How to apply for MH SET 2024 | MH SET 2024 करीता ऑनलाईन अर्ज कसा करावा?

MH SET

महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि युजीसी नवी दिल्ली मान्यता प्राप्त नोडल एजन्सी मार्फत 31 व्या MH SET परीक्षेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी केले आहे. MH SET 2024 या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक 12 जानेवारी 2024 ते दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. MH SET ही परीक्षा खालील विविध विषयांमध्ये घेतले जाते. जसे की Science, Mental Moral and Social Sciences, Commerce, Law, Management, Education and Physical Education. वर दिलेल्या विभागातील विविध विषयांकरिता MH SET ही परीक्षा घेतली जाते. एकूण 32 विषयांमध्ये MH SET ही परीक्षा घेतली जाते आणि यासाठी पेपर एक हा सर्वांसाठी सारखाच असतो. पेपर एक मध्ये एकूण पन्नास प्रश्न (50 प्रश्न) विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात. म्हणजेच पेपर एक (100 गुण) शंभर गुणांचा असतो. ही परीक्षा देण्यासाठी त्या उमेदवाराने सदर विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे किंवा सदर विषयात तो व्यक्ती पोस्ट ग्रॅज्युएशन करत असून त्याच्या अंतिम वर्षात असणे आवश्यक आहे. पेपर 2 हा प्रत्येक विषयासाठी वेगळा असून त्यात संबंधित विषयावरच शंभर प्रश्न 100 प्रश्न (200 गुण) विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी असतो. म्हणजे एकंदरीत पेपर 2 200 गुणांसाठी असतो. ही परीक्षा खाली दिलेल्या बत्तीस विषयांमध्ये घेतली जाते. जे विषय या यादीमध्ये नसतील त्या विषयाशी संबंधित विषय साठी तो व्यक्ती पात्र ठरतो (यूजीसी गाईडलाईनुसार).

  • मराठी
  • हिंदी
  • इंग्लिश
  • संस्कृत
  • उर्दू
  • History
  • Economics
  • Philosophy
  • Psychology
  • Sociology
  • Political science
  • Defence and Strategic Studies
  • Home science
  • Library and Information science
  • Journalism and Mass Communication
  • Social Work
  • Public Administration Mathematical Sciences Environmental Sciences Physical Sciences Chemical Sciences
  • Life sciences
  • Earth, atmospheric, ocean and planetary science
  • Geography
  • Computer science and application
  • Electronics science Commerce
  • Management
  • Law
  • Education
  • Physical education

वरील एकूण 32 विषयांकरिता सेटी परीक्षा आयोजित केली जाते म्हणजेच वरील 32 विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले विद्यार्थी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी सेट या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

जर तुम्हाला महाराष्ट्र राज्य मधे सहाय्यक प्राध्यापक व्हायचे असेल तर तुम्हाला UGC NET/CSIR NET/MH SET यापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते. परंतु महाराष्ट्र बाहेर जाऊन जर तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक पाहिजे असेल तर तुम्हाला त्या राज्याची सेट परीक्षा उत्तीर्ण करणे किंवा नीट परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते. जर तुम्ही नेट परीक्षा उत्तीर्ण केली तर तुम्ही भारतामध्ये कुठेही सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र ठरू शकता. परंतु सेट ही परीक्षा प्रत्येक राज्यासाठी वेगळी असून त्या राज्यामध्येच सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी पात्र करावी लागते. एकंदरीत महाराष्ट्र राज्य मध्ये सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून MH SET ही परीक्षा दरवर्षी एक वेळा घेतली जाते. आजवर तीस सेट परीक्षा ह्या ऑफलाइन पद्धतीने आयोजित केल्या होत्या. येणारी सेट परीक्षाही सात एप्रिल 2024 ला असून ती सुद्धा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणारी सेट परीक्षा 2024 ही शेवटची परीक्षा ठरणार आहे. यानंतर म्हणजेच 2025 पासून ज्या काही सेट परीक्षा होतील त्या ऑनलाईन घेतल्या जातील आणि त्यामध्ये अभ्यासक्रमात सुद्धा थोडाफार बदल केल्या जाऊ शकतो. म्हणून 2024 मध्ये होणारी सेट परीक्षाही ऑफलाईन होणारी शेवटची परीक्षा असल्या कारणाने ही आपल्याला जुन्या सिल्याबस वर आधारित होणारी परीक्षा शेवटची परीक्षा किंवा शेवटचा चान्स आहे असे आपण म्हणू शकतो.

MH SET 2024 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नियम:

MH SET ही परीक्षा जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला असतील असे विद्यार्थी तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे असे विद्यार्थी सुद्धा त्यांच्या विषयाकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतात.

जर एखादा विद्यार्थी चे पोस्ट ग्रॅज्युएशन वर दिलेल्या 32 विषयांमध्ये नसेल तर त्या विषयांची संबंधित विषयांमध्ये ते सेट या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात (यूजीसीच्या नियमानुसार).

जर एखाद्या विद्यार्थ्याने एखादा विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर तो विद्यार्थी पुन्हा त्याच विषयाकरिता सेट परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरू शकत नाही. असे केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई केल्या जाऊ शकते किंवा त्याचे सर्टिफिकेट केल्या जाईल. म्हणून एका विषयात फक्त एकाच वेळी सेट परीक्षा उत्तीर्ण करता येते.

सेट परीक्षा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट अजून देण्यात आलेली नाही. म्हणजेच वयाच्या कोणत्याही वर्षी तुम्हाला MH SET परीक्षा देता येते. त्याकरिता फक्त संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे.

सेट या परीक्षेमध्ये युजीसीच्या नियमानुसार प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षण दिले आहे ते खालील प्रमाणे.

  • SC – 13%
  • ST – 7%
  • OBC – 19%
  • EWS (OPEN) – 10%
  • SBC – 2%
  • VJ A – 3%
  • NT B – 2.5%
  • NT C – 3.5%
  • NT D – 2%
  • General – 38%
  • Horizontal Reservation (Orphan) – 1%
  • Bench mark disability – 5%

प्रत्येक प्रवर्गाला सेट या परीक्षेमध्ये सुद्धा आरक्षण दिले जाते आणि त्यानुसारच त्यांचा उत्तीर्ण होण्याचा कटऑफ ठरला जातो.

सेट या परीक्षेकरिता अर्ज करण्यासाठी SC/ST/OBC/SBC/VJ/NT/Transgender/PWD/ Orphan या कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनला कमीत कमी 55 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

तसेच OBC/SBC/VJ/NT (नॉन क्रिमी लेयर गटात मोडत असलेले) आणि SC/ST/Transgender/PwD/Orphans या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता त्या विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन ला किमान 50 टक्के गुण मिळवले असावे.

सेट ही परीक्षा दरवर्षी एक वेळा घेतल्या जात असून त्यासाठी महाराष्ट्रामधील 17 सेंटर हे परीक्षे करिता दिले जातात. महाराष्ट्र मध्ये एकाच वेळी एकाच दिवशी ही परीक्षा ऑफलाईन घेतली जाते. या परीक्षेकरिता उपलब्ध असणारे परीक्षा केंद्र हे खालील प्रमाणे आहेत.

मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, गोवा, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, धुळे, रत्नागिरी, परभणी अशा एकूण 17 परीक्षा केंद्रांवर SET ही परीक्षा एकाच वेळी आणि एकाच दिवशी ऑफलाइन पद्धतीने घेतले जाते.

MH SET या परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज करताना भरावयाची फी ही खालील प्रमाणे आहे. OPEN प्रवर्ग करिता आठशे रुपये फी आकारले जाते. तर SC/ST/PwD/Transgender/Orphans/OBC/VJ/NT B/NT C/NT D/ SBC (Non Creamy Layer only)/EWS(OPEN) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 650 रुपये फी आकारले जाते.

How to apply for MH SET 2024 | MH SET 2024 परीक्षे फॉर्म कसा भरावा?:

ज्या उमेदवारांना या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यावी.

https://setexam.unipune.ac.in

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराकडे खालीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

पॅन कार्ड/आधार कार्ड/ वोटर आयडी/पासपोर्ट/राशन कार्ड/ बँक अकाउंट/अन्य कोणतीही सरकारी ओळखपत्र

ऑनलाइन अर्ज भरण्याआधी उमेदवाराने खालील इमेजेस स्कॅन करून त्या साईज मध्ये सेव करणे आवश्यक आहे.

१.) Passport size photograph JPG/JPEG फॉरमॅट मधे (maximum size 50KB)

२.) Signature JPG/JPEG फॉरमॅट मधे (maximum size 30KB)

MH SET 2024 या परीक्षेचा ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरील महत्त्वाची माहिती जसे की ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख, पात्रता निकष आणि शैक्षणिक पात्रता व संपूर्ण नियम लक्षपूर्वक व काळजीपूर्वक वाचून नंतरच ऑनलाईन अर्ज करावा.

MH SET 2024 या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी प्रत्यक्षात तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन (Registration) करणे आवश्यक आहे आणि त्यावरून रजिस्ट्रेशन आयडी बनवणे महत्त्वाचे आहे. रजिस्ट्रेशन करण्याकरिता तुम्हाला व्हॅलिड ईमेल आयडी आणि पासवर्ड (Valid Email ID and Password) याची आवश्यकता असते.

रजिस्ट्रेशन करण्याकरिता सुरुवातीला वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर एक होम पेज ओपन होईल आणि त्या होम पेजवर गेल्यानंतर Apply Now Link यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन ची लिंक मिळेल.

तिथे क्लिक केल्यावर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक टॅब उपलब्ध करून देण्यात येईल. त्या टॅबमधून तुम्हाला युजरनेम (Create Username) क्रिएट करायचा आहे आणि त्यानंतर त्या युजरनेम चा वापर करून ऑनलाइन अप्लिकेशन करायचा आहे.

अशाप्रकारे रजिस्ट्रेशन केल्यावर तुमच्याकडे Valid Email ID (ई-मेल आयडी) आणि पासवर्ड (Password) वापरून तुम्ही तुमचा युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करू शकता. आणि हा युजरनेम आणि पासवर्ड तुम्ही दिलेल्या विशिष्ट ईमेल आयडीवर तुम्हाला मेल केल्या जाईल तुमच्या पुढच्या प्रोसेस साठी.

तुम्ही दिलेले तुमचे ईमेल आयडी हेच तुम्हाला रजिस्ट्रेशन साठी युजरनेम करिता उपलब्ध करून दिले जाईल.

प्रत्येक उमेदवाराने स्वतःचा युजरनेम आणि पासवर्ड लक्षात ठेवणे हे सर्वस्वी जबाबदारी त्या उमेदवाराची असेल. कारण याच युजरनेम आणि पासवर्ड चा वापर करून भविष्यात तुम्हाला त्या परीक्षेची संपूर्ण माहिती तुमच्या लॉगिनला मिळेल.

रजिस्ट्रेशन केल्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड मिळाल्यावर तुम्ही त्यांचा वापर करून Fill Main Application Form या लिंक वर करू शकता. तिथे क्लिक करून तुम्ही विचारलेले माहिती काळजीपूर्वक तपासून भरू शकता.

संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा ती माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत तपासून नंतरच तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करू शकता.

तुम्ही तुमचा भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म Fill Main Application Form यावर क्लिक करून Preview म्हणून पाहू शकता.

यानंतर सिस्टीम तुम्हाला एक युनिक एप्लीकेशन नंबर Unique Application Number जनरेट करून देईल तुमच्या आपलिकेशन फॉर्म साठी. यानंतर तुम्हाला Upload Scanned Photo and Signature यावर क्लिक करून पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर दिलेल्या साईज मध्ये अपलोड करायची आहे. अपलोड केल्यानंतर ती अपलोड झाली की नाही हे बघून एक वेळा ती फाईल ओपन करायची आहे.

यानंतर तुम्हाला Payment and Print Application Form यावर क्लिक करायचे आहे आणि क्लिक केल्यानंतर सदर परीक्षेची फीस क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग मधून भरावयाची आहे.

MH SET परीक्षेकरता ऑनलाइन अर्ज करताना भरावयाची फी खाली प्रमाणे आहे.

  • OPEN प्रवर्ग – 800 रुपये
  • SC/ST/PwD/Transgender/Orphans/OBC/VJ/NTB, NTC, NTD/SBC (Non creamy layer only)/EWS(OPEN) – 650 रुपये

परीक्षा फी ट्रांजेक्शन यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि एप्लीकेशन फॉर्म दोन पेज चा आहे की नाही हे बघायचे आहे पहिल्या पेजवर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म मधील माहिती दिसेल तर दुसरा पेजवर ऑनलाईन पेमेंट ट्रांजेक्शन डिटेल्स मिळतील.

शेवटी तुम्हाला त्या आपलिकेशनचे प्रिंट भविष्याकरिता सेव्ह करून ठेवायची आहे जेणेकरून आपलिकेशन नंबर आणि बाकी माहिती तुम्हाला सहजपणे उपलब्ध होईल.

अशाप्रकारे तुम्हाला MH SET 2024 या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टी याची संपूर्ण माहिती आम्ही या पेजवर उपलब्ध करून दिलेली आहे. वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती परीक्षा आणि नोकरीच्या संधी यांची अधिकृत आणि तात्काळ माहिती मिळवण्यासाठी आमचे Telegram Channel – Mahasarkar नक्कीच फॉलो करा.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT