AMRUT: Academy of Maharashtra Research, Upliftment and Training/अमृत: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी

maha govt

ज्याप्रमाणे ओबीसी OBC करिता महाज्योती योजना, एस सी SC करिता barti योजना आणि कुणबी मराठा यांच्याकरिता सारथी योजना या योजना महाराष्ट्र मध्ये राबवल्या जातात. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वीच खुल्या प्रवर्गातील म्हणजेच ओपन OPEN आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच ईडब्ल्यूएस EWS मधील विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी अमृत AMRUT ही नवीन स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली आहे.

ही योजना अमलात आणण्यासाठी नवीन स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा महाराष्ट्र शासनाचा जीआर GR 13 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला.

बार्ती, सारथी आणि महा ज्योती या संस्थांच्या धरतीवर खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील तरुण-तरुणांकरिता विविध उपक्रम, कार्यक्रम इत्यादी राबवले जाऊन व अशा अनेक माध्यमातून विद्यार्थी आणि युवकांचा विकास घडविण्यासाठी AMRUT – अमृत या नावाने नवीन स्वायत्त संस्था स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली. यात नमूद केल्याप्रमाणे BARTI, SARTHI आणि महाज्योती या संस्थांच्या धरतीवर ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग किंवा संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांकरिता विविध उपक्रम कार्यक्रम इत्यादी राबविण्यात यावे आणि इतर माध्यमातूनही अशा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी – अमृत AMRUT – Academy of Maharashtra Research, Upliftment and Training या नावाने नवीन संस्था स्थापन करण्यात साठी मान्यता देण्यात आली.

AMRUT योजनेची उद्दिष्टे

अमृत ही स्वार्थ संस्था महाराष्ट्र मधील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता आणि त्यांच्या सर्वांगीण विकास होण्याकरिता एक विश्वासनीय आणि प्रगतिशील समाज याची पुनर्निर्मिती करण्यासाठी आणि समाजामध्ये शांती आनंद आणि समृद्धी प्रस्थापित करण्यासाठी या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. अमृत या स्वायत्त संस्थेचे ब्रीदवाक्य समर्थ व्यक्ती ते समर्थ ग्राम, ते समर्थ भारत असे आहे.

अमृत या स्वायत्त संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. या योजनेत संपूर्ण महाराष्ट्र मधील खुल्या प्रवर्गामधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना संशोधन तसेच विविध योजना आणि उपक्रम, रोजगार मेळावे राबवून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे संघटन करणे, त्यांना स्वाभिमानी बनवणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्या घटकाला समाजामध्ये उच्च स्थान प्राप्त करून देणे हे उद्दिष्ट अमृत या स्वायत्त संस्थेचे आहे. त्यासाठी विविध योजना, कार्यक्रम, नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करून विविध क्षेत्रातील विविध विद्यार्थ्यांना असे प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन त्यांचे कौशल्य, त्यांचे ज्ञान आणि त्यांची विकास करण्याची पातळी वाढवणे यासाठी अमृत स्वायत्त संस्थेद्वारे विविध प्रशिक्षण शिबिर राबवले जातात.

अमृत या स्वायत्त संस्थेद्वारा महाराष्ट्र मधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी याचे प्रशिक्षण, तसेच मुलाखतीचे प्रशिक्षण याची मोफत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही स्वायत्त संस्था घेत असते. त्यात खालील काही योजना राबवल्या जातात.

१.) महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC च्या राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा मुलाखतीच्या तयारीसाठी उमेदवारांना अर्थसहाय्य देणे.

२.) संघ लोकसेवा आयोग UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा किंवा मुलाखतीच्या तयारीसाठी उमेदवारांना अर्थसहाय्य देणे.

३.) कौशल्य विकासाच्या (Skills Upliftment)आधारे नोकरीची संधी उपलब्ध करून देणे.

४.) स्वावलंबी नवउद्योजक बनविण्यासाठी लघुउद्योग प्रशिक्षण

५.) कृषी आधारित उद्योगासाठी प्रशिक्षण

६.) AIIMS, IIM, IIT, IIIT येथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य

त्यापैकी पहिली योजना आणि त्याचे लाभ आपण खाली डिटेल्स मधे पाहूया.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC च्या राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा मुलाखतीच्या तयारीसाठी उमेदवारांना अर्थसहाय्य देणे

वरील योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र मधील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील EWS मधील जे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC याची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील आणि जे मुख्य परीक्षेची तयारी करत असतील अशा उमेदवारांना 15 हजार रुपये आणि तसेच जे उमेदवार ही मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्या मुलाखतीला आणि त्याच्या तयारीसाठी त्यांना 25000 रुपये अर्थसाहाय्य देण्याची तरतूद या योजनेत केली आहे.

लाभाचे स्वरूप:

  • पूर्व परीक्षा (Prelim) उत्तीर्ण असून मुख्य परीक्षेची (Mains) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ हजार रुपये मदत.
  • मुख्य परीक्षा (Mains)उत्तीर्ण झाले असून मुलाखतीची (Interview) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २५ हजार रुपये मदत.

📌वरील लाभाचे कार्यकाळ किंवा कालावधी हा पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यापासून तर मुख्य परीक्षा होईपर्यंतचा असेल आणि मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यापासून तर मुलाखत होईपर्यंतचा कालावधी गृहीत धरण्यात येईल आणि हा संपूर्ण कालावधी महिन्यांमध्ये गृहीत धरण्यात येईल.

संपूर्ण महाराष्ट्र मधील लोकसेवा आयोग MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा ची तयारी करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांमधील EWS विद्यार्थ्यांसाठी ही योजना असून त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी पात्र होण्यासाठीचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. आणि ते निकष खालील प्रमाणे आहेत.

पात्रता निकष:

📌वरील योजना ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ची राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या म्हणजेच पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या, तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि इंटरव्यू ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असल्याने.

📌 सदर विद्यार्थ्याने पूर्व परीक्षा उत्तीर्ण असल्याचे एम पी एस सी चे निकालाचे प्रत किंवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण असल्याचे एमपीएससीचे निकालाचे प्रत सादर करणे आवश्यक असेल.

📌 सदर योजना संपूर्ण महाराष्ट्र मधील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल EWS घटकांसाठी असल्याने सदर उमेदवारांनी त्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये आठ लाखाच्या आत असल्याचे पुरावे सादर करावे लागेल. त्याकरिता सदर लाभार्थ्याने सक्षम प्राधिकारी यांच्याकडून उत्पन्नाचे त्या वर्षाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.

📌 सदर उमेदवाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि ते सादर करणे गरजेचे आहे.

📌 सदर विद्यार्थ्याला मिळणाऱ्या मानधनासाठी त्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि त्या बँक खात्याशी सदर विद्यार्थ्यांचे आधार संलग्नित केलेले असणे आवश्यक आहे.

 निवडीचे निकष:

📌 सदर उमेदवारांनी दिलेले नियम, अटी व शर्ती यांचे पालन करून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. तसेच तो उमेदवार दिलेल्या वयोमर्यादा मध्ये पात्र असणारा हवा. एकदा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जो प्रथम येईल त्यास प्राधान्य राहील आणि विद्यार्थ्यांची निवड ही छाननी समिती द्वारे करण्यात येईल आणि ती त्यांच्या मान्यतेच्या अधीन राहून अंतिम असेल. जर आवश्यकता पडल्यास छाननी समिती चाळणी परीक्षा सुद्धा घेण्याची नियोजन करू शकते.

📌 या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड ही अमृत स्वायत्त संस्थेद्वारे स्थापन केलेल्या समिती द्वारा करण्यात येईल आणि त्यांचा निर्णय अंतिम निर्णय असेल त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही.

ज्या प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र मधे BARTI मार्फत अनुसूचित जाती SC, आणि महज्योटI मार्फत OBC आणि NT प्रवर्ग, तसेच SARTHI मार्फत कुणबी, मराठा, मराठा – कुणबी आणि कुणबी – मराठा मधील होतकरू, मेहनती आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना, उपक्रम, राबविले जातात आणि प्रशिक्षण दिले जाते जसे की MPSC, UPSC, पोलिस भरती, संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या साठी, NET SET च अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, JEE/MH CET करीता पूर्व प्रशिक्षण आणि विविध कौशल्य विकसित करण्यास विविध व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि आर्थिक सहाय्य म्हणजेच फेलोषीप/विद्यावेतन दिले जाते. अशाच प्रकारे खुल्या प्रवर्गातील (OPEN) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) मधील पात्र ठरलेल्या, नियम अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या, तसेच निवडीचे निकष पूर्ण करणाऱ्या आणि दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमृत या योजनेमार्फत एमपीएससी MPSC, यूपीएससी UPSC , पोलीस भरती, संशोधन, कौशल्य विकास यासाठीचे मोफत प्रशिक्षण दिले जाते व आर्थिक सहाय्य सुद्धा केले जाते. तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी विविध रोजगार मेळावे आयोजित केले जातात. इतर सरकारी नोकर भरती मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला (EWS)आरक्षण तर दिले जातेच, परंतु या आर्थिक दुर्बल घटकातील समाज सर्व स्तरातून समोर यावा, त्याचा विकास व्हावा आणि उच्च शिक्षणासाठी या समाजातील विद्यार्थी सुद्धा अग्रेसर व्हावे त्यासाठी त्यांना आर्थिक मदत दिली जाते.

संघ लोकसेवा आयोग UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा किंवा मुलाखतीच्या तयारीसाठी उमेदवारांना अर्थसाहाय्य देणे:

📌 या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र मधील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील EWS असे विद्यार्थी जे संघ लोकसेवा आयोगाची UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा Prelim उत्तीर्ण झालेले आहेत आणि ते मुख्य Mains परीक्षेच्या दृष्टीने तयारी करत आहेत. तसेच जे विद्यार्थी मुख्य परीक्षा Mains उत्तीर्ण झालेले आहेत आणि ते आता मुलाखतीची Interview तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या महिनाअखेरपर्यंत किंवा मुलाखतीच्या महिनाअखेरपर्यंत विद्या वेतन दिले जाते.

योजनेच्या लाभाचे स्वरुप:

ही योजना संपूर्ण महाराष्ट्र मधील खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यूएस प्रवर्गातील जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग ची नागरी सेवा पूर्व परीक्षा पास झाले असतील आणि ते आता मुख्य परीक्षेची तयारी करत असतील असे विद्यार्थी किंवा जे विद्यार्थी नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील आणि ते आता मुलाखतीची तयारी करत असतील अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलाखतीच्या किंवा परीक्षेच्या शेवटच्या तारखेपर्यंत विद्यावेतन दिले जाते म्हणजेच अर्थसहाय्य दिले जाते जेणेकरून कोणत्याही आर्थिक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि ते आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचतील.

योजनेचा कार्यकाल:

📌 जर विद्यार्थी पूर्व परीक्षेची तयारी करत असेल तर पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तो विद्यार्थी मुख्य परीक्षा देईल यादरम्यान चा पूर्ण कालावधी महिन्यांमध्ये गृहीत धरला जाऊन त्याला त्याप्रमाणे विद्यावेतन दिली जाईल. तसेच जर विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि तो आता मुलाखतीची तयारी करत असेल तर त्याची मुख्य परीक्षा झाली तेव्हापासून तर मुलाखत होईपर्यंत चा जो कालावधी असेल या कालावधीला महिन्यांमध्ये गृहीत धरून त्याप्रमाणे विद्यावेतन दिले जाते.

📌 या योजनेकरिता फक्त खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग ची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील किंवा मुलाखत साठी पात्र असतील अशाच विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याची नियम आहेत.

पात्रता निकष:

📌 सदर योजनेसाठी पात्र असण्याकरिता सदर उमेदवार आणि खालील निकष पूर्ण करायला हवे तरच तो उमेदवार या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येईल अन्यथा कोणत्याही टप्प्यात त्या विद्यार्थ्यांनी पात्रतेचे निकष पूर्ण केले नसतील तर त्याला या योजनेतून संपूर्णतः बाद करण्यात येईल आणि त्या विद्यार्थ्यावर केलेला संपूर्ण खर्च त्याच्याकडून घेण्यात येईल.

📌 सदर उमेदवार हा संघ लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा किंवा संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे तो विद्यार्थी संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षेची तयारी करणारा असावा किंवा संघ लोकसेवा आयोगाची मुलाखतीची तयारी करणारा असावा तरच तो या योजनेस पात्र धरल्या जाईल.

📌 सदर उमेदवार खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच ईडब्ल्यूएस मधील असून त्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या कमी असायला हवे आणि त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकारी यांचे उत्पन्नाचे त्याच वर्षीचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल.

सदर उमेदवारा जवळ अचूक आणि व्हॅलिड आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

📌 सदर उमेदवाराचा आधार क्रमांक त्याच्या बँक खात्याशी संलग्नित असणे सुद्धा आवश्यक आहे जेणेकरून दरमहाचे विद्यावेतन दिले जाईल ते त्याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाईल.

📌 या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या म्हणजेच वरील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी वयोमर्यादेच्या अटी आणि शर्ती सुद्धा पालन करणे गरजेचे आहे. वरील सर्व अटी ची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराने दिलेल्या नमुन्यामध्ये ऑनलाईन अर्ज करणे आणि तो वेळेत करणे आवश्यक आहे. तसेच जाहिरात एकदा प्रसिद्ध झाल्यावर जो विद्यार्थी प्रथम प्राधान्य देईल त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल आणि जर गरज पडल्यास छाननी समितीकडून अंतिम निर्णय तो घेण्यात येईल. जर छाननी समिती इच्छा झाली तर चाळणी परीक्षा सुद्धा घेण्यात येईल आणि त्या चाळणी परीक्षेत वरून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून गुणवत्तेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

📌 वरील सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्याला अमृत या स्वायत्त संस्थेद्वारे सदर योजना दिल्या जाईल आणि सदर विद्यार्थ्यांची निवड ही अमृत द्वारे गठीत केलेल्या समितीद्वारे करण्यात येईल यात अन्य कुणाचा हस्तक्षेप नसेल.

अशाप्रकारे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील होतकरू आणि मेहनती विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी चे प्रोत्साहन आणि आर्थिक सहाय्य हे अमृत या स्वायत्त संस्थेद्वारे दिले जाते. या दुर्बल घटकातील विद्यार्थी सरकारी क्षेत्रात सर्वोच्च पदावर कार्यरत व्हावे आणि त्यांच्या समाजाला उच्च स्तरावर घेऊन जावे यासाठी या घटकातील विद्यार्थ्यांना barti, सारथी महाजोती च्या धरतीवर अर्थसहाय्य दिले जाते.

समाजातील काही घटकच किंवा काही प्रवर्ग सरकारी नोकऱ्यांचा लाभ मिळू शकतील असे नाही किंवा जो प्रवर्ग उच्चस्तरावर गेला आहे तोच प्रवर्ग उच्च स्तरावर जावत राहावा असे न होता सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी तसेच त्यांना कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी अमृत या संस्थेद्वारे प्रोत्साहन आणि आर्थिक सहाय्य दिले जात.

 स्वावलंबी नवुद्योजक बनविण्यासाठी लघुउद्योग प्रशिक्षण:

📌आपण पाहतो की समाजामध्ये प्रत्येक प्रवर्गातील व्यक्ती शिक्षण घेण्यास सक्षम नाही किंवा प्रत्येकाची क्षमताही त्या स्तराची नसते. प्रत्येकाला शिक्षणात आवड असेल असे नाही काहींना उद्योगांमध्ये सुद्धा आवड असू शकते किंवा त्यात ते वेगळ्या पद्धतीने आपले कौशल्य प्रस्थापित करू शकतात. अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि नवनवीन उद्योग स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. यात विविध लघुउद्योग यांचा समावेश होतो. जर समाजातील सर्वच घटक सरकारी नोकऱ्यांच्या मागे लागले तर उद्योग व्यवसाय मागे पडतील आणि कुठेतरी ही साखळी कोलमडला लागेल. म्हणून खाजगी नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या, त्यासोबतच विविध उपक्रम, नवनवीन उद्योग, व्यवसाय उदयास येणे आणि त्यांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची कौशल्य त्यांच्यात निर्माण करणे यासाठी विविध स्तरावरून आर्थिक सहाय्य करण्यासाठी अमृत ही स्वायत्त संस्था नेहमीच उत्सुक असते.

📌 फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर उद्योग क्षेत्रातही नवनवीन संकल्पना उपक्रम यांना प्राधान्य देण्यासाठी स्वायत्त संस्थेद्वारे लघुउद्योजक यांना प्रशिक्षण दिले जाते आणि आर्थिक सहाय्य सुद्धा केले जाते.

📌 शिक्षणाकडे वळणारे विद्यार्थी हे जास्तीत जास्त शहरी भागातील असतात. परंतु ग्रामीण भागातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक हे व्यवसायाकडे किंवा शेतीकडे जास्त वळलेले असतात.  अशा होतकरू आणि मेहनती विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या प्रगतीमध्ये भर टाकण्यासाठी स्वायत्त संस्थेद्वारे आर्थिक सहाय्य आणि वेळोवेळी प्रशिक्षण दिले जात.

कृषी आधारित उद्योगासाठी प्रशिक्षण:

📌 अमृता स्वायत्त संस्थेद्वारे संपूर्ण महाराष्ट्र मधील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील होतकरू आणि मेहनती उमेदवार जे शेती करू इच्छितात आणि शेतीमध्ये विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे उत्पादन वाढवू शकता अशा विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राशी निगडित उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते आणि आर्थिक सहाय्य सुद्धा केले जाते.

📌आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणजे संपूर्ण भारत देश हा शेतीवर अवलंबून असून ग्रामीण भागात जास्तीत जास्त लोक हे शेतीकडे वळले आहेत हे आपल्याला दिसून येते. म्हणून ग्रामीण भागातील शेतीकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांची प्रगती व्हावी तसेच देशाच्या कृषी क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी अशा विद्यार्थ्यांना शेतीचे प्रशिक्षण दिले जाते.

📌 इतकेच नव्हे तर शेतीला पूरक असे उद्योग जसे की शेळी पालन मेंढी पालन पॉलिहाऊस चा वापर करून शेती करणे आणि अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान वापरून आपली शेती कशी विकसित करावी आणि त्याच्याशी निगडित उद्योग कसे भरभराटीला आणावे यासाठीचे प्रशिक्षण सुद्धा अमृत या स्वायत्त संस्थेद्वारे दिली जाते.

📌 अशाप्रकारे शिक्षणासोबतच निरनिराळ्या क्षेत्रातील म्हणजेच उद्योग, व्यवसाय, शेती, आधुनिक तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर सुद्धा भर दिली जाते आणि सर्वच क्षेत्राशी निगडित असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

AIMS, IIM, IIT, IIIT येथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य:

📌 या योजनेद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी जे भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मान्यताप्राप्त ए आय आय एम एस AIIMS ,आय आय एम IIM, आय आय टी IIT, आय आय आय टी IIT यासारख्या नामांकित आणि प्रसिद्ध संस्थांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका पूर्ण वेळ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना त्यांचा सदर शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य किंवा विद्या वेतन दिले जाते.

📌 अशा विद्यार्थ्यांची निवड ही अमृत या स्वायत्त संस्थेने गठीत केलेल्या समितीद्वारेच करण्यात येते. सदर पात्र उमेदवारांनी दिलेल्या अटी नियम व शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे तरच त्यांना या योजनेसाठी गृहीत धरण्यात येते. या प्रकारे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांना संपूर्ण भारत देशातील नामांकित संस्थेमध्ये त्यांचे उच्च शिक्षण संशोधन पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी अमृत या स्वायत्त संस्थेकडून आर्थिक मदत केली जाते.

अशाप्रकारे वरील सर्व योजना या अमृत या स्वायत्त संस्थेद्वारे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिल्या जातात जेणेकरून याच प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या उमेदवारांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची गरज आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अमृत ही स्वायत्त संस्था त्यांच्या पंखात बळ देण्याचे  काम करते असे आपण म्हणू शकतो. जर आपणास अशाच प्रकारच्या विविध योजनांचा विविध प्रवर्गातील योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणते निकष, कोणत्या पात्रता, निवडीचे निकष, लाभ, लाभाचा कालावधी, शैक्षणिक पात्रता या सर्वांची जलद आणि तात्काळ माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचे पेज फॉलो करू शकता. तसेच या सर्व योजनांचे ऑनलाईन अर्ज सुरू होण्यापासून तर त्यांची शेवटची तारीख येईपर्यंत वेळोवेळी निघालेले सर्व प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सहजपणे उपलब्ध होण्यासाठी तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनेल फॉलो करू शकता तसेच आमच्या पेजला लाईक करू शकता.

जगासोबत स्वतःला संपर्कात ठेवण्यासाठी आणि जगातील लोकांसोबत धावत राहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेल ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि एक पाऊल पुढे ठेवून तात्काळ माहिती मिळवा.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT