MH SET 2024 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संधी

MH SET

दरवर्षी महाराष्ट्र आणि गोवा शासन प्राधिकृत आणि युजीसी नवी दिल्ली मान्यता प्राप्त मॉडल एजन्सी मार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच MH SET (State Eligibility Test) ही परीक्षा आयोजित केला जाते. 2024 मध्ये ही परीक्षा 7 एप्रिल 2024 ला घेण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 12 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. जर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन केले असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षात असाल आणि आपणास महाराष्ट्र मधील कोणत्याही वरिष्ठ महाविद्यालय मध्ये सहाय्यक प्राध्यापक व्हायचं असेल किंवा आपल्याला PhD करायची असेल तर आपण MH SET 2024 ही परीक्षा देऊ शकता.

केवळ महाराष्ट्र मध्ये वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक व्हायचे असेल किंवा PhD करायची असेल तर आपण सेट ही परीक्षा देऊ शकता. तसेच UGC NET/ CSIR NET/ MH SET या सर्व परीक्षा वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक यासाठी पात्रता परीक्षा आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य याव्यतिरिक्त भारतात कुठेही वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक व्हायचे असेल तर तुम्ही केंद्राची UGC NET/CSIR NET ही परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. UGC NET/CSIR NET ही परीक्षा सुद्धा आपणास विविध संधी उपलब्ध करून देते जसे की वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता, रिसर्च क्षेत्रात जाण्यासाठी ची संधी, विविध फेलोशिप घेऊन वैज्ञानिक संशोधनास प्रोत्साहन देणारी परीक्षा सुद्धा आपण म्हणू शकतो. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधी जाणून घेण्याआधी आपण सेट या परीक्षेविषयी माहिती घेऊया.

MH SET 2024 ही 32 वी परीक्षा असून शेवटची ऑफलाइन परीक्षा असणार आहे. कारण यापूर्वी एकूण 31 सेट परीक्षा झाल्या ज्या ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. ऑफलाइन पद्धतीने घेतलेल्या सेट परीक्षेमध्ये निकाल लावण्यासाठी बराच वेळ लागायचा परंतु यात आजपर्यंत कोणताही गैरप्रकार आढळून आलेला नाही. परंतु आजच्या कम्प्युटरच्या युगात सेकंदामध्ये जग बदलण्याची क्षमता आज सिद्ध होताना आपल्याला दिसून येते. म्हणूनच कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळाचा वापर करून सोप्यात सोपे नियोजन करणे म्हणजेच सेट ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणे होय. म्हणूनच पुढच्या वर्षीपासून होणाऱ्या सर्व MH SET परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे, त्यामुळे निकाल लवकरात लवकर लागणार सुद्धा मदत होईल. दुसरीकडे कागदांचा वापर कमी झाल्याने पर्यावरण संवर्धनास सुद्धा मदत होईल.

जर तुम्ही महाराष्ट्राची सेट परीक्षा देत असाल किंवा दिली असेल किंवा उत्तीर्ण झाली असेल तर यापुढे काय असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. याच प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला या पेजवर मिळणार आहे. आपणास माहिती आहे की सेट ही परीक्षा एकूण 32 विषयांमध्ये घेतली जाते. 32 विषयांकरिता पहिला पेपर हा कॉमन असतो तर दुसरा पेपर हा त्या विषयावर आधारित असतो. एकूण तीन तासाची ही परीक्षा असून 300 गुणांची ही परीक्षा असते. यापूर्वी आपण MH SET 2024 परीक्षा याची संपूर्ण माहिती, ऑनलाइन अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता आणि उत्तीर्ण होण्याची पात्रता याविषयीची संपूर्ण माहिती बघितली आहे. परंतु आता इथे आपल्याला ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधी यांच्या विषयी माहिती जाणून घ्यायची आहे. सेट परीक्षेचे नियम सुद्धा आपण बघितलेले आहेत आणि या नियमांचे पालन करून जर आपण ही परीक्षा उत्तीर्ण झालो असेल तरच या परीक्षेचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल अन्यथा नाही.

Job Opportunities After Qualifying MH SET 2024 Exam | MH SET 2024 परीक्षा उत्तीर्ण केल्यावर उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधी

  • महाराष्ट्र सरकार आणि गोवा सरकार यांची राज्यसंस्था म्हणून निवड केली गेली आणि UGC ने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना MH SET ही परीक्षा घेण्याची परवानगी दिली.
  • दरवर्षी ही परीक्षा एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमध्ये 32 विषयांमध्ये घेतली जाते. या परीक्षेकरिता उत्तीर्ण होण्याचा प्रवर्गानुसार आणि विषयानुसार क्रायटेरिया ठरलेला आहे.
  • या क्रायटेरियानुसार सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार हे महाराष्ट्र मधील विविध विद्यापीठ किंवा विद्यापीठ यांच्याशी संलग्नित असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र ठरतात.
  • सेट परीक्षा उत्तीर्ण करण्यासोबतच यूजीसी ने दिलेली सहाय्यक प्राध्यापक या पदासाठीची नियमावली सुद्धा पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सदर उमेदवार महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे ही त्या विषयांमध्ये PhD/संशोधन करू शकतो किंवा PhD करण्यास पात्र ठरतो.
  • सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची फेलोशिप मिळत नाही. परंतु महाराष्ट्र मध्ये कोणत्याही वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी ची पात्रता पूर्ण होते.
  • तुम्ही ज्या राज्यातील ज्या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्याच विषयात आणि त्याच राज्यात असिस्टंट प्रोफेसर म्हणजेच सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र ग्राह्य धरल्या जातात.
  • ही परीक्षा राज्यस्तरावर घेण्यात येते त्यामुळे या परीक्षेची काठीने पातळी केंद्रस्तरावर होणाऱ्या परीक्षेपेक्षा थोडीफार कमी असते. तसेच या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे मिळालेले गुण कपात होण्याची भीती नसते.
  • मुख्य म्हणजे सेट ही परीक्षा महाराष्ट्र राज्य मध्ये 32 विषय मधे एकाच वेळी आणि एकाच दिवशी घेतल्या जाते. पेपर एक हा दोन्ही भाषांमध्ये म्हणजेच मराठी आणि इंग्लिश या भाषांमध्ये असतो आणि तो सर्वांसाठी कॉमन असतो. आणि पेपर दोन हा प्रत्येक विषयासाठी वेगळा असतो. हे सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचे फायदेच आहेत केंद्रीय परीक्षेपेक्षा.
  • तसेच राज्यस्तरावर घेण्यात येणाऱ्या सेट परीक्षेची फीस ही केंद्रस्तरावर घेण्यात येणाऱ्या चाचणी परीक्षा पेक्षा कमीच असते. आणि महाराष्ट्र सेट परीक्षेचे केंद्र हे महाराष्ट्र मधील एकंदरीत 17 जिल्हे असल्याने उमेदवारांची प्रवासाची धावपळ होत नाही.
  • सेट परीक्षा आपणास महाराष्ट्र मधील कोणत्याही वरिष्ठ महाविद्यालयात किंवा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक बनण्यासाठी पात्र ठरवते. जरी सेट परीक्षा मार्फत उपलब्ध होणाऱ्या संशोधनाच्या संधी कमी असल्या तरीही आपल्याच राज्यात पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर नोकरीच्या संधी उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर सेट ही परीक्षा महत्त्वाची ठरेल.
  • तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये विविध विभागामार्फत सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती म्हणजेच शासकीय महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांची जेव्हा भरती केल्या जाते तेव्हा MH SET ही पात्रता परीक्षा ग्राह्य धरण्यात येते.
  • अशाप्रकारे MH SET परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र मधील विविध विभागात, विविध विद्यापीठ मध्ये, विविध वरिष्ठ महाविद्यालयात किंवा अन्य शासकीय विभागात पदोन्नती मिळविण्यासाठी सुद्धा सेट परीक्षा उत्तीर्ण करणे महत्त्वाचे आहे.
  • जर आपण कोणत्याही क्षेत्रात शासकीय नोकरी करत असाल आणि आपले पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल आणि त्या विषयातच तुम्ही सेट परीक्षा उत्तीर्ण असाल किंवा त्या विषयात तुम्ही PhD पूर्ण केली असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रात नक्कीच पदोन्नती करिता अनेक मार्ग मोकळे होतात.

एकंदरीत पदोन्नतीचे मार्ग सेट परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे सुकर बनतात किंवा जलद होतात असे आपण म्हणू शकतो.

अशाप्रकारे राज्यस्तरावर घेण्यात येणारी सेट परीक्षा उत्तीर्ण गेल्यानंतर आपणास करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतात. तसेच आपण शासकीय सेवेत असलो तरीही ह्या परीक्षेमुळे आपणास पदोन्नतीची हमी लवकर मिळते.

जर आपण विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल, नोकरीच्या शोधात असाल किंवा आपणास नवनवीन अपडेट्स एका क्लिकमध्ये तात्काळ आणि जलद हवे असतील, तर आमचे टेलिग्राम चैनल Mahasarkar नक्कीच जॉईन करा. आमचे पेज लाईक करा आणि फोन करा. जेणेकरून रोजच्या रोज होणाऱ्या घडामोडी आणि करिअरच्या संधी तुमच्या पर्यंत काही क्षणातच पोहोचतील. स्पर्धेच्या या युगामध्ये एक पाऊल पुढे राहण्यासाठी नक्कीच आमचे पेज फॉलो करा.

Also See: Why Maha SET Exam is Required?


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT