Solve these “Alphanumeric Series” to ace Reasoning part : या “वर्ण अंक मालिका” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Alphanumeric Series” to ace Reasoning part : या वर्ण अंक मालिकाचे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve Alphanumeric Series:

या टॉपिक मधे आपणास अंक, अक्षर, चिन्हे यांची मालिका दिली जाते व त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न सोडवत असताना आपले बारीक निरीक्षण असणे गरजेचे ठरते. दिलेली अंक अक्षर चिन्ह मालिका अगोदर कागदावर लिहून नंतर तिचे निरीक्षण करून आपण दिलेल्या प्रश्नांची सहज उत्तरे देऊ शकतो. यावरील प्रश्न हे अतिशय सोपे असून फक्त sequence व्यवस्थित पाहणे महत्वाचे असते. जास्तीत जास्त सराव केल्यास अशी उदाहरणे आपण सहज सोडवून जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकतो.

तसेच अशी उदाहरणे सोडवताना डावी आणि उजवी बाजू मधे गोंधळ न घालता ती योग्य रित्या सोडवणे आवश्यक आहे.

खाली काही उदाहरणे दिली आहेत ती आपण सोडवू.

उदाहरणे:

1.) खालील दिलेल्या मालिका मधे अंक, अक्षर, चिन्हे यांची विशिष्ट मांडणी दिली असून त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.

3 A N 5 I R 8 * K 9 $ V R B D H O L Z Y ^ P 2 £ E 1 3 § 5 M © T ® C

1) खालील पैकी कोणते शब्द दिलेल्या मालिका मधून बनवल्या गेलेले नाहीत.

a) CARE

b) HEAD

c) LEAPS

d) BIRD

e) BRICK

उत्तर: c) LEAPS

स्पष्टीकरण:

कारण वरील मालिकेत L, E, A, P हे अक्षर आहेत पण S नाही त्यामुळे आपले उत्तर LEAPS असेल.

2) E या अक्षराच्या डावीकडे 8 व्या स्थानी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे 7 व्या स्थानावर असणारा अक्षर कोणता?

a) Y

b) £

c) R

d) वरील पैकी नाही

उत्तर: b) £

स्पष्टीकरण:

कारण, दिलेल्या मालिकेत E च डावीकडे 8 व्या स्थानावर O आहे. आणि O च उजवीकडे 7 व्या स्थानावर £ आहे. म्हणून आपले योग्य उत्तर £ आहे.

3) दिलेल्या series मधून R, I, L, E ही अक्षरे काढून, K आणि M मधे असणाऱ्या व्यंजन अक्षरांची संख्या किती असेल?

a) 5

b) 6

c) 7

d) 8

उत्तर: c) 7

स्पष्टीकरण:

जर दिलेल्या मालिकेतून R, I, L, E ही अक्षरे काढून टाकली तर खालील मालिका तयार होईल.

3 A N 5 I R 8 * K 9 $ V B D H O Z Y ^ P 2 £ 1 3 § 5 M © T ® C

वर दिलेल्या मालिकेत K आणि M मधे असणारे व्यंजन V, B, D, H, Z, Y, P हे एकूण 7 आहेत.

4) जर दिलेल्या series मधून ^ हे चिन्ह वगळता बाकी सगळी चिन्हे काढून टाकली तर उजवीकडून 23 व्या स्थानी कोणता अक्षर असेल?

a) I

b) K

c) R

d) V

उत्तर: c) R

स्पष्टीकरण:

जर दिलेल्या मालिकेमधून ^ हे चिन्ह वगळता सगळी चिन्हे काढून टाकली तर खालील मालिका तयार होईल.

3 A N 5 I R 8 K 9 V R B D H O L Z Y ^ P 2 E 1 3 5 M T C.

आता वर दिलेल्या मालिकेत उजवीकडून 23 व्या स्थानी R आहे.

5) दिलेल्या मालिकेत I उजवीकडे 5 व्या क्रमांक वर आणि C डावीकडे 5 व्या क्रमांक वर असणाऱ्या अंकांचा गुणाकार काय येईल?

a) 40

b) 45

c) 50

d) 30

उत्तर: b) 45

स्पष्टीकरण:

दिलेल्या मालिकेत I च उजवीकडे 5 व्या स्थानी 9 आहे तर C च डावीकडे 6 व्या स्थानी 5 आहे. म्हणून त्यांचा गुणाकार 9×5=45 असेल.

2.) खाली दिलेल्या अक्षर, चिन्ह आणि अंक मालिकेचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

M $ T R J 1 M * 8 U S P M 7 K I £ M Q Z R L 6 M 9

1) वर दिलेल्या मालिकेत असे किती M आहेत ज्यांच्या नंतर चिन्ह किंवा ज्यांच्या अगोदर अंक आहेत, पण दोन्ही नाहीत?

a) 2

b) 3

c) 4

d) 5

उत्तर: a) 2

स्पष्टीकरण:

दिलेल्या मालिकेत जर आपण बघितले तर असे 2 च M आहेत ज्यांच्या अगोदर अंक आणि ज्यांच्या नंतर चिन्ह आहेत. ते M $ आणि 6 M आहेत.

म्हणून आपले योग्य उत्तर 2 असेल.

2) जर वर दिलेल्या मालिकेतून सगळी विषम अंक काढून टाकली तर तयार होणाऱ्या नवीन मालिकेत उजवीकडून 20 व्या स्थानी काय असेल?

a) T

b) Q

c) 4

d) R

उत्तर: a) T

स्पष्टीकरण:

जर दिलेल्या मालिकेतून सगळी विषम अंक 1,7,9 काढून टाकली तर खालील मालिका तयार होईल.

M $ T R J M * 8 U S P M K I £ M Q Z R L 6 M

आता वर तयार झालेल्या मालिकेत उजवीकडून 20 व्या स्थानी T आहे. म्हणून T हे आपले योग्य उत्तर असेल.

3) जर दिलेल्या मालिकेत डावीकडून पहिली 12 घटक(अंक/अक्षर/चिन्हे) reverse केली आणि उजवीकडून पहिली 12 घटक reverse केली तर नवीन तयार होणाऱ्या मालिकेत उजवीकडून 15 व्या स्थानी काय येईल?

a) M

b) 7

c) S

d) $

उत्तर: d) $

स्पष्टीकरण:

प्रश्न मधे दील्यानुसर जर आपण डावीकडून पहिली 12 घटक रिव्हर्स केली आणि उजवीकडून पहिली 12 घटक reverse केली तर खालील मालिका तयार होईल.

P S U 8 * M 1 J R T $ M M 9 M 6 L R Z Q M £ I K 7

आता वर दिलेल्या मालिकेत उजवीकडून 15 व्या स्थानी $ असेल. म्हणून आपले योग्य उत्तर $ आहे.

4) जर वर दिलेल्या प्रश्ना नुसार reverse करून नवीन मालिका तयार झाल्यास त्यात उजवीकडून 19 व्या स्थानी आणि डावीकडून 14 व्या स्थानी असणाऱ्या अंकांमधील फरक किती असेल?

a) 1

b) 6

c) 7

d) 8

उत्तर: d) 8

स्पष्टीकरण:

प्रश्न 3 मधे नवीन मालिका तयार केली ती खालील प्रमाणे.

P S U 8 * M 1 J R T $ M M 9 M 6 L R Z Q M £ I K 7

आता या मालिकेत उजवीकडून 19 व्या स्थानी 1 आहे आणि डावीकडून 14 व्या स्थानी 9 आहे. म्हणून त्यांच्यातील फरक 9-1=8.

म्हणून आपले योग्य उत्तर 8 असेल.

5) जर प्रश्न 3 मधे दिल्या नुसार reverse करून नवीन मालिका तयार केली तर उजवीकडून 18 व्या स्थानी आणि डावीकडून 8 व्या स्थानी अनुक्रमे काय असेल?

a) KM

b) QJ

c) MJ

d) JJ

उत्तर: d) JJ

स्पष्टीकरण:

प्रश्न 3 मधे दिल्यानुसर reverse करून आपणास खालील मालिका मिळेल.

P S U 8 * M 1 J R T $ M M 9 M 6 L R Z Q M £ I K 7

यात आता उजवीकडून 18 व्या स्थानी आणि डावीकडून 8 व्या स्थानी अनुक्रमे J आणि J आहेत.

म्हणून आपले योग्य उत्तर JJ असेल.

 3.) खाली दिलेली अंक, अक्षर, चिन्हांची मालिका अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

A Z $ 3 8 B & 7 A X © 6 U C @ Y O M 4 D K I 2 Q E € ® F T L 9 S G V A %

1) वर दिलेल्या मालिकेत असे एकूण किती चिन्ह आहेत ज्यांच्या आधी स्वर येतात आणि ज्यांच्या नंतर अंक नाहीत आणि अक्षर सुद्धा नाहीत?

a) 4

b) 3

c) 2

d) 1

उत्तर: c) 2

स्पष्टीकरण:

दिलेल्या मालिकेत आपणास असे चिन्ह शोधायचे आहेत ज्यांच्या आधी स्वर आहेत आणि ज्यांच्या नंतर अंक आणि अक्षर दोन्ही सुद्धा नाहीत.

असे चिन्ह € आणि % हेच आहेत. म्हणून आपले योग्य उत्तर 2 असेल.

2) जर वर दिलेल्या मालिकेतून सगळे स्वर काढून टाकले तर तयार होणाऱ्या नवीन मालिकेत डावीकडून तिसऱ्या स्थानी असलेल्या घटकाच्या उजवीकडे 15 व्या स्थानी काय असेल?

a) K

b) D

c) Q

d) 2

उत्तर: d) 2

स्पष्टीकरण:

जर दिलेल्या मालिकेतून आपण सगळी स्वर काढून टाकली तर खालील मालिका तयार होईल.

Z $ 3 8 B & 7 X © 6 C @ Y M 4 D K 2 Q € ® F T L 9 S G V %

या नवीन मालिकेत डावीकडून तिसऱ्या स्थानी 3 आहे. आणि 3 च उजवीकडे 15 व्या स्थानी 2 हा अंक आहे. म्हणून आपले योग्य उत्तर 2 आहे.

3) वर दिलेल्या मालिकेचे

निरीक्षण करून खाली विचारलेल्या प्रश्नांमध्ये ? ठिकाणी काय येईल?

A$3 B7A ? YM4

a) ©UC

b) U©C

c) @UC

d) UC@

उत्तर: c) @UC

स्पष्टीकरण:

दिलेल्या मालिकेचे निरीक्षण करून पाहिले अक्षर A घेउन नंतर एक सोडून लगेच आलेली दोन्ही घटक $3 घेतली आहेत.

पुन्हा एक सोडून B घेउन एक सोडून नंतर आलेली 7A लगेच घेतली आहेत.

तसेच, आता एक सोडून © येईल आणि नंतर लगेच एक सोडून UC येईल. म्हणून आपले योग्य उत्तर @UC असेल.

4) दिलेल्या मालिकेत $ आणि T यांमध्ये असलेल्या विषम अंकांची बेरीज किती?

a) 10

b) 20

c) 24

d) 30

उत्तर: a) 10

स्पष्टीकरण:

दिलेल्या मालिकेत $ आणि T यांच्यामधे असलेले विषम अंक 3 आणि 7 आहेत. म्हणून त्यांची बेरीज 3+7=10 असेल. म्हणून आपले योग्य उत्तर 10 आहे.

5) खाली दिलेल्या चार पर्याय मधे बसणारा पर्याय शोधा.

a) A %

b) $ V

c) G 3

d) Z A

उत्तर: c) G 3

स्पष्टीकरण:

दिलेल्या पर्याय मधे सुरुवात डावी कडल्या अक्षरपसून केली आहे आणि त्याच स्थानावर उजविडकुन असणाऱ्या अक्षरपासून end केला आहे. फक्त पर्याय c) G3 हे follow करत नाही म्हणून G3 हा गटात न बसणारा पर्याय आहे.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT