Solve these “Simple Interest” problems to ace Math part : या “सरलव्याज”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Simple Interest” problems to ace Math part : या “सरलव्याज”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

या टॉपिक मधे आपणास दिलेल्या रकमेवर होणारे व्याज दिलेल्या दराने कसे काढायचे हे बघणार आहोत. त्या आधी आपण खाली दिलेली काही मुद्दे अभ्यासू.

१)मुद्दल:

आपण व्याजाने घेतलेल्या किंवा ठेवलेल्या रकमेला मुद्दल असे म्हणतात.

२)मुदत:

मुद्दल रक्कम आपण ज्या ठराविक वेळेसाठी घेतो त्या वेळेला मुदत असे म्हणतात.

३)दर:

मुदत नुसार दिलेल्या रकमेवर प्रती १०० रुपये प्रति वर्षी आकारला जाणारा पैसा म्हणजेच दर होय.

दर साल दर शेकडा आपण असे म्हणू शकतो.

४) सरळव्याज:

सरळ व्याज म्हणजे दिलेल्या मुद्दल वर दर साल दर शेकडा प्रमाणे वसूल केलेली रक्कम परंतु यात व्याजाची रक्कम समाविष्ट केली जात नाही.

एकंदरीत, जेव्हा व्याजाची आकारणी वर्षा करीता केली जाते व व्याजाची रक्कम मुद्दलात न मिळवता व्याज आकारले जाते अशा व्याज आकारण्यास सरळ व्याज असे म्हणतात.

म्हणून,

सरळ व्याज= (मुद्दल × मुदत × व्याजाचा दर)/१००

किंवा

सरळ व्याज= P × N × R/१००

रास= मुद्दल + व्याज

किंवा

A = P + S.I.

P= मुद्दल, N= मुदत, R= व्याजाचा दर, A= रास

आता आपण सरावासाठी खाली दिलेली उदाहरणे अभ्यासू.

उदाहरणे:

1.) महेश ने एका बँकेत 8000 रुपये द. सा. द. शे. 6 दराने सरळ व्याजा नुसार 4 वर्ष ठेवले तर त्यास एकूण मुदत झाल्यावर किती रक्कम मिळेल?

a) 1920

b) 9920

c) 8000

d) 7080

उत्तर: b) 9920

स्पष्टीकरण :

वरील उदाहरणात,

P = 8000, N= 4, R= 6

म्हणून,

सरळ व्याज= (P×N×R)/100

= (8000×4×6)/100

=(80×4×6)

= 80×24 = 1920

दिलेल्या रकमेवरील सरळ व्याज= 1920

आता मुदत नंतर मिळणारी एकूण रक्कम म्हणजे रास काढू.

रास = P + S.I. = 8000+1920= 9920

2.) राम आणि शाम यांनी प्रत्येकी 15000 रुपये सारख्या व्याजदराने सरळ व्याज नुसार कर्ज घेतले. राम ने 2 वर्षानी तर शाम ने 3 वर्षानी कर्ज फेडले. दोघांनी मिळून मुद्दल आणि व्याज अशी एकूण 33000 रुपये भरले तर त्यांचा व्याज दर काय होता?

a) द. सा. द. शे. 3

b) द. सा. द. शे. 6

c) द. सा. द. शे. 5

d) द. सा. द. शे. 4

उत्तर: d) द. सा. द. शे. 4

स्पष्टीकरण:

वरील उदाहरणात,

P =15000

व्याज दर R मानू.

म्हणून, राम ने भरलेलं व्याज = 15000×2×R/100 = 300R

शाम ने भरलेले व्याज = 15000×3×R/100 = 450R

दोघांनी मिळून भरलेलं एकूण व्याज = 33000 – 30000 = 3000

म्हणून, (450R + 300R )= 3000

750R = 3000

R = 300/75 = 4

म्हणून त्यांचा व्याजाचा दर द. सा. द. शे. 4 असेल.

3.) एका रकमेची 5 वर्षं मधे तिप्पट होते तर 15000 मुद्दल साठी 5 वर्षात किती व्याज मिळणार?

a) 20000

b) 10000

c) 30000

d) 45000

उत्तर: c) 30000

स्पष्टीकरण:

इथे,

15000 मुद्दल ची मिळणारी रक्कम = मुद्दल × तीनपट

आणि

रास = 15000×3 = 45000

म्हणून, व्याज = रास – मुद्दल

= 45000 – 15000 = 30000

4.) एक रक्कम द. सा. द. शे. 4% दराने घेतल्यास किती वर्षात दुप्पट होईल?

a) 25 वर्षे

b) 10 वर्षे

c) 15 वर्षे

d) 20 वर्षे

उत्तर: a) 25 वर्षे

स्पष्टीकरण:

इथे आपण मुद्दल 100 रुपये समजू.

म्हणून, व्याज = 100

म्हणून,

सरळ व्याज = (म × द × क)/100

100= (100×4×क)/100

100/4=क

क = 25 वर्षे

5.) राधा ने एका बँकेत 10000 रुपये द. सा. द. शे. 5 दराने सरळ व्याज नुसार 6 वर्ष ठेवले तर तिला मुदत संपली की एकूण किती रक्कम मिळेल?

a) 7000

b) 3000

c) 10000

d) 13000

उत्तर: d) 13000

स्पष्टीकरण:

वरील उदाहरणात,

P = 10000

N = 6

R = 5

म्हणून,

सरळ व्याज= (P×N×R)/100

= (10000×6×5)/100

= 100×30 = 3000

दिलेल्या रकमेवरिल सरळ व्याज = 3000

म्हणून, आता मुदत नंतर मिळणारी एकूण रक्कम म्हणजेच रास बघू.

रास= P + SI = 10000+3000 = 13000

In case you have missed: Seema Nagnath Purbuj 1st article on Dice Problems


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT