Gram Sevak Practice Paper 03 : महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 03

Maharashtra Zilla Parishad Gram Sevak Practice Paper 03

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत १८,८३९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 03

1) एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो.
अ) विभागीय आयुक्त
ब) उपआयुक्त
क) गावकरी
ड) जि. प. अध्यक्ष
Answer: अ) विभागीय आयुक्त

2) ग्रामराज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम कोणी केला?
अ) महात्मा गांधी
ब) डॉ. आंबेडकर
(क) अशोक मेहता
ड) यापैकी नाही.
Answer: अ) महात्मा गांधी

3) खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता ते अधिक फायद्याचे व सोयीस्कर ठरते?
अ) पालेभाज्या
ब) ऊस
क) फळझाडे
ड) यापैकी नाही.
Answer: क) फळझाडे
4) खालीलपैकी कोणते खत नैसर्गिक आहे.
अ) युरिया
ब) कंपोस्ट
क) सल्फेट
ड) नायट्रेट
Answer: ब) कंपोस्ट

5) ग्रामीण विकास कार्यक्रमात ग्रामीण पातळीवर काम करणारा जनतेचा मार्गदर्शक व तत्त्वज्ञ व मित्र अशी संज्ञा असलेली व्यक्ती पुढील पैकी कोणती.
अ) ग्रामसेवक
ब) गटविकास अधिकारी
क) तलाठी
ड) स्वयंसेवी संस्थेचा अध्यक्ष
Answer: अ) ग्रामसेवक

6) पुढीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करु शकते?
अ) ज्वारी
ब) मूग
क) कांदा
ड) भात
Answer: ब) मूग

7) गहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी अति संवेदनशील अवस्था कोणती?
अ) मुकुटमूळे फुटणे
ब) कांड्याची वाढ
क) फूखे फुटणे
ड) फुलोरा येणे
Answer: अ) मुकुटमूळे फुटणे

8) ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते?
अ) केवळ प्रौढ पुरुष
ब) केवळ प्रौढ स्त्रिया
क) केवळ ग्राम पंचायत सदस्य
ड) गावांतील सर्व प्रौढ मतदार
Answer: ड) गावांतील सर्व प्रौढ मतदार

9) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १५८ मधील कलम ७ हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
अ) ग्रामपंचायत स्थापना
ब) ग्रामपंचायतीचे कर विषयक बाबी
क) सदस्य अनर्हता
ड) ग्रामसभेच्या बैठकी
Answer: ब) ग्रामपंचायतीचे कर विषयक बाबी

10) यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे?
अ) जलव्यय
ब) पर्यावरण संतुलन
क) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन
ड) स्त्रियांचा पंचायतराज व्यवस्थेतील सहभाग
Answer: क) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन

11) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील अगदी अलीकडील सुधारणेनुसार जिल्हा परिषदेवर स्त्री प्रतिनिधीसाठी ——– जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
अ) एक तृतीयांश
ब) दोन तृतीयांश
क) एक चतुर्था
ड) एक द्वितीयांश
Answer: ड) एक द्वितीयांश

12) एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३६२९ आहे तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निर्वाचित होऊ शकतील?
अ) ११
ब) १३
क) ९
ड) ७
Answer: अ) ११

13) मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतीची ———–होत.
अ) भूमिगत खोडे
ब) सोटमुळे
क) भूमिगत फळे
ड) यापैकी नाही
Answer: अ) भूमिगत खोडे

14) सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो?
अ) गट विकास अधिकारी
ब) सभापती, पंचायत समिती
क) अध्यक्ष, जिल्हा परिषद
ड) मुख्य कार्यकारी अधिकारी
Answer: ब) सभापती, पंचायत समिती

15) पंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीच्या वैधतेविषयी विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय देण्याचे अधिकार कोणास आहेत.
अ) जिल्हाधिकारी
ब) जिल्हा निवडणूक अधिकारी
क) दिवाणी न्यायालय
ड) मुख्य कार्यकारी अधिकारी
Answer: अ) जिल्हाधिकारी

16) हरितक्रांती नावाने ओळखले जाणारे नवीन कृषी धोरण राबविण्यास देशात या वर्षापासून सुरुवात झाली.
अ) १९६१
ब) १९६५
क) १९७६
ड) १९७७
Answer: ब) १९६५

17) इ. स. १९५७ मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने ———–
अ) सत्तेच्या केंद्रीकरणाची शिफारस केली.
ब) लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली.
क) स्थानिक स्वराज्य संस्था भ्रष्ट असल्याचे प्रतिपादन केले
ड) स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केल्या.
Answer: अ) सत्तेच्या केंद्रीकरणाची शिफारस केली.

18) मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?
अ) कलम ३९
ब) कलम ४१
क) कलम ४०
ड) कलम ३८
Answer: क) कलम ४०

19) कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’मध्ये ठेवला जातो?
अ) ठिबक
ब) तुषार
क) उपसा
ड) मोकाट पाणी देणे
Answer: अ) ठिबक

20) केंद्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना ——- दिवस काम पुरविण्याचे बंधन आहे.
अ) ३६०
ब) १००
क) २००
ड) यापैकी नाही
Answer: ब) १००

21) डांगी ब्रीड हे मूळचे ——— या राज्यातील आहे.
अ) गुजरात
ब) आंध्रप्रदेश
क) राजस्थान
ड) महाराष्ट्र
Answer: ड) महाराष्ट्र

22) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते?
अ) ग्रामसभा
ब) तहसिलदार
क) गटविकास अधिकारी
ड) यापैकी नाही
Answer: अ) ग्रामसभा

23) ठिबक सिंचनपद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते?
अ) १०
ब) २०
क) २५
ड) ३०
Answer: क) २५

24) कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातात?
अ) मोठे सिंचन प्रकल्प
ब) मध्यम सिंचन प्रकल्प
क) लघू सिंचन प्रकल्प
ड) उपसा सिंचन प्रकल्प
Answer: क) लघू सिंचन प्रकल्प

25) मोसंबीमध्ये फळाची गळती थांबण्यासाठी ———- संवर्धकाची फवारणी करतात.
अ) एन.ए.ए.. २० पी.पी.एम.
ब) आय.बी.ए. २० पी.पी.एम.
क) एन.ए.ए. १०० पी.पी.एम.
ड) जी.ए., ५० पी.पी.एम.
Answer: अ) एन.ए.ए.. २० पी.पी.एम.

26) निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे
अ) शेती
ब) दुग्धोत्पादन
क) मत्स्योत्पादन
ड) जलसिंचन
Answer: क) मत्स्योत्पादन

27) लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतींची सदस्य संख्या खालीलपैकी किती असते?
अ) ७ ते १७
ब) ५ ते १५
क) ७ ते ११
ड) ५ ते १७
Answer: अ) ७ ते १७

28) सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य पुढीलपैकी कोणते आहे?
अ) सारे शिकुया पुढे जाऊया
ब) चला शिकुया, पुढे जाऊया
क) चला उठा सारे शिका
ड) सारे शिकुया जग जिंकू या
Answer: अ) सारे शिकुया पुढे जाऊया

29) पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशाचे (Fats) प्रमाण जास्त असते.
अ) जर्सी संकरित गाय
ब) म्हैस
क) गावठी
ड) गिर गाय
Answer: ब) म्हैस

30) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A) जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीच्या बैठकांना हजर राहू शकतो.
B) गट विकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते.
C) पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार शकतो.
D) गट विकास अधिकारी ग्राम पंचायतीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो.
Answer: C) पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार शकतो.

31) जिल्ह्यातील सरपंचाची पदे स्त्रियांसाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीने आरक्षित केली जातात?
A) चिठ्ठ्या टाकून
B) गावांच्या नावांच्या आद्याक्षराप्रमाणे
C) आळीपाळीने (Rotation)
D) जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वेच्छाधिकारानुसार
Answer: C) आळीपाळीने (Rotation)

32) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A) ते भारतीय प्रशासन सेवेतील उच्चाधिकारी असतात.
B) जिल्हा परिषदेच्या विविध खातेप्रमुखांवर त्यांचे नियंत्रण असते.
C) ते जिल्हा परिषद व शासन यांमधील महत्त्वाचा दुवा होत.
D) ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात.
Answer: D) ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात.

33) ———- हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात.
A) जिल्ह्याचे पालकमंत्री
B) जिल्हा परिषद अध्यक्ष
C) मुख्य कार्यकारी अधिकारी
D) जिल्हाधिकारी
Answer: A) जिल्ह्याचे पालकमंत्री

34) टी-मॉस्क्युटो ही कीड कोणत्या फळपिकावर पडते?
A) आंबा
B) संत्री
C) पेरू
D) काजू
Answer: D) काजू

35) केंद्रीय मसाला पिके संशोधन केंद्र कोठे आहे?
A) कासार गोड
B) कोची
C) राजमहेंद्री
D) तिरुअनंतपुरम
Answer: A) कासार गोड

36) कोणत्या सालापासून “भूदान चळवळ” सुरू करण्यात आली?
A) १९५०
B) १९३०
C) १९४१
D) १९५१
Answer: D) १९५१

37) “राष्ट्रीय युवा दिन” केव्हा साजरा करतात
A) १२ जानेवारी
B) १५ मार्च
C) १० जानेवारी
D) २० फेब्रुवारी
Answer: A) १२ जानेवारी

38) पॅगोडा हा वास्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे?
A) हिंदू
B) शीख
C) बौद्ध
D) ख्रिश्चन
Answer: C) बौद्ध

39) चोपण जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात?
A) चुनखडी
B) जिप्सम
C) कोळसा
D) मीठ
Answer: B) जिप्सम

40) खालीलपैकी कोणत्या फळझाडाचा जनावरांसाठी चारा, रेशीम किड्यांसाठी खाद्य, लोणचे व मादक पेयनिर्मिती असा बहुउपयोग होतो?
A) जांभूळ
B) फालसा
C) करवंद
D) आवळा
Answer: A) जांभूळ


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT