Talathi Practice Paper 20 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २०

Talathi Practice Paper 20 | Talathi Practice Question Paper Set 20

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २०

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) ‘कुसुम’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. पुष्प
B. वेल
C. गवत
D. सोने
Answer: A. पुष्प

 

2) खालील केवल वाक्यांचे संयुक्त वाक्य बनवताना कोणते अव्यय जास्त समर्पक आहे?
वाटेत मोटार नादुरुस्त झाली. मला यावयास उशीर झाला.
A. किंवा
B. आणि
C. म्हणून
D. पण
Answer: C. म्हणून

3) आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश, फेंकी रसाल तरुही मधुगंधपाश ह्या ओळीतील वृत्त कोणते?
A. भुजंगप्रयात
B. वसंततिलका

C. पादाकुलक
D. नववधू
Answer: B. वसंततिलका

4) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा:
मालतीने रात्रभर जागून मुलीसाठी गोधडी शिवली. मात्र मुलीने ती भडक रंगाची आहे असे म्हटले.
म्हणतात ना…….
A. शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड कशी
B. रात्र थोडी सोंगे फार
C. लेकी बोले सुने लागे
D. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.
Answer: A. शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड कशी

5) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक लोकांनी आपल्या प्राणांची ——— दिली.
A. आहुति
B. आकृति
C. आखाती
D. कृती
Answer: A. आहुति

6) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
A. संगित
B. न्याहारी
C. बालहत्या
D. प्रतीक्षा
Answer: A. संगित
7) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
ज्याचे पोट दुखेल————
A. तोच औषध मागेल.
B. तोच दुआ मांगेल
C. तोच वैद्य बोलवेल
D. तोच ओवा मागेल.
Answer: D. तोच ओवा मागेल.

8) ‘अवचित’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. अपेक्षित
B. प्रसंग
C. अचानक
D. परिचित
Answer: C. अचानक

9) खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा
A. उचित = बरोबर
B. कचित = कधीतरी
C. वंचित = वचनबद्ध
D. संचित = एकत्रित
Answer: C. वंचित वचनबद्ध

10) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
सत्य, असत्य व बुद्धीला स्मरुन
A. विवेकशून्य
B. सदसद्विवेकबुद्धी
C. अर्धसत्य
D. सत्यार्थी
Answer: B. सदसद्विवेकबुद्धी

विभाग-२ इंग्रजी

11) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Are apps a fad or are they here to stay?
A. Vogue
B. Standard
C. Tradition
D. Custom
Answer: A. Vogue

12) Identify the figure of speech in the following sentence:
The teacher asked the children to run slowly on the playground.
A. Apostrophe
B. Simile
C. Oxymoron
D. Euphemism
Answer: C. Oxymoron

13) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:

Veena finally brought around her father to see her point of view

A. To persuade
B. To reveal clearly
C. To cause to happen
D. To demand something
Answer: A. To persuade

14) Pick the right meaning of the highlighted word in the sentence.
Even though the hose seemed pliable, Henry wasn’t able to curve it around the corner of the house
A. Something which is easily flexible
B. Something inelastic
C. Something easily breakable
D. Something which is very trustworthy
Answer: A. Something which is easily flexible

15) Identify the figure of speech in the following sentence:
It feels like my birthday will never come
A. Metaphor
B. Simile
C. Hyperbole
D. Oxymoron
Answer: C. Hyperbole

16) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
The courts developed the doctrine of breach of contract.
A. Being unlawful about something
B. Abiding to a principal
C. Feeling faint about something
D. Avoiding something
Answer: B. Abiding to a principal

17) Choose the appropriate prepositional phrase for the given sentence:
_ the rains, we went out for the picnic.
A. On behalf of

B. In spite of
C. Respite of
D. In case of
Answer: B. In spite of

18) Choose the most suitable determiner for the given sentence:
Dreaming ———-of the two pay any attention during class. They are always day
A. Either
B. Each
C. Neither
D. Both
Answer: C. Neither

19) Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence:
If he helps others, he always expects them to be recipro ————
A-city
B-cal
C.-ment
D-en
Answer: B-cal

20) Choose the sentence with the correct punctuation to convey the right meaning.
A. What a beautiful morning said the boy!
B. “What a beautiful morning!” said the boy.
C. What! A beautiful morning said the boy.
D. “What a beautiful morning said the boy?”
Answer: B. “What a beautiful morning!” said the boy.

विभाग-३ गणित

21) X हा Y हून 300% नी मोठा आहे. मग हा x हून —– % लहान आहे.
A.75
B.50
C.25
D.30
Answer:
A.75

22) जर IS =4595 NICE = 70451525, तर KNOW =
A.55775115
B.557075115
C.11141523
D.2565
Answer: B.557075115

23) आनंद आणि बाबु यांच्या वर्तमान क्यामधील गुणोत्तर अनुक्रमे 5:3 आहे. 4 वर्षांपूर्वी आनंदचे वय आणि 4 वर्षांनंतर बाबुच्या वयामधील गुणोत्तर 1:1 आहे. 4 वर्षांनंतर आनंदचे वय आणि 4 वर्षांपूर्वी बाबुच्या वयामधील गुणोत्तर काय असेल?
A. 1:3
B.2:1
C.3:1
D.4: 1
Answer: C.3:1

24) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा: 6, 8, 14, 26, 46, 76, —–
A.84
B.96
C.112
D.118
Answer: D. 118

25) अरुण त्याच्या सायकलवर प्रवास करत आहे आणि त्याने जर 10 किमी/तास या वेगाने प्रवास केला तर तो A या ठिकाणी दुपारी 2 वाजता पोहचेल अशी त्याने गणना केली. त्याने 15 किमी तासाने प्रवास केला तर तो तेथे दुपारी 12 वाजता पोहचेल. दुपारी 1 वाजता त्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्याने किती वेगाने प्रवास करावा.
A.8 किमी/तास
B. 10 किमी/तास
C. 12 किमी/तास
D. 14 किमी/तास
Answer: C. 12 किमी/तास

26) सरासरी काढा.
78, 89, 65, 82, 98 & 98
A.85
B.56
C.58
D.98
Answer: A.85

27) 7136985 या संख्येमधील अंकांची चढत्या क्रमाने पुनर्माडणी केल्यानंतर त्यामधील किती अंकांचे स्थान बदलणार नाही?
A. एक
B. दोन
C. तीन
D. चार
Answer: B. दोन

28) खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा:
1527, 1185, 985, 865, 823, 817
A.985
B.865
C.823
D.817
Answer: A.985

29) एक व्यक्ती 10 तासांमध्ये प्रवास पूर्ण करतो. तो पहिला अर्धा प्रवास 21 किमी/तास या दराने करतो आणि दुसरा अर्धा प्रवास 24 किमी/तास या दराने करतो. किलोमीटरमध्ये केलेला एकूण प्रवास काढा.
A. 121 किमी
B. 242 किमी
C. 224 किमी
D. 112 किमी
Answer: C. 224 किमी

30) एका व्यक्तीच्या खात्यामध्ये दोन वर्षांपूर्वी 2000 रुपये होते. पहिल्या वर्षी त्याने त्याच्या खात्यामध्ये 20% रक्कम जमा केली. पुढच्या वर्षी त्याने वाढलेल्या रकमेच्या 10% रक्कम जमा केली. 2 वर्षांनंतर व्यक्तीच्या खात्यामधील एकूण रक्कम काढा.
A. 2650
B.2640
C.2740
D.2840
Answer: B.2640

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) दिल्लीतील वीरभूमी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे?
A. राजीव गांधी
B. इंदिरा गांधी
C. लाल बहादुर शास्त्री
D. जवाहरलाल नेहरू
Answer: A. राजीव गांधी

32) संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष —- होते.
A. बी. एन. राव
B. जवाहरलाल नेहरू
C. बी. आर. आंबेडकर
D. सच्चिदानंद सिन्हा
Answer: C. बी. आर. आंबेडकर

33) खालीलपैकी कोणाला “भारतीय नाइटिंगेल” म्हटले जाते?
A. मीरा बाई
B. सरोजिनी नायडू
C. डॉ. एनी बेझंट
D. वंदना शिवा
Answer: B. सरोजिनी नायडू

34) सायबेरियन क्रेन भारतातील पुढीलपैकी कोणत्या उद्यानात/ अभयारण्यात स्थलांतर करित होता?
A. केवलादेव राष्ट्रीय उद्यान
B. वेदांर्तगत पक्षी अभयारण्य
C. गिर वन्यजीव अभ्यारण्य
D. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
Answer: A. केवलादेव राष्ट्रीय उद्यान

35) “महाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा” ——– शी संबंधित आहे.
A. बॉक्सिंग
B. कुस्ती
C. कबड्डी
D. खो-खो
Answer: B. कुस्ती

36) नरेंद्र नाथ दत्त है ———- मूळ नाव आहे.
A. स्वामी विवेकानंद
B. रामकृष्ण परमहंस
C. राजा राम मोहन राप
D. रवींद्रनाथ टागोर
Answer: A. स्वामी विवेकानंद

37) पर्यावरणाशी संबंधित खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जैवविविधता हॉटस्पॉटस घोषित करते?
A. वर्ल्ड वाइल्डलाईफ फंड (WWF)
B. आय. पु. सी. एन. (IUCN)
C. कॉन्झव्र्हेशन इंटरनॅशनल (CI)
D. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP)

Answer: C. कॉन्झव्र्हेशन इंटरनॅशनल (CI)

38) पृथ्वीवरील वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे?
A.0.32
B.0.23
C.0.04
D.0.02
Answer: C.0.04

39) केंद्रीय माहिती आयोग (सीआपसी) हे केंद्र सरकारद्वारे, ———— च्या अंतर्गत स्थापित करण्यात
आला आहे.
A. माहितीचा अधिकार अधिनियम, 2006
B. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005
C. माहितीचा अधिकार अधिनियम, 2002
D. केंद्रीय माहिती आयोग कायदा, 2008
Answer: B. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005

40) वैद्यकीय तापमापी ————— हे मोजण्यासाठी वापरतात
A. वातावरणीय तापमान
B. मानवी शरीराचे तापमान
C. रुग्णालयाचे तापमान
D. प्रयोगशाळेचे तापमान
Answer: B. मानवी शरीराचे तापमान