MH SET 2024 Eligibility & Qualifying Criteria | MH SET 2024 पात्रता आणि उत्तीर्ण होण्याचे नियम (निकष)

MH SET

MH SET 2024 ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि युजेसी नवी दिल्ली मान्यता प्राप्त नोडल एजन्सी मार्फत 31 वी परीक्षा घेण्यात येत आहे. आज पर्यंत ज्या 30 MH SET परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. परंतु 7 एप्रिल 2024 रोजी होणारी MH SET ही परीक्षा शेवटची ऑफलाईन परीक्षा ठरणार आहे. यानंतर होणाऱ्या पुढील MH SET परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून त्यासाठीचा अभ्यासक्रमात सुद्धा बदल करण्यात येणार आहे. म्हणून ऑफलाईन परीक्षा देण्याची ही शेवटची संधी आहे असे आपण म्हणू शकतो. MH SET या परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख म्हणजेच आज 12 जानेवारी पासून ते 31 जानेवारी 2024 पर्यंत ची मुदत देण्यात आलेली आहे. MH SET ही परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा मधील वरिष्ठ महाविद्यालय मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळविण्यासाठी घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण केली म्हणजे आपण सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आपण ज्या विषयात परीक्षा दिली त्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून पात्र होऊ शकतो.

MH SET ही परीक्षा मुख्यतः arts, science mental moral and social Sciences, commerce, law, management, education and physical education इत्यादी विभागातील विविध विषयांमध्ये म्हणजेच एकूण 32 विषयांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. यापूर्वी आपण सेट परीक्षेची आवश्यकता का आणि सेट परीक्षेचा फॉर्म कसा भरावा याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. आज या पेजवर आपणास सेट परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक निकष यांची अधिकृत माहिती घेणार आहोत.

MH SET 2024 Eligibility Criteria | MH SET 2024 करीता आवश्यक शैक्षणिक पात्रता

MH SET 2024 परीक्षा देण्यासाठी म्हणजेच परीक्षेचा फॉर्म भरणे आधी आपण खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

सेट परीक्षा देणार उमेदवार हा त्या विषयातून पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण केलेला असावा किंवा त्या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला असायला हवा. असेच उमेदवार हे MH SET 2024 या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात.

खाली दिलेल्या 32 विषयांमधून कोणत्याही एका विषयात त्या उमेदवाराने पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला असायला हवा. म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशनला असणाऱ्या विषयातच तो उमेदवार सेट परीक्षा ही देऊ शकतो. जर एखाद्या उमेदवाराला त्याच्या पोस्ट ग्रॅज्युएशनला असणारा विषय या यादीमध्ये नसेल, तर संबंधित विषयाशी निगडित विषय तो या यादीमधून घेऊ शकतो, परंतु हे UGC ने दिलेल्या गाईडलाईन नुसार होणे आवश्यक आहे.

खाली दिलेल्या एकूण 32 विषयांपैकी कोणत्याही एका विषयात त्या उमेदवाराने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे किंवा त्या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षात तो व्यक्ती असावा.

  • मराठी
  • हिंदी
  • इंग्लिश
  • संस्कृत
  •  उर्दू
  • History
  • Economics
  • Philosophy
  • Psychology
  • Sociology
  • Political science
  • Defence and strategic studies
  • Home science
  • Library and information science
  • Journalism and Mass communication
  • Social work
  • Public administration
  • Mathematical Sciences
  • Environmental Sciences
  • Physical Sciences
  • Chemical Sciences
  • Life sciences
  • Earth, atmospheric, ocean and planetary science
  • Geography
  • Computer science and application
  • Chronic science
  • Commerce
  • Management
  • Law
  • Education
  • Physical education

वरील एकूण 32 विषयांमध्ये महाराष्ट्र मध्ये सेट ही परीक्षा घेतली जाते. म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशनला वरीलपैकी एखादा विषय असणे आवश्यक आहे तरच तो व्यक्ती त्या विषयात MH SET 2024 ही परीक्षा देऊ शकतो.

जर एखादा विद्यार्थी चे पोस्ट ग्रॅज्युएशन वर दिलेल्या 32 विषयांमध्ये नसेल तर त्या विषयांची संबंधित विषयांमध्ये ते सेट या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात (यूजीसीच्या नियमानुसार).

जर एखाद्या विद्यार्थ्याने एखादा विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर तो विद्यार्थी पुन्हा त्याच विषयाकरिता सेट परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरू शकत नाही. असे केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई केल्या जाऊ शकते किंवा त्याचे सर्टिफिकेट रद्द केल्या जाईल. म्हणून एका विषयात फक्त एकाच वेळी सेट परीक्षा उत्तीर्ण करता येते.

सेट परीक्षा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट अजून देण्यात आलेली नाही. म्हणजेच वयाच्या कोणत्याही वर्षी तुम्हाला MH SET परीक्षा देता येते. त्याकरिता फक्त संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे.

MH SET ही परीक्षा केवळ महाराष्ट्रामधील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक होण्याकरितासाठीची पात्रता परीक्षा आहे. ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाराष्ट्र बाहेर सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

सेट या परीक्षेकरिता अर्ज करण्यासाठी SC/ ST/ OBC/ SBC/ VJ/ NT/ Transgender/PWD/ Orphan या कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनला कमीत कमी 55 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

तसेच OBC/ SBC/ VJ/ NT (नॉन क्रिमी लेयर गटात मोडत असलेले) आणि SC/ST/Transgender/ PwD/ Orphans या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता त्या विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन ला किमान 50 टक्के गुण मिळवले असावे.

सेट ही परीक्षा दरवर्षी एक वेळा घेतल्या जात असून त्यासाठी महाराष्ट्रामधील 17 सेंटर हे परीक्षे करिता दिले जातात. महाराष्ट्र मध्ये एकाच वेळी एकाच दिवशी ही परीक्षा ऑफलाईन घेतली जाते. या परीक्षेकरिता उपलब्ध असणारे परीक्षा केंद्र हे खालील प्रमाणे आहेत.

मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, गोवा, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, धुळे, रत्नागिरी, परभणी अशा एकूण 17 परीक्षा केंद्रांवर SET ही परीक्षा एकाच वेळी आणि एकाच दिवशी ऑफलाइन पद्धतीने घेतले जाते.

MH SET या परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज करताना भरावयाची फी ही खालील प्रमाणे आहे. OPEN प्रवर्ग करिता 800 रुपये फी आकारले जाते. तर SC/ST/PwD/Transgender/Orphans/OBC/VJ/NT B/NT C/NT D/ SBC (Non Creamy Layer only)/EWS(OPEN) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 650 रुपये फी आकारले जाते.

See also: How to Apply Maha SET Exam Year 2024

अशाप्रकारे MH SET 2024 परीक्षेचा अर्ज करण्याआधी आपण वरील शैक्षणिक पात्रता किंवा नियम पूर्ण करायला हवे. अन्यथा कोणत्याही स्टेजवर सदर व्यक्तीचा फॉर्म किंवा उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र रद्द केल्या जाऊ शकते.

MH SET 2024 Exam Qualifying Criterion | MH SET 2024 परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष:

MH SET 2024 ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे सर्व प्रकारचे प्रवर्गनुसार आणि नियमानुसार जे निकष खालील प्रमाणे आहेत.

सेट या परीक्षेमध्ये युजीसीच्या नियमानुसार प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षण दिले आहे ते खालील प्रमाणे.

  • SC – 13%
  • ST – 7%
  • OBC – 19%
  • EWS (OPEN) – 10%
  • SBC – 2%
  • VJ A – 3%
  • NT B – 2.5%
  • NT C – 3.5%
  • NT D – 2%
  • General – 38%
  • Horizontal Reservation (Orphan) – 1%
  • Bench mark disability – 5%

वर दिलेल्या प्रवर्गनिहाय आरक्षणानुसारच त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांची त्यांच्या आरक्षणा नुसार निवड केली जाते आणि त्यांचा उत्तीर्ण होण्याचा कटऑफ ठरविला जातो.

आपणास माहिती आहे की सेट या परीक्षेमध्ये दोन वेगळे पेपर घेतले जातात. पेपर 1 हा सर्व उमेदवारांसाठी म्हणजेच 32 विषयांसाठी एकच घेतला जातो. या पेपरमध्ये एकूण 50 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नात दोन गुण दिले जातात. म्हणजेच पेपर 1 हा 100 गुणांचा असून यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते. पेपर एक साठी एक तासाचा कालावधी दिला जातो. एकंदरीत पेपर एक हा सर्वांसाठी कॉमन असतो.

पेपर दोन हा वरील 32 विषयांसाठी वेगवेगळ्या असतो. म्हणजेच पेपर दोन मध्ये तुम्ही ज्या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे त्या विषयावर आधारित प्रश्नांचा असतो. यात एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण दिले जातात.

पेपर 2 हा प्रत्येक विषयासाठी 200 गुणांचा असतो आणि यात सुद्धा कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते. पर दोन करिता दिला जाणारा कालावधी म्हणजे दोन तास असतो.

MH SET या परीक्षेकरिता बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सहा टक्के 6% विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण केली जातात.

म्हणजेच 6% विद्यार्थ्यांची निवड केल्यानंतर त्यांच्या प्रवर्ग आरक्षणा नुसार त्यांचा कट ऑफ निर्धारित केला जातो.

एकूण विद्यार्थ्यांपैकी 6% विद्यार्थ्यांमध्ये आपले नाव येण्यास त्या उमेदवाराने किमान खालील निकष पूर्ण करावा लागतो.

  • OPEN/EWS प्रवर्गातील उमेदवाराने पेपर एक आणि पेपर दोन मिळून किमान 40 टक्के गुण घेणे आवश्यक आहे.
  • तर उर्वरित प्रवर्ग मधील विद्यार्थ्यांनी दोन्ही पेपर मिळून किमान 35 टक्के गुण घेणे आवश्यक आहे.

तसेच प्रत्येक प्रवर्गामधील आणि प्रत्येक विषयामधील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निकष किंवा सूत्र हे सेट भवन च्या अधिकृत संकेतस्थळावर आपणास उपलब्ध करून दिलेले आहे ते तुम्ही बघू शकता.

प्रत्येक प्रवर्गाचा आणि प्रत्येक विषयाचा कट ऑफ हा वेगवेगळा असतो.

अशाप्रकारे वरील सर्व नियमांचे किंवा निकष यांचे पालन करूनच सदर उमेदवार सेट या परीक्षेत उत्तीर्ण झाला की नाही हे ठरते आणि त्यानंतरच निकाल घोषित केला जातो. म्हणजे दरवर्षी या परीक्षेत सहा टक्के निकाल घोषित केला जातो.

थोडक्यात सेट परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार महाराष्ट्र मध्ये कोणत्याही वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त केला जातो. तसेच SET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना PET परीक्षा उत्तीर्ण करण्याची गरज नसते. म्हणजेच सेट उत्तीर्ण विद्यार्थी महाराष्ट्र मधे PhD करीता पात्र ठरतात.

जर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा महाराष्ट्र मधील विविध नोकरीच्या संधीची वाट पाहत असाल तर आमचे टेलिग्राम चैनल महा सरकार नक्कीच फॉलो करा. आम्ही आपणास वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या जाहिराती, परीक्षा, नोकरीच्या संधी अशा प्रकारची संपूर्ण अधिकृत माहिती जलद आणि तात्काळ पद्धतीने आपणापर्यंत पोहोचवत असतो. आमचे पेज लाईक करायला विसरु नका.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT