 2024 Physical Test Details
SSC GD Selection Process 2024: CBT, PST / PET, Medical
SSC GD English Subject Syllabus 2024 in Marathi
SSC GD Full Form in Marathi | SSC GD चा मराठी मधे संपूर्ण अर्थ
SSC GD Constable Admit Card Download Link : एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
SSC GD PET PST Admit Card Download: SSC GD कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करा

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT