Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

Solve these शेकडेवारी (Percentage) problems to ace Reasoning part

Shanku
शेअर करा:WhatsApp
Solve these शेकडेवारी (Percentage) problems to ace Reasoning part

This is the second topic article on Percentage for the Talathi exam as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the शेकडेवारी Percentage topic.

शेकडेवारी हा एक महत्वाचा घटक असून या घटकावर आधारित शाब्दिक उदाहरणे जास्तीत जास्त परीक्षेत विचारले जातात. ते सोडवण्यासाठी शेकडा प्रमाण काढता येणे अधिक महत्वाचे ठरते.
त्यासाठी आपण काही मुद्दे समजून घेऊ.

1.) शेकडेवरीचे पूर्णाकात रूपांतर करणे:

समजा आपण एक गोलाकार पोळी गृहीत धरू.

ती गोलाकार पोळी म्हणजे 100% भाग.

इथे एक च भाग असल्याने आपण असे लिहू शकतो.

शेकडा प्रमाण= पूर्ण भाग/केलेले भाग

म्हणून, 100% = 1/1

जर आपण त्या दोन पोळीचे समान दोन भाग केले तर प्रतेक भाग म्हणजे 50%.

म्हणूनच आपण असे लिहू शकतो,

50% = पूर्ण भाग/केलेले भाग = 1/2

त्याप्रमाणेच जर त्या पोळीचे 3 समान भाग केले तर प्रतेक भाग म्हणजे 33.33% आणि ते आपण असे लिहू शकतो.

शेकडा प्रमाण = पूर्ण भाग/केलेले भाग

33.33% = 1/3

जर आपण त्याच पोळीचे 4 समान भाग केले तर प्रतेक भाग म्हणजे 25% आणि ते आपण असे लिहू शकतो.

25% = 1/4

अशाप्रकारे जर समान भाग केले तर आपण शेकडेवरी काढू शकतो.

उदाहरणे:

1) 64% चे पूर्णकात रूपांतर करा.

उत्तर:

64% म्हणजेच 64/100

म्हणून 64% = 64/100= 32/50= 16/25

अशाप्रकारे, 64% = 16/25

2) 6% चे fraction मधे रूपांतर करा.

उत्तर: 6% = 6/100 = 3/50

3) 0.3% चे fraction मधे रूपांतर करा.

उत्तर: 0.3% = 0.3/100 = 3/1000 = 0.003

4) (2/5)% चे fraction मधे रूपांतर करा.

उत्तर: (2/5)% = 2/(5*100) = 1/(5*50) = 1/250

म्हणून, (2/5)% = 1/250

2.) पूर्णाकाचे शेकडेवरीत रूपांतर करणे:

पूर्णाकाचे शेकडेवरित रूपांतर करताना दिलेल्या पूर्णाकाला 100 ने गुणून आलेले उत्तर हे % मधे असेल. त्यासाठी खाली दिलेली काही उदाहरणे आपण अभ्यासू.

उदाहरणे:

1) 2/3 चे % मधे रूपांतर करा.

उत्तर :

2/3 *100= 0.66*100 =66.66%

2) 3/5 चे % मधे रूपांतर करा.

उत्तर :

3/5 *100= 3*20 = 60%

3) 0.03 चे % मधे रूपांतर करा.

उत्तर :

0.03*100= 3%

4) 1/4 चे % मधे रूपांतर करा.

उत्तर :

1/4 *100 = 50/2 =25%

आता आपण शेकडेवारी या घटकावर आधारित शाब्दिक उदाहरणे बघू.

3.) शाब्दिक उदाहरणे:

जर एखादि गोष्ट किती % ने कमी करावयाची किंमत काढायची असेल तर आपण खाली दिलेले सूत्र वापरू शकतो.

% कमी = (100*दिलेले टकके)/(100+ दिलेले टक्के)

आणि तीच गोष्ट किती % ने जास्त करावी लागेल याची किंमत काढायची असेल तर खालील सूत्र वापरावे लागते.

% जास्त = (100*दिलेले टक्के)/(100 – दिलेले टक्के)

शाब्दिक उदाहरणे:

1.) साखरेचा वापर किती % ने कमी करावा म्हणजे किंमत जरी 20% ने वाढली तरीही खर्च वाढणार नाही.

a)166.66%

b)16.66%

c)16%

d)160%

उत्तर: b) 16.66%

स्पष्टीकरण:

इथे आपणास साखरेचा वापर किती % ने कमी करावा लागेल हे विचारले आहे. त्यामुळे आपले सूत्र असेल

% कमी = (100* दिलेले टक्के)/(100+ दिलेले टक्के)

% कमी = (100*20)/(100+20) = (100*20)/120 = 50/3 = 16.66%

म्हणून इथे साखरेचा वापर 16.66% ने जर कमी केला तर, साखरेची किंमत 20% ने जरी वाढली तरी साखरे वरचा खर्च वाढणार नाही.

2.) जर तांदळाची किंमत 30% ने वाढवली तर खर्च वाढू नये यासाठी तांदळाचा वापर किती % ने कमी करावा लागेल?

a)20%

b)25%

c)23%

d)24%

उत्तर: c) 23%

स्पष्टीकरण :

इथे आपणास तांदळाची किंमत 30% ने वाढली तर तांदळा वरील खर्च वाढू नये म्हणून तांदळाचा वापर किती % ने कमी करावा लागेल हे विचारले आहे. म्हणून आपणास खालील सूत्र वापरावे लागेल.

% कमी = (100* दिलेले टक्के)/(100 + दिलेले टक्के)

% कमी = (100*30)/(100+30) = (100*30)/130 = 23%

अशा प्रकारे तांदळाची किंमत 30% जर वाढली तर तांदळा वरील खर्च वाढू नये यासाठी आपणास तांदळाचा वापर 23% ने कमी करावा लागेल.

3.) गीताचा पगार हा सिताच्या पगार पेक्षा 20% ने जास्त असेल तर सिताचा पगार गीताच्या पगार पेक्षा किती % ने कमी आहे?

a)16%

b)16.66%

c)166%

d)160%

उत्तर:b) 16.66%

स्पष्टीकरण:

इथे आपणास पगार किती %ने कमी आहे हे काढायचे आहे. म्हणून आपण खालील सूत्र वापरू शकतो.

% कमी = (100*दिलेले टक्के)/(100+दिलेले टक्के) = (100*20)/(100+20) = (100*20)/120= 16.66 %

म्हणून सीताचा पगार गीताच्या पगार पेक्षा 16.66% ने कमी आहे.

4.) जर गव्हाची किंमत 30% ने कमी झाली तर गव्हाचा वापर किती %ने वाढवावा लागेल जेणेकरून गव्हा वरील खर्च तेवढाच राहील.

a) 420%

b) 42%

c) 42.58%

d) 42.85%

उत्तर: d) 42.85%

स्पष्टीकरण:

इथे आपणास गव्हा वरील खर्च किती % ने वाढवायचा आहे ते काढायचे आहे. म्हणून आपण खालील सूत्र वापरू शकतो.

% जास्त = (100* दिलेले टक्के) /(100 – दिलेले टक्के)

% जास्त = (100*30)/(100 – 30) = (100*30) / 70 = 42.85%

म्हणून, गव्हाची किंमत जर 30% ने कमी झाली तर गव्हा च वापर 42.85% ने वाढवल्यास गव्हा वरील खर्च तेवढाच राहील.

5.) रामलाल आणि शामलाल हे दोन व्यक्ती ग्राम पंचायत निवडणुकीसाठी उभे होते. या निवडणुकीत शामलाल ला एकूण मतपैकी 25% मते मिळाली. आणि रामलाल ला 100 मते जास्त पडल्याने तो विजयी झाला तर या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये एकूण किती लोकांनी मतदान केले?

a)200

b)300

c)250

d)150

उत्तर: a) 200

स्पष्टीकरण :

इथे शामलाल ल मिळालेली एकूण मते 25% आहेत.

जर एकूण मते आपण 100 % समजली तर उरलेली मते राम लाल ल मिळाली असणार.

म्हणून रामलाल ला मिळालेली मते = (100 – 25) = 75%

परंतु  रामलाल ला शाम लाल पेक्षा 100 मते जास्त मिळाली.

म्हणून 100 = (75% – 25% ) = 50%

यावरून आपण असे म्हणू शकतो की, इथे दिलेल्या माहिती वरुन 100 म्हणजे 50% तर 100% म्हणजे किती हे आपणास काढावे लागेल.

म्हणून, (100/एकूण मतदार)*100 = 50

म्हणून, एकूण मतदार = (100/50)*100 = 200

अशाप्रकारे, ग्राम पंचायत निवडणुकी मधे एकूण 200 लोकांनी मतदान दिले.

By Seema Nagnath Purbuj

Mahasarkar

In case you have missed: Seema Nagnath Purbuj 1st article on Dice Problems


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”