विभाग स्तरावर नमो महारोजगार भव्य मेळावा पुणे/ Namo Maharojgar Melava Pune

विभाग स्तरावर नमो महारोजगार भव्य मेळावा पुणे/ Namo Maharojgar Melava

Namo Maharojgar Melava 2024

Namo Maharojgar Melava 2024: आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी किंवा मग खाजगी चांगल्या नोकऱ्यांमध्ये सुद्धा उमेदवारांमध्ये इतकी स्पर्धा वाढल्याची दिसून येते की एक चांगला जॉब मिळवणे म्हणजे जणू सहावी मूलभूत गरजच होऊन बसलीय. त्यातल्या त्यात काही ठिकाणी उत्तम कौशल्य आणि पैसा असल्यामुळे लोक समोर निघून जातात. परंतु ज्या लोकांमधे कौशल्य असते परंतु ते सिद्ध करून नोकरी मिळवण्याची, त्याला भांडवल उपलब्ध करून देऊन विकास करण्याची, पैसाचे साधन म्हणून व्यवसाय सुरू करण्याची मदत मात्र न मिळाल्याने असे लोक मागे राहताना आपणास दिसतात. म्हणूनच अशा कौशल्य मधे निपुण असणाऱ्या बेरोजगार तरुणांना स्फूर्ती देण्यासाठी, स्वयं रोजगार उपलब्ध करून तो कसा पुढे नेता येईल आणि कुटुंबासोबत देशाचा पण विकास कसा करता येईल यासाठी एका भव्य महा रोजगार मेळाव्याचे आयोजन पुणे जिल्ह्यामधील बारामती इथे केले आहे. ही आजच्या युवा तरुण पिढीसाठी एक आनंदाची च बाब आहे असे आपण म्हणू शकतो. केवळ पुणे जिल्हा मधील च नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश या सर्व विभागातून म्हणजेच एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र मधून अनेक युवा तरुण इथे रोजगार मिळावा यासाठी उपस्थिती दर्शवणारी आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही सुवर्ण संधी सोडू नको आणि 2 मार्च ते 3 मार्च 2024 दरम्यान होणाऱ्या नमो महा रोजगार मेळावा 2042 मधे नक्की सहभाग नोंदवून आपले भविष्य उज्ज्वल करा.

पुणे जिल्ह्यातील बारामती या तालुका मधे विद्या प्रतिष्ठान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे या भव्य महा रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 2 मार्च 2024 ते 3 मार्च 2024 या कालावधी मधे करण्यात आले आहे. या महा रोजगार मेळावा मधून तब्बल 43,613 उमेदवारांची निवड महाराष्ट्र मधील विविध विभागात तसेच विविध नामांकित कंपनी मधे केली जाणार आहे. यासाठी हा रोजगार मेळावा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

या महा रोजगार मेळावा मधे उमेदवारांना सहभागी होण्या करिता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा दिली आहे. तसेच जर उमेदवारांना या महा रोजगार मेळावा मधे सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी [email protected] किंवा [email protected] या दोन ईमेल आयडीवर संपर्क साधावा. या महा रोजगार मेळावा मधे तब्बल 250 आणि त्यापेक्षा अधिक नामांकित कंपनी उपस्थित राहणार असून खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या महा रोजगार मेळावा मधे पुणे विभाग मधील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे पुणे विभाग मधील जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा फायदा करायला हवा.

आज आपण संपूर्ण भारताचा विचार केला तर हे दिसून येते की आज लाखो तरुण सुशिक्षित असून सुद्धा बेरोजगार आहेत आणि त्यामुळेच आत्महत्या चे प्रमाण सुद्धा वाढल्याचे दिसून येते. नोकरी नसल्या कारणाने निर्माण होणारे नैराश्य, वाढते वय, वाढती महागाई, मानसिक त्रास, कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक ताण आणि नोकरीच्या उपलब्ध असलेली कमी संधी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे उमेदवार मधे असलेली अफाट स्पर्धा या सर्व कारण यामुळेच तरुण बेरोजगार यांचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रतेक तरुण जर सरकारी नोकरी करीता झटत राहिला तर प्रत्येकाला तर ती संधी मिळणे अवघड आहे कारण असे लाखो उमेदवार असणार आहेत. त्यामुळेच सुशिक्षित बेरोजगार तरुण यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांच्या शिक्षण आणि कौशल्याला वाव मिळावा आणि त्यातून च रोजगार निर्माण व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात या महा रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे. भारत देशामधील तरुणांची बेरोजगारी नष्ट करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कित्येक राज्यात आणि जिल्ह्यात असे भव्य महा रोजगार मेळाव सारखे आयोजित केले जातात आणि त्यातून हजारो तरुण स्वावलंबी बनून कुटुंबाची जबाबदारी घेताना आपणास दिसते आहे. पुणे विभाग मार्फत पुणे जिल्ह्यातील बारामती येथे होणाऱ्या भव्य नमो महा रोजगार मेळावा मधे उमेदवारांची कौशल्य चाचणी, त्यांची मुलाखत घेऊन योग्य त्या उमेदवारांना लगेच नियुक्त्या देण्याचे नियोजन सुद्धा केल्या जाणार आहे. जर तुमच्या मधे कौशल्य असेल आणि आत्मविश्वास असेल तर नक्कीच ही एक स्वतः चालून आलेली संधी च आहे असे आपण म्हणू शकतो. मागील वर्ष पासून कित्येक सरळसेवा भरती परीक्षा झाल्या आणि त्या मार्फत हजारो तरुण यांना सरकारी नोकऱ्या सुद्धा मिळाल्या आहेत. परंतु एक दोन गुणांनी मागे राहिलेले तरुण नोकरी पासून वंचित आहेत, अशा तरुणांना ही एक मिळालेली सुवर्ण संधी आहे. एकीकडे सरकारी नोकरी तर दुसरीकडे खाजगी IT कंपन्या मधे मिळणारा गलेलठ्ठ पगार यांचे आकर्षण उमेदवारांमध्ये जास्त असल्याचे दिसून येते. मग बघत काय आहात लगेच तयारीला लागा आणि आपली सर्व योग्य ती शैक्षणिक आणि अन्य प्रमाणपत्र घेऊन आपले कौशल्य, ज्ञान मुलाखत मधून दाखवून देण्यास सज्ज व्हा. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी महा स्यायम यांच्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे दिनांक 2 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता महारष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उप मुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार सुद्धा या नमो महा रोजगार मेळावा चे उद्घाटन करणार आहेत. तसेच या मेळाव्याला नोंदणी करणारे 20 हजार पेक्षा जास्त उमेदवार आहेत, त्यामुळे कोणतीही संधी न दवडता लगेच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून या मेळावा मधे नक्कीच सहभागी व्हा आणि आपले भविष्य उज्ज्वल करा.

एकंदरीत या मेळावा मधे Mechanical, Machineary, IT industry, Customer Care Exicutive, Sales Exicutive, Doctors, Data Entry Operators, Nurse, Medical Exucutive अशा विविध क्षेत्रातील कंपन्या उपस्थिती दर्शवून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार आहेत.

या मेळावा मधे येणाऱ्या उमेदवारांची आणि पाहुण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बारामती पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या सोबत बरेच वरिष्ठ अधिकारी सुद्धा याचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे ही एक भव्य दिव्य मेळावा होणार असल्याचे दिसून येत. इच्छुक उमेदवारांनी कोणतीही दिरंगाई न करता लगेच खाली दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करून तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकता.

https://www.rojgar.mahaswayam.gov.in

जर तुम्ही अशाच विविध नोकरीच्या संधीचा शोधात असाल तर तुम्ही योग्य प्लॅटफॉर्म वर भेट दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्र मधील विविध विभागात होणाऱ्या सरळसेवा भरती असो की खाजगी संस्था मधे होणारी भरती , सोबतच नमंकित कंपन्या मधे नोकरीची संधी उपलब्ध होतात त्या तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आमचे telegram channel 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT