सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्य स्तरीय पात्रता परीक्षा SET ची आवश्यकता का?

MH SET

Maharashtra State Eligibility Test (MH-SET) for Assistant Professor | सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्य स्तरीय पात्रता परीक्षा SET ची आवश्यकता का?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि यु.जी. सी., नवी दिल्ली मान्यता प्राप्त नोडल एजन्सी मार्फत ३१ व्या SET परीक्षेचे आयोजन दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी नियोजन केले आहे. आणि या परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक १२ जानेवारी २०२४ पासून ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत भरण्याची मुदत देण्यात आली आहे. SET ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्र मधील वरिष्ठ महाविद्यालय मधे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यासाठी घेतली जाते.

MH SET ही परीक्षा विविध विभाग म्हणजेच Arts, Science, Mental Moral and Social Sciences, Commerce, Law, Management, Education and Physical Education यातील विविध विषय करीता घेतली जाते. MH SET ही परीक्षा एकूण 32 विषय यासाठी घेतली जाते. म्हणजेच खाली दिलेल्या बत्तीस विषयांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पदवीत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे अशाच विद्यार्थ्यांना सेटची परीक्षा देता येते. तसेच खाली दिलेल्या 32 विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी हे त्यांच्या शेवटच्या वर्षाला असतील तरीही ते सेट या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात ही एक सुवर्णसंधी आहे. विद्यार्थी ज्या विषयातून पोस्ट ग्रॅज्युएशन झाला आहे त्याच विषयासाठी तो सेट ही परीक्षा देऊ शकतो. जर विद्यार्थ्यांचा पोस्ट ग्रॅज्युएशन चा विषय खाली दिलेल्या 32 विषयांमध्ये नसेल तर त्या विषयाशी संबंधित विषय यूजीसी ने दिलेल्या नियमानुसार तो घेऊ शकतो. महाराष्ट्र मध्ये सिटी परीक्षा एकूण 32 विषयांकरिता घेतली जाते ज्यामध्ये पहिला पेपर हा 100 मार्क्स असून त्यात 50 प्रश्न विचारले जातात आणि एक तासाचा वेळ दिला जातो. पहिला पेपर हा सर्व 32 विषयांकरिता सारखा असून फक्त पेपर दोन हा पोस्ट ग्रॅज्युएशनला असलेल्या विषयावर अवलंबून असतो आणि तो 200 मार्क्सचा असतो. म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन मिळून एकूण तीनशे माणसाचा पेपर हा सेट परीक्षेसाठी असतो. सुरुवातीला आपण कोण कोणत्या विषयांसाठी सेट परीक्षा आयोजित केली जाते ते बघूया आणि ते विषय खालील प्रमाणे आहेत.

  • मराठी
  • हिंदी
  • इंग्लिश
  • संस्कृत
  • उर्दू
  • History
  • Economics
  • Philosophy
  • Psychology
  • Sociology
  • Political science
  • Defence and Strategic Studies
  • Home science
  • Library and Information science
  • Journalism and Mass Communication
  • Social Work
  • Public Administration Mathematical Sciences Environmental Sciences Physical Sciences Chemical Sciences
  • Life sciences
  • Earth, atmospheric, ocean and planetary science
  • Geography
  • Computer science and application
  • Electronics science Commerce
  • Management
  • Law
  • Education
  • Physical education

वरील एकूण 32 विषयांकरिता सेटी परीक्षा आयोजित केली जाते म्हणजेच वरील 32 विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले विद्यार्थी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी सेट या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

जर तुम्हाला महाराष्ट्र राज्य मधे सहाय्यक प्राध्यापक व्हायचे असेल तर तुम्हाला UGC NET/CSIR NET/MH SET यापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते. परंतु महाराष्ट्र बाहेर जाऊन जर तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक पाहिजे असेल तर तुम्हाला त्या राज्याची सेट परीक्षा उत्तीर्ण करणे किंवा नीट परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते. जर तुम्ही नेट परीक्षा उत्तीर्ण केली तर तुम्ही भारतामध्ये कुठेही सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र ठरू शकता. परंतु सेट ही परीक्षा प्रत्येक राज्यासाठी वेगळी असून त्या राज्यामध्येच सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी पात्र करावी लागते. एकंदरीत महाराष्ट्र राज्य मध्ये सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून MH SET ही परीक्षा दरवर्षी एक वेळा घेतली जाते. आजवर तीस सेट परीक्षा ह्या ऑफलाइन पद्धतीने आयोजित केल्या होत्या. येणारी सेट परीक्षाही सात एप्रिल 2024 ला असून ती सुद्धा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणारी सेट परीक्षा 2024 ही शेवटची परीक्षा ठरणार आहे. यानंतर म्हणजेच 2025 पासून ज्या काही सेट परीक्षा होतील त्या ऑनलाईन घेतल्या जातील आणि त्यामध्ये अभ्यासक्रमात सुद्धा थोडाफार बदल केल्या जाऊ शकतो. म्हणून 2024 मध्ये होणारी सेट परीक्षाही ऑफलाईन होणारी शेवटची परीक्षा असल्या कारणाने ही आपल्याला जुन्या सिल्याबस वर आधारित होणारी परीक्षा शेवटची परीक्षा किंवा शेवटचा चान्स आहे असे आपण म्हणू शकतो.

MH SET परीक्षेचे नियम:

MH SET ही परीक्षा जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला असतील असे विद्यार्थी तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे असे विद्यार्थी सुद्धा त्यांच्या विषयाकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतात.

जर एखादा विद्यार्थी चे पोस्ट ग्रॅज्युएशन वर दिलेल्या 32 विषयांमध्ये नसेल तर त्या विषयांची संबंधित विषयांमध्ये ते सेट या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात (यूजीसीच्या नियमानुसार).

जर एखाद्या विद्यार्थ्याने एखादा विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर तो विद्यार्थी पुन्हा त्याच विषयाकरिता सेट परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरू शकत नाही. असे केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई केल्या जाऊ शकते किंवा त्याचे सर्टिफिकेट केल्या जाईल. म्हणून एका विषयात फक्त एकाच वेळी सेट परीक्षा उत्तीर्ण करता येते.

सेट परीक्षा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट अजून देण्यात आलेली नाही. म्हणजेच वयाच्या कोणत्याही वर्षी तुम्हाला MH SET परीक्षा देता येते. त्याकरिता फक्त संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे.

सेट या परीक्षेमध्ये युजीसीच्या नियमानुसार प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षण दिले आहे ते खालील प्रमाणे.

  • SC – 13%
  • ST – 7%
  • OBC – 19%
  • EWS (OPEN) – 10%
  • SBC – 2%
  • VJ A – 3%
  • NT B – 2.5%
  • NT C – 3.5%
  • NT D – 2%
  • General – 38%
  • Horizontal Reservation (Orphan) – 1%
  • Bench mark disability – 5%

प्रत्येक प्रवर्गाला सेट या परीक्षेमध्ये सुद्धा आरक्षण दिले जाते आणि त्यानुसारच त्यांचा उत्तीर्ण होण्याचा कटऑफ ठरला जातो.

सेट या परीक्षेकरिता अर्ज करण्यासाठी SC/ST/OBC/SBC/VJ/NT/Transgender/PWD/ Orphan या कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनला कमीत कमी 55 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

तसेच OBC/SBC/VJ/NT (नॉन क्रिमी लेयर गटात मोडत असलेले) आणि SC/ST/Transgender/PwD/Orphans या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता त्या विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन ला किमान 50 टक्के गुण मिळवले असावे.

सेट ही परीक्षा दरवर्षी एक वेळा घेतल्या जात असून त्यासाठी महाराष्ट्रामधील 17 सेंटर हे परीक्षे करिता दिले जातात. महाराष्ट्र मध्ये एकाच वेळी एकाच दिवशी ही परीक्षा ऑफलाईन घेतली जाते. या परीक्षेकरिता उपलब्ध असणारे परीक्षा केंद्र हे खालील प्रमाणे आहेत.

मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, गोवा, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, धुळे, रत्नागिरी, परभणी अशा एकूण 17 परीक्षा केंद्रांवर SET ही परीक्षा एकाच वेळी आणि एकाच दिवशी ऑफलाइन पद्धतीने घेतले जाते.

MH SET या परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज करताना भरावयाची फी ही खालील प्रमाणे आहे. OPEN प्रवर्ग करिता आठशे रुपये फी आकारले जाते. तर SC/ST/PwD/Transgender/Orphans/OBC/VJ/NT B/NT C/NT D/ SBC (Non Creamy Layer only)/EWS(OPEN) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 650 रुपये फी आकारले जाते.

Why SET?/ SET ची गरज का?

यूजीसी ने चौथ्या वेतन आयोगाच्या वेळी महाविद्यालय आणि विद्यापीठ मध्ये शिक्षकांसाठी नवीन वेतनश्रेणी निर्धारित करताना जे प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त केले गेले होते ते सुद्धा या वेतनश्रेणीसाठी पात्र आहेत असे आवाहन केले होते. यूजीसी द्वारे विविध विषयांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक चाचणी म्हणजेच NET National Eligibility Test घेतल्या जाते. UGC आणि CSIR विज्ञान विषयांसाठी एकत्रित चाचण्या घेतात. UGC NET किंवा CSIR NET या दोन्ही परीक्षा कनिष्ठ संशोधन फेलोशीप Junior Research Fellowship (JRF) करिता लागू केल्या जातात तसेच त्या विद्यार्थ्याला सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती देण्यासाठी सुद्धा पात्र बनवतात. सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे यूजीसीने सहाय्यक प्राध्यापकांकरिता राज्य पात्रता परीक्षा SET- State Eligibility Test चे आयोजन करण्यासाठी संपूर्ण देशभरातील राज्य सरकारांना अधिकृत आदेश दिले आहेत. त्यामुळे सेट ही परीक्षा यूजीसी मार्फत असून मान्यता प्राप्त आहे.

महाराष्ट्र राज्य मध्ये राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच MH SET परीक्षेचे आयोजन करण्यासाठी यूजीसी ने पुणे विद्यापीठाला परवानगी दिली आहे आणि या परीक्षेकरिता महाराष्ट्र सरकार आणि गोवा सरकारची राज्यसंस्था म्हणून मान्यता देऊन निवड केली आहे.

Also See: How to Apply Maha SET 2024 Complete Process

MH SET नंतर पुढे काय?

सेट उत्तीर्ण झालेले उमेदवार हे विद्यापीठ किंवा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी नियुक्त करण्यासाठी पात्र ठरतील. सोबतच त्या उमेदवाराने यूजीसीने जी नियमावली सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता दिली आहे ती सुद्धा पूर्ण करणे आवश्यक असेल. NET/UGC CSIR या परीक्षेच्या व्यतिरिक्त जे उमेदवार महाराष्ट्राची सेट परीक्षा MH SET उत्तीर्ण होतात असे उमेदवार फक्त सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी पात्र ठरतात परंतु कनिष्ठ संशोधन फेलोशिप JRF करिता पात्र ठरत नाहीत. यूजीसीच्या नियमानुसार त्या राज्यातील सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो उमेदवार फक्त त्याच राज्यातील विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करू शकतात किंवा नियुक्ती मिळवू शकतात.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT