ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 19 Topic:- Alphabet Series

ZP Bharti Study Material 19 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 19 Topic:- Alphabet Series

1.) खाली दिलेली अल्फाबेट series अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
NSX GHD TUF EOK YDQ
1) जर वर दिलेल्या अल्फाबेट series मधे प्रतेक अक्षर त्याच्या पुढील क्रमाने येणाऱ्या अल्फाबेट ने replace केले तर असे किती शब्द असतील जे कमीत कमी एक स्वर दाखवतील?
a) 1
b) 2
c) 3
d) 4

उत्तर: d) 4

स्पष्टीकरण :

जर प्रश्नात दील्यानुसार प्रतेक अक्षर त्याच्या पुढील क्रमाने येणाऱ्या अक्षर ने replace केले तर पुढील अल्फाबेट series तयार होईल.
OTY HIE UVG FPL ZER
आता वरील अल्फाबेट series मधे कमीत कमी एक स्वर असणारे (जास्तीत जास्त किती पण चालतील) असे एकूण 4 शब्द आहेत.
म्हणून आपले योग्य उत्तर 4 आहे.

2) जर दिलेल्या अल्फाबेट series मधील पहिल्या आणि तिसऱ्या स्थानी असणारे अक्षर अदलाबदल केले, आणि नंतर सर्व शब्द alphabetical order ने डावीकडून उजवीकडे असे arrange केले तर पहिला शब्द डावीकडून कोणता असेल?
a) EOK
b) GHD
c) YDQ
d) NXS

उत्तर: b) GHD

स्पष्टीकरण:

प्रश्नात दिल्यानुसार जर पाहिले आणि तिसरे अक्षर यांची अदलाबदल केली आणि सर्व अक्षर डावीकडून उजवीकडे alphabetical order मधे मांडले तर खालील मालिका तयार होईल.
XSN DHG FUT KOE QDY
Alphabetically वरील series खालील प्रमाणे असेल
DHG FUT KOE QDY XSN
म्हणून आपले योग्य उत्तर GHD हेच असेल.

3) जर दिलेल्या अल्फाबेट series मधे सर्व व्यंजने त्यांच्या अगोदर येणाऱ्या अक्षराने बदलून टाकले तर नवीन तयार होणाऱ्या मालिकेत असे किती शब्द असतील ज्यांत एकापेक्षा जास्त स्वर असतील?
a) 2
b) 4
c) 0
d) 1

उत्तर:

स्पष्टीकरण:

वर प्रश्नात दिल्या नुसार जर सर्व व्यंजने त्यांच्या अगोदर येणाऱ्या अक्षराने बदलून टाकली तर खालील मालिका तयार होईल.

MRW FGC SUE EOJ XCP

वर दिलेल्या मालिकेत एकापेक्षा जास्त स्वर असणारे एकूण शब्द 2 आहेत. ते म्हणजे SUE आणि EOJ.
म्हणून आपले योग्य उत्तर 2 असेल.

4) जर दिलेल्या मालिकेतील सगळे शब्द alphabetical order ने डावीकडून उजवीकडे मांडली तर असे किती शब्द असतील ज्यांचे स्थान बदलणार नाही?
a) 1
b) 2
c) 3
d) 4

उत्तर: b) 2

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या प्रश्नावरून आपण खालील मालिका बनवू शकतो.
EOK GHD NSX TUF YDQ

आता वरील मालिकेची तुलना आपण आधीच्या मालिके सोबत करू तेव्हा आपणास असे दिसून येते की GHD आणि YDQ हे दोन शब्द आहेत ज्यांचे स्थान तेच आहे.
म्हणून आपले योग्य उत्तर 2 असेल.

5) जर दिलेल्या मालिकेत आपण पाहिले आणि तिसरे अक्षर यांची अदलाबदल केली तर नवीन तयार झालेल्या मालिकेत असे किती शब्द असतील ज्यांचा शेवट स्वराने होईल?
a) 3
b) 1
c) 4
d) 2

उत्तर: b) 1

स्पष्टीकरण:

प्रश्नात दिल्या नुसार आपण प्रतेक शब्द मधे पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरांची अदलाबदल केली तर खालील मालिका तयार होईल.
XSN DHG FUT KOE QDY

आता नवीन मालिकेत असा एकच शब्द आहे ज्याचा शेवट स्वराने होतो तो म्हणजे KOE.
म्हणून आपले योग्य उत्तर 1 असेल.

2.) खाली दिलेली अल्फाबेट series अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
DUAL EAST GULF HOLD

1) जर वर दिलेल्या मालिकेत प्रतेक शब्दातील सगळी अक्षरे त्यांच्या उतरत्या क्रमाने डावीकडून उजवीकडे मांडली (alphabetical order नुसार) आणि नंतर त्या मालिकेला अल्फाबेट नुसार मांडणी केली तर त्या नवीन मालिकेत डावीकडून चौथा क्रमांक कुणाचं असेल?
a) DUAL
b) HOLD
c) GULF
d) EAST

उत्तर: c) GULF

स्पष्टीकरण:

दिलेल्या प्रश्न नुसार,
उतरत्या क्रमाने मांडणी:
ULDA TSEA ULGF OLHD

वरील मालिकेची अल्फाबेट नुसार मांडणी:
OLHD TSEA ULDA ULGF

म्हणून आपले योग्य उत्तर ULGF (GULF) असेल.

2) जर दिलेल्या मालिकेत प्रतेक शब्दातील पाहिले आणि शेवटचे अक्षर त्याच्या पुढील क्रमाने येणाऱ्या अक्षराने बदलून टाकले, तर असे एकूण किती शब्द तयार होतील ज्यामधे दोन पेक्षा जास्त व्यंजने असतील?
a) 1
b) 2
c) 3
d) 4

उत्तर: a) 1

स्पष्टीकरण:

वरील दिलेल्या प्रश्न नुसार,
EUAM FASU HULG IOLE

आता आपण पाहू शकतो की असे किती शब्द आहेत ज्यात दोन पेक्षा जास्त व्यंजने आहेत. ते म्हणजे HULG ( 3 व्यंजन) आहे.
म्हणून आपले योग्य उत्तर 1 असेल.

3) जर दिलेल्या मालिकेत प्रतेक शब्द मधील अक्षर चढत्या क्रमाने मांडली अल्फाबेट नुसार. तर खालील पैकी कोणते अक्षर उजवीकडून 6 व्या स्थानी असेल?
a) G
b) H
c) L
d) O

उत्तर: c) L

स्पष्टीकरण:

दिलेल्या मालिकेतील सगळे अक्षर आपण अल्फाबेट नुसार मांडले तर खालील मालिका तयार होईल.
AADDEFGHLLLOSTUU

म्हणून आपले योग्य उत्तर L असेल.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT