Talathi Practice Paper 03 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३

Talathi Practice Paper 03 | Talathi Practice Question Paper Set 03

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १५ मार्च २०२३ पासून तलाठी भरती प्रक्रिया चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३

विभाग-१ मराठी

1) ‘आत्मजा, तनया, तनुजा हे शब्द खालीलपैकी कोणासाठी वापरतात?
A. ओटी
B. विदुषी
C) मुल
D. मुलगी
Answer. D. मुलगी

2) पोपट पेरू खाते. या वाक्यातील क्रियापदाचे योग्य रुप सांगा.
A. खातो
B. खाते
C. खाऊ
D. खाणे
Answer: A. खातो

3) खालीलपैकी कोणता अंशाभ्यस्त शब्द फारसी मराठी या दोन भाषांपासून तयार झाला?
A. जुलुमजबरी
B. अक्कलहुशारी
C. बाजारहाट
D. डावपेच
Answer: C. बाजारहाट

4) खालील पर्यापातून अनुकरणवाचक शब्द ओळखा.
A. किरकिर
B. गडबड
C. समोरासमोर
D. दारोदार
Answer: A. किरकिर

5) जे शब्द मूळ महाराष्ट्रातील रहिवाश्यांच्या बोलीभाषेतील मानले जातात, त्यांना …… शब्द म्हणतात.
A. देशज
B. तत्सम
C. तद्भव
D. कोकणी
Answer: A. देशज

6) केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ-
A. त्रास देणे.
B. विश्वासघात करणे.
C. केस कापणे
D. खून करणे.
Answer: B. विश्वासघात करणे.

7) ‘बराय’ या शब्दाची भावना ओळखा.

A आसूर्यदर्शक
B. हर्षदर्शक
C मौनदर्शक
D. समतिदर्शक
Answer: D. समतिदर्शक

8) त्याने आता घरी जावे. प्रयोग ओळखा.
A. भावे
B. कर्मणी
C. कर्तरी
D. नवीन कर्मणी
Answer: A. भावे

9) ‘गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीचा अर्थ-
A. गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतराच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
B. वैद्यकीय सल्ला घेणे.
C. वैद्याला कशाचीही गरज नसते.
D. आपले काम झाले की उपकार करणाऱ्याची पर्वा न करणे.
Answer: D. आपले काम झाले की उपकार करणाऱ्याची पर्वा न करणे

10) शिक्षक मुलांना शिकवितात या वाक्यातील कर्म ओळखून लिहा.
A. मुलांना
B. शिक्षक
C. शिकवितात
D. शिक्षक मुलांना
Answer: A. मुलांना

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the option that best punctuates the given sentence:
The little girl asked her mother are we going home now.
A. The little girl asked her mother, “Are we going home now?”
B.The little girl asked her mother, “are we going home now”.
C. The little girl asked her mother “Are we going home now.”
D. The little girl asked her mother. “Are we going home now.?”
Answer: A. The little girl asked her mother, “Are we going home now?”

12) Combine both the sentences below with a relative pronoun.
That is my friend Gautam. Gautam has opened a new showroom.
A. That is my friend Gautam who has opened a new showroom.
B. My friend Gautam has opened a new showroom.
C. It is my friend Gautam that has opened a new showroom.
D.A new showroom has been opened by Gautam that is my friend.
Answer: A. That is my friend Gautam who has opened a new showroom.

13) Choose the appropriate prepositional phrase for the given sentence:
—————- reach early, took the shorter route.
A. In order for
B. In order with
C. In order in
D. In order to
Answer: D. In order to

14) Choose the option that best transforms the given sentence as directed:
He is very old. He cannot walk.
(Combine the two sentences into one sentence)
A. He is so old but cannot walk.
B. He is very old and cannot walk
C. He is very old enough not to walk
D. He is too old to walk.
Answer: D. He is too old to walk.

15) Choose the option that has all words spelt correctly.
A servant, guidance, assistant
B. servent, guidance, asistant
C. servent guidence, assistant
D servant, guidance, assistent
Answer: A servant, guidance, assistant

16) Select the suitable determiner from the given options to complete the given sentence:
Have you watched —— of the James Bond movies?
A. few
B. any
C. little
D. a few
Answer: B. any

17) Choose the appropriate preposition to complete the given sentence
Gemma is bad _ tennis.
A.in
B.at
C. over
D. about
Answer: B.at

18) Choose appropriate conjunctions for the given sentence:
I like you a lot ——-you are kind ——-smart.
A. but, and
B. If, and
C. because, and
D. although, while
Answer: C. because, and

19) Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence:

If were you, I——-consider the job offer seriously
A. ought
B. can
C.would
D. must
Answer: C. would

20) Choose the correct form of adjective for the given sentence:
Don’t overtake on a ——— comer
A. blind
B. blunt
C. sharp
D steep
Answer: A. blind

विभाग-३ गणित

21) वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा 4, 23, 60, 121, —-
A.212
B.221
C.241
D.242
Answer: A.212

22) एका वस्तूची किंमत खरेदी किमतीपेक्षा 50% जास्त लावली गेली. जर लावलेल्या किमतीवर 10% सूट दिली गेली. तर आता वास्तविक नफ्याची टक्केवारी काय असेल?
A.40%
B.35%
C.32%
D.30%
Answer: B.35%

23) अभया तासामध्ये एक डॉल हाउस तयार करते, तर विनय तेच काम 8 तासामध्ये करतो. जर त्या दोघांनी मिळून काम करण्याचे ठरविले तर ते 48 तासामध्ये अशी किती डॉल हाउस तयार करू शकतात
A.7
B.14
C.21
D.28
Answer: B.14

24) देसिकनचा जन्म शनिवार नोव्हेंबर 9, 2002 ला झाला होता. 2008 मधील त्याच्या वाढदिवसाला आठवडयाचा कोणता दिवस?
A. शनिवार
B. रविवार
C. सोमवार
D. मंगळवार
Answer: B. रविवार

25) सिमी आणि निमी बहिणी आहेत. जेव्हा सिमी 10 वर्षांची होती तेव्हा निमीचं वय तिच्या दुप्पट होतं. सध्या त्यांच्या वयाची सरासरी जर 25 असेल तर निमीचे वय काढा.
A. 30 वर्ष
B. 40 वर्ष
C. 45 वर्ष
D. 60 वर्ष
Answer: A. 30 वर्ष

26) तीन संख्यांची बेरीज 174 आहे. दुसरी संख्या आणि तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 9:16 आहे, आणि पहिल्या संख्येस तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 1:4 आहे. दुसरी संख्या काय असेल?
A.52
B.45
C.54
D.60
Answer: C.54

27) सरासरी काढा.
98, 65, 78, 98, 86&79
A.98
B.84
C.56
D.85
Answer: B.84

28) जर A हा B पेक्षा उंच आहे. C हा B पेक्षा ठेंगणा आहे, आणि D हा A पेक्षा ठेंगणा आहे. पण C पेक्षा उंच आहे, तर त्यांच्यापैकी सर्वात ठेंगणा कोण आहे?
A.D
B.C
C.B
D.A
Answer: B.C

29) जर तुमच्या शाळेपासून घरापर्यंतचे अंतर 1.2 किमी. आहे आणि आपला चालण्याचा वेग 3 किमी/तास असेल, तर आपल्या घरापासून आपल्या शाळेत जाण्यासाठी आपण वेळ घ्याल :
A. 2 तास 30 मिनिटे
B. 24 मिनिटे
C. 36 मिनिटे
D. 2.5 मिनिटे
Answer: B. 24 मिनिटे

30) A एक काम 6 दिवसांत करू शकतो. A आणि B एकत्रितरित्या ते काम 2 दिवसांत करू शकतात. तेव्हा एकटा B ते काम किती दिवसांत करू शकतो?
A.4
B.3
C.2
D.5
Answer: B.3

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) न्यूरॉन या ———- च्या पेशी असतात.
A. मूत्रपिंड
B. यकृत
C. चेता
D. मान
Answer: C. चेता

32) शेव म्हणजे खाण्याचा पदार्थ ‘शेव’ शब्दाचा दुसरा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
A. दाढी करणे
B. साडीचा पदर
C. शरीराचा भाग
D. एक फळ
Answer: B. साडीचा पदर

33) (आरटीआय) माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या विभागा अंतर्गत एखादी व्यक्ती सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळविण्यासाठी अर्ज करू शकते?
A.6
B.7
C.8
D.9
Answer: A.6

34) कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपूर्ण महाकाव्याची रचना केली होती?
A. छत्रपती शाहू
B. मालोजी महाराज
C. छत्रपती शिवाजी
D. संभाजी शहाजी
Answer: C. छत्रपती शिवाजी

35) सूरीमध्ये धारदार कर्तन कडा असते कारण
A. ते स्पर्श क्षेत्र कमी करते आणि प्रयुक्त होणारा दाब वाढवते
B. ते स्पर्श क्षेत्र वाढवते आणि प्रयुक्त होणारा दाब वाढवते
C. ते स्पर्श क्षेत्र कमी करते आणि प्रयुक्त होणारा दाब कमी करते
D. ते स्पर्श क्षेत्र वाढवते आणि प्रयुक्त होणारा दाब कमी करते
Answer: A. ते स्पर्श क्षेत्र कमी करते आणि प्रयुक्त होणारा दाब वाढवते

36) मंत्री परिषदेमध्ये पंतप्रधानासह मंत्र्याची एकूण संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या टक्के पेक्षा जास्त असू नये.
A. 10%
B.15%
C.16%
D.20%
Answer: B.15%

37) विनू मनकड चषक ——साठी किडा कार्यक्रम आहे
A. क्रिकेट
B. बास्केटबॉल
C. फूटबॉल
D. हॉकी
Answer: A. क्रिकेट

38) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते?
A. पंत प्रधान
B. राष्ट्रपती
C. कायदा मंत्री
D. भारताचे मुखा न्यायाधीश
Answer: B. राष्ट्रपती

39) कोणता मुस्लिम सण हजच्या पवित्र कालावधीच्या सुरुवातीला चिन्हांकित करतो?
A. ईद-उल-जुहा
B. ईद-उल-फित्र
C. मिलाद-उल-नबी
D. मुहरम
Answer: A. ईद-उल-जुहा

40) डांबराच्या गोळयांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, कारण त्याचे
A. बाष्पीभवन होते
B. संघनन होते
C.संप्लवन होते
D. यापैकी नाही
Answer: C.संप्लवन होते


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT