TCS/IBPS Pattern “Marathi Grammar” Practice Paper 2 : TCS/IBPS पॅटर्न “मराठी व्याकरण सराव पेपर 02

Talathi Bharti Practice paper

TCS/IBPS Pattern “Marathi Grammar Practice Paper 2

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे २५ सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS मराठी व्याकरण सराव प्रश्न…………………..

“TCS / IBPS पॅटर्न मराठी व्याकरण सराव पेपर – 2”

Q.1 ‘सवंगडी’ चा समानार्थी शब्द शोधा.
1. मित्र
2. स्वस्त
3. शिक्षक
4. उदार
उत्तर: 1. मित्र
स्पष्टीकरण: ‘सवंगडी’ चा समानार्थी शब्द = मित्र

Q.2 ‘भरती’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
1. ओहोटी
2. अपयश
3. आखूड
4. कावड
उत्तर: 1. ओहोटी
स्पष्टीकरण: ‘भरती’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द x ओहोटी

Q.3 ‘तो काम करतो’. या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य कोणते आहे?
1. ती काम करते.
2. हा काम करतो.
3. ते काम करतात.
4. आम्ही काम करतो.
उत्तर: 1. ती काम करते.
स्पष्टीकरण: ‘तो काम करतो’. या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य ती काम करते.

Q.4 हा नदीचा फार मोठा प्रवाह आहे. वाक्यार्थाला बाधा न आणता या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा.
1. छे छे नदीचा हा प्रवाह काही मोठा नाही.
2. नदीचा हा प्रवाह लहान नाही.
3. अबब! केवढा हा नदीचा प्रवाह
4. नदीचा हा प्रवाह मोठा आहे का?
उत्तर: 3. अबब! केवढा हा नदीचा प्रवाह
स्पष्टीकरण: हा नदीचा फार मोठा प्रवाह आहे. वाक्यार्थाला बाधा न आणता या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य पर्याय क्रमांक ३ अबब! केवढा हा नदीचा प्रवाह हा बरोबर आहे.

Q.5 ‘विलासला बक्षीस मिळेल. या वाक्याचे साध्या भूतकाळातील रूप ओळखा.
1. विलासला बक्षीस मिळत असेल.
2. विलासला बक्षीस मिळते.
3. विलासला बक्षीस मिळाले.
4. विलासला बक्षीस मिळत असते.
उत्तर: 3. विलासला बक्षीस मिळाले.
स्पष्टीकरण: ‘विलासला बक्षीस मिळेल.” या वाक्याचे साध्या भूतकाळातील रूप पर्याय ३ विलासला बक्षीस मिळाले. हे बरोबर आहे.

Q.6 ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे?’
1. भगवद्गीता
2. रघुवंश
3. वाल्मिकी रामायण
4. शाकुंतल
उत्तर: 1. भगवद्गीता
स्पष्टीकरण: ज्ञानेश्वरी ही “भगवद्गीता” या संस्कृत भाषेतील ग्रंथावर आधारित आहे.

Q.7 पुढीलपैकी महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ ओळखा.
1. तीर्थरूप महाराष्ट्र
2. ऋतुचक्र
3. लीळाचरित्र
4. गंगाजळ
उत्तर: 3. लीळाचरित्र
स्पष्टीकरण: महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ लीळाचरित्र हा आहे.

Q.8 “ये” या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा
1. झाले
2. केले
3. आले
4. गेले
उत्तर: 3. आले
स्पष्टीकरण: “ये” या क्रियापदाचे भूतकाळातील रूप “आले” आहे.

Q.9 सरोज दिल्लीत राहते. या वाक्याचा प्रयोग सांगा.
1. भावे प्रयोग
2. समापन कर्मणी प्रयोग
3. कर्मकर्तरी प्रयोग
4. कर्तरी प्रयोग
उत्तर: 4. कर्तरी प्रयोग
स्पष्टीकरण: ‘सरोज दिल्लीत राहते.’ या वाक्याचा प्रयोग कर्तरी प्रयोग आहे.
कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथामांत असतो.

Q.10 खालीलपैकी कोणता शब्द ‘अकल्पित’ चा विरुद्धार्थी आहे?
1. कल्पित
2. यजमान
3. आव
4. कलाकार
उत्तर: 1. कल्पित
स्पष्टीकरण: ‘अकल्पित’ चा विरुद्धार्थी शब्द x कल्पित आहे.

Q.11 शब्दांचा योग्य पदक्रम लावून लेखननियमानुसार अचूक वाक्य सांगा.
1. जगात दुसरी नाही संपूर्ण आईइतकी कोणीही व्यक्ती प्रेमळ.
2. दुसरी प्रेमळ आईइतकी कोणीही जगात संपूर्ण व्यक्ती नाही.
3. संपूर्ण दुसरी प्रेमळ आईइतकी व्यक्ती जगात कोणीही नाही..
4. आईइतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कोणीही नाही.
उत्तर: 4. आईइतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कोणीही नाही.
स्पष्टीकरण: शब्दांचा योग्य पदक्रम लावून लेखननियमानुसार अचूक वाक्य पर्याय ४ आहे.

Q.12 ‘गायिका’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप सांगा.
1. गायकी
2. गायन
3. गाय
4. गायक
उत्तर: 4. गायक
स्पष्टीकरण: ‘गायिका’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप गायक आहे.

Q.13 पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे?
1. हरित x हिरवेगार
2 मेहनत x कष्ट
3. विश्वास x अविश्वास
4. धन संपत्ती
उत्तर: 3. विश्वास x अविश्वास
स्पष्टीकरण: योग्य विरुद्धार्थी जोडी “विश्वास x अविश्वास” आहे.

Q.14 ‘श्रीमती’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते?
1. श्रीमान
2. श्रीरंग
3. श्रीमती
4. श्रीराम
उत्तर: 1. श्रीमान
स्पष्टीकरण: श्रीमती’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप = श्रीमान आहे.

Q.15 पापपुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह शोधा.
1. पापाचे पुण्य
2. पापपुण्य इत्यादी
3. पाप अथवा पुण्य
4. पापयुक्त पुण्य
उत्तर: 3. पाप अथवा पुण्य
स्पष्टीकरण: द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात.
पापपुण्य चा विग्रह पाप अथवा पुण्य असा होतो.

Q.16 अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.
‘प्रत्येकाने गरजूंना यथाशक्ती मदत करावी.’
1. अव्ययीभाव
2. तत्पुरुष
3. कर्मधारय
4. अलुक समास
उत्तर: 1. अव्ययीभाव
स्पष्टीकरण: यथाशक्ती हा शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे.

Q.17 खालील वाक्याचे रीति भूतकाळी रूप बनवा.
‘मधू लाडू खात जाईल.’
1. मधू लाडू खात असतो.
2. मधूने लाडू खाल्ला आहे.
3. मधूने लाडू खाल्ला.
4. मधू लाडू खात असे.
उत्तर: 4. मधू लाडू खात असे.
स्पष्टीकरण: भूतकाळात क्रिया पूर्वीपासून करत असेल तर रिती भूतकाळ असतो.
मधू लाडू खात असे. यात मधु भूतकाळात रोज लाडू खात होता. म्हणून मधू लाडू खात असे. हे रीति भूतकाळी वाक्य आहे.

Q.18 खालीलपैकी कोणते उदाहरण सकर्मक कर्तरी प्रयोगाचे नाही ते ओळखा.
1. गायत्री घरी जाते.
2. गणेश पत्र लिहितो.
3. अर्णव पुस्तक वाचतो.
4. पार्थ मध खातो.
उत्तर: 1. गायत्री घरी जाते.
स्पष्टीकरण: गायत्री घरी जाते. या वाक्यात कर्म नाही म्हणजेच हे अकर्मक वाक्य आहे.

Q.19 नाशिक येथे आयोजित झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
1. आनंद यादव
2. जयंत नारळीकर
3. फ्रान्सिस दिब्रिटो
4. नागनाथ कोत्तापल्ले
उत्तर: 2. जयंत नारळीकर
स्पष्टीकरण: 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर हे होते.

Q.20 खालीलपैकी द्विकर्मक क्रियापदाचे उदाहरण कोणते आहे?
1. आरोही लाडू खाते.
2. त्याला थंडी वाजते.
3. आजीने नातीला गोष्ट सांगितली.
4. तृप्ती चहा पिते.
उत्तर: 3. आजीने नातीला गोष्ट सांगितली.
स्पष्टीकरण: द्विकर्मक वाक्यात दोन कर्म असतात. म्हणून आजीने नातीला गोष्ट सांगितली.हे द्विकर्मक वाक्य आहे.

Q.21 ‘त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती सहज मिळवली. या वाक्यातील उद्देश विभाग कोणता आहे?
1. मुलाने यंदा पहिली
2. यंदा पहिली शिष्यवृत्ती सहज मिळवली
3. त्याच्या हुशार मुलाने
4. शिष्यवृत्ती सहज
उत्तर: 3. त्याच्या हुशार मुलाने
स्पष्टीकरण: वाक्यातील कर्ता व त्या अगोदर शब्द मिळून “उदेश्य विभाग” तयार होतो.
त्याच्या हुशार मुलाने हा “उदेश्य विभाग” आहे.

Q.22 संत तुकारामांनी कोणत्या प्रकारची रचना केली?
1. अभंग
2. पोवाडा
3. ओवी
4. आख्यानकाव्य
उत्तर: 1. अभंग
स्पष्टीकरण: संत तुकारामांनी अभंग प्रकारची रचना केली.

Q.23 खालील वाक्यातील नामाचे लिंग बदला.
घोडा जोरात धावतो.
1. घोडी
2. गज
3. लांडोर
4. अश्व
उत्तर: 1. घोडी
स्पष्टीकरण: घोडा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप “घोडी” आहे.

Q.24 ‘अव्हेर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
1. स्वीकार
2. मंडन
3. अनुरूप
4. कृपण
उत्तर: 1. स्वीकार
स्पष्टीकरण: अव्हेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द स्वीकार आहे.

Q.25 वचन बदला.
‘विद्या, आंबा, खाण, जीभ
1. विद्ये, आंबे, खाणी, जिभे
2. विद्या, आंबा, खाणी, जिभा
3. विद्या, आंबे, खाणी, जिभा
4. विद्या, आंबे, खाण, जिभा
उत्तर: 3. विद्या, आंबे, खाणी, जिभा
स्पष्टीकरण: दिलेल्या शब्दाचे योग्य अनेकवचनी गट हा पर्याय क्रमांक ३ आहे.



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT