Solve these “Maths Puzzle” problems to ace Math part : या “अंकगणित कोडे”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Maths Puzzle” problems to ace Math part : या “अंकगणित कोडे”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Maths Puzzle (अंकगणित कोडे):

या प्रकारच्या टॉपिक मधे आपणास वेगवेगळ्या भौमितिक आकृत्या जसे की चौरस, त्रिकोण, घन, वर्तुळ देऊन त्याचे भाग करून काही संख्या दिल्या जातात. आणि त्या संख्यांचे एकमेकांशी विशिष्ट सहसंबंध असतात. तो सहसंबंध शोधून आपणास विचारलेल्या प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय उत्तर येईल हे शोधावे लागते.

असे प्रश्न सोडवण्यास वेळ लागू शकतो परंतु जास्तीत जास्त सराव केल्यास आपण त्या ट्रिक्स सहज ओळखून योग्य उत्तर शोधू शकतो. हे प्रश्न सोडिण्यासाठी आपणास 1 ते 30 पर्यंत चे वर्ग, 1 ते 10 पर्यंत चे घन, 1 ते 30 पर्यंत पाढे आणि 1 ते 100 मधील मुळ संखं लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

दिलेल्या आकृती मधे संख्यांची मांडणी कोणत्या पद्धतीने, कोणत्या सूत्राने केली हे ओळखावे लागते जेणेकरून तोच संबंध वापरून आपण विचारलेले उत्तर काढू शकणार.

त्यासाठी आपण खाली दिलेली काही उदाहरणे अभ्यासू.

उदाहरणे

1.) खाली दिलेल्या आकृती मधे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?

a) 156
b) 170
c) 153
d) 226

उत्तर: c) 153

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृती वरून आपण खालील प्रमाणे ती संख्या शोधू शकतो.
पहिल्या column मधील आणि शेवटच्या column मधील संख्यांच्या वर्गांची बेरीज ही मधल्या column मधील संख्या येते हे आपणास दिसून येईल.
जसे की,
(7) च वर्ग + 5 च वर्ग = (49+25) = 74
तसेच,
(15) च वर्ग + 9 च वर्ग = (225+81) = 306

याच पद्धतीने जर आपण गेलो तर आपणास प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या काढता येईल.
म्हणून,
(12) च वर्ग + 3 च वर्ग = (144 + 9)= 153
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

2.) खाली दिलेल्या आकृती मधे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?

a) 11
b) 12
c) 14
d) 18

उत्तर: b) 12

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृती मधे,
वरच्या चौरस मधे दिलेल्या संख्यांमधील अंकांचा गुणाकार करून येणारी संख्या जर खाली दिलेल्या उजवीकडील चौरस मधील संख्येत मिळवली ते आपणास मधल्या चौरसत दिलेली संख्या मिळेल.
जसे की,
पहिल्या आकृती मधे,
35: 3×5 = 15
म्हणून,
(15+15)=30 (मधली संख्या)

तिसऱ्या आकृती मधे,
34: 3×4= 12
म्हणून,
(12+56)= 68 (मधली संख्या)

आता चौथा आकृती मधे,
72: 7×2 = 14
म्हणून,
(14+78)= 92

याच पद्धतीने जर आपण गेलो तर आपणास आकृती दोन मधील प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी असलेली संख्या काढता येईल.
म्हणून,
17: 1×7 = 7
आता,
7+ ? = 19
म्हणून, 19-7= 12
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

3.) खाली दिलेल्या आकृती मधे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?

a) 42
b) 41
c) 40
d) 43

उत्तर: a) 42

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृती मधे जर आपण बारीक निरीक्षण केले तर असे दिसून येते की, वर्तुळाच्या उजवीकडील अर्ध्या भागात ज्या संख्या आहेत त्यांची तिप्पट त्यांच्या विरुद्ध बाजूला दिल्या आहेत. म्हणून, डावीकडील अर्ध वर्तुळ तिप्पट संख्या दाखवतो.
जसे, 5 ची तिप्पट 15, 3 ची तिप्पट 9, 7 ची तिप्पट 21.
म्हणून, 14 ची तिप्पट 42.
म्हणून आपले योग्य उत्तर a) असेल.

4.) खाली दिलेल्या आकृती मधे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?

a) 121
b) 64
c) 100
d) 81
उत्तर: d) 81

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृती चे जर आपण बारीक निरीक्षण केले तर असे दिसून येते की त्रिकोण बाहेरील संख्यांची बेरीज करून जी संख्या येईल तिची तिप्पट त्रिकोणाच्या आत दिली आहे.
जसे,
पहिल्या आकृती मधे,
(3+5+7) = 15 आणि 15 ची तिप्पट 45.

दुसऱ्या आकृती मधे,
(10+11+4)= 25 आणि 25 ची तिप्पट 75.

तिसऱ्या आकृती मधे,
(9+6+12)= 27 आणि 27 ची तिप्पट 81.
म्हणून, आपले योग्य उत्तर d) असेल.

6.) खाली दिलेल्या आकृती मधे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?


a) 32
b) 22
c) 30
d) 26

उत्तर: c) 30

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृती चे जर आपण योग्य निरीक्षण केले तर आपणास असे दिसून येते की तिथे खालील प्रमाणे सूत्र वापरले आहे.
(डावीकडील संख्या × उजविकडली संख्या)+ वरची संख्या + खालची संख्या = वर्तुळ मधील संख्या
याप्रमाणे पहिल्या आकृती मधे,
3×6+2+4=18+6=24

दुसऱ्या आकृती मधे,
1×9+3+5=9+8=17

तिसऱ्या आकृती मधे,
7×4+6+2= 36

आता आकृती चार मधे,
8×3+4+2= 30
म्हणून आपले योग्य उत्तर c) असेल.

In case you have missed: Seema Nagnath Purbuj 1st article on Dice Problems


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT