मुंबई महानगर पालिकेची लिपिक भरती लांबणीवर

मुंबई महानगर पालिकेची लिपिक भरती लांबणीवर

पालिकेच्या नोकर भरतीकडे आशेने डोळे लावून बसलेल्या इच्छुकांचा तूर्तास तरी हिरमोड होणार आहे. कार्यकारी सहायक पदाच्या अर्थात, लिपिकपदासाठी सरळसेवा पदांमधून होणाऱ्या ८१० पदांची भरती लांबणीवर पडली आहे. या भरतीसह पालिका कर्मचाऱ्यांमधून होणाऱ्या ८७४ जागांसाठीची अंतर्गत भरतीही रखडली आहे. आस्थापना खर्चात होत असलेली वाढ आणि पालिकेच्या उत्पन्नात झालेली घट यांमुळे ही भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पालिकेत कार्यकारी सहायक वर्गातील पाच हजार २५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३,२२१ पदे भरायची आहेत. त्यातील ८१० पदे सरळसेवा भरतीतून भरण्यात येणार आहेत. तर, कर्मचाऱ्यांमधून अर्थात अंतर्गत भरतीतून ८७४ पदे भरण्यात येणार होती. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाऊन त्याची लिंक महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार होती. भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मागील बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. पण, त्यावेळी निर्णय होऊ शकला नाही. गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित होते. पण, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी एका निवेदनाद्वारे प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली. पालिकेच्या उत्पन्नात झालेली घट व आस्थापना खर्चात झालेली वाढ, यामुळे नोकर भरतीचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यास विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आक्षेप घेतला. ‘सल्लागारांवर कोट्यवधी रुपये उडवणारी महापालिका प्रशासन नोकर भरतीला विरोध का करत आहे? लिपिकांची कमतरता लक्षात घेता भरती झालीच पाहिजे’, असा आग्रह त्यांनी धरला. अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाचे निवेदन फेटाळत मूळ प्रस्तावावरील निर्णय पुढील बैठकीपर्यंत राखून ठेवला आहे.

SOURCE: https://maharashtratimes.indiatimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- [email protected] . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.


Mumbai Mahanagarpalika Recruitment 2020

मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai], Mumbai will be published soon a new job notification for Executive Assistant Posts . There are in total 874 Vacancies. This Mega Bharti process will be implemented by taking an Online Test.  For more details of Mumbai Mahanagarpalika Bharti 2020 Read Below.

मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागांसाठी भरती:

कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर मुंबई महापालिकेत आता महाभरती होणार आहे. लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत. याबाबतची ऑनलाइन परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परीक्षेच्या प्रक्रियेसाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

पालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८७४ पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात एकूण तीन हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ५०० रुपये शुल्क घेतले जाणार असून, मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ३०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. भरतीसाठी पालिकेने महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. उद्या, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
या भरतीसाठी उमेदवारांची इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षा होणार आहे. राज्य सरकारच्या महाआयटी आणि आयबीपीएस या नामांकित संस्थांनी ही परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. महाऑनलाइन ही सरकारी कंपनी भरती प्रक्रिया राबवणार असल्याने जाहिरातीद्वारे निविदा मागवण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

SOURCE: https://maharashtratimes.indiatimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- [email protected] . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.