Skip to content
महाSarkar
Study Materials

Solve these Clock : Aarshatil ani Panyatil Pratima (घड्याळ : आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा) problems to ace Reasoning part

ShankuUpdated
शेअर करा:WhatsApp
Solve these Clock :  Aarshatil ani Panyatil Pratima (घड्याळ : आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा) problems to ace Reasoning part

Solve these “Clock :  Aarshatil ani Panyatil Pratima” problems to ace Reasoning part | या “घड्याळ : आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा” समस्यांचे निराकरण करा तर्कशास्त्र भाग

This is the fourteen no. topic article on Clock :  Aarshatil ani Panyatil Pratima Problems for the Talathi exam as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the घड्याळ : आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा (Clock :  Aarshatil ani Panyatil Pratima) topic.

घड्याळ : आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा:

या घटका मधे आपण घड्याळात किती वाजले हे दिलेले असताना त्याची आरशातील व पाण्यातील प्रतिमा काढली असता किती वाजलेले असतील हे पाहू

१.) जेव्हा घड्याळात किती वाजलेत त्याची आर्शातील प्रतिमा काढायची असेल तर दिलेला वेळ ११:६० मधून वजा करावा.

• जर वेळ तास:मिनिटे:सेकंद मधे दिला असेल तर तो ११:५९:६० मधून वजा करावा.
(कारण ११:६० म्हणजे १२ वाजले आणि ११:५९:६० म्हणजे सुद्धा १२ च वाजले असतील)

• तसेच घड्याळ २४ तासाची दिली असेल तर दिलेला वेळ २३:६० मधून वजा करावा.

• आणि २४ तास घड्याळ मधला वेळ तास:मिनिट:सेकंद असा दिला असेल तर तो २३:५९:६० मधून वजा करावा.

२.) जर घड्याळात किती वाजलेत याची पाण्यातील प्रतिमा काढायची असेल तर दिलेला वेळ १८:३० मधून वजा करावा.

आता आपण यावरील आधारित उदाहरणे सोडवू.

१.) जर घड्याळ मधे ९:३० झाले असतील तर त्याच्या आरशतील प्रतीमे मधे किती वाजलेले असतील?
a) २:३७
b) २:३०
c) ९:००
d) ९:३०
उत्तर: b) २:३०

स्पष्टीकरण :
दिलेला वेळ ९:३०
म्हणून, दिलेल्या वेळेची आरशा तील प्रतिमा काढण्यासाठी तो वेळ ११:६० मधून वजा करू.
११:६०
– ९:३०
_____
२:३०

म्हणून घड्याळ ची आरशतील प्रतिमा २:३० हा वेळ दाखवेल.

२.) ५ वाजून ३५ मिनिटे झाली असताना आरशात किती वाजलेले दिसेल.
a) ६:००
b) ६:३५
c) ६:२५
d) ६:५५
उत्तर: c) ६:२५

स्पष्टीकरण:
दिलेला वेळ ५:३५
दिलेला वेळ ११:६० मधून वजा करू.
११:६०
-५:३५
_____
६:२५
म्हणून आरशात ६:२५ झालेले दिसतील.

३.) घड्याळ मधे ८ वाजून १५ मिनिटे ३५ सेकंद झाली असता आरशात किती वाजलेले दिसतील.
a) ३:४४
b) ३:४४:२५
c) ३:४४:३५
d) ३:४०
उत्तर: b) ३:४४:२५

स्पष्टीकरण:
दिलेला वेळ ८:१५:३५
आपण दिलेला वेळ (१२ तास घड्याळ असल्याने) ११:५९:६० मधून वजा करू आरशात किती वाजलेले असतील हे पाहण्यासाठी.
म्हणून,
११:५९:६०
-८:१५:३५
____
३:४४:२५

म्हणून आरशात ३:४४:२५ वाजलेले दिसतील. म्हणजेच ३ वाजून ४४ मिनिटे आणि २५ सेकंद.

४.) घड्याळ मधे १८ वाजले असतील तेव्हा आरशात किती वाजलेले दिसतील.
a) ५:६०
b) ५:५०
c) ६ वाजलेले
d) a आणि c दोन्ही
उत्तर: d) a आणि c दोन्ही

स्पष्टीकरण:
इथे २४ तासाच्या घड्याळ मधील वेळ दिला आहे.
दिलेला वेळ १८ हा २३:६० मधून वजा करू.
म्हणून,
२३:६०
-१८:००
___
५:६०

म्हणून आरशात ५:६० म्हणजेच ६ वाजलेले दिसतील.

५.) घड्याळ मधे १५ वाजून ४५ मिनिटे ३० सेकंद झाले असतील तर आरशात किती वाजलेले असतील.
a) ८:००
b) ८:१५
c) ७:१४:२५
d) ८:१४:२५
उत्तर: d) ८:१४:२५

स्पष्टीकरण:
दिलेला वेळ १५:४५:३५
म्हणजेच दिलेले घड्याळ २४ तासाचे आहे.
म्हणून, आरशात किती वाजलेत हे काढण्यासाठी दिलेला वेळ २३:५९:६० मधून वजा करू.
म्हणून,
२३:५९:६०
-१५:४५:३५
____
८:१४:२५

म्हणून आरशात ८:१४:२५ म्हणजेच ८ वाजून १४ मिनिटे २५ सेकंद झालेले असतील.

६.) १.२३० तास चे तास, मिनिटे व सेकंद मधे रूपांतर करा.
a) १ तास १३ मिनिटे
b) १ तास १३ मिनिटे ४८ सेकंद
c) १ तास १४ मिनिटे
d) १ तास १५ मिनिटे
उत्तर: b) १ तास १३ मिनिटे ४८ सेकंद

स्पष्टीकरण:
दिलेला वेळ १:२३० तास
म्हणजेच (१ तास + ०.२३० तास)
०.२३० तास = ०.२३०×६० मिनिटे
= २.३×६ = १३.८ मिनिटे
म्हणून
०.२३० तास = १३.८ मिनिटे

आणि १३.८ मिनिटे = १३ मिनिटे + ०.८ मिनिटे

आता ०.८ मिनिटे = ०.८×६० सेकंद = ४८ सेकंद

म्हणून १:२३० तास म्हणजेच १ तास १३ मिनिटे ४८ सेकंद.

७.) जर घड्याळ मधे ७ वाजून २५ मिनिटे झाली असतील तर त्याची पाण्यातील प्रतिमा बघितली असता किती वाजलेले दिसतील.
a) ४:३५
b) ३:३५
c) ११:०५
d) ११: ५५
उत्तर: c) ११:०५

स्पष्टीकरण:
दिलेला वेळ ७:२५
पाण्यातील प्रतिमा मधे किती वाजले हे पाहण्या साठी आपण दिलेला वेळ १८:३० मधून वजा करू.
म्हणून,
१८:३०
-७:२५
___
११:०५

म्हणून पाण्यातील प्रतिमा मधे ११.०५ वाजले असतील.

८.) जर घड्याळ मधे ११:४५ झाले असतील तर त्याची पाण्यातील प्रतिमा किती वेळ दाखवेल.
a)६:४०
b) ६:४५
c) ५:४५
d) ७:४५
उत्तर: b) ६:४५

स्पष्टीकरण:
दिलेला वेळ ११:४५
पाण्यातील प्रतिमा मधे किती वाजले असतील हे पाहण्यासाठी दिलेला वेळ १८:३० मधून वजा करू.
इथे १८:३० ला आपण असे सुद्धा लिहू शकतो १७:(३०+६०)=१७:९०

म्हणून,
१७:९०
-११:४५
_____
०६:४५

म्हणून पाण्यातील प्रतिमा मधे ०६:४५ हा वेळ दिसेल.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”