नागपूर महानगरपालिका मध्ये चार हजारावर पदे रिक्त 2020

Nagpur Municipal Corporation Bharti 2020 – 4000 Vacancy

मनपात ११,९६१ पदे मंजूर पदांपैकी तब्बल ४००४ पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्चही ५० टक्यांवर आहे. त्यामुळे आता मनपावरील ताण वाढला आहे. मनपात कंत्राटी कर्मचारीही कार्यरत आहेत. शिक्षक संवर्गातील १०७ पदे मात्र अतिरिक्त ठरली आहेत. त्यामुळे सातवा वेतन आयोग रखडला आहे.

आतापर्यंत ८६९ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. ८५० आश्वासीत पदोन्नती झाल्या आहेत. २००४मध्ये रिक्तपदे भरण्यात आली. त्यानंर २०१२मध्ये पदभरती झाली. तदनंतर भरती रखडली आहे. त्यामुळे रिक्त पदांची संख्या मोठी आहे. सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या दर महिन्यात वाढत आहे. त्यामुळे कंत्राटी नियुक्तीवर काम सुरू आहे. अतितात्काळ स्वरुपाची ५४ पदे भरण्यात आली आहेत. कंत्राटी सेवानिवृत्तीनंतर पदभरती केलेल्यांची संख्या तीनशेच्या आसपास असेल. सीमेंट रस्त्यांसाठी ८० तर, अग्निशमन विभागात १३ जणांची भरती करण्यात आली. उपद्रव शोध पथकातही कंत्राटी भरण्यात आली आहे. त्यामुळे कामावर परिणाम होत आहे.

महोत्सवासाठी अनुदान

२०१९-२० या आर्थिक वर्षात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासाठी मनपाने २० लाखाचा अनुदान देण्यास मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

SOURCE: https://maharashtratimes.indiatimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.