तृतीयपंथीयांना पोलीस भरती मधे दिल्या जाणार संधी

Maharashtra police constable salary 2024

Maharashtra Transgender Bharti | तृतीयपंथीयांना पोलीस भरती मधे दिल्या जाणार संधी

Maharashtra Transgender Bharti: आपणा सर्वांना माहिती आहे की मागच्या टप्प्यात च मोठ्या प्रमाणात पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर अजून 17 हजार पेक्षा जास्त पदे सुद्धा भरल्या जाणार आहेत. पोलीस भरती म्हणजे आधी शारिरीक चाचणी पूर्ण करणे, परंतु तृतीय पंथी उमेदवार या शारीरिक चाचणीचे निकष पूर्ण न करू शकल्याने त्यांना या भरती मधे सामील करण्यात आले नाही. परंतु काही तासांपूर्वी च गृह विभाग मार्फत असे आदेश देण्यात आले की तृतीयपंथी उमेदवार सुद्धा ह्या पोलीस भरती मधे पात्र ठरणार आहेत. त्यामुळे त्यांचा या भरती मधे येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्र मधून तब्बल 73 तृतीयपंथी उमेदवारांनी या पोलिस भरती प्रक्रिया मधे प्रवेश नोंदविला होता. त्यामुळे यांना आता या भरती मधे समाविष्ट करून घेण्यासाठी पोलीस विभाग मार्फत प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यांच्या शारीरिक चाचणी चे योग्य निकष सुद्धा ठरले जाणार आहेत. त्यामुळे तृतीय पंथी उमेदवारांना न्याय मिळून ते सुद्धा पोलीस म्हणून कामगिरी करू शकतात याची खात्री आता त्यांना मिळाली आहे. या पोलिस शिपाई भरती प्रक्रिया मधे नागपूर विभाग मधून तृतीय पंथी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला असल्याचे दिसून येत आहे. या उमेदवारांना संधी देण्यासाठी काही दिवसांपासून निवड यादी सुद्धा रोखून ठेवल्या कारणाने उमेदवारांमध्ये असंतोष दिसत होता परंतु आता तो सुद्धा मिटला असल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेची सुनावणी झाल्यावर पोलीस भरती मधे तृतीय पंथी यांना सामावून घेण्यासाठी एक समिती स्थापन केली त्यात एकंदरीत सहा सदस्य नेमण्यात आले होते. त्या समिती मधे गृह प्रधान सचिव, आरोग्य विभाग चे संचालक, विधी व न्याय विभाग चे सहसचिव, मानस शास्त्रज्ञ आणि दोन डॉक्टरांचा सुद्ध समावेश करण्यात आला. याच सहा सदस्य यांनी अभ्यासपूर्वक एक नियमावली बनवली आणि तो अहवाल 31 जानेवारीला शासनाकडे मांडला. या अहवालावर फेरविचार करून शासनाकडून पोलीस भरती प्रक्रिया मधे तृतीय पंथी यांना संधी देण्याचे आणि त्यांची शारीरिक चाचणी चे निकश ठरविण्याचे आदेश पारित केले गेले.

तृतीय पंथी उमेदवारांना पोलीस शिपाई भरती प्रक्रिया मधे प्रवेश घेण्यासाठी त्यांना शारीरिक चाचणी करीता खालील पूर्तता पूर्ण करावी लागणार आहे आणि त्यानंतरच ते त्यासाठी पात्र ठरवले जाऊन त्यांना पुढच्या परीक्षेची तयारी करता येणार आहे.

तृतीय पंथी उमेदवारांना शारीरिक चाचणी चे निकष:

  • महिला उमेदवार याच्यासाठी त्यांची उंची 158 सेमी पेक्षा कमी नसावी तर पुरुष उमेदवार यांची उंची 165 सेमी इतकी असावी हा निकष मांडण्यात आला आहे.
  • शारीरिक चाचनीच्या छातीच्या निकष मधून या उमेदवारांना वगळण्यात आले आहे किंवा सूट दिली आहे.
  • यात तृतीय पंथी यांना स्वतः तृतीय पंथी पुरुष, महिला किंवा तृतीय पंथी म्हणून ओळख निश्चित करण्याचा अधिकार दिली गेलं आहे.
  • या उमेदवारांना शारीरिक चाचणी द्यावी लागणार असून ती 50 गुणांची असणार आहे.
  • तृतीय पंथी पुरुष यांना 1600 मीटर अंतर धाव ल्यास एकूण 30 गुण देणार आहेत तर याच पुरुषांना गोळा फेक मधे 20 गुण दिल्या जाणार आहेत.
  • सोबत च जर तृतीय पंथी महिला असतील तर त्यांना 800 मीटर अंतर धाव ल्यस 30 गुण मिळणार आहेत तर गोळा फेक मधे 20 गुण दिल्या जाणार आहेत.
  • एकंदरीत कोणताही भेदभाव न करता पोलीस भरती प्रक्रिया मधे तृतीय पंथी उमेदवारांना शारीरिक चाचणी मधे सहभागी होऊन आपली गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे.

इतकेच नव्हे तर सरकारी नोकर भरती मधे तृतीय पंथी यांना सामावून घेण्यासाठीची प्रक्रिया सुध्धा सुरू असल्याचे दिसून येते. तृतीय पंथी उमेदवार सुद्धा पोलीस होण्याचे स्वप्न तर उराशी बाळगून आहेतच परंतु त्यासाठी आतोनात मेहनत आणि प्रयत्न सुद्धा ते करत आहेत. त्यांना डिसेंबर 2022 पोलीस भरती प्रक्रिया मधे प्रवेश न मिळाल्याने त्या उमेदवारांनी न्यायालयात धाव घेऊन न्याय मागितला. परंतु ya याचिकेची सुनावणी झाल्यावर असे दिसून आले की न्यायालय सुद्धा तृतीय पंथी उमेदवारांना सरकारी नोकरी भरती प्रक्रिया मधे संधी देऊ इच्छिते आहे. त्यामुळे विविध विभाग मधे त्यांच्या निवडीचे निकष ठरवून त्यांना सुद्धा समान संधी देण्याचे नियोजन सरकार कडून चालू असल्याचे दिसून येत आहे.

तृतीय पंथी उमेदवार समाजात स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी नेहमी प्रयत्न शील असतात परंतु त्यांचा प्रयत्नांना नेहमीची योग्य संधी मिळते असे नाही. त्याच मुळे ते मागे असल्याचे दिसू येते, म्हणून च आता त्यांना पोलीस भरती मधे पोलीस शिपाई व पोलीस चालक म्हणून संधी मिळणार असल्याचे गृह विभाग मार्फत कळाले आहे. त्यामुळे हा एक अमुलाग्र बदल च असल्याचे आपण सांगू शकतो. ज्यामुळे तृतीय पंथी उमेदवारांना समाजात प्रतिष्ठेने जगण्याची आणि वावरण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही एक आनंदाची बातमी त्या उमेदवारांसाठी असणार आहे. आता पुढे होणाऱ्या प्रतेक पोलीस भरती प्रक्रिया मधे तृतीय पंथी यांना संधी देऊन त्यांना सुद्धा देशासाठी उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे ही एक खूप मोठी आणि अभिमानाची बाब आहे असे आपण म्हणू शकतो.

जर तुम्ही वी विविध स्पर्धा परीक्षा, सरकारी किंवा खाजगी नोकरीच्या शोधात असल तर नक्कीच आमचे telegram channel Mahasarkar जॉईन करा आणि जगात घडणाऱ्या प्रत्येक फायद्याच्या नव्हे तर इतर घडामोडींचा आढावा घ्या.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT