Vanrakshak Practice Paper 10: महाराष्ट्र वनरक्षक सराव पेपर 10

Maharashtra Vanrakshak Practice Paper 10 – Forest Guard Practice Paper 10

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वन मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १० जून २०२३ पासून वनरक्षक भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार वनरक्षक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया …………

विभाग-१ मराठी

1) वंदना सिनेमाला गेली. ह्या वाक्याचे अपूर्ण वर्तमानकाळ रूपांतर करताना खालीलपैकी कोणता पर्याय निवडावा लागेल.
A. वंदना सिनेमाला जाते.
B. वंदना सिनेमाला जात होती.
C. वंदना सिनेमाला जात आहे.
D. वंदना सिनेमाला गेली होती.
Answer: C. वंदना सिनेमाला जात आहे.

2) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख
A. पत्रावळी
B. ताम्रपट
C. तांबूल
D. लेख
Answer: B. ताम्रपट

3) खालील शब्दाचा समास/ समास प्रकार ओळखा..
चरणकमल
A. द्वितीया तत्पुरुष
B. नत्र बहुव्रीहि
C. कर्मधारय
D. बहुव्रीहि
Answer: C. कर्मधारय

4) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायांमधून ओळखा,
शड्डू ठोकणे
A. गवंड्याने घरबांधणी करते वेळेस भितीत शड्डू ठोकला.
B. सुधा मावशी शड्डू ठोकत अप्रतिम गोड जेवण बनवायची.
C. मीनलने शड्डू ठोकत झाडांना पाणी दिले.
D. रिंगणात उतरताच राजा पहिलवानाने प्रतिस्पर्धासमोर शड्डू ठोकला
Answer: D. रिंगणात उतरताच राजा पहिलवानाने प्रतिस्पर्धासमोर शड्डू ठोकला.

5) पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा.
कापड
A. कडू
B. जरतारी
C. मऊ
D. विणलेले
Answer: A.कडू

6) पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.
A. तिची वही हरवले.
B. तिची वही हरवलो.
C. तिची वही हरवली.
D. तिची वही हरवल्या.
Answer: C. तिची वही हरवली.

7) पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.
“तुला मुक्ती मिळू शकेल असे सांप्रत काही लाभेल, असे वाटत नाही.”
A. उभयान्वयी अवय
B. शब्दयोगी अव्यय
C. केवलप्रयोगी अव्यय
D. क्रियाविशेषण अव्यय
Answer: D. क्रियाविशेषण अव्यय

8) दिलेल्या धातूचे शक्य क्रियापद ओळखा. खेळणे
A. खेळतो
B. खेळते
C. खेळवते
D. खेळतात
Answer: C. खेळवते

9) दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा.
कासव
A. मच्छ
B. कच्छप
C. वराह
D. सुपर्ण
Answer: B. कच्छप

10) जोडशब्द नसलेला शब्द निवडा.
A. बेलभांडार
B. बोलघेवडा
C. बाडबिस्तरा
D. बाजारहाट
Answer: B. बोलघेवडा

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the correct form of adjective for the given sentence:
Knowing no better, he used very ———- language.
A. spontaneous
B. accurate
C. inappropriate
D. correct
Answer: C. inappropriate

12) Out of the following options, identify a simple sentence
A. Gulliver opened his eyes gently.
B. Only to find himself surrounded by strange people.
C. Try as much, he was unable to raise himself.
D. There were birds in the sky and ants below him.
Answer: A. Gulliver opened his eyes gently.

13) Choose the appropriate collective noun to complete the sentence:
Scientists have recently discovered ——– of asteroids is fast that approaching the earth’s surface.
A. galaxy
B. constellation
C. belt
D. group
Answer: C. belt

14) Choose the correct form of adjective for the given sentence;
He must have done his duty, because he is ———- man.
A. upright
B. conscientious
C. conscious
D. truthful
Answer: B. conscientious

15) Choose the appropriate conjunctions for the given sentence:
He sprained his ankle———–played on to win the match.
A. and
B. otherwise
C. but
D. because
Answer: C. but

16) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:
if you don’t have a place to stay, you can’t get a job, and with no job you can’t get an apartment. It’s a Catch 22 situation.
A. a situation where one factor depends on another
B. a situation where you are caught red handed
C. a situation that depends on luck
D. a situation that revolves round destiny
Answer: A. a situation where one factor depends on another

17) Choose the appropriate prepositional phrase for the given sentence:
We are forwarding all the items on the list ——— your request.
A. of accordance
B. inspite of
C.in accordance with
D. with accordance
Answer: C.in accordance with

18) Choose the correct form of adjective for the given sentence:
She loves to help the blind across the road; she is ———–
A. considerate
B. loveable
C. dedicated
D. sincere
Answer: A. considerate

19) Choose the appropriate collective noun to complete the sentence:
Every morning the —— follows its coach for cricket practice.
A. team
B. group
C. class
D. band
Answer: A. team

20) Choose the option that has the correct spelling.
A. Consonant
B. Consonent
C. Cansonent
D. Censonant
Answer: A. Consonant

विभाग-३ गणित

21) 60 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 40% विद्यार्थी तार्किकीमध्ये उत्तीर्ण झाले. 5% विद्यार्थी बुध्दिमत्ता चाचणी आणि तार्किकीमध्ये नापास झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयांत उत्तीर्ण झाले. फक्त बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या काढा?
A.17
B.33
C23
D.37
Answer: B.33

22) एक रेल्वे 48 किमी/तासाच्या सरासरी वेगाने धावली, तर विशिष्ट अंतर 50 मिनिटामध्ये कापते. प्रवासाचा वेळ 40 मिनिटे एवढा कमी करण्यासाठी रेल्वेने किती वेगाने धावायला हवे?
A.50 किमी/तास
B.60 किमी/तास
C.65 किमी/तास
D. 70 किमी/तास
Answer: B.60 किमी/तास

23) 56 रुपये/किलोग्रॅम किंमत असलेला 8 किग्रॅ चहाला 69 रुपये / किग्रॅ असलेला 32 किग्रॅ चहा आणि 75 रुपये / किग्रॅ असलेल्या 25 किग्रॅ चहासोबत मिसळला गेला आणि मिश्रणाची 20% नफ्याने विक्री केली. मिश्रणाची विक्री किंमत काढा (रुपयांमध्ये)?
A. 82.64
B.83.64
C.80
D.85
Answer: B.83.64

24) (22)3 बरोबर किती:
A.64
B.32
C.256
D.16
Answer: A.64

25) राम सकाळी 10.15 वाजता बाहेर पडला आणि तो 3.5 तासांनी स्टेशनवर पोहचला. तो कि वाजता स्टेशनला पोहचला असेल?
A. दुपारी 1.45
B. रात्री 1.45
C. दुपारी 2.00
D. दुपारी 3.30
Answer: A. दुपारी 1.45

26) एका व्यापाऱ्याकडे 600 किग्रॅ तांदूळ आहे. ज्यामधील काही तांदळाची त्याने 15% नफ्याने आणि उर्वरित मात्रेची त्याने 20% तोट्याने विक्री केली. त्याला या सर्वांवर एकूण 6% तोटा झाला. 20% तोट्याने त्याने विक्री केलेल्या तांदळाचे प्रमाण काय आहे?

A. 300 किग्रॅ
B.410 किग्रॅ
C. 360 किग्रॅ
D. 210 किग्रॅ
Answer: C. 360 किग्रॅ

27) A हा एक विशिष्ट काम 12 दिवसांत पूर्ण करू शकतो. B हा A पेक्षा 60% अधिक कार्यक्षम आहे. तेच काम करण्यासाठी B ला किती दिवस लागतील?
A. 16/4
B.15/2
C.12

D.14/3
Answer: B. 15/2

28) 4 पुरूष आणि 6 महिला एक काम 8 दिवसांमध्ये पूर्ण करतात. तर 3 पुरूष आणि 7 महिला ते काम 10 दिवसांत पूर्ण करू शकतात. 10 महिला ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?
A. 35 दिवस
B. 40 दिवस
C. 45 दिवस
D.50 दिवस
Answer: B. 40 दिवस

29) 31 ऑक्टोबर 1984 रोजी कोणता दिवस होता?
A. बुधवार
B. गुरूवार
C. शुक्रवार
D. शनिवार
Answer: A. बुधवार

30) वडीलांचे वय हे त्यांचा मुलगा रोहितच्या वयाच्या तीन पट जास्त आहे. 8 वर्षांनंतर, त्यांचे वय रोहितच्या वयाच्या अडीच पट असेल. 8 वर्षांनंतर वडीलांचे वय रोहितच्या वयाच्या किती पट असेल?
A.2 पट
B.3 पट
C.4 पट
D.5 पट
Answer: A. 2 पट

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत, दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करणे शक्य आहे?
A. अनुच्छेद 153
B. अनुच्छेद 158
C. अनुच्छेद 156
D. अनुच्छेद 163
Answer: A. अनुच्छेद 153

32) पंतप्रधानांनी 24 फेब्रुवारी 2019 रोजी गोरखपूरमधून (पीएम- किसान) प्रकल्प सुरू केला. “पीएम- किसान” चे पूर्ण स्वरूप काय आहे?
A. प्रधान मंत्री किसान सन्मान निधी
B. प्रधान मंत्री किसान सिंचन सन्मान दर्शन
C. प्रधान मंत्री कृषी सिंचन सन्मान
D. प्रधान मंत्री किसान संघर्ष निर्माण
Answer: A. प्रधान मंत्री किसान सन्मान निधी

33) खालीलपैकी कोणत्या पहिल्या भारतीय कुस्तीपटूने ऑलिंपिकमध्ये रजत पदक जिंकले होते?
A. योगेश्वर दत्त
B. साक्षी मलिक
C. गीता फोगट
D. सुशिल कुमार
Answer: D. सुशिल कुमार

34) वन्यजीव संवर्धनासाठी भारताची पहिली जननिक बैंक ——– येथे उघडली
A. हैदराबाद
B. मुंबई
C. दिल्ली
D. चंदीगढ़
Answer: A. हैदराबाद

35) भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टाच्या समवर्ती सूचीशी खालीलपैकी कोणता घटक/ विषय संबंधित आहे?
A. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता
B. वने
C. स्टॉक एक्सचेंजेस
D. कृषी
Answer: B. वने

36) जर आपल्याला अतिरिक्त थकवा आल्यासारखे वाटले, तर खालीलपैकी कोणती वस्तू आपल्याला त्वरित ऊर्जा देऊ शकते?
A. ग्लुकोजचे पाणी
B. दूध
C. अन्न
D. पाणी
Answer: A. ग्लुकोजचे पाणी

37) मराठी भाषा दिन हा ——- च्या जयंतीला साजरा केला जातो.
A. ज्योतिबा फुले
B. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज
C. वीर सावरकर
D. गोविंदाग्रज
Answer: B. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज

38) सांसर्गिक काळपुळी हा जीवघेणा रोग ———मुळे होतो.
A. विषाणू
B. बुरशी
C. जंत
D. जीवाणू
Answer: D. जीवाणू

39) भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांची नेमणूक करताना राज्यपालाचा सल्ला घेतला जावा असे नमूद करतो.
A. अनुच्छेद 112
B. अनुच्छेद 400
C. अनुच्छेद 217
D. अनुच्छेद 356
Answer: C. अनुच्छेद 217

40) ———– वर्षामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेसदरम्यान लखनऊ करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती..
A. 1921
B.1916
C.1942
D.1931
Answer: B.1916


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT