District wise DV schedule for Pavitra Portal Teachers Recruitment

maha govt

पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरती मधील Without Interview Round मधील प्रतेक जिल्ह्याचे Document Verification (कागदपत्र पडताळणी) वेळापत्रक

महाराष्ट्र राज्यात गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया न झाल्याने DEd – BEd उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे असे कित्येक उमेदवार शिक्षक भरती प्रक्रिया कधी होणार याची वाट बघत होते. परंतु तो दिवस शेवटी उजाडला आणि तब्बल 11,000 पदे पहिल्याच प्रयत्नात विना मुलाखत मधे भरली जाणार आहेत. या साठी ची निवड यादी सुद्धा प्रसिद्ध झाली आहे. अनेक अडथळे दूर करून शिक्षण विभाग मार्फत दिवसाचे 24 तास काम करून ही शिक्षक भरती प्रक्रिया अगदी एका महिन्यात पूर्ण करण्याची जोखीम आज पूर्ण झाल्याची दिसते आहे. केवळ 11 हजार उमेदवार च नाही तर अकरा हजार कुटुंबांचे स्वप्न, त्यांची उदरनिर्वाहाची सोय झाल्याची दिसून येते आहे. त्यामुळे ही अत्यंत आनंदाची बाब आहे असे आपण म्हणू शकतो. एकीकडे जिल्हा परिषद शाळा मधे शिक्षकांची कमतरता आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात बेरोजगार असणारे DEd BEd तरुण या सर्वांना आता न्याय मिळाला आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो. आजपर्यंतच्या इतिहासात ही शिक्षक भरती प्रक्रिया सर्वात मोठी शिक्षक भरती प्रक्रिया ठरणार आहे. सुरुवातीला विना मुलाखत निवड यादी जाहीर केली गेली आणि त्यानुसार प्रतेक जिल्ह्यामधे निवड झालेल्या उमेदवारांना त्या त्या जिल्ह्यात दिलेल्या वेळापत्रक नुसार कागदपत्र पडताळणी करीता जायचे आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपले सगळी कागदपत्रे तयार ठेवून त्या मुदतीत आपली निवड ज्या जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगरपालिका, नगर परिषद, संस्था इथे झाली आहे त्यांनी दिल्या नुसार त्या वेळेत आणि त्या कागदपत्रे यांचा यादी नुसार तिथे पोहोच्याचे आहे. दिलेल्या वेळापत्रक नुसार कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्या नंतर जे उमेदवार कागदपत्र पडताळणी मधे पात्र ठरलेत त्या उमेदवारांना पुन्हा नियुक्ती आणि समुपदेशन करीता बोलावले जाईल. आणि त्यावेळी त्यांना नियुक्त्या देऊन निवड झालेल्या सबंधित शाळेत रुजू होण्यासाठी सांगितले जाईल. त्यामुळे आता कित्येक उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न तर पूर्ण होणारच आहे सोबत चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षक सुद्धा मिळणार आहे ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. जर तुमची निवड संपूर्ण महाराष्ट्र मधील कोणत्याही जिल्हा परिषद, महा नगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, संस्था मधे विना मुलाखत मधे निवड झाली असेल तर तुम्हाला सदरच्या आस्थापना मधे कधी आणि कोणते कागदपत्र घेऊन पडताळणी करीता जायचे आहे हे माहिती करून घेण्यासाठी आम्ही खाली दिलेली माहिती नक्कीच अभ्यासा.

इथे आम्ही आपणास जिल्ह्यानुसर संपूर्ण वेळापत्रक दिला आहे, तुम्ही तुमचा जिल्हा निवडून तो वेळापत्रक पाहू शकता. तसेच खाली दिलेल्या संपूर्ण कागदपत्रांची यादी दिली आहे ती कागदपत्रे आणि सोबत झेरॉक्स कॉपी संच घेऊन तिथे दिलेल्या वेळेत हजर व्हा आणि आपले शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्णत्वाला न्या.

Document Verification ल जाताना सोबत न्यावयाची आवश्यक कागदपत्रे:

खाली दिलेली कागदपत्रे योग्य रित्या तपासून दिलेल्या अटी आणि नियमात बसत असतील तरच तुम्ही कागदपत्र पडताळणी मधे पात्र ठरणार आहात याची दक्षता घ्या. आणि तुमच्या कागदपत्र पडताळणी करीता आमच्या महा सरकार कुटुंबाकडून मनपूर्वक शुभेच्छा…!

1.) पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्व प्रमाणपत्राची प्रत (self certify copy मूळ प्रत फोटो आणि स्वाक्षरी सहित)

2.) एस एस सी गुणपत्रक (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

3.) एस एस सी प्रमाणपत्र (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

4.) एच एस सी गुणपत्रक (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

5.) एच एस सी प्रमाणपत्र (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

6.) पदवी परीक्षा गुणपत्रक (सबंधित विषयात ५०% गुणासह उत्तीर्ण) (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

7.) पदवी परीक्षा प्रमाणपत्र (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

8.) पद्व्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

9.) पदव्युत्तर पदवी परीक्षा प्रमाणपत्र (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

10.) शिक्षणशास्त्र पदविका गुणपत्रक डीएड/ डीएलएड /डी टी एड / टी सी एच (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

11.) शिक्षणशास्त्र पदविका प्रमाणपत्र डीएड/ डीएलएड /डी टी एड / टी सी एच (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

12.) शिक्षणशास्त्र पदवी गुणपत्रक बी एड/ बी एल एड/ बी एस्सी बीएड (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

13.) शिक्षणशास्त्र पदवी प्रमाणपत्र एड/ बी एल एड/ बी एस्सी बीएड (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

14.) एम एस सी आय टी प्रमाणपत्र

15.) शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ (TET Paper १) प्रमाणपत्र इयत्ता पहिली ते पाचवी करीता (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

16.) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 प्रमाणपत्र (CTET पेपर १) इयत्ता पहिली ते पाचवी करिता (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

17.) शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन टीईटी २ (भाषा – कोणताही विषयातून उत्तीर्ण, गणित – गणित व विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक) (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

18.) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन CTET २ ( भाषा – कोणताही विषय घेऊन उत्तीर्ण, गणित – विज्ञान आणि गणित विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक) (१२/०२/२०२३ पूर्वीचे)

19.) अभी योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्रक / यादी (TAIT score Card)

20.) जातीचे प्रमाणपत्र

21.) जात वैधता प्रमाणपत्र (ST करीता अनिवार्य)

22.) नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र (SC, ST वगळून)

23.) लहान कुटुंब प्रमाणपत्र

24.) शाळा सोडल्याचा दाखला

25.) जन्म प्रमाणपत्र (शाळांत प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला)

26.) महाराष्ट्रतील रहिवासी असल्याचा दाखला (अधिवास प्रमाणपत्र) (सीमा भागातील असल्यास रहिवासी दाखला)

27.) आधार कार्ड/ pan कार्ड/ पासपोर्ट/ ड्रायव्हिंग लायसन्स

28.) अपंगत्वाचा दाखला (संगणकीय प्रणाली मार्फत वितरीत प्रमाणपत्र) (किमान ४०% दिव्याग असल्याचे)

29.) माजी सैनिक दाखला

30.) खेळाडू प्रमाणपत्र (विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल अथवा प्रस्ताव दाखल पोच पावती)

31.) प्रकल्पग्रस्त दाखला प्रमाणपत्र

32.) भूकंपग्रस्त दाखला प्रमाणपत्र

33.) अनाथ प्रमाणपत्र

34.) आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्याचे प्रमाणपत्र

35.) १९९१ जनगणना /१९९४ निवडणूक कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र

36.) अंशकालीन कर्मचारी प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकारी तहसीलदार प्रमाणपत्र)

37.) विवाह नंतर नावात बदल असल्यास राजपत्र

38.) हमीपत्र (सादर केलेले सर्व कागदपत्रे वैद्य असल्याचे हमीपत्र)

वर दिलेली सर्व कागदपत्रे त्यांच्या अटी व नियम यानुसार तुम्हाला उपलब्ध करून द्यावयाची आहेत आणि ते verify केल्यावरच तुम्ही कागदपत्र पडताळणी मधून पात्र होऊन पुढच्या प्रक्रिया करीता ग्राह्य धरल्या जाणार आहात. त्यामुळे प्रतेक उमेदवाराने काळजीपूर्वक सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

 

कोणत्याही प्रकारची खडतोड केलेली कागदपत्रे सादर केल्यास तुम्हाला भरती प्रक्रिया मधून कोणत्याही टप्प्यातून बाद केल्या जाईल. त्यामुळे उमेदवारांनी स्व प्रमाणित करताना जी कागदपत्रे उपलोड केलीय ती सर्व मूळ कागदपत्रे आणि दोन xerox संच (सेल्फ attested) सोबत ठेवणे आवश्यक आहे. एकदा कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यावर काही दिवसात तुम्हाला समुपदेशन करीता बोलावले जाईल आणि शाळा निवडीचा चान्स दिल्या जाईल. एकदा हे पूर्ण झाले की तुम्हाला त्या त्या शाळेत नियुक्त्या देऊन रुजू होण्यास सांगितले जाईल. म्हणून सर्व उमेदवारांनी तयारीत असणे आवश्यक आहे. शाळा निवडत असताना खालील प्रमाणे उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

१.) दिव्यांग उमेदवार मेरिट नुसार

२.) महिला मेरिट नुसार

३.) पुरुष मेरिट नुसार

अशा प्रकारे मेरिट नुसार प्राधान्य देऊन शाळा निवडता येतील. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या आवडीचा तालुका किंवा शाळा सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे च उमेदवारांनी कोणत्या तालुक्यात काम करण्याची तयारी आहे हे आधीच ठरवून मगच तो तालुका निवडावा. जेणेकरून नंतर उमेदवारांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.

 🔴 जिल्हा नुसार कागदपत्र पडताळणी वेळापत्रक: 🔴

खाली संपूर्ण महाराष्ट्र मधील विना मुलाखत करीता आलेल्या जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद आणि संस्था यांनी दिलेले कागदपत्र पडताळणी करीता चे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. तरीही उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आपली उपस्थिती सकाळी 10 वाजता नोंदवून आपली कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

1.) रायगड जिल्हा परिषद

📌4 मार्च 2024 – मराठी माध्यम 1 ते 275

📌5 मार्च 2024 – मराठी माध्यम 276 ते 550

📌6 मार्च 2024 – मराठी माध्यम 551 ते 671, उर्दू मध्यम 1 ते 48

स्थळ: टिपणीस सभागृह ‘ शिवतीर्थ ‘, तिसरा मजला, रायगड जिल्हा परिषद इमारत, जिल्हा रुग्णालय समोर, अलिबाग – जिल्हा रायगड, महाराष्ट्र

2.) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

📌 4 मार्च 2024 – मराठी माध्यम 1 ते 200

📌 5 मार्च 2024 – मराठी माध्यम 201 ते 400

📌 6 मार्च 2024 – मराठी माध्यम 401 ते 604, उर्दू माध्यम  1 ते 11

स्थळ: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग (प्राथमिक), महाराष्ट्र

3.) रत्नागिरी जिल्हा परिषद

📌 29 फेब्रुवारी 2024 ते 1 मार्च 2024 दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत कागदपत्र पडताळणी करीता उपस्थित राहणे.

स्थळ: कमलाबाई विसपुते इंग्लिश मिडीयम शाळा, कुवारबाव, रत्नागिरी, ता रत्नागिरी, महाराष्ट्र

4.) नागपूर जिल्हा परिषद

📌 29 फेब्रुवारी 2024 – 1 ते 85

📌 1 मार्च 2024 – 86 ते 170

📌 4 मार्च 2024 – 171 ते 255

📌 5 मार्च 2024 – 256 ते 345

स्थळ: जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण संस्था, सी. पी अँड बेरार हाय स्कूल जवळ, रविनगर, नागपूर , महाराष्ट्र

5.) अहमदनगर जिल्हा परिषद

📌 1 मार्च 2024 – 1 ते 75

📌 2 मार्च 2024 – 76 ते 143

स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, चौथा मजला, जिल्हा परिषद अहमदनगर, महाराष्ट्र

6.) बृहन्मुबई महानगर पालिका

📌 4 मार्च 2024 – 1 ते 150 (इंग्रजी माध्यम)

📌 5 मार्च 2024 – 151 ते 300 (इंग्रजी माध्यम)

📌 6 मार्च 2024 – 376 ते 447 (इंग्रजी माध्यम)

 

📌 7 मार्च 2024 – 1 ते 143 (मराठी माध्यम)

📌 8 मार्च 2024 – 1 ते 151 (हिंदी माध्यम)

📌 9 मार्च 2024 – 1 ते 57 (उर्दू माध्यम)

 

स्थळ: शिक्षणाधीकारी यांच्या कार्यालयातील सभागृह, त्रिवेणी संगम महा नगर पालिका शाळा, महादेव पालव मार्ग, करी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र

7.) नांदेड जिल्हा परिषद

📌 4 मार्च 2024 – मराठी माध्यम 1 ते 100

📌 5 मार्च 2024 – मराठी माध्यम 101 ते 202

📌 5 मार्च 2024 – उर्दू माध्यम 1 ते 6

स्थळ: यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद रेल्वे स्टेशन जवळ , नांदेड , महाराष्ट्र

8.) बुलढाणा जिल्हा परिषद

📌 27 फेब्रुवारी 2024 ते 1 मार्च 2024

स्थळ: शिवाजी सभागृह, जिल्हा परिषद बुलढाणा, महाराष्ट्र

9.) जळगाव जिल्हा परिषद

📌 1 मार्च 2024 – 1 ते 140 मराठी माध्यम

📌 2 मार्च 2024 – 141 ते 282 मराठी माध्यम

📌 3 मार्च 2024 – 283 ते 336 मराठी माध्यम, 1 ते 74 उर्दू माध्यम

स्थळ: जिल्हा परिषद जळगाव, महाराष्ट्र

 

 

10.) पुणे महा नगर पालिका (PMC पुणे)

📌 5 मार्च 2024 – 1 ते 200 मराठी माध्यम

📌 6 मार्च 2024 – 201 ते 287 मराठी माध्यम , 1 ते 100 इंग्रजी माध्यम

📌 7 मार्च 2024 – 101 ते 140 इंग्रजी माध्यम, 1 ते 14 उर्दू माध्यम

स्थळ: के बा. ब. गोगटे प्रशाला विद्यानिकेतन शाळा क्रमांक 7, 318, नारायण पेठ , पुणे 411030, (मोदी गणपती, प्रभात प्रेस, विजय टॉकीज जवळ) पुणे, महाराष्ट्र

11.) जिल्हा परिषद धाराशिव

📌 4 मार्च 2024 – सकाळी 10 वाजता

स्थळ: कै यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद धाराशिव, महाराष्ट्र

12.) चंद्रपूर जिल्हा परिषद

📌 1 मार्च 2024 ते 2 मार्च 2024 – सकाळी 10 वाजता

स्थळ: शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद चंद्रपूर , महाराष्ट्र

13.) नांदेड वाघाळा महानगर पालिका

📌 1 मार्च 2024 – सकाळी 10 वाजता

स्थळ: माननीय उपयुक्त (सामान्य प्रशासन) कक्ष खोली क्रमांक 316, नांदेड वाघाळा महानगर पालिका, नांदेड, महाराष्ट्र

14.) गोंदिया जिल्हा परिषद

📌  4 मार्च 2024 – 1 ते 120

📌 5 मार्च 2024 – 121 ते 240

📌 6 मार्च 2024 – 241 ते 327

स्थळ: स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृह , जिल्हा परिषद गोंदिया, महाराष्ट्र

15.) जिल्हा परिषद सांगली

📌 4 मार्च 2024 – मराठी माध्यम 1 ते 100

📌 5 मार्ग 2024 – मराठी माध्यम 101 ते 200

📌 6 मार्च 2024 – 201 ते 253 मराठी माध्यम, 1 ते 14 कन्नड माध्यम, 1 ते 14 उर्दू माध्यम

स्थळ: पद्म वसंतदादा पाटील सभागृह, जिल्हा परिषद सांगली, महाराष्ट्र

16.) सातारा जिल्हा परिषद

📌 4 मार्च 2024 – 1 ते 250 मराठी माध्यम

📌 5 मार्च 2024 – 251 ते 495 मराठी माध्यम , 1 ते 3 उर्दू माध्यम

स्थळ: आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा, ता सातारा, जिल्हा सातारा, महाराष्ट्र

17.) वर्धा जिल्हा परिषद

📌 6 मार्च 2024 – मराठी माध्यम 1 ते 80

📌 7 मार्च 2024 – मराठी माध्यम 81 ते 162, उर्दू माध्यम 1 ते 3

स्थळ: स्वर्गीय सिंधुताई सपकाळ सभागृह, जिल्हा परिषद  वर्धा, महाराष्ट्र

18.) यवतमाळ जिल्हा परिषद

📌 1 मार्च 2024 – मराठी माध्यम 1 ते 94

📌 3 मार्च 2024 – मराठी माध्यम 95 ते 188

📌 4 मार्च 2024 – मराठी माध्यम 189 ते 269, उर्दू माध्यम 1 ते 13

स्थळ: जिल्हा परिषद सभागृह, जिल्हा परिषद यवतमाळ

19.) भंडारा जिल्हा परिषद

📌 5 मार्च 2024 – 1 ते 115 प्राथमिक

📌 6 मार्च 2024 – 116 ते 185 प्राथमिक

📌 6 मार्च 2024 – 1 ते 41 माध्यमिक

स्थळ: जिल्हा परिषद सभागृह, जिल्हा परिषद भंडारा, महाराष्ट्र

 20.) छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद

📌 4 मार्च 2024 – 1 ते 140 मराठी माध्यम

📌 5 मार्च 2024 – 141 ते 280 मराठी माध्यम

📌 6 मार्च 2024 – 281 ते 370 मराठी माध्यम, 1 ते 38 उर्दू माध्यम

स्थळ: विद्या प्राधिकरण, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (डायट) देवगिरी कॉलेज जवळ, उस्मानपुरा, छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र

21.) ठाणे महानगर पालिका

📌 6 मार्च 2024 – 1 ते 100 मराठी माध्यम

📌 7 मार्च 2024 – 1 ते 11 हिंदी माध्यम

📌 7 मार्च 2024 – 1 ते 21 उर्दू माध्यम

📌 7 मार्च 2024 – 1 ते 11 मराठी माध्यम

स्थळ: ठाणे महानगर पालिका शिक्षण विभाग मुख्य कार्यालय, ठामपा शाळा क्रमांक 19, विष्णूनगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र

वरील प्रमाणे ज्या ज्या जिल्ह्यांचे म्हणजेच आस्थापना यांचे वेळापत्रक आले आहे त्यांचे अधिकृत  वेळापत्रक आम्ही इथे उपलब्ध करून दिले आहे. जर आपणास अजून नवीन जिल्हा परिषद किंवा आस्थापना यांचे वेळापत्रक त्वरित माहिती करून घ्यायचे असल्यास आपण आमचे telegram channel Mahasarkar नक्किच जॉइन करा. जेणेकरून वेळोवेळी निघणाऱ्या सूचना, notifications आणि परिपत्रक आपणा पर्यंत क्षणात पोहोचतील. पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया मधील कोणतीही अधिकृत माहिती जलद गतीने माहिती करून घेण्यास आमचे चॅनेल फॉलो करा. पुढील वाटचालीस शुभेच्छा..!


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT