SSC GD Full Form in Marathi | SSC GD चा मराठी मधे संपूर्ण अर्थ

SSC

SSC GD Full Form in Marathi

या पेज वर तुम्हाला SSC GD Full Form आणि त्याविषयी ची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. SSC GD ही एक सरकारी नोकरी मिळवून देणारी परीक्षा आहे जी की कोणताही दहावी उत्तीर्ण व्यक्ती ही परीक्षा देण्यास पात्र ठरतो. तर आज आपण SSC GD या परीक्षे विषयी आणि त्याला लागणारी पात्रता हे सर्व जाणून घेणार आहोत. तर थोडासा ही विलंब न करता आपण बघुया SSC GD विषयी.

SSC GD या विषयी अधिक माहिती:

SSC GD याचा शबदशः पूर्ण अर्थ किंवा फुल्ल फॉर्म Staff Selection Commission General Duty असा होतो. Staff Selection Commission लाच मराठी मधे कर्मचारी निवड आयोग असे म्हटले जाते. या कर्मचारी निवड आयोगाद्वारे विविध दला मधे सरकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यासाठी SSC GD ही परीक्षा घेतली जाते. त्यात समाविष्ट असलेले दल जसे की केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजेच CAPF, केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच CRPF, सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो तिबेट सीमा पोलीस (ITBP), सशस्त्र सीमा बल (SSB) अशा भारतातील विविध दलामधील कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी भारतीय कर्मचारी निवड आयोग SSC GD ही परीक्षा घेते. मुख्यत्वे करून ही परीक्षा दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सुध्दा देऊ शकतात. या लेखी परीक्षे सोबत शारीरिक क्षमता चाचणी आणि वैद्यकीय आरोग्य तपासणी यांचा सुद्धा समावेश केला जातो.

SSC GD या परीक्षे करीता दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरतात परंतु त्यासाठी काही वयो मर्यादा दिल्या आहेत त्या खालील प्रमाणे.

Browse: SSC GD Constable Cut Off 2023

Recommended: SSC GD Constable Syllabus & Exam Pattern PDF

Apply Online : 84,000+ Vacancy under SSC GD Notification

SSC GD परीक्षेसाठी असणारे पात्र तेचे निकष खालील प्रमाणे आहेत:

  • ही परीक्षा देणारा उमेदवार प्रथम भारतीय नागरिक असायला हवा. आणि त्याची नोंद कुठल्याही गुन्हे प्रकरणात नसायला हवी.
  • उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड मधून दहावी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • प्रतेक प्रवर्ग नुसार या परीक्षे करीता असणारी वयाची अट ही बदलत जाते. खुला प्रवर्ग करीता वयाची अट १८-२३ वर्षे आहे, तर OBC प्रवर्ग करीता वयाची अट १८-२६ वर्षे आहे, तर SC/ST प्रवर्ग करीता वयाची अट १८-२८ वर्षे देण्यात आली आहे.
  • वरील दोन्ही अटींची पूर्तता तर उमेदवाराने करणे बंधनकारक असून काही पदाकरीता उमेदवार हा शारीरिक, मानसिक आणि आरोग्य तपासणी ची पूर्तता सुद्धा त्याने केलेली असावी. एकंदरीत तो व्यक्ती किंवा उमेदवार शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.

SSC GD ही परीक्षा SSC कडून घेतल्या जात असून योग्य रित्या आणि अचूक पद्धतीने जे उमेदवार फॉर्म भरतील त्यांचेच प्रवेश पत्र हे कर्मचारी निवड आयोग कडून उपलब्ध करून दिले जातात. अधिकृत माहिती करिता आपण SSC च्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन भेट देऊ शकता. दर वर्षी कर्मचारी निवड आयोग कडून या पदाकरीता जाहिरात प्रसिद्ध केली जाते आणि विहित मुदतीत ते फॉर्म भरून घेतल्या जातात. त्यात आवश्यक कागदपत्रे सुद्धा मागितले जातात जेणे करून खोटं आणि बनावटी कागदपत्रे verify केल्या जातील. परीक्षा फॉर्म भरताना आपल्याला SSC अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन आपले अकाउंट बनवावे लागते आणि वेळोवेळी लॉग इन करून योग्य ती माहिती घेता येते. म्हणजेच आपले प्रवेश पत्र हे परीक्षेच्या किमान २-३ आठवडे आधी उपलब्ध करून दिले जातात ज्यासाठी आपणास लॉग इन करावे लागते आणि प्रवेश पत्र ची प्रिंट काढून घायवी लागते.

SSC GD संपूर्ण अभ्यासक्रम:

या परीक्षेत खालील घटकांचा समावेश केल्या जातो.

  1. सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र
  2. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
  3. प्राथमिक स्तरावरील गणित
  4. हिंदी आणि इंग्रजी भाषा ज्ञान

ही परीक्षा दहावी उत्तीर्ण उमेदवार करीता असल्याने परीक्षेचे स्वरूप मध्यम स्वरूपाचे असून उमेदवाराचे सामान्य ज्ञान तपासणी करिता परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा अभ्यास करताना आपणास मागील वर्षाची प्रश्न पत्रिका नक्कीच खूप उपयुक्त ठरतील.

We are on Telegram! Join Us

SSC GD परीक्षेद्वारे निवड करण्यात येणारी पदे:

⭕SSC GD Constable भरती गृह मंत्रालय (MHA)

⭕सीमा सुरक्षा दल (BSF)

⭕केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)

⭕केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दल (CRPF)

⭕भारत तिबेट सीमा पोलीस दल (ITBP)

⭕सशस्त्र सीमा दल (SSB)

⭕राष्ट्रीय सर्वेक्षण एजंसी (NIA)

⭕सचिवालय सुरक्षा दल (SSF)

SSC GD परीक्षेचे स्वरूप:

➡️ SSC GD लेखी परीक्षा उत्तीर्ण करण्या बरोबर बाकी चाचण्या सुद्धा qualify करणे बंधनकारक आहे. आणि त्यानंतरच उमेदवाराची त्या पदाकरीता निवड केली जाते.

➡️ हि परीक्षा कॉम्प्युटर based असून त्यासाठी ६० मिनिटे म्हणजेच एकंदरीत १ तासाचा वेळ दिल्या जातो आणि एकूण ८० प्रश्न १६० गुण साठी विचारले जातात.

➡️ या परीक्षेत प्रतेक प्रश्न २ गुणा साठी विचारला जातो.

➡️ या परीक्षेचे माध्यम हे हिंदी आणि इंग्लिश या स्वरूपाचे असते कारण ही परीक्षा all India लेव्हल वर घेतली जाते.

अशा प्रकारे SSC GD या परीक्षेद्वारे मोठ्या प्रमाणात पदे भरली जातात आणि त्यासाठी प्रतेक राज्यातील उमेदवारांना समान संधी दिली जाते. दहावी नंतर लगेच करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे असे आपण म्हणू शकतो.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT