Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 08 : वरिष्ठ लिपिक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०८

Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 08 | Animal Husbandry Department Practice paper 08 | AHD Maharashtra Practice Papers

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ४४६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक ,लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक०८

विभाग मराठी

1) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
A. सोहमचा आनंद दिव्यगुणित झाला.
B. उगाच तिरास्कार करू नये.
C. तो स्वायलंबी होता.
D. त्याने अत्युच्च शिखर गाठले.
Answer: D. त्याने अत्युच्च शिखर गाठले.

2) ‘अनुरक्ती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A. जिव्हाळा
B. स्नेह
C. संताप
D. पाठिंबा
Answer: C. संताप

3) वळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो ।
त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो ||
वरील ओळींत …….. हा अलंकार वापरला गेला आहे.
A. अर्थान्तरन्यास
B. उत्प्रेक्षा
C. व्यतिरेक
D. भ्रांतिमान
Answer: C. व्यतिरेक

4) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
कावळा बसायला अन ——— तुटायला.
A. घरटी
B. छप्पर
C. काठी
D. फांदी
Answer: D. फांदी

5) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
जगाचे नियंत्रण करणारा
A. जगनिवारक
B. जगन्नियंता
C. जगन्नाथ
D. जीवनकर्ता
Answer: B. जगन्नियंता

6) पुढील वाक्यातील विधेयविस्तार ओळखा. भुरभुरत्या पावसात ताजमहालाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
A. भुरभुरत्या पावसात
B. ताजमहालाचे
C. खुलून
D. दिसते.
Answer: A. भुरभुरत्या पावसात

7) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. अरेरे! किती हे करुण दृश्या
A. विध्यर्थी
B. उद्गारार्थी
C. नकारार्थी
D. आज्ञार्थी
Answer: B. उद्गारार्थी

8) पुढील वाक्यातील अव्यय ओळखा.
जिने चढून जाण्यापेक्षा लिफ्टने जाणे बरे पडेल.
A. बरे
B. जिने
C. लिफ्ट
D. पेक्षा
Answer: D. पेक्षा

9) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. अकलेचा कांदा असणे-
A. प्रचंड बुद्धीमत्ता असणे
B. सुमार बुद्धीचा असणे
C. अक्कल हुशारीने वागणे
D. अतिशहाणा नसणे
Answer: B. सुमार बुद्धीचा असणे

10) दिलेल्या धातूचे ‘कृदंत’ (साधित) रूप ओळखा.
खाणे
A. खातो
B. खाते
C. खात
D. खते
Answer: C. खात

विभाग-२ इंग्रजी

11) Find the word opposite in meaning to the word:
Ominous
A. Auspicious
B. Dire
C. Doomy
D. boding
Answer: A. Auspicious

12) Pick the right antonym for the word:
Candid
A. Inhibited
B. Direct
C. Difficult
D. Upfront
Answer: A. Inhibited

13) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
We plan to lay out five lakhs for this business.
A. To spend systematically
B. Store for the future
C. To abandon for a while
D. To lease on hire
Answer: A. To spend systematically

14) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Trump attempted to mediate between the powers to end the war.
A. Cut in the middle
B. Arbitrate
C. Obliterate
D. Eliminate
Answer: B. Arbitrate
15) pick the correct meaning of the highlighted idiom;
In my neighbourhood there is a decent house which is let out.
A. To study one’s surroundings
B. To allow to go free
C. To prove of worth
D. To lease on hire
Answer: D. To lease on hire

16) Identify the figure of speech in the following sentence:
Will ask the lawyer to give his unbiased opinion on the case
A. Oxymoron
B. Metaphor
C. Euphemism
D. Apostrophe
Answer: A. Oxymoron

17) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following
Her house is situated a km from here, as the crow flies
A. in a straight line
B. Go in the direction of the flying crow

C. At a very long distance
D. In a maze and in a jumbled up way
Answer: A. In a straight line

18) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:
My not getting a job there proved to be a blessing in disguise.
A.a disguised appearance of pure evil
B.a disappointment to one’s morals and ideals
C. something good that isn’t recognized at first
D. a disaster that disguised itself as a bad thing
Answer. C. something good that isn’t recognized at first

19) Fill in the blank with the correct noun for the given sentence:
it is hard to cope with even everyday without a certain amount of ——– events.
A. managerial
B. management
C. manages
D. manage
Answer. B. management

20) Pick the right antonym for the word:
Lanky
A. bulky
B. gangly
C. thin
D. pleasant
Answer: A. bulky

विभाग-३ गणित

21) आज वडिल आणि मुलाच्या वयांचे संबंधित गुणोत्तर 7:3 आहे. 5 वर्षांनंतर हे गुणोत्तर अनुक्रमे 2:1 होईल. मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलांचे वय काय असेल?
A. 18 वर्ष
B. 24 वर्ष
C. 22 वर्ष
D. 20 वर्ष
Answer: D. 20 वर्ष

22) ——– च्या 20%, 46 असतात.
A. 230
B.225
C.232
D.235
Answer: A. 230

23) सुलतानने 2,000 रुपयांची एक वस्तू विकत घेतली. त्याला जर 20% नफा मिळवायचा असेल तर त्याने ती कोणत्या किमतीला विकली पाहिजे?
A. 2,100 रुपये
B. 2,200 रुपये
C. 2,300 रुपये
D. 2,400 रुपये
Answer: D. 2,400 रुपये

24) सबिता 30 किमी अंतरावर असलेल्या पिंकींच्या घराच्या दिशेने ताशी 10 किमी वेगाने रेसिंग सायकल चालवत जाते. घराकडे परतत असताना ती ताशी 15 किमी वेगाने सायकल चालवते. तिचा सरासरी वेग किती आहे?
A. ताशी 12 किमी.
B. ताशी 15 किमी.

C. ताशी 20 किमी.
D. ताशी 25 किमी.
Answer: A. ताशी 12 किमी

25) जर एक खेळ जिंकण्याची संभाव्यता 0.76 आहे. तर खेळ हरण्याची संभाव्यता काय आहे?
A. 1
B.0.42
C.0.34
D.0.24
Answer: D.0.24

26) वयाबद्दल विचारले असता एका व्यक्तीने सांगितले, “त्याचे वय पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांची बेरीज केल्यावर मिळते.” तर त्या व्यक्तीचे वय किती?
A.100
B.50
C.120
D.150
Answer: C.120

27) 13 पेपरांच्या गुणांची सरासरी 50 आहे. पहिल्या 7 पेपरांची सरासरी 52 आणि शेवटच्या 7 पेपरांची सरासरी 45 आहे. सातव्या पेपरचे गुण काय आहेत?
A. 25 गुण
B. 26 गुण
C. 29 गुण
D. 32 गुण
Answer: C. 29 गुण

28) VERTEXVERTEX… वाक्याकडे लक्ष द्या जेथे VERTEX ची 10 वेळा पुनरावृत्ती झाली आहे. 1 ल्या टप्प्यामध्ये सर्व विषम स्थानावरील अक्षरे काढून टाका. 2 या टप्यामध्ये सर्व विषम स्थानावरील अक्षरे काढून टाका. एक अक्षर शिल्लक राहिल तोपर्यंत हे पुनरावृत्त करा. ते अक्षर काय आहे?
A.V
B.T
C.X
D.E
Answer: D.E

29) एक चोर दुपारी 2:30 वाजता एक कार चोरतो आणि ती ताशी 60 किमी वेगाने पळवतो. पोलीस दुपारी 3:00 वाजता ताशी 75 किमी वेगाने जिथून त्याने कार चोरली त्या ठिकाणाहून त्याचा पाठलाग सुरू करतात. तर पोलीस किती वाजता त्याला पकडतील?
A. सायं 05:15

B. सायं. 04:25
C. सायं 05:00
D. सायं. 04:55
Answer: C. सायं 05:00

30) एक कृष्णधवल छायाचित्र अनुक्रमे 60% काळे आणि 40% पांढरे आहे. त्या छायाचित्राचा आकार 2 पट वाढविल्यास पांढऱ्या रंगाची टक्केवारी आहे
A.80%
B.60%
C.50%
D.40%
Answer: D. 40%

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) लक्षद्वीप बेट ही अरबी समुद्राच्या ———- किनारपट्टी लगत स्थित आहेत?
A. तामिळनाडू
B. महाराष्ट्र
C. केरळ
D. आंध्र प्रदेश
Answer: C. केरळ

32) ——- द्वारे क्षय रोगाचा (टीबी) जीवाणूचा शोध घेतल्याचा स्मरणोत्सव म्हणून मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा केला जातो.
A. डॉ. अँटनी वॅन लीयुवेनहोएक
B. डॉ. लुइस पाश्वर
C. डॉ. रॉबर्ट कोच
D. डॉ. एडवर्ड जेन्नर
Answer: C. डॉ. रॉबर्ट कोच

33) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवण्यासाठी विधेयक राखून ठेवण्याच्या राज्यपालाच्या अधिकाराशी संबंधित तरतुद दिली आहे?
A. अनुच्छेद 443
B. अनुच्छेद 345
C. अनुच्छेद 76
D. अनुच्छेद 200
Answer: D. अनुच्छेद 200

34) राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातील ——— नदीवर स्थित आहे?
A. साबरमती
B. कृष्णा
C. भीमा
D. अंबा
Answer: D. अंबा

35) भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ——– द्वारे केली जाते.
A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. राज्यपाल
D. कायदा आणि न्याय मंत्री
Answer: A. राष्ट्रपती

36) उष्णकटिबंधीय सदाहरित वनांप्रमाणे पुढीलपैकी कोणते प्रजातीमध्ये समृद्ध आहे?
A. प्रवाळ भित्ति
B. काटेरी वने
C. सूचिपर्णी वने
D. वाळवंट
Answer: A. प्रवाळ भित्ति

37) पाण्याच्या वाफेचे रुपांतर पाण्यामध्ये होणे म्हणजे ——- होय.
A. दृढीभवन
B. बाष्पीभवन
C. शीतकरण
D. उष्णता
Answer: A. दृढीभवन

38) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लोकसभेतील अध्यक्ष घेतला आहे.
A.कॅनडा
B. युनायटेड किंगडम
c. ऑस्ट्रेलिया
D. जर्मनी
Answer: B. युनायटेड किंगडम

39) पुढीलपैकी कोणते सत्य आहे?
(A) भारतीय संविधानाने असे म्हटले आहे की “राज्य हे पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे आणि देशातील वने व वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करेल.
(B) भारतीय संविधानाने असे म्हटले आहे की “वने, तलाव, नद्या आणि वन्यजीवन यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा करणे आणि जीवित प्राण्यांसाठी दया करणे हे भारतातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.
A. केवळ A सत्य आहे.
B. केवळ B सत्य आहे
C. दोन्ही A आणि B सत्य आहे
D. दोन्ही A आणि B सत्य नाही
Answer: C. दोन्ही A आणि B सत्य आहे

40) मुगल सम्राट अकबरच्या दरबारातील मुख्य सदस्यांना “नवरत्न” असे म्हणतात त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?
A. बिरबल
B. राजा भारमल
C. तानसेन
D. राजा मानसिंह
Answer: B. राजा भारमल

Also See: Previous Day Practice Paper Set (Total 40 Questions)


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT