जिल्हा रुग्णालय, औध,पुणे-२७ ए.एन.एम (A.N.M) प्रशिक्षण प्रवेश प्रकिया २०२३-२४

जिल्हा रुग्णालय, औध,पुणे-२७ ए.एन.एम (A.N.M) प्रशिक्षण प्रवेश प्रकिया २०२३-२४

आपल्या देशातील विविध विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्स मध्ये आपले करिअर करण्यास इच्छुक असतात. काही मुले इंजिनीअरिग मध्ये, काही वैद्यकशास्त्र मध्ये, तर काही विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बघत असतात. त्यासाठी आपण आज ए.एन.एम (A.N.M) या कोर्स विषयी माहिती पाहूया.

राज्यातील मुले दहावी किवा बारावी नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्यास उत्सुक असतात. ए.एन.एम (A.N.M) हा कोर्स बारावी नंतर केला जातो. ए.एन.एम (A.N.M) हा वैद्यकीय (Medical) क्षेत्रातील कोर्स आहे. आपल्या सरकारी किवा विविध रुग्णालयात डॉक्टर काम करत असतात. त्यांना मदत करण्यासाठी विविध कर्मचारी,विविध सहाय्यक परिचारिका असतात. या सहाय्यक परिचारिका या ए.एन.एम (A.N.M) कोर्स करूनच बनलेल्या असतात. ए.एन.एम (A.N.M) चा longform आहे Auxiliary Nursing Midwifery (A.N.M). हा कोर्स उत्तीर्ण होणार्या परीक्षार्थींना रुग्णालयातील विविध कामे करावी लागतात जसे रुग्णांच्या नोंदी ठेवणे, त्यांना वेळेवर औषधे देणे, रुग्णांची देखभाल करणे.

ए.एन.एम (A.N.M) हा कोर्स फक्त महिलांसाठी आहे यामध्ये पुरुष येत नाही. पुरुष G.N.M कोर्स करू शकतात. ए.एन.एम (A.N.M) या कोर्स चा कालावधी हा २ वर्षाचा असतो यामध्ये पहिले १.५ वर्षे सर्व पदाविषयी ज्ञान दिले जाते. व शेवटचे ६ महिने इंटरशीप विविध रुग्णालयात करावी लागतात.

ए.एन.एम (A.N.M) या कोर्स साठी पात्रता:

i) उमेदवार हा बारावी विज्ञान (science) या शाखेतून (Physics, Chemistry, Biology) या विषयांसह ४५% गुणासह उत्तीर्ण झालेली असावी.

ii) उमेद्वाराविरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद व न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असू नये.

ए.एन.एम (A.N.M) या कोर्स साठी अर्ज प्रक्रिया:

i) उमेदवाराने अर्ज ऑनलाईन किवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.

ii) अर्जासोबत १२ वी उत्तीर्ण चे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला तसेच त्यांचा साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.

iii) विविध आरक्षणानुसार राखीव जागांची तरतूद महाविद्यालयाने केलेली असेल.

ए.एन.एम (A.N.M) या कोर्स साठी निवड प्रक्रिया:

i) केलेल्या अर्जानुसार निवड प्राधिकरण उमेदवारांना प्राप्त बारावीच्या गुणानुसार निवड यादी आरक्षणानुसार प्रसिद्ध करेल.

ii) निवड यादीतील उमेदवाराने आपले अडमिशन पूर्ण करून घ्यावे.

iii) निवडी बाबत निवड समितीचा निर्णय अतिम असेल.

Important Links:

वयोमर्यादा: उमेदवार हा १७ ते ३५ वर्षे दरम्यान असावा.

अर्ज मिळण्याचे ठिकाण: दि. १६/११/२०२३ ते २०/११/२०२३ दरम्यान सकाळी १० ते ५ या वेळेत परिचर्या प्रशिक्षण प्रशाला, तिसरा मजला, उरो रुग्णालय, सांगवी फाटा,औध,पुणे-२७.

अर्ज कालावधी: दि. १६/११/२०२३ ते २१/११/२०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत.

अर्ज शुल्क: खुल्या प्रवर्गासाठी ४००रु. आणि राखीव प्रवर्गासाठी २००रु.

प्रमाणपत्र पडताळणी: दि. २३/११/२०२३ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत.

ANM Admission


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT