Solve these “Problems on Triangle” to ace Reasoning part : या “त्रिकोण वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Problems on Triangle” to ace Reasoning part : या “त्रिकोण वर आधारित प्रश्नचे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Problems on Triangle: “या प्रकारच्या टॉपिक मधे त्रिकोण वरील प्रश्न विचारले जातात. त्यासाठी आपल्याला त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, त्रिकोणाचे नियम व गुणधर्म, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे परिमिती हे सगळे माहिती असणे आवश्यक आहे. तरच आपण असे प्रश्न सहज सोडवू शकतो. त्यासाठी आपण खाली दिलेले काही नियम व सूत्रे पाहू.

१) त्रिकोणाचे क्षेत्रफळ= 1/2 × पाया × उंची

२) समभुज त्रिकोण(Equilateral Triangle):

समभुज त्रिकोण मधे सर्व बाजू समान असतात आणि प्रतेक कोन 60° असतो.

समभुज त्रिकोण चे क्षेत्रफळ = √3/4 × (बाजू)^2

३) समदविभुज त्रिकोण (Isosceles Triangle):
समदविभूज त्रिकोण मधे दोन बाजू समान असतात.

आणि समान बाजू असलेल्या बाजू समोरील कोन सुद्धा समान असतात.

समदविभून काटकोन त्रिकोण मधे तीन कोन 90°, 45°, 45° असे असतात.

समदविभूज काटकोन त्रिकोण चे क्षेत्रफळ= 1/2× पाया × उंची

४) त्रिकोण मधे सर्व म्हणजेच तीनही कोनाची बेरीज 180° असते.

५) लघुकोण (Acute angle):

लघुकोन 90° पेक्षा कमी असतो.

६) काटकोन (right angle):

काटकोन 90° च असतो.

७) विषालकोन (Obtuse Angle):

विशाल कोन 90° पेक्षा जास्त असतो.

आता आपण त्रिकोण वरील विविध उदाहरणे सोडवू.

उदाहरणे:

१.) √3 युनिट बाजू असलेल्या समभुज त्रिकोण मधे अंतर्भूत असलेल्या वर्तुळ ची त्रिज्या किती?
a) 1/2 unit
b) 1/4 unit
c) 1 unit
d) 2/3 unit

उत्तर: c) 1 unit

स्पष्टीकरण:

आपल्याला माहिती आहे की, समभुज त्रिकोण मधे अंतर्भूत असलेल्या वर्तुळ ची त्रिज्या (a/√3) असते, जिथे a म्हणजे समभुज त्रिकोण ची बाजू.
इथे समभुज त्रिकोण ची बाजू √3 दिली आहे.
म्हणून, a= √3
म्हणून, वर्तुळ ची त्रिज्या = a/√3 = √3/√3 = 1
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

२.) ABC हा समभुज त्रिकोण आहे आणि P, Q, R हे बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC यांचे मध्यबिंदू आहेत अनुक्रमे. जर समभुज त्रिकोण ची बाजू 4cm असेल तर त्रिकोण PQR चे क्षत्रफळ काय असेल?
a) √3/9 cm2
b) 1/4√3 cm2
c) √3/2 cm2
d) √3 cm2

उत्तर: d) √3 cm2

स्पष्टीकरण:

समभुज त्रिकोण ची बाजू 4cm दिली आहे.
म्हणून,
समभुज त्रिकोण चे क्षेत्रफळ= (√3/4)× (बाजू च वर्ग)
= √3/4 × 16
= 4√3

इथे, बिंदू P, Q आणि र हे बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC यांचे मध्यबिंदू आहेत.
म्हणून,
त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ = 1/4× त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ
= 1/4× 4√3
= √3 cm2
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय d) असेल.

3.) जर दोन सारख्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 16cm2 आणि 36cm2 असेल तर त्यांच्या सबंधित बाजूंचे गुणोत्तर काय असेल?
a) 3:4
b) 4:6
c) 16:36
d) 4:8

उत्तर: b) 4:6

स्पष्टीकरण:

समजा त्या दोन त्रिकोणाच्या सबंधित बाजू A आणि B असतील तर त्यांचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर खालील प्रमाणे.
क्षेत्रफळ गुणोत्तर = [√3/4 ×(A च वर्ग)]/[√3/4×(B च वर्ग)]
16/36 = A च वर्ग/ B च वर्ग
A/B = 4/8
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

४.) जर एका समभुज त्रिकोण ची परीमिती 36√3m. तर त्या त्रिकोण ची उंची किती असेल?
a) 12
b) 16
c) 14
d) 18

उत्तर: d) 18

स्पष्टीकरण:

आपणास माहिती आहे की, समभुज त्रिकोण ची परिमीती = 3× बाजू
3× बाजु= 36√3
बाजू = 36√3/3 = 12√3
आपणास माहिती आहे,
समभुज त्रिकोण ची उंची = √3/2× बाजू
= √3/2 × 12√3
= 6×3
= 18
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय d) असेल.

५.) जर त्रिकोणाच्या तीन मध्यगांची लांबी 3cm, 6cm आणि 5cm असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असेल?
a) √405/3 cm2
b) √345/3 cm2
c) 4/3 √56 cm2
d) √255/3 cm2

उत्तर: c) 4/3 √56 cm2

स्पष्टीकरण:

आपणास माहिती आहे,
S = (M1+M2+M3)/2
S= (3+6+5)/2
S= 14/2
S= 7
आता,
त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ= 4/3× √s(s-m1)(s-m2)(s-m3)
= 4/3 × √7(7-3)(7-6)(7-5)
= 4/3 × √7×4×1×2
= 4/3 × √56 cm2
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

६.) जर समभुज त्रिकोण ची बाजू 12cm असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असेल?
a) 32√3 cm2
b) 36√3 cm2
c) 34√3 cm2
d) 30√3 cm2

उत्तर: b) 36√3 cm2

स्पष्टीकरण:

आपणास माहिती आहे,
समभुज त्रिकोण चे क्षेत्रफळ= √3/4 × बाजू च वर्ग
= √3/4 × 12×12
= 36√3
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

७.) जर एका काटकोन समदविभूज त्रिकोण चे क्षेत्रफळ 81cm2 असेल तर त्याचा कर्न काढा.
a) 18cm
b) 22cm
c) 14cm
d) 16cm

उत्तर: a) 18cm

स्पष्टीकरण:

आपणास माहिती आहे, काटकोन समदविभूज त्रिकोण मधे दोन बाजू समान असतात तर तिसरी बाजू कर्णा असेल.
समजा, त्या समान बाजू ची लांबी x आहे समजू.
त्रिकोण चे क्षेत्रफळ= 1/2×b×h
81=1/2×x×x
x = 9√2
पायथागोरस नियमानुसार,
कर्ण= √[(9√2)^2 + (9√2)^2]
= √[162+162] = √324 = 18
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय a) असेल.

Also Solve: Mathematical Operations Question and Answer Solution

 ८.) खाली दिलेल्या समीकरण मधे कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागले जेणे करून दिलेले समीकरण संतुलित होईल?

7 – 9 × 3 ÷ 9 + 5 = 5

a) – आणि ×

b) ÷ आणि ×

c) + आणि –

d) + आणि ÷

उत्तर: c) + आणि –

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,

7 – 9 × 3 ÷ 9 + 5 = 5

 

जर आपण दिलेल्या समीकरण मधे + आणि – या चिन्हांची अदलाबदल केली तर,

7 + 9 × 3 ÷ 9 – 5 = 5

7 + 3 – 5 = 5

10 – 5 = 5

5 = 5

म्हणजे आपले समीकरण संतुलित झाले आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT