Locking Preferences on Pavitra Portal | पवित्र पोर्टल वर प्राधान्यक्रम लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया

maha govt

पवित्र पोर्टल वर प्राधान्यक्रम लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया | Process of locking Preferences on Pavitra Portal

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 म्हणजेच Teacher Aptitude and Intelligence Test 2022 या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वर्ग पहिली ते बारावी करिता शिक्षकांची असलेली रिक्त पदे भरण्यासाठी ची सुरुवात म्हणजेच प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक 5 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली आहे. जर आपणास आपल्या एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि प्रवर्गनुसार प्राधान्यक्रम लोक करायचे असतील तर खालील स्टेप बाय स्टेप मेथड फॉलो करून तुम्ही प्राधान्यक्रम नोंदवू शकता आणि लॉक करू शकता.

  • खाली दिलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ यावर जाऊन तुम्ही सुरुवातीला लॉगिन करू शकता https://tait2022.mahateacherrecruitment.org.in.
  • वर दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Pavitra Teacher Recruitment अशी एक शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांची विंडो ओपन होईल.
  • या होम पेजवर गेल्यानंतर तुमच्यासमोर दोन टॅब दिसतील. त्यापैकी Pavitra – Teacher Recruitment 2022 या टॅब वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक लॉगिन साठी टॅब उपलब्ध करून देण्यात येईल.
  • लॉगिन चा टॅब उपलब्ध झाल्यानंतर त्यावर तुम्ही तुमचे आयडी म्हणजेच रोल नंबर किंवा परीक्षा क्रमांक, तुमचा पासवर्ड आणि दिलेला कॅपच्या एंटर करून तुमचे प्रोफाईल लॉगीन करू शकता.
  •  जर तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक माहिती नसेल, तर तुम्ही तुमचे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT चे स्कोर कार्ड बघू शकता त्यावर तो रोल नंबर दिलेला आहे.
  • जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर Forget Password करून तो नव्याने पुन्हा जनरेट करू शकता.
  • Forget Password केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी व रजिस्टर केलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. लगेच तुमच्या त्या रजिस्टर मोबाईलवर एक OTP येईल आणि तो ओटीपी OTP तिथे एंटर करून खाली दिलेल्या CAPTCHA  टाकायचा आहे.

 

  • त्यानंतर Verify OTP या बटन वर क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड नव्याने जनरेट करू शकता. नव्याने चॉकलेट केलेला पासवर्ड आता तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि यानंतर पुन्हा लॉगिन करताना तोच पासवर्ड टाकायचा आहे.
  • एकदा लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड  ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला दोन टॅब दिसतील. ते टॅब म्हणजे Preference Form (Without Interview) आणि Preference Form (With Interview).
  • आता तुम्हाला Preference Form (Without Interview) या टॅब मधील Generate/ Delete Preferences यावर क्लिक करून तुमचे मुलाखती शिवायचे प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहेत.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल त्यावर तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कॅटेगिरी नुसार सर्व आस्थापनांच्या जागा दिसतील.
  • ही संपूर्ण पीडीएफ तुम्ही वर दिलेल्या डाउनलोड या बटनावर क्लिक करून तुमच्या सिस्टीमवर डाऊनलोड करू शकता.
  • या पीडीएफ मध्ये तुम्हाला काही तक्ते दिसतील त्यात जिल्हा, शिक्षण पातळी, माध्यम, पे स्केल Aid Type, विषय, शिकविण्याचे माध्यम यानुसार सर्व जिल्ह्यांच्या आणि संस्थांच्या मुलाखती शिवाय आलेल्या जाहिराती त्यामध्ये असतील.
  • अशाप्रकारे तुम्ही With Interview Preferences या टॅब वर क्लिक करून मुलाखतीसह चे प्रेफरन्सेस डाऊनलोड करू शकता.
  • वरील दोन्ही पीडीएफ यांचा अभ्यास करून आणि कोणत्या प्रकारे त्यांना  प्राधान्यक्रम द्यायचे हे ठरवल्यानंतरच तुम्ही ते प्राधान्यक्रम लॉक करू शकता.
  • आता प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठीची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
  • प्रेफरन्सेस जनरेट केल्यानंतर ते Save and Next या बटनावर क्लिक करून सेव्ह करायचे आहेत.
  • एकदा जनरेट केलेले प्रेफरन्स हे जास्तीत जास्त तीन वेळा डिलीट करून पुन्हा रीजनरेट करता येतात. शक्यतो प्राधान्यक्रम डिलीट करून रिजन रेट करूच नये.
  • जर काही कारणास्तव किंवा तांत्रिक इशूमुळे तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशन शिवाय प्राधान्यक्रम जनरेट झाले तर ते लॉक करू नयेत.
  • Save Next केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये डिस्ट्रिक्ट, Education Level, Medium असे तीन टॅब दिसतील. त्या तीनही टॅब मध्ये All हा पर्याय ठेवून तुम्ही तुमचे प्रेफरन्सेस सर्च करू शकता.
  • सर्च Preferences केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमचे जनरेट झालेले सर्व प्रेफरन्सेस तुम्हाला दिसतील. या जनरेट झालेल्या प्रेफरन्स मध्ये तुमच्या डाव्या बाजूला एक सिलेक्ट बॉक्स दिला आहे. तुम्ही तुमच्या चॉईस नुसार प्रेफरन्सेस सिलेक्ट करून त्या बॉक्स वर क्लिक करू शकता.
  • तुम्हाला तुमच्या आवडीनुसार प्राधान्यक्रम सिलेक्ट करू शकता. तुम्ही सर्वच्या सर्व प्राधान्यक्रम सिलेक्ट करू शकता किंवा तुम्हाला हवी तीच प्राधान्यक्रम सिलेक्ट करू शकता.
  • आता प्राधान्यक्रम निवडल्यानंतर तुम्ही ते प्राधान्यक्रम Add the Selected Preferences या बटन वर क्लिक करून ऍड करू शकता. त्यानंतर तुम्हाला Save and Next या क्लिक करून ऍड केलेले प्राधान्यक्रम सेव्ह करायचे आहेत.
  • आता तुम्हाला एक नवीन विंडो ओपन झालेली दिसेल ज्या तुम्हाला Assign Preferences करायचे आहेत. यात तुम्ही प्राधान्यक्रम assign, reset आणि sort करू शकता.
  • जर तुम्ही तुम्हाला हवी ती सगळी प्राधान्यक्रम निवडलेली असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना उतरत्या क्रमाने नंबरिंग देऊ शकता.
  • आता तुमच्यासमोर तुम्ही दिलेल्या नंबरिंग नुसार प्राधान्यक्रम यांची यादी दिसेल जर तुम्हाला त्याच्यात बदल करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. बदल करायचा नसेल तर तुम्ही Save and Next करू शकता.

 

  • आता तुमच्यासमोर एक शेवटची विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे. लॉक करण्याआधी तुम्हाला तुम्ही दिलेले प्राधान्यक्रम आणि तुमचा संपूर्ण प्रोफाईल एक वेळा पुन्हा चेक करायचे आहे.
  • संपूर्ण खात्री केल्यानंतर च तुम्ही declaration टॅब वर क्लिक करून तुमचे प्राधान्यक्रम लॉक करू शकता. एकदा प्राधान्यक्रम लोक केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला खूप बारकाईने प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत.
  • लॉक करण्यापूर्वी तुमच्यासमोर एक पॉप अप विंडो येईल त्यावर Yes वर क्लिक करून तुम्ही तुमचे प्रेफरन्सेस शेवटी लॉक करू शकता.
  • तुम्ही कोणत्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले हे भविष्यात पाहण्यासाठी तुम्ही त्याची पीडीएफ डाऊनलोड करून ठेवू शकता.
  • अशाप्रकारे आम्ही आपणास प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगितली आहे. यानुसार तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम नक्कीच लॉक करू शकता.

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT