पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या मुलाखती ची तयारी कशी करावी, डेमो कसा द्यावा, तुमची 100% निवड होईल यासाठी चे उपयुक्त मुद्दे

How to prepare for interview and demo through Pavitra Portal Teachers Recruitment

पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली असून आता सर्व उमेदवारांना उत्सुकता आहे ती म्हणजे निवड यादीची आणि ही उत्सुकता काही दिवसात संपणार सुद्धा आहे. एकदा निवड यादी प्रसिद्ध झाली की त्यात दोन याद्या आपणास दिसतील. एक म्हणजे विना मुलाखत निवड यादी Without Interview Selection List आणि मुलखात सहित निवड यादी With Interview Selection List अशा दोन निवड याद्या प्रसिद्ध होणार आहेत. विना मुलाखत निवड यादी मधे ज्यांची नावे आहेत त्यांना डायरेक्ट कागदपत्र पडताळणी करीता बोलावले जाईल आणि नंतर लगेच समुपदेशन करून नियुक्त्या दिल्या जातील. तर दुसरीकडे मुलाखत सहित निवड यादी मधे नावे आलेल्या उमेदवारांना १० संस्था मिळतील आणि प्रतेक संस्थेत एका जागेसाठी किमान तीन उमेदवार बोलावले जातील.

मुलाखत सहित निवड यादी जी प्रसिद्ध होईल ती उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी TAIT मध्ये पडलेल्या गुणांच्या आधारावरच मेरिटनुसार त्यांना दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार संस्था मिळतील. जर उमेदवाराने मुलाखतीसहित टॅब मध्ये जाऊन प्राधान्यक्रम दिले असतील तर प्रत्येक उमेदवाराच्या लॉगिन वर मुलाखतीसहित या रावण साठी आलेल्या संस्था पाहायला मिळतील.

प्रत्येक उमेदवाराला त्याच्या लॉगिन वर उपलब्ध झालेल्या संस्था ह्या केवळ त्यांनी TAIT मिळवलेले गुण आणि स्वतः लॉक केलेले प्राधान्यक्रम यांच्या क्रमानुसारच असेल. म्हणजेच प्रत्येक उमेदवाराला आलेली संस्था ही त्याच्या गुणवत्तेवरुनच आलेली असणार आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नसणार. शेवटी मुलाखतीसहित राऊंड असो की विना मुलाखत राहून त्यामध्ये होणारी निवड ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2023 मध्ये मिळालेल्या गुणांवरच असणार आहे. एखाद्या उमेदवाराला आलेल्या दहा संस्था जशास तशा दुसऱ्या उमेदवाराला सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे एकदा संस्था लॉग इन वर आल्यावर त्या संस्थेवर निवड होण्यासाठी आवश्यक असणारा क्रायटेरिया म्हणजे टेट मध्ये मिळालेले गुण नसून तिथे घेतले जाणारी मुलाखत आणि डेमो यावरच आधारित असेल.

एकंदरीत 90 गुण मिळवणारा उमेदवार आणि 120 गुण मिळवणारा उमेदवार या दोघांनाही एकच संस्था आल्यास, त्या संस्थेवर निवड करताना त्यांच्या गुणांचा विचार होणार नाही, तर त्यांनी दिलेली मुलाखत आणि डेमो यावरूनच त्यांची निवड करावी की नाही हा सर्वस्वी अधिकार त्या संस्थाचालक यांना असेल.

 

आज या पेजवर आपणास पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये मुलाखतीसहित राउंड मध्ये घेतल्या जाणाऱ्या मुलाखती आणि त्यामधून होणारी उमेदवारांची निवड कशाप्रकारे होते यासाठीची संपूर्ण अधिकृत माहिती इथे दिलेली आहे.

जर तुम्ही मुलाखतीसहित राऊंड करिता प्राधान्यक्रम लॉक केले असतील आणि तुम्हाला मुलाखत देऊन संस्थेमध्ये जॉईन व्हायचे असेल तर नक्कीच या पेजवर तुम्हाला योग्य आणि अधिकृत मार्गदर्शन दिले जाईल अशी आम्ही खात्री घेतो.

एकदा मुलाखती सहित निवड यादी प्रसिद्ध झाली की काही दिवसातच तुम्हाला दिलेल्या संस्थेवर मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. अशावेळी कोणत्याही प्रकारची धावपळ न करता आपले कौशल्य, आपले ज्ञान आणि आपल्या जवळ असलेल्या सुप्त गुणांचा योग्य वापर करून मुलाखत आणि डेमो कसा द्यावा यासाठी तुम्ही पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. आणि हीच पूर्वतयारी कशी करावी याची संपूर्ण माहिती आम्ही इथे दिलेली आहे.

📌आज प्रत्येक उमेदवाराला निवड यादीची प्रतीक्षा तर लागूनच आहे परंतु त्यासोबतच मुलाखतीची तयारी करून ठेवणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे कारण प्रत्यक्षात मुलाखत देताना येणारे अडथळे हे मुलाखत दिल्यानंतरच आपल्याला अनुभवायला मिळू शकतात.

📌 तुम्ही घेतलेली मेहनत तुमच्यात असलेले कौशल्य आणि ज्ञान यांचा पुरेपूर वापर करून मुलाखतीमध्ये कशाप्रकारे तुम्हाला स्वतः ल सिद्ध करता येईल यासाठी तुम्ही तत्पर असणे खूप गरजेचे आहे. कारण या मुलाखतीवरच तुमची निवड त्या संस्थेत होणार की नाही हे ठरणार असून तुमच्यासाठी हा खूप मोठा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा असू शकतो.

📌त्यामुळेच शिक्षक भरती प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर इथून मागे न फिरता आपले योगदान पूर्णपणे देऊन नोकरी मिळवणे हे फक्त आपल्या आणि आपल्याच हातात आहे. मुलाखतीला जाताना कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या यासाठीची सर्व उपयुक्त माहिती आणि खाली दिलेली आहे ती नक्की एकदा वाचूनच मुलाखतीची तयारी करा.

📌 एकदा तुमच्या लॉगिन वर संस्थांची यादी प्रसिद्ध झाल्यावर तुम्ही त्या संस्थांशी संपर्क साधून तुमच्या मुलाखतीचा दिवस आणि वेळ ठरवू शकता. काही वेळेस तुम्हाला दोन संस्थांवर एकाच दिवशी मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. अशावेळी कोणत्याही प्रकारची काळजी न करता तुम्ही त्यापैकी एका संस्थेची संपर्क करून तुमचा मुलाखतीचा दिवस बदलू सुद्धा शकता, जेणेकरून तुम्हाला दोन्ही संस्थांवर वेग वेगळ्या दिवशी मुलाखतीसाठी जाता येईल.

📌 मुलाखतीची तयारी करत असताना किंवा मुलाखतीला जाण्याआधी आपल्या मनातील सर्व निगेटिव्ह विचार पूर्णतः मनातून काढूनच मुलाखतीला सामोरे जाणे हेच योग्य ठरणार आहे. कारण 2017 मध्ये मुलाखत सहित जी शिक्षक भरती प्रक्रिया झाली त्यामधून काही ठिकाणी उमेदवारांची निवड त्यांच्या स्किलवर, ज्ञानावर आणि त्यांच्या डेमो वरूनच झाली असल्याची सिद्ध झाले आहे. त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता मुलाखत कशी योग्य होईल आणि तुमची निवड त्या ठिकाणी मोफत कशी होईल याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

📌 काही उमेदवारांमध्ये अशी अफवा पसरली आहे की संस्थेमध्ये मुलाखती पेक्षा पैशांची बोलणी यावर जास्त भर दिला जातो. परंतु खरे पाहता सगळ्याच संस्थांमध्ये असे घडत नसून 99% संस्थांमध्ये तुमच्या कौशल्याची, ज्ञानाची, तुमच्या जवळ असलेल्या सुप्त गुणांची परीक्षा घेऊन त्यावरूनच निवड केल्या जाते. त्यामुळे तुम्हाला आलेल्या सर्व दहा संस्था वर तुम्ही मुलाखतीसाठी जाणे योग्य ठरेल. कारण पाण्यात उतरल्याशिवाय आपणास कळवू शकत नाही की ते पाणी किती खोल आहे.

📌 जर तुमच्यामध्ये कॉलिटी असेल तर नक्कीच तुम्ही फक्त आणि फक्त मुलाखत कशी चांगली होईल आणि त्यातून तुमची निवड कशी होईल याकडेच लक्ष देणे योग्य ठरेल.

📌 एकदा तुमच्या लॉगिन वर संस्था आल्यानंतर संस्थेच्या ठिकाणी होणारी निवड ही तुमच्या टेटमध्ये मिळालेल्या गुणवान वर नसून तुम्ही दिलेल्या मुलाखती आणि डेमो वरूनच असणार आहे.

म्हणजेच मुलाखतीकरिता जाणाऱ्या उमेदवारांमध्ये ९० गुण असणारा उमेदवार हा १२० गुण असणाऱ्या उमेदवारासोबत स्पर्धा करू शकतो. तसेच 90 मार्क्स असणारा उमेदवार सुद्धा आपली क्वालिटी, कौशल्य, अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती आणि वागणूक यावरून स्वतः ल सिद्ध करून ती नोकरी मिळवू शकतो.

📌मुलाखत मधे सुद्धा दोन टप्पे करण्यात आले आहेत. एक म्हणजे मुलाखत करीता 15 गुण आणि दुसरे म्हणजे डेमो करीता 15 गुण. मुलाखत मधून तुमचे ज्ञान, तुमची बोलण्याची शैली, तुमच्या मधे असलेली विनम्रता तपासल्या जाईल. तर डेमो मधून तुमचे अध्यापन कौशल्य, विद्यार्थी हॅण्डल करण्याची क्षमता आणि अशा बऱ्याच गोष्टी तपासल्या जातील.

📌 सुरुवातीला तुमची मुलाखत घेतली जाईल आणि त्यात अगोदर तुमचे कागदपत्र पडताळणी केल्या जाईल. तुमचे ओरिजनल कागदपत्रे यांची तपासणी केली जाईल. तुमची ओरिजनल कागदपत्रे आणि Attested Xerox copy चे दोन संच तुम्ही सोबत नेणे आवश्यक असेल.

📌 जर तुमच्या कडे व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता सोबत च अजून कोणते शैक्षणिक पात्रता असेल तर त्याच्याशी संबंधित कागदपत्रे सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. जसे की MSc, MA, सेट, नेट, PhD आणि अशी बरीच additional educational qualification असतील तर त्याची कागदपत्रे तुम्ही सादर करू शकता. जेणेकरून तुमची निवड होण्याचे चान्स अधिक असतील.

📌 सोबतच तुम्ही जर कुठे नोकरीचा अनुभव घेतला असेल ते मग खाजगी शाळा असो की संस्था अशा ठिकाणी तुम्ही शिकविण्याचे काम केले असेल तरीही त्याविषयी चे आवश्यक कागदपत्रे (Experience Certificate) तुम्ही सोबत ठेवू शकता. जेणेकरून मुलाखत आणि डेमो देण्या आधी तुमची त्या अधिकारी किंवा निवड समिती वर तुमची छाप पडेल.

📌 जर तुम्ही ऑनलाईन Teaching च experience घेतला असेल, शैक्षणिक क्षेत्रात काही उल्लेखनीय कामगिरी केली असेल, व्हिडिओ मधून टिचींग केले असेल तर ते सुद्धा गोळा करून तुम्ही सादर करू शकता किंवा त्यांना शेअर करू शकता. जेणेकरून तुमच्या कदे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल आणि तुमची निवड होण्यासाठी जास्त हितकारक सुद्धा ठरेल.

मुलाखत म्हणजे केवळ तुमच्या मधले दिसणारे गुण, कौशल्य सादर करणे नव्हे, तर तुमच्यात लपून असलेले सुप्त गुण सुद्धा सादर करून त्यांचा पुरेपूर वापर शाळेसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षण क्षेत्रात कसा होईल हे सिद्ध करणे होय.

📌मुलाखत देताना सुरुवातीला तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती, शिक्षण, अनुभव याविषयी विचारणा केल्या जाऊ शकते. मुख्य म्हणजे मुलाखत देताना आपण नम्रपणे आणि सत्य आहे तेच सांगणे त्यांना अपेक्षित असते.

📌 मुलाखत मधे मिळणारे गुण हे त्या उमेदवाराच्या राहणीमान, हावभाव, वेशभूषा यावर सुद्धा अवलंबून असू शकते. कारण शिक्षक हा एक सभ्य, सुशील आणि भावी पिढी घडवणारा जबाबदार नागरिक असून त्याने ते आपल्या वर्तणूक आणि वागणूक मधून दाखवणे योग्य असेल.

📌 त्यामुळे उमेदवाराने मुलाखत करीता जाताना योग्य अशी वेशभूषा करावी जी शिक्षक या पेशाला शोभली पाहिजे आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या मुलाखत वर झाला पाहिजे. तसेच तुमची केश रचना आधुनिक प्रकरची नसून ती साधी आणि शिक्षकाला शोभेल अशी असणे आवश्यक आहे. जेणेकरून नियुक्ती प्राधिकारी यांना आपल्यातील नम्रता, शालीनता, सुप्त गुण न सांगता च आपल्यातून दिसून येतील आणि ते आपल्या मुलाखत करीता प्लस पॉइंट असणार.

 

📌त्यानंतर तुम्हाला मुलाखत घेताना तुमची निवड कोणत्या विषयासाठी होणार आहे त्याविषयी चे प्रश्न विचारल्या जातील. जर तुम्हाला प्रश्नांची योग्य उत्तरे येत असतील तर तुम्ही ते ठामपणे देऊ शकता आणि जर उत्तरे माहिती नसतील तर सॉरी म्हणून तुम्ही ते टाळू शकता. खोटे, चुकीचे, उडवा उडविचे उत्तरे, फेका फेकी ची उत्तरे देणे कधीही टाळणे चांगले असेल.

📌 कोणतीही कमतरता न लपवता त्याला योग्य प्रकारे सामोरे जाणे योग्य ठरेल.  तुम्हाला तुमच्या विषयाशी निगडीत प्रश्न तर विचारले जातील च आणि सोबत च तुम्हाला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. मुख्य म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी, New Education Policy, General Knowlegde यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतात.

📌 यासोबतच तुम्हाला प्रत्यक्ष परिस्थिती सांगून ती कशी सुधारणार, शाळेची प्रगती कशी उंचावनार यावर सुद्धा प्रश्न विचारले जातील. त्यामुळे तुम्ही ज्या शाळेत किंवा संस्थेत मुलाखत करीता जाणार त्या संस्थेचा आणि संबंधित भागाचा थोडाफार अभ्यास करणे गरजेचे आहे.

📌 एखादी critical condition तुमचा समोर मांडून त्यावर तुम्ही कशाप्रकारे मात करणार आणि योग्य तो न्याय मिळवून देणार यावर भर दिल्या जाऊ शकते. जेणेकरून तुमच्यामध्ये असलेली उपक्रम शिलता, कल्पना, विवेक बुद्धी, चातुर्य यांचा प्रभाव समोर बसलेल्या अधिकारी वर्ग यावर पडेल आणि तुमची निवड होण्याचे प्रमाण जास्त असेल.

📌वर दिलेल्या संपूर्ण मुलाखत प्रक्रिये करीता एकूण 15 गुण दिलेले आहेत. जर तुम्ही तुमचे 100% दिले तर नक्कीच तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात. आता पुढचा टप्पा आहे तो म्हणजे डेमो. काही संस्था डेमो हा प्रत्यक्ष बोलवून घेतील तर काही ऑनलाईन सुद्धा डेमो घेऊ शकतात. त्यामुळे दोन्ही गोष्टींची तुमची तयारी असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमची पूर्वतयारी आणि सराव असणे सुद्धा गरजेचे आहे.

📌 महत्वाचं मुद्दा म्हणजे तुमची निवड ज्या वर्गासाठी आणि विषयासाठी निवड झालेली असेल त्या संबंधित संपूर्ण तयारी तुमची झालेली असणे आवश्यक आहे. त्यामधे तुम्ही पाठ टाचण काढलेले असावे, फलक लेखन, आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य यांची संपूर्ण तयारी तुम्ही केलेली असावी. जनेकरून तुम्ही ज्या विषयाची तयारी केली आहे तो सुद्धा तुम्हाला सादर करण्यास मिळाला तर ते अगदी उत्तम होऊ शकते.

📌काही वेळेस संस्था मधील व्यक्ती तुम्हाला तुमच्या च टॉपिक वर डेमो सादर करण्यास सांगतील. तर काही ठिकाणी तुम्हाला ते स्वतः टॉपिक देतील आणि त्यावर आयत्या वेळी डेमो देण्यास सांगतील याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

📌 हे सर्व करताना तुम्हाला दिलेल्या वेळेत च दिलेला टॉपिक ची तयारी करून तो चांगल्या पद्धतीने कसा प्रदर्शित करता येईल हे तुम्हाला जमले तर नक्कीच तुमचा प्रभाव पडू शकतो. यासाठी तुम्ही डेमो ची पूर्वतयारी, सराव करणे सुद्धा गरजेचे आहे आणि तुमच्यातील बेस्ट देणे फायदेशीर ठरणार आहे.

📌आताच्या भरती मधे प्रतेक जागेसाठी 3 उमेदवार बोलवल्या जात असल्याने प्रतेक उमेदवाराला मुलाखत आणि डेमो करीता जास्तीत जास्त वेळ दिल्या जाऊ शकतो. डेमो मधून तुम्ही तुमचा प्रभाव विद्यार्थ्यांवर कसा पाडणार, त्यांचे concept कसे क्लिअर करणार हे तपासल्या जाऊ शकतो. जेणेकरून पुढे चालून शाळेच्या प्रगतीत तुमच्या मुळे भर पडेल.

📌 तुम्ही नेहमी ज्या पद्धतीने शिकविण्यासाठी पद्धत वापरली आहे तीच परंतु योग्य पूर्व तयारीनिशी करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्यातील सर्व सुप्त गुण यांची ओळख समोर असलेल्या व्यक्तींना होईल. आणि तुमची निवड होण्याचे प्रमाण वाढेल.

मुलाखत आणि डेमो कसा असावा याची सखोल माहिती

आपणास माहिती आहे की मुलाखत दोन टप्प्यात विभागलेली असणार आहे. एक म्हणजे मुलाखत आणि दुसरे डेमो.

  • मुलाखत – 15 गुण
  • डेमो – 15 गुण
  • एकूण गुण – 30

मुलाखत आणि डेमो मधे कोणते मुद्दे विचारात घेऊन तयारी करायची ते खालील प्रमाणे आहेत.

👉🏻 मुलाखत घेण्या आधी तुमची शैक्षणिक कागदपत्रे यांची पडताळणी केल्या जाईल. त्यात तुमची सर्व मूळ कागदपत्रे तपासली जातील. सोबतच दोन शैक्षणिक कागदपत्रे याचा attested केलेला संच सुद्धा बघितल्या जाईल.

👉🏻 तुम्ही जोडलेली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव पत्रे, तुम्ही उत्तीर्ण केलेल्या परीक्षा यांची गुणपत्रक तपासल्या जातील. आणि यानंतर प्रत्यक्षात तुमच्या मुलाखतीची सुरुवात केल्या जाईल.

👉🏻 सुरुवातीला तुम्हाला स्वतः विषयी, तुमच्या अनुभव विषयी, तुमच्या वयक्तिक तसेच अन्य गोष्टीवर प्रश्न विचारले जातील.

ते तुम्ही सत्य पने आणि ठाम पने नम्रतेने मांडणे अपेक्षित असेल.

👉🏻 मुलाखत घेताना तुमची वर्तणूक, तुमचा पेहराव, तुमच्यातील नम्रता या सर्व व्यक्तिमत्व विकास वर आधारित तुमची पडताळणी केल्या जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही त्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

👉🏻 मुलाखत मधे तुम्हाला तुमच्या विषयाशी संबंधित प्रश्न, सामान्य ज्ञान वर आधारित प्रश्न, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सर्व प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. त्याची पूर्वतयारी तुम्ही केलेली असणे हितकारक ठरू शकते.

👉🏻 शाळेच्या, संस्थेच्या प्रगती साठी तुम्ही काय करू शकता, कोणते उपक्रम राबवून तुम्ही शाळेला अव्वल दर्जा मिळवून देऊ शकता, तुमच्यातील कोणत्या कल्पना शाळेला आणि विद्यार्थ्याना यश मिळवून देतील यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारचे प्रश्न विचारताना तुम्हाला एखादा प्रसंग सांगून त्यावर उपाय योजना कसे करणार यावरून तुमच्यातील सुप्त गुण यांची पाहणी केल्या जाऊ शकते.

👉🏻 शाळा जर एखाद्या मागासलेल्या भागात असेल, विद्यार्थी संख्या कमी असेल तर ती वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता असे सुद्धा विचारल्या जाऊ शकते. सोबतच तुम्ही शाळा आणि संस्था यांच्या शैक्षणिक कामा मधे कसे हातभार लावणार याविषयी चे प्रश्न सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. एकंदरीत तुम्हाला प्रत्यक्ष परिस्थिती सांगून त्यावर तुमचे विचार लक्षात घेतले जाऊ शकतात.

म्हणून तुम्ही या सर्व गोष्टींची पूर्वतयारी करणे, अभ्यास करणे गरजेचं आहे.

👉🏻 वरील प्रमाणे तुमची मुलाखत घेतल्या जाऊ शकते. आणि त्यानंतरच तुम्हाला डेमो साठी आज्ञा दिल्या जाऊ शकते.

या डेमो साठी तुमच्या कडे १५ गुण असणार आहेत.

👉🏻 डेमो देताना तुम्ही पूर्वतयारी करून आलेल्या टॉपिक वरच तुम्हाला डेमो दिल्या जाऊ शकतो. तर काही वेळेस आयत्या वेळी तुम्हाला ते टॉपिक सुद्धा देऊन काही वेळ देऊन डेमोची तयारी करण्यास सांगू शकतात.

त्यामुळे तुमचा आयत्या वेळी दिलेल्या टॉपिक वर डेमो देण्याची तयारी असणे सुद्धा गरजेचे आहे.

👉🏻 डेमो देताना तुम्ही दिलेल्या टॉपिक चे निरीक्षण केले जाईल. तुम्ही डेमो देताना तुमच्यातील विषयाचे असणारे ज्ञान तपासल्या जाईल. सोबतच तुम्ही तुमचा टॉपिक सोप्या पद्धतीने कसा शिकवणार याकडे सुद्धा लक्ष दिले जाईल. तसेच तुम्ही डेमो देताना कोन कोणती शैक्षणिक साहित्य वापरली याची सुध्दा नोंद केल्या जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही विविध साहित्य वापरून तुमचा डेमो आकर्षक आणि सोप्या पद्धतीने सादर करू शकता.

👉🏻 डेमो मधून तुम्ही विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे आणि कशा पद्धतीने शिकवता, समजावून सांगता याची तपासणी केल्या जाऊ शकते.

👉🏻 तुम्ही दिलेला संपूर्ण डेमो याचे निरीक्षण आणि परीक्षण संस्थे मार्फत च केल्या जाईल. तुमच्या मधील फलक लेखन कौशल्य, मूल्यमापन कौशल्य याची सुद्धा तपासणी केल्या जाते. त्यामुळे तुमचा डेमो प्रतेक पैलू ने बघितल्या जाऊन त्याचे परीक्षण केल्या जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही त्या तयारीत असणे गरजेचे आहे.

👉🏻 डेमो देताना च तुम्ही वर्ग नियंत्रण कसे करता, विद्यार्थ्यांच्या हालचाली कशा प्रकारे नियंत्रित करू शकता याचे सुद्धा निरीक्षण केल्या जाईल. तुमच्या मधील हेतू कथन आणि विविध कौशल्य डेमो मधून तपासले जातील.

👉🏻 यावेळी प्रतेक संस्थेत एका जागे करीता तीन उमेदवार बोलावले जाणार असल्याने तुम्हाला डेमो साठी जास्त वेळ दिल्या जाऊ शकतो. तो वेळ अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतो.

👉🏻 तुमच्या मुलाखत आणि डेमो चे परीक्षण आणि निरीक्षण करण्यासाठी पॅनल असेल आणि तेच ही सर्व निरीक्षणे नोंदवत असणार आहेत.

👉🏻 तुमची निवड करताना तुमचे TAIT मधील गुण ग्राह्य न धरता फक्त आणि फक्त तुमची मुलाखत आणि डेमो यांच्या आधारा वरच तुम्हाला गुण देऊन तुमची निवड होणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला TAIT मधे कमी गुण मिळाले असतील तरीही तुम्ही ती भर चांगल्या प्रकारे मुलाखत आणि डेमो देऊन काढू शकता.

👉🏻 ज्या उमेदवारांची निवड होईल किंवा ज्या उमेदवारांची निवड होणार नाही या सर्वामागचे लिखित कारण संस्थेने देणे बंधन कारक असणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा ना बळी न पडता तुम्ही तुमचे 100% देऊन मुलाखत आणि डेमो ची तयारी करू शकता.

👉🏻 प्रतेक संस्थेने निवडलेल्या उमेदवारांची यादी पवित्र पोर्टल वर नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. आणि एकदा निवड झाल्यावर सदर उमेदवाराला ७ दिवसांच्या आत तिथे जॉइन व्हावे लागेल. अन्यथा त्या नंतर त्या उमेदवाराचा विचार सुद्धा केल्या जाणार नाही.

 

अशा प्रकारे एकंदरीत संपूर्ण मुलखात प्रक्रिया राबविली जाणार असून जर काही नवीन बदल झालेच तर ते आम्ही नक्कीच तुमच्या पर्यंत पोहोचवू. अशाच नवनवीन अधिकृत माहिती करिता आणि सूचना करीता आमचे Telegram Channel Mahasarkar नक्कीच फॉलो करा. पवित्र पोर्टल शिक्षक भरती विषयी तात्काळ आणि जलद गतीने अधिकृत माहिती जाणून घेण्याकरिता आमचे पेज नक्कीच फॉलो करा आणि लाईक करा. जर तुम्ही मुलाखत सहित राऊंड साठी जाणार असल तर वर सांगितल्या प्रमाणे तयारी करून अगदी आत्मविश्वासाने मुलाखतीस सामोरे जाऊन स्वतः ल सिद्ध करू शकता. मुलाखत साठी पूर्वतयारी करणार्या उमेदवारांना खूप साऱ्या शुभेच्छा…!


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT