Maharashtra Basic Information | महाराष्ट्रातील संपूर्ण माहिती

महाराष्ट्र:माहिती

महाराष्ट्राचे भारतातील स्थान

स्थान: भारत हा उत्तर गोलार्धात असून पूर्व गोलार्धातील आशिया खंडातील भारत हा महत्त्वाचा देश आहे. हिमालयाच्या दक्षिणेकडे अगदी हिंदी महासागरापर्यंत पसरलेला आशियाचा हा एक मोठा भूभाग आहे. यास ‘भारतीय उपखंड’ असे म्हणतात. या उपखंडात भारत, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, भूतान, नेपाळ व माली यांचा समावेश होतो. याला ‘सार्क’ (SAARC) म्हणतात. (SAARC South Asian Assocation for Regional Co-operation).

“महाराष्ट्र” हे भारतामधील २८ घटकराज्यांपैकी ‘महाराष्ट्र राज्य’ हे एक राज्य आहे. भारताच्या मध्यवर्ती भागात महाराष्ट्र राज्यअसून उत्तर भारत व दक्षिण भारतास एकत्रित आणणारी विशाल भूमी आहे.

१) अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार: महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार १५ ४४’ उत्तर अक्षवृत्त ते २२° ६ उत्तर अक्षवृत्त असून रेखांश विस्तार ७२ ३६’ पूर्व रेखावृत्त ते ८०° ५४’ पूर्व रेखावृत्त आहे.

२) आकार: भारतीय द्वीपकल्पाचा एक भाग महाराष्ट्र पठार (दख्खन पठार) आहे. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती असून दक्षिणेकडे चिंचोळा तर उत्तरेकडे रुंद होत गेलेला आहे. त्याचा पाया कोकणात व त्याचे निमुळते टोक पूर्वेस गोंदियाकडे आहे.

३) लांबी, रुंदी व क्षेत्रफळ: पश्चिमेस अरबी समुद्रापासून पूर्वेस साधारणपणे पूर्व घाटापर्यंत महाराष्ट्र पसरलेला आहे. महाराष्ट्राची पश्चिम-पूर्व लांबी सुमारे ८०० कि. मी. असून दक्षिणोत्तर रुंदी सुमारे ७२० कि. मी. आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये राजस्थान (३,४२,२३९ चौ. कि. मी.) व मध्य प्रदेश (३,०८, ३४६ चौ. कि. मी.) त्या खालोखाल महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राने देशाचा ९. ३६% प्रदेश व्यापलेला आहे.

४) नैसर्गिक सीमा: महाराष्ट्राच्या वायव्य भागात सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकडा व सातपुडा पर्वतरांगेतील अक्राणी टेकड्या, उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकडया आहेत, तर ईशान्येस दरकेसा टेकडया, पूर्वस चिरोली टेकडया व भामरागड डोंगर या नैसर्गिक सीमा निर्माण करतात. दक्षिणेस पठारावर हिरण्यकेशी नदी व कोकणात तेरेखोल नदी पश्चिमेस अरबी समुद्र अशा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत.

५) राजकीय सीमा: व सरहदी महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य आणि दादरा व नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आहे. उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड तर आग्नेयेस तेलंगाना या राज्यांच्या सीमारेषा आहेत. दक्षिणेस कर्नाटक व गोवा ही राज्ये आहेत.

महाराष्ट्राच्या सरहद्दी:

१) वायव्येला गुजरात राज्याला ठाणे, नाशिक व नंदुरबार जिल्हयांच्या सरहद्दी भिडतात.

२) उत्तरेकडे मध्यप्रदेशबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्हयांच्या सरहद्दीआहेत.

३) पूर्वेस छत्तीसगड राज्याशी गोंदिया व गडचिरोली जिल्हयांच्या सरहद्दी आहेत.

४) तेलंगाना आंध्र प्रदेशाला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नादेड जिल्हयांच्या सरहदी आहेत.

५) दक्षिणेस कर्नाटकाला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांच्या सरहदी आहेत.

६) सरतेशेवटी अगदी दक्षिणेस गोवा राज्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्हयाची सरहद आहे.

राजकीय स्वरूप: 0१ मे १९६० रोजी महाराष्ट्रात २६ जिल्हे, २३५ तालुके, २८९ शहरे व ३५७७ खेड़ी होती; तेव्हा मुंबई (कोकण), पुणे, औरंगाबाद व नागपूर असे चार प्रशासकीय विभाग होते.यानंतर नाशिक व अमरावती असे दोन प्रशासकीय विभाग निर्माण झाले. सध्या एकूण प्रशासकीय विभाग ६ आहेत.

१) महाराष्ट्रात कुलाबा जिल्हयाचे नामांतर ‘रायगड’ करण्यात आले.

२)) तसेच यथावकाश सिंधुदुर्ग, लातूर, जालना, गडचिरोली व मुंबई उपनगर असे नवीन ५ जिल्हे उदयास आले. प्रथम रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग तर चंद्रपूर जिल्हयाचे विभाजन होऊन गडचिरोली जिल्हे निर्माण झाले.

३) त्यानंतर औरंगाबाद जिल्हयाचे विभाजन होऊन जालना तर, उस्मानाबाद जिल्हयाचे विभाजन होऊन लातूर हे जिल्हे निर्माण झाले. एकूण ३० जिल्हे झाले. मुंबई जिल्हयाचे विभाजन करून मुंबई उपनगर हा ३१ वा जिल्हा निर्माण केला.

४) १ जुलै, १९९८ रोजी धुळे व अकोला जिल्हयांचे विभाजन होऊन अनुक्रमे नंदुरबार व वाशीम असे दोन नवीन जिल्हेनिर्माण झाले. तेव्हा महाराष्ट्रात ३३ जिल्हे होते.

५) यानंतर मे १९९९ मध्ये परभणी जिल्हयाचे विभाजन होऊन हिंगोली तर भंडारा जिल्हयाचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हयाची निर्मिती झाली. त्यानंतर २०१४ साली ठाणे जिल्ह्यातून पालघर हा ३६ वा जिल्हा निर्माण झाला. सध्या महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. महाराष्ट्रात सध्या एकूण ३५८ तालुके (मुंबई उपनगर जिल्हयामधील ३ तालुके धरून) आहेत.

६) प्रशासकीय विभागानुसार कोकण विभाग (५० तालुके), पुणे विभाग (५८ तालुके), नाशिक विभाग (५४ तालुके), औरंगाबाद विभाग (७६ तालुके), अमरावती विभाग (५६ तालुके), नागपूर विभाग (६४ तालुके) याप्रमाणे तालुके आहेत.

महाराष्ट्राच्या काही भागांना लाभलेली वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक नावे:

आपण ‘महाराष्ट्र’ या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे पाहिले. तसेच कोकण व देश या प्रादेशिक नावांचाही उल्लेख व परिचय करून घेतलेला आहे. देशावरच्या काही भागांना आणखी काही वैशिष्टयपूर्ण नावे आहेत याची माहिती पाहू.

कोकण: सहयाद्री पर्वत व अरबी समुद्राच्या दरम्यान असलेल्या अरुंद किनारपट्टीचे कोकण आहे. कोकणात एकूण ७ जिल्हे आहेत.

देश: सहयाद्रीच्या पूर्व बाजूला महाराष्ट्राचा ‘देश’ हा प्रादेशिक विभाग असून महाराष्ट्राच्या विकासात देशाचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर हे ५ जिल्हे व नाशिक विभागातील नाशिक व अहमदनगर जिल्हयांचा समावेश होतो. देशात एकूण ७ जिल्हे आहेत.

घाटमाथा:सहयाद्री पर्वताच्या उंचवटयाचा भाग घाटमाथा म्हणून ओळखला जातो.

मावळ: सहयाद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग ‘मावळ प्रांत’ या नावाने ओळखला जातो.

खानदेश:अशाच प्रकारे ‘खानदेश’ हादेखील एक प्रादेशिक विभाग सुप्रसिद्ध आहे. उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हयांना खानदेश म्हणतात, खानदेशामध्येही जमीन सुपीक व काळी असून त्या ठिकाणाचा कापूस व केळी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत, खानदेशात ३ जिल्हे समाविष्ट आहेत.

मराठवाडा: मध्य महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोन्यास ‘मराठवाडा’ हे प्रादेशिक नाव आहे. हा प्रदेश तसा रूक्ष प्रदेश आहे. परंतु गोदावरी तीरावर नेवासे, पैठणसारखी पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा समावेश होतो. मराठवाड्यात एकूण ८ जिल्हे आहेत.

विदर्भ: नागपूर विभागास ‘विदर्भ’ किंवा ‘वन्हऱ्हाड’ या नावाने व्यवहारात संबोधले जाते, आपण ‘वऱ्हाडी माणसं आहोत असे • अभिमानाने नागपूरकर सांगतात. तेथील सुपीक काळी जमीन व कापूस संत्री यांचा अगदी निकटचा संबंध ‘वऱ्हाड’ या शब्दाशी आहे. यामध्ये अमरावती विभाग (५ जिल्हे) व नागपूर प्रशासकीय विभागाचा (६ जिल्हे) समावेश होतो. विदर्भात ११ जिल्हे आहेत.

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग

महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत. ते पुढीलप्रमाणे:

(अ) कोकण विभाग (ब) पुणे विभाग(क) नाशिक विभाग (ड) औरंगाबाद विभाग(इ) अमरावती विभाग (फ) नागपूर विभाग

महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांचेक्षेत्रफळ (चौ. कि. मी.)


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT