Vanrakshak Practice Paper 08 : महाराष्ट्र वनरक्षक सराव पेपर ०८

Maharashtra Vanrakshak Practice Paper 08 – Forest Guard Practice Paper 08

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वन मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १० जून २०२३ पासून वनरक्षक भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार वनरक्षक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया …………

विभाग-१ मराठी

 

1) ‘ती दररोज फेरफटका मारण्यास जातो. अधोरेखित शब्दाचे योग्य रूप लिहा.
A. जाते
B. जातात
C. जातो
D. जातील
Answer: A. जाते

2) खालील आलंकारिक शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
A. पिकले पान – म्हातारा
B. भीष्म प्रतिज्ञा – कठीण प्रतिज्ञा
C. बोके सन्यासी – ढोंगी मनुष्य
D. गंगा-यमुना – नद्या
Answer: D. गंगा-यमुना – नद्या

3) “आगगाडी’ हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
A. मध्यमपदलोपी समास
B. उपपद तत्पुरुष समास
C. कर्मधारय समास
D. द्विगु समास
Answer: A. मध्यमपदलोपी समास

4) ‘खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा…
A. खेड्यातील
B. माणसे
C. आता
D. पुढारली
Answer: D. पुढारली

5) चुकीची जोडी ओळखा.
A. स्वगत – स्वतःशी केलेले भाषण
B. हुतात्मा – देशासाठी प्राण अर्पण केलेला
C. विदुषी – विद्वान स्त्री
D. स्वावलंबी – दुसऱ्यावर अवलंबून असणारा
Answer: D. स्वावलंबी – दुसऱ्यावर अवलंबून असणारा

6) ‘वैद्याने रोग्यास बरे केले.’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
A. वैद्याने
B. बरे
C. केले
D. रोग्यास
Answer: A. वैद्याने

7) “कटी’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
A. पाय
B. डोके
C. गळा
D. कंबर
Answer: D. कंबर

8) गुणहीन’ या शब्दाचा समास ओळखा.
A. षष्ठी तत्पुरुष
B. पंचमी तत्पुरुष
C. चतुर्थी तत्पुरुष
D. तृतीया तत्पुरुष
Answer: D. तृतीया तत्पुरुष

9) चुकीची जोडी ओळखा.
A. तुलनावाचक शब्दयोगी अव्यय -पेक्षा, तर, परीस
B. हेतुवाचक शब्दयोगी अव्यय – साठी, करिता, स्तव
C. संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय – सुद्धा, देखील. ही –
D. भागवाचक शब्दयोगी अव्यय – प्रति कडे, विरुद्ध
Answer: D. भागवाचक शब्दयोगी अव्यय प्रति कडे, विरुद्ध

10) खालीलपैकी कोणते उदाहरण कर्मधारय समासाचे नाही?
A. काव्यामृत
B. भवसागर
C. नीलगगन
D. शेतकरी
Answer: D. शेतकरी

विभाग-२ इंग्रजी

11) Water is ————– tea or any other liquid for all living beings.
A. more precious than
B. precious than
C. most precious
D. the most precious
Answer: A. more precious than

12) Choose the appropriate preposition for the given sentence:
An amazing biological clock ———- us regulates our sleeping patterns.
A. for
B. from
C. into
D. within
Answer: D. within

13) Choose the option that best punctuates the given sentence:
The basketball coach ordered the players stand up and form a line quickly.
A. The basketball coach ordered, “To the players stand up and form a line quickly”.
B. The basketball coach ordered the players, “stand up, and form a line quickly.
C. The basketball coach ordered “The players stand up and form a line quickly”.
D. The basketball coach ordered the players, “Stand up and form a line quickly”.
Answer: D. The basketball coach ordered the players, “Stand up and form a line quickly”.

14) Choose the correct form of adjective for the given sentence:
Negotiators are hoping for an ———- settlement.
A. early
B. earlier than
C. earliest
D. immediately
Answer: A. early

15) Choose the appropriate possessive noun to complete the given sentence.
The summit is just ———– march from here.
A. a days
B. a days’
C. a day’s
D. a days’s
Answer: C. a day’s

16) Choose the most suitable conjunction to complete the given sentence:
We came ———– the guest had left.
A. till
B. for
C. after
D. ago
Answer: C. after

17) Choose the correct form of verb that is in agreement with the subject:
A 3BHK house usually ——- three bedrooms, a hall and a kitchen too.
A.is
B. are
C. has
D. have
Answer: C. has

18) Choose the correct form of the noun for the given sentence:
The ———– of the monarch butterfly is the most spectacular natural phenomena in the world.
A mitigation
B. migrate
C. migrating
D. migration
Answer: D. migration

19) Out of the following options, choose the sentence that is punctuated correctly.
A. One day Mamma Fox said to Papa Fox I want a fat hen to eat.
B. One day Mamma Fox said to Papa Fox “I want a fat hen to eat.”
C. One day Mamma Fox said to Papa Fox, “I want a fat hen to eat.”
D. One day, Mamma Fox said to Papa Fox, “I want, a fat hen to eat
Answer: C. One day Mamma Fox said to Papa Fox, “I want a fat hen to eat.”

20) Find the word opposite in meaning to the word:
Invincible
A. Unbeatable
B. Bulletproof
C. Vulnerable
D. Indomitable
Answer: C. Vulnerable

विभाग-३ गणित

21) एक विक्रेता एक घड्याळ 5% सूटीवर विकतो. जर त्याने 7% सूट दिली तर त्याला नफ्यामध्ये 15 रुपये कमी मिळतात. घड्याळाची लावलेली किंमत काय आहे?
A.697.50 रूपये
B.712.50 रूपये
C. 750 रूपये
D.817.50 रूपये
Answer: C. 750 रूपये

22) वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा
0, 4, 6, 3, 7, 9, 6, —–, 12
A.8
B. 10
C.11
D.14
Answer: B.10

23) दोन असमान परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात?
A.0
B. अनंत
C.10000
D.1456
Answer: B. अनंत

24) एक कार ताशी 45 किमीच्या वेगाने जाते आणि वेळेवर मुक्कामी पोहोचते. जेव्हा तिचा सरासरी वेग ताशी 40 किमी होतो तेव्हा ती 30 मिनिटे उशीरा पोहोचते. तर कारने पार केलेले अंतर काढा.
A. 200 किमी
B. 240 किमी
C. 180 किमी
D. 150 किमी
Answer: C. 180 किमी

25) 39 विद्यार्थी असलेल्या वर्गामध्ये प्रत्येकाकडे एक कुत्रा किंवा एक मांजर किंवा कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळीव प्राणी आहेत. वीस विद्यार्थ्यांकडे कुत्रा आहे आणि 26 विद्यार्थ्यांकडे मांजर आहे. किती मुलांकडे कुत्रा आणि मांजर दोन्हीही आहेत?
A. 12
B.10
C. 7
D.5
Answer: C.7

26) वयाबद्दल विचारले असता एका व्यक्तीने सांगितले, “त्याचे वय पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांची बेरीज केल्यावर मिळते.” तर त्या व्यक्तीचे वय किती?
A.100
B.50
C.120
D.150
Answer: C.120

27) 13 पेपरांच्या गुणांची सरासरी 50 आहे. पहिल्या 7 पेपरांची सरासरी 52 आणि शेवटच्या 7 पेपरांची सरासरी 45 आहे. सातव्या पेपरचे गुण काय आहेत?
A. 25 गुण
B. 26 गुण
C. 29 गुण
D. 32 गुण
Answer: C. 29 गुण

28) VERTEXVERTEX… वाक्याकडे लक्ष द्या जेथे VERTEX ची 10 वेळा पुनरावृत्ती झाली आहे. 1 ल्या टप्प्यामध्ये सर्व विषम स्थानावरील अक्षरे काढून टाका. 2 या टप्यामध्ये सर्व विषम स्थानावरील अक्षरे काढून टाका. एक अक्षर शिल्लक राहिल तोपर्यंत हे पुनरावृत्त करा. ते अक्षर काय आहे?
A.V
B.T
C.X
D.E
Answer: D.E

29) एक चोर दुपारी 2:30 वाजता एक कार चोरतो आणि ती ताशी 60 किमी वेगाने पळवतो. पोलीस दुपारी 3:00 वाजता ताशी 75 किमी वेगाने जिथून त्याने कार चोरली त्या ठिकाणाहून त्याचा पाठलाग सुरू करतात. तर पोलीस किती वाजता त्याला पकडतील?
A. सायं 05:15

B. सायं. 04:25
C. सायं 05:00
D. सायं. 04:55
Answer: C. सायं 05:00

30) एक कृष्णधवल छायाचित्र अनुक्रमे 60% काळे आणि 40% पांढरे आहे. त्या छायाचित्राचा आकार 2 पट वाढविल्यास पांढऱ्या रंगाची टक्केवारी आहे
A.80%
B.60%
C.50%
D.40%
Answer: D. 40%

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो?
A. लाल रक्तपेशी (RBC)
B. पांढऱ्या रक्तपेशी (WBC)
C. बिंबाणु
D. जीवद्रव्य
Answer: A. लाल रक्तपेशी (RBC)

32) ———– च्या परिभ्रमण कक्षांदरम्यान लघुग्रह आढळतात.
A. नेपच्यून आणि प्लुटो
B. शनी आणि गुरु
C. मंगळ आणि गुरू
D. मंगळ आणि पृथ्वी
Answer: C. मंगळ आणि गुरू

33) नेमणूकीच्या वेळी किती कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नेमणूक केली जाते?
A. 5 वर्ष
B. 3 वर्ष
C. 2 वर्ष
D. 1 वर्ष
Answer: A.5 वर्ष

34) प्रख्यात अरविंद गुप्ता (पुणे) यांना त्यांच्या मधील ——– योगदानासाठी 69 व्या प्रजासत्ताक दिनी पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
A. वैद्यकीय
B. कला
C. हिंदुस्थानी संगीत
D. शिक्षण आणि साहित्य
Answer: D. शिक्षण आणि साहित्य

35) खाली दिलेल्या पदार्थांपैकी कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यासाठी जबाबदार नाही?
A. कार्बन टेट्राक्लोराईड
B. अमोनिया
C. क्लोरोफ्लोरो कार्बन
D. एरोसॉल्स
Answer: B. अमोनिया

36) सूर्यमधील ऊर्जेचा उगम ———- यामुळे होतो.
A. कार्बन डायॉक्साइडमध्ये कार्बनचे रूपांतरण होणे

B. हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतरण होणे
C. हायड्रोजनचे ज्वलन होणे
D. युरेनियमचे क्रिप्टॉनमध्ये रूपांतरण होणे
Answer: B. हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतरण होणे

37) 1853 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी (टेक्सटाईल मिल) कुणी सुरू केली?
A. चित्तरंजन दास
B. डॉ. बी. आर. अंबेडकर
C. रोमेश चंद्र दत्त
D. कावसजी नानाभाई
Answer: D. कावसजी नानाभाई

38) भारतामध्ये फिनटेक धोरणाची घोषणा करणारे महाराष्ट्र शासन हे —– होते.
A. दुसरे
B. पाचवे
C. पहिले
D. तिसरे
Answer: C. पहिले

39) अपर्णा पोपट ही ———- ची राष्ट्रीय चॅम्पियन आहे आणि तिने कॉमनवेल्थ गेम्स 2002 मध्ये कांस्य पदक जिंकले होते.
A. जलतरण
B. बॅडमिंटन
C. नेमबाजी
D. कुस्ती
Answer: B. बॅडमिंटन

40) भारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन डाय ऑक्साईड (एस-सीओ2) ब्रेयटन चाचणी लूप सुविधा येथे सुरू करण्यात आली.
A. बेंगलुरू
B. चेन्नई
C. ओडिसा
D. मुंबई
Answer: A. बेंगलुरू


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT